प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी

प्राण्यांचे वर्गीकरण



1. ओळखा पाहू, मी कोण ?

अ. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही, मी कोणत्या संघातील प्राणी आहे ?

उत्तर :
सिलेंटराटा संघ. 

आ. माझे शरीर सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा संबोधतात. माझे नाव काय ?

उत्तर :

तारामासा 

इ. मी तुमच्या लहान आतडयामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल ?

उत्तर :
गोलकृमी प्राणीसंघ

ई. मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा. 

उत्तर :

रंध्रीय प्राणीसंघ

2. प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. 

रोहू मासा, नाकतोडा, हत्ती, पेंग्वीन, सुसर, टोड, उडणारा सरडा, हुक वर्म, जेलीफिश, गोम

उत्तर :

1) रोहू मासा :

i) हा प्राणी पूर्णपणे जलचर असून, जलीय जीवनासाठी अत्यंत अनुकूलित आहेत. 

ii) शरीर दोन्ही टोकाला निमुळते व खरखरीत असते. कारण त्यावर खवल्याचे आच्छादन असते. 

iii) श्वसनासाठी आच्छादित अथवा अनाच्छादित कल्ले असतात. पाण्यात पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात व पुच्छपराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो. हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते. 

iv) हा शीत रक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. 

v) यांना अस्थिमय व कास्थिमय अंतःकंकाल असते.

2) नाकतोडा :

i) ऑरथॉप्टेरा गणातील अँक्रिडिडी व टेट्टीगोनिडी कुलांमधील कीटकांना सामान्यतः नाकतोडे म्हणतात. 

ii) नाकतोडे मुख्यत्वेकरून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आढळून येतात. 

iii) हे विविध रंगाचे असून काळसर, पिवळे, वाळलेल्या गवताच्या रंगाचे किंवा शरीरावर रंगीत पट्टे असलेले सामान्यत: आढळतात. 

iv) हा शीत रक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. त्यांच्यापैकी बहुतेक सर्वच कीटकांना पूर्ण वाढलेल्या, चामड्यासारख्या लवचिक पंखांच्या दोन जोड्या असतात. परंतु काही पंखहीन किंवा नाममात्र पंख असलेलेही असतात. 

v) त्यांची मुखांगे चर्वणास उपयुक्त असून त्यांच्या शेवटच्या पायांची जोडी उडी मारण्यासाठी रूपांतरित झालेली असते. 

vi) नाकतोडे पिकांची हानी करतात. पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही याच प्रकारात येते. 

vii) मादीस खुरपाच्या वा तलवारीच्या आकाराचा लांब अंडनिक्षेपक असतो.

3) हत्ती :

i) हा दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणाऱ्या प्राण्यांच्या सस्तन प्राणीवर्गात मोडतो. 

ii) हा प्राणी उष्णरक्ती असतो. 

iii) डोके, मान, धड़ व शेपूट हे शरीराचे भाग असतात. 

iv) अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. 

v) बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. 

vi) शरीरावर केस स्वेदग्रंथी व तैलग्रंथी असतात. 

vii) एकलिंगी व जरायुज असतात. परंतु या वर्गात येणारे अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटीपस व एकडिना होय. 

viii) जरायुज प्राणी म्हणजे पिल्लाला जन्म देणारे. 

ix) हृदयाला चार कप्पे असतात. 

x) हालणारा जबडा, हालणारा बाह्यकर्ण, डोळ्यांची पापणी हालते. 

xi) छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. 

xii) स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनीनिर्मिती करू शकतात.

4) पेंग्वीन :

i) हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. 

ii) हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. 

iii) हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. 

iv) अग्रउपांगे (Forelimbs) पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. 

v) बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते. 

vi) जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. 

vii) फुफ्फुसाद्वारे श्वसन होते. 

viii) हृदय चार कप्प्यांचे असते.

5) सुसर :

i) प्राणी-उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. 

ii) हे प्राणी शीतरक्ती असतात. 

iii) शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. 

iv) त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 

v) शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. 

vi) बाह्यकर्ण नसतो. 

vii) अंगुलींना नखे असतात. 

viii) एकलिंगी, अंडज असतात व फलन शरीरांतर्गत होते.

6) टोड :

i) हे प्राणी त्यांच्या डिंब-अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतात.

ii) उपांगांच्या दोन जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. 

iii) बाह्यकंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. 

iv) बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. 

v) मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. 

vi) यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते.

vii) यांच्या अंगावर श्लेष्मल ग्रंथी (Mucosa) असल्याने ते कायम ओलसर असतात. 

viii) यांच्यात बायफलन घडून येते.

7) उडणारा सरडा :

i) सरडा हा भूचर होऊन ही सरपटणारा प्राणी आहे.

ii) हे प्राणी शीतरक्ती असतात. 

iii) यांचे पाय कमकुवत असतात. 

iv) याची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 

v) शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. 

vi) याला उडण्यासाठी पापुद्र्यासारखे त्वचेचे पडदे असते.

8) हुकवर्म :

i) या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, द्विपार्श्वसममित, लांबट व दंडाकृती असते. 

ii) बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असून, एकलिंगी असतात. 

iii) शरीरात आभासी देहगुहा असते यांना सुडोसिलोम म्हणतात. 

iv) मुखापासून सुरू होऊन गुद्दद्द्वारापर्यंत जाणारी पचननलिका असते. 

v) यापैकी बहुसंख्य प्राणी माणसांमध्ये रोग निर्माण करतात. 

9) जेलीफिश :

i) हे जलवासी प्राणी असून, त्यापैकी बहुतेक समुद्रात आढळतात. 

ii) हे अरिय सममित व द्विस्तरी असतात. 

iii) देह गुहा असते. 

iv) शरीराला एक मुख असून, त्याभोवती संवेदनाक्षम शुंडके असतात. 

v) साधारणत: यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने होते.

10) गोम :

i) हे सार्वत्रिक आढळणारे त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित असून प्रचलनासाठी यांना संधियुक्त उपांगे असतात. प्राण्यांमधील हा सर्वांत मोठा संघ आहे. 

ii) त्यांचे शरीर खंडीभूत असून त्यावर कायटिनयुक्त बाह्यकंकालाचे आच्छादन असते. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. कीटकांना उडण्यासाठी पंखाच्या दोन जोड्या व उपांगांच्या तीन जोड्या असतात 

iii) एकलिंगी असून, लैंगिक प्रजनन करतात.

3. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत. 

उत्तर :

i) वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. 

ii) ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. 

iii) विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले. 

iv) ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला ‘कृत्रिम पद्धत’ म्हणतात. 

v) त्यांच्या व्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. 

vi) कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. 

vii) वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. 

viii) कालांतराने उत्क्रांतिवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अमलात आणली गेली. 

ix) डॉब्झंस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. 

x) अलिकडच्या काळात कार्ल वुज यांनी युद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. अशाप्रकारे वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या.

4. रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे ? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.

उत्तर :

रचनात्मक संघटन व सममिती हे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीसाठी वापरलेले आधारभूत मुद्दे असून रचनात्मक संघटनात प्राण्यांच्या शरीरात पेशी किंवा ऊती यांद्वारे अवयव तयार होणे यावर रचनात्मक संघटनाचे प्रकार पडतात तर सममितीमध्ये प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात.

उदा. – i) रचनात्मक संघटन : रंध्रीय संघातील प्राणी, नीडारीया संघातील प्राणी, चपटे कृमी. 

ii) सममिती : अमिबा (असममित शरीर), तारामासा (अरिय सममिती), मानव (द्विपार्श्व सममिती).

5. थोडक्यात उत्तरे द्या. 

अ. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा

उत्तर :

शार्कचे वर्गीकरण 

सजीव → दृश्यकेंद्रकी → बहुपेशीय → सजीव प्राणीवर्गीय

सृष्टी – प्राणी 

संघ – समपृष्ठरज्जू प्राणीसंघ

उपसंघ – पृष्ठवंशीय प्राणी 

वर्ग – मत्स्य प्राणीवर्ग

आ. कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा. 

उत्तर :

i) कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. 

ii) हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रोेेढावस्थेत पंच – अरिय सममिती आढळते; परंतु त्यांच्या अळीअवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. 

iii) या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन/पुननिर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. 

iv) हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. 

उदा. तारामासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार इत्यादी. 

इ. फुलपाखरू आणि वटवाघूळ यातील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा. 

उत्तर :

 फुलपाखरू

 वटवाघूळ

 

1. फुलपाखरू है उपसृष्टी असमपृष्ठरज्जू  यात वर्गीकृत केले जाते. 

2 संधिपाद संघातील कीटकवर्गात याचा समावेश केला जातो.

3. फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटीनयुक्त असतात.

4. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे. 


5. फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून अळी, अळीचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात.

 

1. वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.

2. पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो. 

3. वटवाघळाला पायाची एक जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात. 

4. वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.

5. वटवाघूळ जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे स्वतःच्या दुधाने पोषण करतात.

ई. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे ? उत्तर सकारण स्पष्ट करा.

उत्तर : 

1. झुरळ हा संधीपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे. 

2. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे :

i) शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन. 

ii) छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे : तीन पायांच्या जोड्या. 

iii) द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर. 

iv) श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे. 


6. शास्त्रीय कारणे द्या. 

अ. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. 

उत्तर :

i) कासव सरीसृप असते. ते जमिनीवर राहते त्या वेळी फुफ्फुसाने श्वसन करते.

ii) ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते. या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेच श्वसन करता येते.

iii) उभयचर प्राण्याचे असे नसते. तो जमिनीवर फुप्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो.

iv) तसेच कासवाच्या अंगावर बाह्यकंकालही असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.

आ. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. 

उत्तर :

i) जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या देशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. 

ii) दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात.

iii) जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.


इ. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत

उत्तर :

i) पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणीसंचाचा उपसंच होय. 

ii) सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये होतो. परंतु सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे तीन उपसंचात विभागले गेले आहेत. 

iii) त्यामुळे सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठवंशीय नाहीत. 

ई. बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात. 

उत्तर :

i) बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो   

ii) तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो.   

iii) दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात. 

iv) म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा असे म्हणतात.

उ. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. 

उत्तर :

i) सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. 

ii) त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. 

iii) परिसराचे तापमान जसे वर-खाली होते, त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर-खाली होते. 

iv) त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


7. योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. 

अ. रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाॅजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. 

1. कॉलर पेशी   2. निडोब्लास्ट

3. अंतर्जनस्तर पेशी    4. बहिर्जनस्तर पेशी

उत्तर :

1. कॉलर पेशी 

स्पष्टीकरण : रंध्रीय प्राणी हे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. पाण्याला प्रवाहित करण्यासाठी यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. 

आ. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विससमिती दाखवते. 

1. तारामासा   2. जेलीफिश

3. गांडूळ    4. स्पॉज

उत्तर :

3. गांडूळ 

स्पष्टीकरण : गांडूळ या प्राण्याचे शरीर द्विससमिती दाखवते. 

इ. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो ?

1. झुरळ    2. बेडूक   

3. चिमणी    4. तारामासा

उत्तर :

4. तारामासा

स्पष्टीकरण : तारामासा हा कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राणी असून असून यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. 

ई. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?  

उत्तर :

1. उभयचर    2. सरीसृप 

3. पक्षी       4. सस्तन 

उत्तर :

4. सस्तन 

स्पष्टीकरण : वटवाघळाला दूध स्त्रावणाऱ्या ग्रंथी असतात तसेच सस्तन प्राणी वर्गातील प्राण्यांची सर्व लक्षणे यांच्यात दिसून येतात. 

8. खालील तक्ता पूर्ण करा. 

 देहगुहा 

 जननस्तर 

 संघ 

 नसते 

 …………….

 रंध्रीय प्राणीसंघ

 नसते 

 त्रिस्तर 

 …………….

 आभासी 

 …………….

 गोलकृमींचा संघ 

 असते 

 …………….

 संधिपाद प्राणीसंघ

 उत्तर :

 देहगुहा 

 जननस्तर 

 संघ 

 नसते 

 दविस्तर

 रंध्रीय प्राणीसंघ

 नसते 

 त्रिस्तर 

चपट्या कृमींचा संघ 

 आभासी 

 त्रिस्तर

 गोलकृमींचा संघ 

 असते 

 त्रिस्तर

 संधिपाद प्राणीसंघ


9. तक्ता पूर्ण करा. 

 प्रकार 

वैशिष्टये  

 उदाहरणे 

 चक्रमुखी 

 

 

 

 कल्ल्याद्वारे श्वसन 

 

 उभयचर 

 

 

 

 

 देवमासा 

 

 शीतरक्ती

 

उत्तर :

 प्रकार 

वैशिष्टये  

 उदाहरणे 

 चक्रमुखी 

 अंतकंकाल कास्थिमय

 मिक्झीन

 मत्स्य प्राणीवर्ग 

 कल्ल्याद्वारे श्वसन 

 पापलेट

 उभयचर 

 उपांगांच्या दोन जोड्या 

बेडूक  

 सस्तन 

उष्णरक्ती  

 देवमासा 

 सरीसृप 

 शीतरक्ती

कासव 

10. आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. 

हायड्रा, जेलीफिश, प्लॅनेरीया, गोलकृमी, फुलपाखरू, गांडूळ, ऑक्टोपस, तारामासा, शार्क, बेडूक, पाल,कबुतर. 

हायड्रा – सिलेंटराटा

जेलीफिश – सिलेंटराटा

 

प्लॅनेरिया – चपट्या

गोलकृमी – गोलकृमी प्राणीसंघ

गांडूळ – वलयी प्राणीसंघ 
आक्टोपस – मृदुकाय प्राणीसंघ

बेडूक – उभयचर प्राणीवर्ग

पाल – सरीसृप प्राणीवर्ग

कबुतर – पक्षीवर्ग

11. आकृतीस योग्य नावे द्या. 

उत्तर :


नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय

नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय

प्रश्न १. पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा. 

 अ. क्र.

 वनांचा प्रकार

 गुणधर्म

 भारतातील प्रदेश

 ब्राझीलमधील प्रदेश

 १.

 उष्ण कटिबंधीय वने

१. रुंदपर्णी सदाहरीत वृक्ष

 २.

 निम वाळवंटी काटेरी वने

१.

 ३.

 ‘सॅव्हाना’

 १. तुरळक झुडपांसारखी झाडे/ तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकरक गवत

 ४.

 उष्ण कटिबंधीय निम पानझडी

१. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती

 ५.

 गवताळ प्रदेश

१. अर्जेटिनातील ‘पंपास’ प्रमाणे गवताळ प्रदेश

उत्तर :

 अ. क्र.

 वनांचा प्रकार

 गुणधर्म

 भारतातील प्रदेश

 ब्राझीलमधील प्रदेश

 १.

 उष्ण कटिबंधीय वने

१. रुंदपर्णी सदाहरीत वृक्ष

सह्याद्रीच्या दक्षिण भागात, हिमालयाच्या पायथ्यालगत व पूर्व भारतात. 

ॲमेझाॅन खोरे गियाना उच्चभूमी

 २.

 निम वाळवंटी काटेरी वने

१. काटेरी वने आकाराने लहान व कमी उंचीच्या वनस्पती

पठारावरील पर्जन्यछायेचा प्रदेश, राज्यस्थान, सोेराष्ट्र, कच्छ 

कटिंगा

 ३.

 ‘सॅव्हाना’

 १. तुरळक झुडपांसारखी झाडे/ तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकरक गवत

राजस्थान, गुजरात

ब्राझीलची उच्चभूमी

 ४.

 उष्ण कटिबंधीय निम पानझडी

१. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती

मध्यप्रदेश, बिहार, पंजाब, उत्तरे प्रदेश

पॅराग्वे व पॅराना नद्यांच्या खोऱ्यांचा भाग 

 ५.

 गवताळ प्रदेश

१. अर्जेटिनातील ‘पंपास’ प्रमाणे गवताळ प्रदेश

हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पं. बंगाल, आसाम

 दक्षिणेकडील सॅव्हानाचा गवताळ प्रदेश  

प्रश्न २. वेगळा घटक ओळखा. 

अ ) ब्राझीलमधील वनप्रकार – 

i) काटेरी झुडपी वने

ii) सदाहरित वने

iii) हिमालयीन वने

iv) पानझडी वने

उत्तर : iii) हिमालयीन वने

आ ) भारताच्या संदर्भात – 

i) खारफुटीची वने

ii) भूमध्य सागरी वने

iii) काटेरी झुडपी वने

iv) विषुववृत्तीय वने

उत्तर : iv) विषुववृत्तीय वने

इ ) ब्राझीलमधील वन्य प्राणी – 

i) ॲनाकोंडा

ii) तामरिन

iii) लाल पांडा

iv) सिंह

उत्तर : iii) लाल पांडा

ई ) भारतीय वनस्पती – 

i) देवदार

ii) अंजन

iii) ऑर्किड

iv) वड

उत्तर : iii) ऑर्किड

प्रश्न ३. जोड्या जुळवा

अ ) सदाहरित

आ ) पानझडी

इ ) समुद्रकाठची वने

ई ) हिमालयीन वने

उ ) काटेरी व झुडपी वने

i) सुंद्री

ii) पाईन

iii) पाऊ ब्रासील

iv) खेजडी

v) साग

vi) आमर

vii) साल

उत्तर :

अ ) सदाहरित

आ ) पानझडी

इ ) समुद्रकाठची वने

ई ) हिमालयीन वने

उ ) काटेरी व झुडपी वने

iii) पाऊ ब्रासील

v) साग

i) सुंद्री

vi) आमर

iv) खेजडी

 

प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे द्या. 

अ ) ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा. 

उत्तर :

 भारतातील नैसर्गिक वनप्रकार

 ब्राझीलमधील नैसर्गिक वनप्रकार

 

1. भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे भारतात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळत नाहीत.

2.भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगांत अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात.

 

1. ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळतात. 

2. ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत. त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन क ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.

आ ) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. 

उत्तर :

i) नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खादय असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खादय असते.

ii) विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खादय असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात, त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी, अशा प्रदेशांत मांसभक्षक प्राणीही मोठ्या संख्येने आढळतात.

iii) उदा., ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात.

iv) उदा., भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या प्रमाण जास्त असते, अशा कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी आढळतात.

v) सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.

vi) उदा., ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागांत विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात.

vii) ज्या प्रदेशात  नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते, अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळतात.

viii) उदा., भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.

इ ) ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. 

उत्तर :

ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे :

i) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंघनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वतीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.

ii) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.

iii) वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

iv) पर्यावरणाच्या हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

ई ) ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?
उत्तर :

i) मानवी विकासाच्या वाढीचा प्रचंड वेग, वाढते प्रदूषण, संसाधनांचा अतिरेकी वापर, विकास परियोजना प्रकल्प, उदयोगीकरण, जंगलातील वणवे या सर्वामुळे वनांचा ऱ्हास होत चाललेला आहे.

ii) इमारती लाकडासाठी होणारी बेसुमार वृक्षतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी होणारी वनांची तोड, मूलभूत सुविधा प्राप्त करणे. वीजनिर्मिती, खनिजोत्पादन आदी अनेक कारणांमुळे भारतातील वनसंपदेचा ऱ्हास झाला आहे.

iii) वाढत्या लोकसंख्येच्या वाढीव गरजा, अतिजलद, ओेदयोगिकरण व धरणाच्या निर्मितीमुळे धरणक्षेत्राखाली तसेच सिंचनक्षेत्राखाली जमीन आल्याने तेथील वनांचा ऱ्हास झाला आहे.

iv) उर्वरित वनांचा दर्जा घसरण्यासाठी गुरांची अतिरिक्त चराई व वन जमिनीचे शेतजमिनीत होणारे रूपांतरण ही महत्त्वाची कारणे आहेत.

v) तसेच ॲमेझाॅनचे जंगल अतिशय घनदाट असून येथील वृक्षांचे टणक लाकूड, दलदल, रोगट हवामान असंख्य कीटक, मजुरांची कमतरता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव यामुळे या वनांचा व्यावसायिक वापर होत नव्हता. या भागात मनुष्य वस्तीचा अभाव होता.  परंतु या समस्यांवर मात करण्यासाठी आता ब्राझील सरकारने इथे रस्ते व लोहमार्ग बांधले आहे. म्हणजेच मानवाने नैसर्गिक वनांवर अतिक्रमण करून स्वत:च्या सुविधांचा मार्ग काढला व वनांचा ऱ्हास करण्यास सुरुवात केली.

उ ) भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे. 

उत्तर :

i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी तील वनस्पतींची पाने गळतात.

ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.

iii) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी बने आढळतात.

iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे. त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

प्रश्न ५. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे. 

उत्तर :

i) ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी सुमारे २८ से असते.

ii) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.

iii) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याणे होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

आ ) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. 

उत्तर :

i) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही टिकाणी तापमान 0° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात

ii) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.

iii) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींचचे संख्या विरळ असते.

इ ) ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे. 

उत्तर :

i) कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनांत, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.

ii) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खादय असते.

iii) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे-पॅराना नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पँटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

ई ) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. 

उत्तर :

i) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

iii) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

उ ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे. 

उत्तर :

i) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका’ या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.

iii) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय

 इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय

यामध्ये इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्या पाठाचा स्वाध्याय पाहायाचा आहे, त्यापुढील येथे क्लिक करा किंवा पाठाचा नावावर क्लिक करा.  

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय

 इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय

 यामध्ये इयत्ता आठवी भूगोल विषयाचे सर्व स्वाध्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्या पाठाचा स्वाध्याय पाहायाचा आहे, त्यापुढील येथे क्लिक करा किंवा पाठाचा नावावर क्लिक करा.

प्रकाशाचे अपवर्तन स्वाध्याय

प्रकाशाचे अपवर्तन स्वाध्याय 

प्रकाशाचे अपवर्तन स्वाध्याय इयत्ता दहावी

प्रश्न 1. खालील विधानांमधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा. 

अ. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या ………….. वर अपवर्तनांक अवलंबून असतो. 

उत्तर :

प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या वेग वर अपवर्तनांक अवलंबून असतो. 

स्पष्टीकरण : पकाशाच्या पुढे जाणाऱ्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. ही विधान पुढील सूत्रावरून स्पष्ट होते. 

पदार्थाचा निरपेक्ष अपवर्तनांक = प्रकाशाच्या निर्वातातील वेग/प्रकाशाचा त्या माध्यमातील वेग

आ. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ………… बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. 

उत्तर :

 प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना मार्ग बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. 

स्पष्टीकरण : प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना मार्ग बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात. व्याख्येनुसार विधानामध्ये स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. 

प्रश्न 2. खालील विधानांची सिध्दता लिहा. 

अ. जर एका काचेच्या चीपेवर पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन i असेल व चीपेतून बाहेर पडतांना त्याचा निर्गत कोन e असेल तर i = e.   

उत्तर :

आ. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. 

उत्तर : 

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन व पूर्ण आंतरिक परावर्तन या तीन नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे, ते खालील घटना क्रमावरून लक्षात येते. 

i) प्रथम प्रकाश किरण हवेत तरंगणाऱ्या पाण्याच्या थेंबात प्रवेश करतात म्हणजेच घन माध्यमात प्रवेश करतात. येथे अपवर्तन होऊन प्रकाश किरणे स्वत:चा मार्ग किंचित बदलवितात.

ii) पाण्याच्या थेंबात शिरलेले प्रकाश किरण पुढे मार्ग क्रमित होऊन पाण्याच्या थेंबाच्या पृष्ठभागावर पडतो. यावेळी त्याचा पुढील मार्ग विरळ माध्यमातून जाणारा असतो. पण यावेळी आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असल्यामुळे ते विरळ माध्यमात प्रवेश न करता त्याचे पूर्ण आंतरिक परावर्तन होते. 

iii) ही पूर्ण आंतरिक परावर्तीत किरण पाण्याच्या थेंबातून बाहेर पडताना पुन्हा अपवर्तीत होते व वेगवेगळ्या रंगाची किरणे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात म्हणजेच अपस्करण होते व सप्तरंग दिसू लागतात. 

iv) हा घटनाक्रम प्रत्येक पाण्याच्या थेंबात घडतो व त्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम होऊन इंद्रधनुष्य दिसू लागते. 

प्रश्न 3. खालील प्रश्नांत दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते ते लिहा. 

अ. ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण काय ?

1) ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट 

2) ताऱ्याच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशेष

3) ताऱ्यांची गती

4) वायुमंडळातील वायुचा बदलता अपवर्तनांक 

उत्तर :

4) वायुमंडळातील वायुचा बदलता अपवर्तनांक 

आ. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असतांनादेखील आपल्याला दिसते याचे कारण काय ?

1) प्रकाशाचे परावर्तन 

2) प्रकाशाचे अपवर्तन 

3) प्रकाशाचे अपस्करण  

4) प्रकाशाचे अवशोषण

उत्तर :

2) प्रकाशाचे अपवर्तन 

इ. काचेच्या हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल ?

1) 1/2 

2) 3 

3) 1/3 

4) 2/3 

उत्तर :

4) 2/3 

प्रश्न 4. खालील उदाहरणे सोडवा. 

उष्णता स्वाध्याय

उष्णता स्वाध्याय 

उष्णता स्वाध्याय इयत्ता दहावी

इयत्ता दहावी विज्ञान भाग एक स्वाध्याय

प्रश्न 1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. 

अ. हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ………… म्हणतात. 

उत्तर :

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. 

आ. समान वस्तुमान असलेल्या वेगेवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ……….. गुणधर्मामुळे समान नसते. 

उत्तर :

समान वस्तुमान असलेल्या वेगेवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या विशिष्ट उष्मा धारकता गुणधर्मामुळे समान नसते.

इ. पदार्थाचे द्रवातून स्थायूत रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा ………… 

उत्तर :

पदार्थाचे द्रवातून स्थायूत रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा बाहेर पडतो

प्रश्न 2. खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°Cपासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात ?

उत्तर :

आलेखाच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की,  

पाण्याला 0°C पासून उष्णता देण्यास सुरुवात केल्यास त्याचे आकारमान कमी कमी होऊ लागते. आकारमान कमी होण्याची क्रिया 4°C पर्यंत चालते. त्यानंतर आकारमान वाढत जाते. याचा अर्थ असा होतो की पाण्याची घनता 4°C तापमानाला लघुत्तम असते. 

इतर पदार्थाच्या बाबतीत या उलट अनुभव येतो. एखाद्या पदार्थास तापविल्यास त्याचे आकारमान वाढत जाते. येथे मात्र पाण्याचे आकारमान 4°C पर्यंत कमी होते. त्यानंतर ते वाढते. अर्थात पाणी सर्वसामान्य नियमाविरुद्ध वागते याला पाण्याचे असंगत आचरण म्हणता. पाणी 0 ते 4°C पर्यंत असंगत वागते. 

प्रश्न 3. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ? प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते हे प्रयोगाच्या साहाय्याने कसे सिद्ध कराल ?

उत्तर :

एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्मा म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. 

ही उष्माधारकता प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील प्रयोग करू या. 

साहित्य – मेणाचा जाड थर असलेला ट्रे, लोखंड, तांबे व शिशे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल, स्पिरीटचा दिवा, मोठे चंचूपात्र इत्यादी. 

कृती – i) समान वस्तुमानाचे लोखंड, तांबे व शिशे यांचे गोळे उकळत्या पाण्यात काही वेळपर्यंत ठेवा. 

ii) त्यानंतर हे तीनही गोल पाण्यातून बाहेर काढा व ताबडतोब मेणाच्या ट्रे मध्ये सावकाश ठेवा. 

iii) निरीक्षण करा – मेण वितळतांना दिसेल व गोळे मेणात खोल खोल जाताना दिसतात. 

iv) थोड्या वेळानंतर कोणता गोळा मेणात किती खोल गेलाय ते पहा. 

लोखंडाचा गोळा सर्वात खोलपर्यंत गेलेला दिसतो तर शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो. 

या निरीक्षणावरून आपण असे म्हणू शकतो की लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे व शिशाची सर्वात कमी आहे. 

कारण – लोखंडामुळे मेण जास्त वितळते म्हणजे लेखंडाने मेणाला जास्त उष्मा पुरविली असावी म्हणजेच लोखंडाने पाण्याकडून जास्त उष्मा ग्रहण केली असावी. तसेच शिशाच्या बाबतीत हे विधान करता येईल. 

अर्थात समान तापमानात वाढ होऊनही ग्रहण केलेला उष्मा वेगवेगळा असू शकतात म्हणजे विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असू शकते. 

प्रश्न 4. उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात ? का ?

उत्तर :

एकक ठरवताना 14.5 °C ते 15.5 °C हा विशिष्ट तापमानखंड निवडतात. याचे कारण असे की, 1 kg पाण्याचे तापमान या तापमानखंडापेक्षा वेगळ्या तापमानखंडात 1 °C ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता थोडी भिन्न असते.

प्रश्न 5. खालील तापमानकाल आलेख स्पष्ट करा. 

उत्तर :

0°C तापमानावरील बर्फाचे 1000°C तापमानावरील वाफेत रूपांतर होताना तापमानात कसकसा बदल होत जातो हे या आलेखात दाखविले आहे.  

i) आलेखाचा AB रेखाखंड – 0°C तापमानावरील बर्फाचे पांण्यात रूपांतर होण्यासाठी 4 मिनिट वेळ लागतो. बर्फ वितळेपर्यंत तापमान 0°C असते. येथे ग्रहण केलेली उष्णता स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. अर्थात हे स्थिर तापमान बर्फाचा द्रवणांक दर्शविते. 

ii) आलेखाचा BC रेषा खंड – या 20 – 4 = 16 मिनिटाच्या कालावधीत पाण्याचे तापमान 0°C पासून 100°C पर्यंत वाढते. ग्रहण केलेली उष्णता तापमान वाढीसाठी वापरली जाते. 

iii) आलेखाचा CD रेषा खंड – या अवधित तापमान 100°C स्थिर आहे व पाण्याचे वाफेत रूपांतर होते. शोषण केलेली ऊर्जा पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी उपयोगात येते. या तापमानावर पाणी उसळते. 100°C पाण्याचा उत्कलन बिंदू आहे.  

प्रश्न 6. स्पष्टीकरण लिहा. 

अ. थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.

उत्तर :

पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याची घनता 4 °C ला उच्चतम असते. थंड प्रदेशातील तलावांमध्ये जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते, त्या वेळी 4 °C तापमानाचे पाणी तळाशी राहते आणि त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ पृष्ठभागावर राहते. पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती व जलचर सुरक्षित राहतात.

आ. शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा

उत्तर :

ठरावीक तापमानास हवेच्या ठरावीक आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प (पाण्याची वाफ) सामावले जाऊ शकते. तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते.

शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिचे तापमान कक्ष तापमानापेक्षा (Room temperature) बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान कमी होते. परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात.

इ. पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात हे वाक्य स्पष्ट करा.

उत्तर :

थंड प्रदेशात थंडीच्या दिवसांत वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0°C च्या खालीही जाऊ शकते. सामान्यतः खडकांच्या भेगांमध्ये पाणी असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4°C च्या खाली गेल्यास पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्याचे बर्फ बनले तरी त्याचेही आकारमान अधिक होते. अशा वेळी खडकांच्या भेगांमधील पाण्याने निर्माण केलेल्या दाबामुळे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.

प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. अप्रकट उष्मा म्हणजे काय ? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकल्या गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील ?

उत्तर :

पदार्थाची अवस्था बदलताच त्याचे तापमान कायम असते पण एकतर उष्णता बाहेर टाकली जाते किंवा शोषली जाते ह्या उष्णतेला अप्रकट उष्मा म्हणतात. अप्रकट उष्मा बाहेर टाकली जात असेल तर वायू  द्रव → स्थायू अशा अवस्था बदल होतो.  

आ. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ? 

उत्तर : 

पदार्थाच्या विशिष्ट उष्माघारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा उपयोग करतात. हे तत्त्व असे आहे :

उष्णता विनिमयाचे तत्व : दोन वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास, पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही: अशा स्थितीत, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान समान होते.

इ. पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर : 

i) स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान वाढते. या वेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची (अणू, रेणू इत्यादी) गतिज ऊर्जा वाढवण्यात, तसेच त्या कणांमधील आकर्षण बलांविरुद्ध कार्य करण्यात म्हणजेच अणू / रेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठरावीक तापमानाला (द्रवणांक) स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. या वेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणांमधील बंघ तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.  

ii) द्रवाचे द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होतानाही उष्णता शोषली जाते, पण तापमान बदलत नाही. या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. या वेळी शोषलेल्या उष्णतेचा वापर द्रवाच्या कणांमधील बंध कमकुवत करण्यासाठी अवस्थांतरासाठी होतो.  

iii) काही पदार्थाच्या बाबतीत ठरावीक भौतिक स्थिती असताना स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते. या वेळीही उष्णता शोषली जाते, पण तापमान स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवनाचा अप्रकट उष्मा म्हणतात.   

iv) अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाचे शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायूत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो.

ई. हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल

उत्तर : 

जर हवा संपृक्त असेल तर वातावरणात जागोजागी दवबिंदू दिसतात. हवा संपृक्त असण्याची ही एक मोठी खूण आहे. 

तसेच हवा पाण्याच्या वाफेने संपृक्त आहे की नाही हे ठरविण्यासाठी सापेक्ष आर्द्रता ठरवितात. सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असल्यास हवा संपृक्त नाही पण दमट आहे, तर 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी आहे असे समजतात. तसेच सापेक्ष आर्द्रता 100 म्हणजे हवा संपृक्त असे समजतात. 

प्रश्न 8. खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही. तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तु उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची (System) प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणाली मधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्त्व मिळते. 

उष्ण वस्तूने गामावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. 

या तत्त्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात. 

अ. उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते ?

उत्तर :

उष्णतेचे स्थानांतरण उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थकडे होते. 

आ. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो ?

उत्तर :

अशा स्थितीत उष्णता विनियमाच्या तत्त्वाच्या बोध होतो. 

इ. हे तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल ?

उत्तर :

दोन वस्तुच्या प्रणालीमधून उष्णता आत जाणार नाही व बाहेरही येणार नाही अशा स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. 

ई. या तत्त्वाला उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो ?

उत्तर :

पदार्थाची विशिष्ट उष्मा ग्राहकता हा गुणधर्म मोजण्यासाठी तत्वाचा उपयोग केला जातो. 

प्रश्न 9. उदाहरणे सोडवा.     

अ. 1g वस्तुमानाचे दोन पदार्थ ‘अ’ आणि ‘ब’ यांना एकसारखी उष्णता दिल्यावर ‘अ’ चे तापमान 3°C तर ‘ब’ चे तापमान 5°C ने वाढवले यावरून ‘अ’ व ‘ब’ पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे ? किती पटीने ?

उत्तर :

आ. बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°Cतापमानाच्या 2kg बर्फात रूपांतरित करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाच्या बाष्पन करावे लागेल ?

(द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g)

उत्तर :

इ. एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150g वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल ? (बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा = 80cal/g, पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 540Cal/g, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता = 1Cal/g)

उत्तर :

ई. एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100g असून, विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg°C आहे. त्यामध्ये 250g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg°C विशिष्ट उष्माधारकतेचा व 30°C तापमानचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा, टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल ?

उत्तर :

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता दहावी

विद्युतधारेचे परिणाम इयत्ता दहावी

प्रश्न 1. गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. 

अ. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र

उत्तर :

वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र यात न बसणारा शब्द जनित्र. कारण जनित्रात विद्युत निर्मिती होते व इतर तीन हे कशाचीही निर्मिती करत नाहीत. 

आ. व्होल्टमीटर, अँमीटर, गॅलव्हॅनोमीटर, थर्मामीटर

उत्तर :

व्होल्टमीटर, अँमीटर, गॅलव्हॅनोमीटर, थर्मामीटर. यात थर्मामीटर हा शब्द गटात न बसणारा आहे. कारण याच्या साहाय्याने तापमान मापन करतात व इतर तीन विद्युतच्या संदर्भातील आहेत. 

इ. ध्वनीवर्धक, सुक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक

उत्तर :

ध्वनीवर्धक, सुक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक यापैकी चुबक हा गटात न बसणारा आहे. कारण इतर तीन मध्ये चुंबकाचा उपयोग करून काही नवनिर्मिती केलेली आहे. 

प्रश्न 2. रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. 

अ) विद्युतचलित्र     ब) विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)

उत्तर : 

विद्युतचलित्र – विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युतचलित्र होय.  

तत्त्व – चुंबकीय क्षेत्रातून विद्युतधारा वाहून नेणाऱ्या तारेवर ‘बल’ कार्य करते. ह्या बलाची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा यावर अवलंबून असते. जर विद्युत धारेची दिशा व चुंबकक्षेत्राची दिशा परस्पर लंब असतील तर विद्युत वाहक तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा ही ह्या दोहोंशी लंब असते. हे फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले याच तत्त्वावर विद्युतचलित्र कार्य करते.

रचना – आकृतीत दाखविल्याप्रमाणे विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल N व S या प्रबळ चुंबक ध्रुवामध्ये ठेवलेले असते. ह्या बाजू चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लांब असतात. 

कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. विद्युतरोधक आवरण असलेले कड्याचे दोन भाग चलित्राच्या आसावर पक्के बसविले असतात. दोन विदयुत वाहक कार्बन ब्रश (E व F) हे X व Y ह्या कड्यांना स्पर्श करून ठेवलेले असतात.

E व F ही ब्रशची टोके विद्युत स्त्रोताला जोडलेली असतात. K ही कळ चालू करताच विद्युत प्रवाह A → B → C → D या दिशेने वाहू लागतो व चलित्राचा आस म्हणजेच विदयुत वाहक तारेचे कुडल, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागते. अशारितीने विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते. 

कार्य – विद्युतधारा, कार्बन ब्रश मार्फत कुंडलात A→ B→ C→ D या दिशेने वाहू लागते. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा N → S आहे व विद्युतधारेची दिशा A → B आहे. ह्या परस्पर लंब आहेत. कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा या दोहोंना लंब असते.

कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ठरविता येते.

या नियमानुसार AB ही कुंडलाची बाजू विद्युत चुंबकीय बलामुळे खालच्या दिशेने ढकलली जाईल व तारेचे कुंडल व आस दोन्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतील.

अर्धे परिवलन होताच, दुभंगलेल्या कड्याचे X व Y हे भाग अनुक्रमे F व E या कार्बन ब्रशला स्पर्श करतात, त्यामुळे विद्युत प्रवाहाची दिशा पूर्वीच्या दिशेच्या उलट होते. त्यामुळे आता BA शाखेवर, वरच्या दिशेने बल कार्य करते व विद्युत वाहक कुंडल सतत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरू लागते.

विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती) – यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विदयुत जनित्र म्हणतात.

तत्त्व – कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तीत होते. अर्थात वाहक तारेची कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरविल्यास त्यात विद्युतनिर्मिती होते. या फॅरडेच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्त्वावर विदयुत जनित्र कार्य करते.

रचना- आकृतीत दाखविल्याप्रमाणे ABCD हे तांब्याच्या तारेचे कुंड आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे. कुंडलाची दोन टोके R1 व R2 ही विदयुत वाहक कड्यांना (slip rings) ब्रशेस B1 व B2 मार्फत जोडलेली असतात. आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरविला असता त्याला जोडलेले ABCD हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते. कुंडल फिरताच बाह्यपरिपथात जोडलेल्या गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरू लागतो. त्यामुळे विद्युतधारेची दिशा लक्षात येते.

कार्य – बाह्य ऊर्जेद्वारे (पाणी, वायू, डिझेल) आस फिरविला असत ABCD कुंडल फिरायला लागते. AB शाखा वर जाते तर CD शाखा खाली येते. (कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते)

फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा वाहू लागते. विद्युतधारेची दिशा A → B → C → D अशी असते. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युतधारेचे अस्तित्व दर्शवितो.

कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विदयुत धारा D → C → B → A अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते.

BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व CD ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विदयुतधारा B1 कडून B2 कडे (पूर्वीच्या उलट दिशेने वाहते)

प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते.

प्रश्न 3. विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे

अ. विद्युतवाहकाचे प्रभारित होणे. 

आ. कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. 

इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. 

ई. विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.  

उत्तर : 

इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. 

प्रश्न 4. फरक लिहा प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र

उत्तर :

i) प्रत्यावर्ती जनित्रामध्ये प्रत्येक अर्धपरिवलनामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेची दिशा व त्या पुढील अर्ध परिवलनामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेची दिशा या एकमेकींच्या विरुद्ध असतात. म्हणजेच प्रत्यावर्ती जनित्रामध्ये प्रत्येक अर्ध्या परिवलनामध्ये विद्युतधारेची दिशा उलट होते. पण दिष्ट जनित्रामध्ये निर्माण होणाऱ्या विद्युतधारेची दिशा नेहमीच स्थिर असते. पूर्ण परिवलनामध्ये दिशा एकच असते. ती बदलत नाही. 

ii) प्रत्यावर्ती जनित्रामध्ये कुंडलाची टोके विद्युत वाहक कड्यांना जोडलेली असतात तर दिष्ट जनित्रामध्ये कुंडलाची टोक दुभंगलेल्या कड्यांना जोडलेली असतात. 

प्रश्न 5. विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? आकृतीसह वर्णन करा. 

अ. विद्युतचलित्र   ब. गॅल्व्हॅनोमीटर   क. विद्युतजनित्र (दिष्ट)  ड. व्होल्टमीटर

उत्तर :

 विद्युतजनित्र (दिष्ट) हे उपकरण वापरतात. 

विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती) – यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विदयुत जनित्र म्हणतात.

तत्त्व – कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तीत होते. अर्थात वाहक तारेची कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरविल्यास त्यात विद्युतनिर्मिती होते. या फॅरडेच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्त्वावर विदयुत जनित्र कार्य करते.

रचना- आकृतीत दाखविल्याप्रमाणे ABCD हे तांब्याच्या तारेचे कुंड आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे. कुंडलाची दोन टोके R1 व R2 ही विदयुत वाहक कड्यांना (slip rings) ब्रशेस B1 व B2 मार्फत जोडलेली असतात. आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरविला असता त्याला जोडलेले ABCD हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते. कुंडल फिरताच बाह्यपरिपथात जोडलेल्या गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरू लागतो. त्यामुळे विद्युतधारेची दिशा लक्षात येते.

कार्य – बाह्य ऊर्जेद्वारे (पाणी, वायू, डिझेल) आस फिरविला असत ABCD कुंडल फिरायला लागते. AB शाखा वर जाते तर CD शाखा खाली येते. (कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते)

फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा वाहू लागते. विद्युतधारेची दिशा A → B → C → D अशी असते. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युतधारेचे अस्तित्व दर्शवितो.

कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विदयुत धारा D → C → B → A अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते.

BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व CD ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विदयुतधारा B1 कडून B2 कडे (पूर्वीच्या उलट दिशेने वाहते)

प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते.

प्रश्न 6.  लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो ?

उत्तर :

उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विदयुतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात. या वेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे परिपथात आग लागू शकते.

प्रश्न 7. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. 

उत्तर :

i) विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंतलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते.   

ii) बल्बमधील तार बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विदयुतधारा पाठवून, तार न वितळता, तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो. टंगस्टनचा वितळणांक अतिउच्च (3410 °C) असतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.

आ. उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत

उत्तर :

कारण – नायक्रोम या मिश्रधातूमध्ये खालील गुणधर्म आहेत की, जे उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणासाठी आवश्यक आहेत. ही सर्व गुणधर्म एकत्रपणे एकाच धातूमध्ये मिळत नाहीत. म्हणून शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम मिश्रधातू वापरतात. 

नायक्रोमचे गुणधर्म – i) उच्च वितळण बिंदू, ii) उच्च विद्युत रोध, iii) रासायनिकदृष्ट्या उदासिन, iv) अचुंबकीय, v) उत्तम विद्युत गुणधर्म. 

उदाहरणार्थ – तन्यता, वर्धनियता, कठीणपणा, लवचिकता इत्यादी. 

या सर्व गुणधर्मामुळे नायक्रोमची तार उच्च तापमान निर्माण करू शकते व त्यावर हवेचा परिणाम होत नाही त्यामुळे त्यापासून बनविलेले तारेची कुंडल अधिक टिकावू बनते. म्हणून उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणामध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात.      

इ. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात. 

उत्तर :

i) तांबे व अँल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत.  

ii) तांबे व अँल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

ई. व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते

उत्तर:

कारण – ज्यूल ही ऊर्जामापनाचे मूलभूत एकक आहे. पण हे अतिशय लहान आहे. त्या मानाने आपला दैनंदिन ऊर्जा वापर खूपच मोठा असतो. म्हणून ज्यूल ऐवजी त्यापेक्षा मोठे एकक kWh वापरतात. ऊर्जा मापनासाठी Joule/s  हे एकक वापरतात. 1 Joule / S = 1 watt

अर्थात वॉट हे एकक सुद्धा लहानच आहे. म्हणून त्यापेक्षा मोठे एकक किलो वॅट सुचविले आहे. 100 Watt = 1 kW 

1 kW ऊर्जा एक तास पर्यंत वापरली तर 1kWh ऊर्जा वापरली असे म्हणतात. 

∴ 1 kWh = 1 Kilo Watt hour

= 1000 Watt x 3600 s

= 3.6 x 106 watts 

= 3.6 x 106 Joule 

या सूत्रावरून ज्यूल हे एकक किती लहान आहे हे लक्षात येते. म्हणून व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी हे kWh हे एकक वापरतात.  

प्रश्न 8. खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ, विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते ? स्पष्टीकरण लिहा. 

अ. तारेच्या लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात. 

आ. तारेला समांतर, तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात. 

इ. तारेला लंब व तारेपासून दूर (radially out ward) अशा चुंबकीय बलरेषा जातात. 

ई. समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. 

उत्तर :

 ई. समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. 

प्रश्न 9. नालकुंतल म्हणजे काय ? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. 

उत्तर :

विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. 

चुंबकीय क्षेत्र – नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीत दाखविली आहे. 

i) चुंबकपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या रेषा यात सारखेपणा असतो. 

ii) दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या बलरेषांचे गुणधर्म समान असतात. 

iii) नालकुंतलाची उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनतात. 

iv) नालकुंतातील चुंबकीय बलरेषा समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. 

v) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते.   

प्रश्न 10. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. 

उत्तर :

1. आकृती (अ)  फ्लेमिंच्या उजव्या हाताचा नियम दर्शविते. यात अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते. मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविते. 

2. आकृती (आ) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम दर्शविते. यात तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते. मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शविते. अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवितो. 

प्रश्न 11. आकृत्या ओळखून त्याचे उपयोग स्पष्ट करा. 

उत्तर :

अ. ‘अ’ आकृती इलेक्ट्रीक फ्युजची आहे. याचा उपयोग फ्युज वायर ‘फ्युज’ झाली असेल तर त्याच्या जागी नवीन टाकण्यासाठी होतो. 

आ. ही आकृती MCB ची आहे. Miniature Circuit Breaker या नावाने ओळखली जाणारी ही एक कळ आहे. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. थोडक्यात या उपकरणामुळे विद्युतधारा बंद किंवा चालू करता येते. 

इ. ही आकृती इलेक्ट्रीक जनित्राची आहे. याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी होतो. 

प्रश्न 12. खालील उदाहरणे सोडवा. 

अ. विद्युत परिपथातील एका विद्युत रोधमध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहत आहे, तर विद्युत रोध किती Ω असेल

उत्तर :

आ. दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल

उत्तर :

इ. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील ? 500 W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600 W ची शेगडी 20 मिनिटात ?

उत्तर :

ऊर्जा   P = t    P  = ऊर्जा वॅटमध्ये     t = वेळ सेकंदमध्ये

T. V. साठी वापरलेली ऊर्जा = P x t

= 500 x 30 x 60 

= 900000 J

शेगडीसाठी वापरलेली ऊर्जा = P x t 

= 600 x 20 x 60 

= 720000 J

T. V. साठी वापरलेली ऊर्जा जास्त लागते. 

ई. 1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल ? ( वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 /-रु. आकरते) 

उत्तर :

बोलतो मराठी स्वाध्याय

बोलतो मराठी स्वाध्याय

बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी

1) आकृती पूर्ण करा. 

अ. 

 

उत्तर :

आ. 
उत्तर :

2. शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. 

उत्तर :

3. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. 

अ. मराठी भाषेची खास शैली

उत्तर :

 वाक्प्रचार

 

आ. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा 

उत्तर :

 नदीसारखी प्रवाही

इ. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन

उत्तर :

 व्युत्पत्ती

4) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. 

अ) ऐट,  डोेल, रुबाब, चैन

उत्तर :

 चैन

आ. कपाळ, हस्त, ललाट, भाल

उत्तर :

 हस्त

इ. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय

उत्तर :

 विनोद

ई. संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर :

 कांता

उ. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध

उत्तर :

 प्रज्ञा

5. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. 

अ. रस्ते 

उत्तर :

रस्ते – रस्ता

वाक्य – हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे. 

आ. वेळा

उत्तर :

वेळा – वेळ

वाक्य – माझी जेवणाची वेळ झाली. 

इ. भिंती 

उत्तर :

भिंती – भिंत

वाक्य – ही भिंत जुनी असूनही मजबूत आहे. 

ई. विहिरी 

उत्तर :

विहिरी – विहीर

वाक्य – या विहिरीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते. 

उ. घड्याळे 

उत्तर :

घड्याळे – घड्याळ

वाक्य – हे घड्याळ खूप महाग आहे. 

ऊ. माणसे 

उत्तर :

माणसे – माणूस

उत्तर :

माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो. 

6) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 

अ. पसरवलेली खोटी बातमी 

उत्तर :

अफवा

आ. ज्याला मरण नाही असा 

उत्तर :

अमर

इ. समाजाची सेवा करणारा

उत्तर :

समाजसेवक

ई. संपादन करणारा

उत्तर :

संपादक

7) स्वमत

अ. ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा. 

उत्तर :

1. धूर्त 

2. हुशार, बुद्धिमान, समजूतदार

3. मठ्ठ

आ. ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरुन बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. 

उत्तर :

लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. परभाषेची मैत्री करावी पण तिचे गुलाम बनू नये. ‘मी टेंन्थमध्ये आहे’ यातून तोच अर्थ कळतो जो ‘मी दहावीत आहे’ या म्हणण्यातून कळतो. गरज नसताना परभाषेतले शब्द वापरणे यात आपल्या मायबोलीचा न कळत आपण अपमान करत असतो. 

इ. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा. 

उत्तर :

लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान केला आहे. त्या म्हणतात की, मराठी ढंगचेय शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मारणे हे एकच क्रियापद गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माश्या मारणे, इत्यादी ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. मराठीतील वाक्प्रचार ही मराठीची खास शैली आहे. नुसते ‘पोट’ या अवयवावर किती तरी वाक्प्रचार आहेत. पोटी येणे (जन्म), पोटात येणे (मत्सर) पोट येणे (अवैध गर्भ) इत्यादी. भाषेचे जीवनातील महत्त्वाचे स्थान कायम ठेवायचा हवे. तिचा सन्मान राखायला हवा. तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. कारण मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. असा लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे.   

नोकरशाही स्वाध्याय

नोकरशाही स्वाध्याय

नोकरशाही स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करा. 

1) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. 

उत्तर :

बरोबर

2) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 

उत्तर :

चूक 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) देशातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 

प्रश्न. 2. पुढील विधाने स्पष्ट करा. 

1) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे. 

उत्तर :

अनेक दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत. निर्णयप्रक्रियेत त्याचा सहभाग वाढावा, या हेतूने सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण राबवले जाते. कारण समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते, तसेच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते. 

2) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 

उत्तर :

दर पाच वर्षानी निवडणुका होतात. निवडणुकांनंतर सरकार बदलू शकते; पण सरकार बदलले तरी नोकरशाही मात्र कायमस्वरूपी असते. नोकरशाहीला प्रत्येक सरकारच्या काळात काम करावे लागते. प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे राबवावी लागतात. ही सर्व कामे कोणत्याही एका राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांकडून होत नाहीत; म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दांत लिहा. 

1) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर :

मंत्री व त्या खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात, यावरही त्या त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. निर्णय मंत्री घेतात, पण निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक देतात. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना माहिती असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद साधल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होतो. 

2) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीने धोरणांच्या अंमलबजावणीतून अनेक बदल सामान्य नागरिपर्यंत आणले आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. 

स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी योजना इ. बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते; म्हणून नोकरशाहीमुळे राजकीय व्यवस्थेला स्थैर्य लाभते. 

प्रश्न. 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

प्रश्न. 5. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीचे स्वरूप पुढीलप्रमाणे – 

कायमस्वरूपी यंत्रणा : कर गोळा करणारी, पर्यावरणरक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, समाजाला सुरक्षा देणारी नोकरशाही सातत्याने काम करत असते. दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येते, पण नोकरशाही बदलत नाही. 

राजकीयदृष्ट्या तटस्थ : कोणत्याही पक्षाचे सरकार येवो; त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने तटस्थपणे, कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घेऊ नयेत. सरकार बदलल्यास पहिल्या सरकारची धोरणे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

अनामिकता : एखाद्या धोरणाच्या यश किंवा अपयशाला नोकरशाही थेटपणे जबाबदार नसते, तर ती जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्याची असते. सनदी सेवकावर जाहीरपणे टीका होत नाही. खात्याच्या गैरकारभारासाठी संसद मंत्र्यांला जबाबदार धरते. याची पूर्ण जबाबदारी मंत्री घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात.      

राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय 

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ……………….. येथे होते. 

अ) मुंबई

ब) नागपूर 

क) पुणे 

ड) औरंगाबाद

उत्तर :

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. 

2) राज्यपालाची नियुक्ती ………………… कडून होते. 

अ) मुख्यमंत्री 

ब) प्रधानमंत्री

क) राष्ट्रपती 

ड) सरन्यायाधीश

उत्तर :

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते. 

3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार ……………… यांना असतो. 

अ) मुख्यमंत्री

ब) राज्यपाल

क) राष्ट्रपती 

ड) सभापती

उत्तर :

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार राज्यपाल यांना असतो. 

प्रश्न. 2. तक्ता पूर्ण करा. 

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 

 

 

 

 2. 

विधान परिषद

 

 

 

 

उत्तर :

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 5 वर्षे

288  

प्रत्यक्ष लोकातून निवडणुकीद्वारे 

विधानसभा अध्यक्ष 

 2. 

विधान परिषद

कायमस्वरूपी

78  

निर्वाचित  

सभापती 

प्रश्न. 3. टिपा लिहा. 

1) राज्यपाल 

उत्तर :

घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहतात. 

विधानपरिषदेने व विधानसभेने संमत केलेला विधेयकाचे राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते. 

विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. 

 2) मुख्यमंत्र्यांची कार्य 

उत्तर :

मुख्यमंत्र्यांची कार्ये खालीलप्रमाणे –

मंत्रिमंडळाची निर्मिती : बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले मंत्रिमंडळ तयार करतात. 

खातेवाटप : विधानसभा सदस्याचे राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, लोकमताची जाणीव, नेतृत्व इ. बाबींचा विचार करून खातेवाटप केले जाते. 

खात्यामध्ये समन्वय : सरकार चालवताना वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय साधून कारभाराची एक दिशा ठरवावी लागते. हे काम मुख्यमंत्री करतात. 

राज्याचे नेतृत्व : मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्री करतात. 

प्रश्न. 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

विधानसभेच्या सभेचे अक्षयक्षपद भूषवणे, सभेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, कामकाजाची कार्यक्रमपत्रीका तयार करणे, बेशिस्त वर्तन करणाऱ्या सभासदांना निलंबीत करणे. 

2) संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली ?

उत्तर :

भारताचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिनसी आहे. भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूपात यात विविधता आहे. अशा वेळेस एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही, हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे. 

3) खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. 

उत्तर :

मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करावे लागते. खातेवाटप करतानाही मंत्र्यांना राजकीय अनुभव, प्रशासकीय अनुभव, कौशल्य, लोकमताची जाण, नेतृत्व इ. बाबींचा विचार करावा लागतो.