कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात – 

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखगारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. 

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. 

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. 

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.  

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला-क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन          

Leave a comment