प्रश्न |
तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. |
उत्तर
|
i) कालप्रवाहात विविध विचारसरणींचा उगम होत असतो. ii) या विविध विचारसरणींचा समाजावर विविध काळात कमी-जास्त प्रभाव पडलेला असतो. iii) या विविध विचारसरणींचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या, यांचा शोध घेण्याची गरज असते. iv) या विचारसरणींच्या वाटचालींचा, त्यांच्या विकास-विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. |