मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण स्वाध्याय
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण इयत्ता दहावी स्वाध्याय
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण इयत्ता दहावी
प्रश्न 1. स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रश्न 2. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा.
अ. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ………….. आहे.
i) 1 ii) 2 iii) 3 iv) 7
उत्तर : i) 1
आ. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीत जागा …………. मध्ये आहे.
i) गण 2 ii) गण 16 iii) आवर्त 2 iv) डी – खंड
उत्तर : i) गण 2
इ. मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसूत्र XCl आहे. ही संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X ही मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल ?
i) Na ii) Mg iii) Al iv) Si
उत्तर : i) Na
ई. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत ?
i) s – खंड ii) p – खंड iii) d – खंड iv) f – खंड
उत्तर : p – खंड
प्रश्न 3. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. या मूलद्रव्यचा अणुअंक किती ?
उत्तर :
अणुअंक – 12
आ. या मूलद्रव्याचा गण कोणता ?
उत्तर :
गण – 2
इ. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे ?
उत्तर :
आवर्त – 3
ई. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील ? (कंसात अणुअंक दिले आहेत)
N(7), Be(4), Ar(18), Cl(17)
उत्तर :
रासायनिक गुणधर्म Be सारखे
प्रश्न 4. दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरुपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा.
अ. 3Li, 14Si, 2He, 11Na, 15P
यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
14Si, 11Na, 15P ही मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तात आहेत. कारण यांच्या अणूसंरचनेत तीन कक्षा आहेत.
आ. 1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar
यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
20Ca, 4Be हे अणू दुसऱ्या गणातील आहेत कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत.
इ. 7N, 6C, 8O, 5B, 13Al,
यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन स्विकारून ऋण – आयन बनण्याची क्षमता 8O ची सर्वात जास्त आहे. कारण बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी 8O ला फक्त दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे व इतर अणुंना दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लागतात. म्हणून 8O हा सर्वात जास्त विद्युत ऋण मूलद्रव्य आहे.
ई. 4Be, 6C, 8O, 5B, 13Al,
यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमातून धन आयन तयार करण्याची क्षमता 4Be ची सर्वात जास्त आहे. कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत ते गमावणे सहज शक्य आहे. कारण इतर अणुंना दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गमवावे लगतात. म्हणून ते तुलनात्मकदृष्ट्या कठीण आहे.
∴ 4Be हा सर्वात जास्त विद्युतधन आहे.
उ. 11Na, 15P, 17Cl, 14Si, 12Mg
यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
11Na मध्ये केंद्रकीय धन प्रभार 11 असून इलेक्ट्रॉन कक्षा तीन आहेत. धन प्रभार कमी असल्यामुळे केंद्रकाकडे इलेक्ट्रॉनला ओढून घेणारी कक्षा कमी आहे. म्हणून आकारमान सर्वाधिक आहे.
त्यामुळे 11Na सर्वात मोठा अणू आहे.
ऊ. 19K, 3Li, 11Na, 4Be
यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणु कोणता ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
4Be अणूच्या एकूण दोन कक्षा असून धन केंद्रकीय प्रभार 4 आहे. तर 3Li मध्ये हा प्रभार 3 आहे. जेवढा तेवढे केंद्राकडे ओढणारे बल जास्त असते व त्यामुळे अणूचा आकार लहान होतो.
म्हणून 4Be हा सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला रेणु आहे.
ए. 13Al, 14Si, 11Na, 12Mg, 16S
यांच्यापैकी सर्वाधिक धातू – गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Na ला सर्वात कमी इलेक्ट्रॉन गमवावे लागतात ते सहज शक्य होते म्हणून 11Na सर्वाधिक धातू – गुणधर्म असलेला अणू आहे.
ऐ. 6C, 3Li, 9F, 7N, 8O
यांच्यापैकी सर्वाधिक अधातू – गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते ?
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ऋण आयन तयार करण्यासाठी 9Fe ला सर्वात कमी इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत स्विकारावे लागतात. ते सहज शक्य आहे. म्हणून 9Fe हा सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला अणू आहे.
प्रश्न 5. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.
अ. सर्वात लहान आकारमानाचा अणू
उत्तर :
H
आ. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू
उत्तर :
H
इ. सर्वाधिक विद्युतऋण अणू
उत्तर :
F
ई. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू
उत्तर :
He
उ. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू
उत्तर ;
F
प्रश्न 6. थोडक्यात टिपा लिहा.
अ. मेंडेलीव्हचा आवर्ती नियम
उत्तर :
मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणूवस्तुमानांचे आवर्तीफल असते. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलीव्हने त्यावेळी माहित असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी अणू वस्तुमानांकाच्या चढच्या क्रमाने केली. या मांडणीनुसार असे दिसून आले की, काही ठराविक अवधीनंतर रासायनिक व भोेतिक गुणधर्मात सारखेपणा असलेल्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते.
आ. आधुनिक आवर्तसारणीची रचना
उत्तर :
आधुनिक आवर्तसारणी मध्ये –
i) सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तने म्हणतात.
ii) अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.
iii) आडव्या उभ्या रांगामुळे चौकटी तयार होतात. प्रत्येक चौकटीत एक एक याप्रमाणे मूलद्रव्याची नावे व अणू अंक लिहिलेले असतात.
iv) तळाशी आणखी दोन ओळी आहेत. त्यांना लॅन्थचनाइड व ऑक्टिनाइड श्रेणी म्हणतात.
v) एकूण 118 चौकटीत, प्रत्येक चौकटीत एक प्रमाणे 118 मूलद्रव्ये दाखविली आहेत.
vi) संपूर्ण आवर्त सारणी चार खंडात विभागली आहे.
|
|
|
|
|
|
|
|
vii) नागमोडी रेषा – P खंडातून एक नागमोडी रेषा जाते ह्या रेषेच्या डाव्या अंगास धातू तर उजव्या अंगास अधातू व रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत.
viii) यातील सर्व मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणू अंकानुसार केलेली आहे.
इ. समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
उत्तर :
समस्थानिके म्हणजे अणू अंक तोच पण अणूवस्तुमान भिन्न असलेले मूलद्रव्याचे अणू. त्याचे रासायनिक गुणधर्म अर्थातच समान असतात. मेंडेलीव्हची सारणी अणुवस्तूमानाप्रमाणे तयार केलेली असल्यामुळे समस्थानिकांना त्या सारणीत सामावून घेणे, योग्य जागी ठेवणे शक्य नव्हते.
पण त्यानंतर मोसले या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची मांडणी अणू अंकानुसार केली त्यामुळे समस्थानिकांना या सारणीत सामावून घेणे शक्य झाले. एकाच चोेेकटीत सर्व समस्थानिके दाखविता आली.
प्रश्न 7. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते
उत्तर :
i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो.
ii) वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.
आ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो
उत्तर :
एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. पण केंद्रकावरील धन प्रभार वाढत जातो. (कारण इलेक्ट्रॉनची संख्या एक एक ने वाढत जाते). त्यामुळे केंद्र व इलेक्ट्रॉन यातील आकर्षण बल वाढून अणूत्रिज्या कमी होते. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावणे अणूला कठीण होत जाते. अर्थात इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो.
इ. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
उत्तर :
i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.
ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.
ई. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
उत्तर :
i) मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.
ii) गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा- इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.
उ. तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्ये आहेत.
उत्तर :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रश्न 8. दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
अ. K , L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त.
उत्तर :
तिसरे आवर्त
आ. शून्य संयुजा असलेला गण
उत्तर :
अठरावा गण किंवा शून्य गण
इ. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
उत्तर :
हॅलोजन्स
ई. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
उत्तर :
अल्क धातू. (गण – 1)
उ. संयुजा 2 असलेल्या धातूंचे कुल
उत्तर :
अल्क मृदा धातू (गण – 2)
ऊ. दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामधील धातुसदृश्य
उत्तर :
5B, 14Si
ए. तिसऱ्या आवर्तामध्ये अधातू
उत्तर :
P, S, Cl, Ar
ऐ. संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
उत्तर :
Ti, Zr