प्रश्न |
वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. |
उत्तर
|
पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात – i) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात. ii) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो. iii) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. iv) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. v) हस्तोदयोग, कुटीरोदयोग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. vi) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. vii) विविध प्रकारचे भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. viii) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते.. ix) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. x) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांधिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो. |