इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय

इयत्ता दहावी विषय इतिहास धडा पहिला स्वाध्याय

इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय 


इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.

१. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) आधुनिक इतिहासलेखनाचा जनक ………….. यास म्हणता येईल.

उत्तर : आधुनिक इतिहासलेखनाचा जनक व्हाॅल्टेअर यास म्हणता येईल.

2) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ …………… याने लिहिला. 

उत्तर : आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

 1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी

 2. लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

 3. हिरोडोटस – द हिस्टरिज

  4. कार्ल मार्क्स – डिसकोर्स ऑन द मेथड

उत्तर : चुकीची जोडी :  कार्ल मार्क्स – डिसकोर्स ऑन द मेथड

दुरुस्त जोडी : कार्ल मार्क्स – दास कॅपिटल

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) द्वंद्ववाद 

उत्तर :

i) एखादया घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला ‘द्वंद्ववाद’ असे म्हणतात. जॉज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.

ii) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच ‘द्वंद्ववाद’ असे म्हणतात.

2) ॲनल्स प्रणाली 

उत्तर :

i) राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ‘ॲनल्स प्रणाली’ असे म्हणतात.
ii) ‘ॲनल्स’ (Annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे, तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी “ॲनल्स प्रणाली’ फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1)  स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 

उत्तर

कारण –

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

ii) स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.

iii) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तसेच ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानल्या गेल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

2) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

उत्तर

कारण –

i) फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी ‘आर्के ऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.

(ii) पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. 

उत्तर

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते –

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

2) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती. 

उत्तर

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये –

i) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.

ii) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.

iii) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.

iv) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.

3) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय. 

उत्तर

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुष सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iii) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

iv) १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

4) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. 

उत्तर

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे.

i) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्ताऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली  माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला.

ii) तसेच  ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज शी ना मत यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

iii) अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

iv) इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका करून जागतिक  इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला.

आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय

आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय

आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय इयत्ता नववी

आनुवंशिकता व परिवर्तन स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान

1. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

(आनुवंश, लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन, गुणसुत्रे, डी. एन. ए, आर. एन. ए, जनुक)

अ. आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून ……………… आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. 

उत्तर :

आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून जनुकांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात.

आ. पुनरुत्पादनाच्या …………….. प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत सूक्ष्म भेद असतात. 

उत्तर :

पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत सूक्ष्म भेद असतात.

इ. सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे ………………. होय. 

उत्तर :

सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसुत्रे होय.

ई. गुणसुत्रे मुख्यत: ………………. नी बनलेली असतात. 

उत्तर :

गुणसुत्रे मुख्यत: डी. एन. ए. नी बनलेली असतात.

उ. पुनरूत्पादनाच्या …………………. प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेद जास्त असतात. 

उत्तर :

पुनरूत्पादनाच्या लैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांतील भेद जास्त असतात.

2. स्पष्टीकरण लिहा. 

अ. मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. 

उत्तर :

मेंडेलेने विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एकसंकर म्हणतात.

यावरून मेंडेलने असे प्रतिपादन केले की, लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीने आढळतात.

आ. मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. 

उत्तर :

द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश होतो.

मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाचवेळी वापरुन संकरणाचे आणखी प्रयोग केले. यात गोल-पिवळ्या (RRYY) बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या (rryy) बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजाचा रंग व प्रकार अशा दोन लक्षणांचा समावेश आहे.

P1 पिढीची युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते म्हणजेच RRYY झाडांपासून RR व YY अशी युग्मके तयार होत नाहीत तर फक्त RY प्रकारची युग्मके तयार होतात तसेच rryy झाडांपासून ry युग्मके तयार होतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते.

इ. मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा. 

उत्तर :

मेंडेलची एकसंकर व द्विसंकर यातील मुद्दे पुढील प्रमाणे आहेत्.

i) विरुद्ध लक्षणांची जोडी

ii) रंग आणि प्रकार

iii) तयार होणारी युग्मके

iv) जनुकांचे प्रतिनिधित्व

ई. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य का आहे. 

उत्तर :

i) जनुकीय विकार हा संक्रमित होणारा रोग नाही.

ii) आई व वडिलांकडून त्यांच्या संततीमध्ये जनुकीय विकार येतो.

iii) जनुकीय विकार असणाऱ्या अपत्यांना आधार आवश्यक असतो. त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही.

3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

अ. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय.

गुणसूत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

i) मध्यकेंद्री (Metacentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे ‘V’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.

ii) उपमध्यकेंद्री (Sub-metacentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे ‘L’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.

iii) अग्रकेंद्री (Acrocentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो. व हे ‘J’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.

iv) अंत्यकेंद्री (Telocentric) – या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘I’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते.

आ. डी.एन.ए रेणूची रचना स्पष्ट करा. 

उत्तर :

i) डी.एन.ए रेणूची रचना सर्व सजीवांत सारखीच असते. डी.एन.ए रेणूतील प्रत्येक धागा न्युक्लीओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो.

ii) नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनीन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनीन व ग्वानीन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसीन व थायमीन यांना पिरिमिडीन्स म्हणतात.

iii) न्युक्लीओटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो.

iv) नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्युक्लिओटाइडसुद्धा चार प्रकारचे असतात.

v) डी.एन.ए. च्या रेणूमध्ये न्युक्लीओटाइडची रचना साखळीसारखी असते. डी.एन.ए चे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील दोन खांब. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हाइड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनीनची थायमीन बरोबर व ग्वानीनची सायटोसीन बरोबर जोडी होते.

इ.  डी.एन.ए फिंगर प्रिटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. 

उत्तर :

प्रत्येक व्यक्तीत असलेल्या डी.एन.ए च्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो.

ई.  आर.एन.ए. ची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

अ) आर.एन.ए ची रचना – हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल होय. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन ॲडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्युक्लीक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्युक्लिओटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आर.एन.ए चा महारेणू तयार होतो.

ब) आर.एन.ए चे कार्य व प्रकार

i) रायबोझोमल आर.एन.ए (rRNA) – रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आर.एन.ए चा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात.

ii) मेसेंजर आर.एन.ए (mRNA) – पेशीकेंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डी.एन.ए च्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा ‘दूत रेणू’.

iii) ट्रान्सफर आर.एन.ए (tRAN) – mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा आर.एन.ए चा रेणू असतो.

उ. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे ?

उत्तर :

सिकलसेल चे निदान करण्यासाठी कारण हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.

4. थोडक्यात माहिती लिहा. 

अ. डाऊन्स सिंड्रोम /मंगोलिकता

उत्तर :

i) गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. ही गुणसूत्रीय विकृती आहे.

ii) यात गुणसूत्ररचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 (एकाधिक द्विगुणितता 21) असेही म्हणतात.

iii) कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21 व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात.

iv) मानसिक वाढ खुंटणे, हे सर्वांत जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. तसेच कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखुड बोटे, आडवी एकच हस्तरेखा, डोक्यावर विरळं केस, आयुर्मान 10 ते 20 वर्षे असते.

आ. एकजनुकीय विकृती

उत्तर :

i) एखाद्या सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याचे जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात.

ii) संदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात.

iii) या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिनसन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमीया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टीक फायब्रॉसिस, वर्णकहीनता, हीमोफेलिया, रातांधळेपणा इ. आहेत.

इ. सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना

उत्तर :

लक्षणे – सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.

उपाययोजना – i) हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो. म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी.

ii) सिकलसेल वाहक / पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक/पिडित व्यक्तीशी लग्न टाळावे.

iii) सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी.

5. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे ?

 अ

 लेबेरची आनुवंशिक चेताविकृती

44 + xxy

निस्तेज त्वचा, पांढरे केस.

 मधुमेह

45 + x

पुरुष प्रजननक्षम नसतात.

 वर्णकहीनता

तंतूकणिका विकृती

स्त्रिया प्रजननक्षम नसतात.

 टर्नर सिंड्रोम

बहुघटकीय विकृती

भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते.

 क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम

एकजनुकीय विकृती

 रक्तातील ग्लुकोजवर परिणाम

उत्तर :

 अ

 लेबेरची आनुवंशिक चेताविकृती

तंतूकणिका विकृती

भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते.

 मधुमेह

बहुघटकीय विकृती

रक्तातील ग्लुकोजवर परिणाम

 वर्णकहीनता

एकजनुकीय विकृती

निस्तेज त्वचा, पांढरे केस.

 टर्नर सिंड्रोम

45 + x

स्त्रिया प्रजननक्षम नसतात.

 क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम

44 + xxy

पुरुष प्रजननक्षम नसतात.

6. सहसंबंध लिहा. 

अ. 44 + X : टर्नर सिंड्रोम :: 44 + XXY : ………….

उत्तर :

44 + X : टर्नर सिंड्रोम :: 44 + XXY : क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम

आ. 3 : 1 एकसंकर :: 9:3:3:1 ………………

उत्तर :

3 : 1 एकसंकर :: 9:3:3:1 द्विसंकर

इ. स्त्रिया : टर्नर सिंड्रोम :: पुरुष : 

उत्तर :

स्त्रिया : टर्नर सिंड्रोम :: पुरुष : क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम

7. आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघतक्ता तयार करा. 

उत्तर :

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय इयत्ता नववी

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान

1. योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा. 

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ

3) मूळ संस्थेची होणारी वाढ

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ

अ) गुरुत्वानुवर्ती हालचाल

ब) रसायन-अनुवर्ती हालचाल

क) प्रकाशानुवर्ती हालचाल

ड) वृद्धी असंलग्न हालचाल

इ) जलानुवर्ती हालचाल

उत्तर :

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ

3) मूळ संस्थेची होणारी वाढ

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ

ब) रसायन-अनुवर्ती हालचाल

क) प्रकाशानुवर्ती हालचाल

अ) गुरुत्वानुवर्ती हालचाल

इ) जलानुवर्ती हालचाल

स्पष्टीकरण – 

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ – रसायन – अनुवर्ती हालचाल – विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन- अनुवर्तन म्हणतात.

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ – प्रकाशानुवर्ती हालचाल – कोणत्याही वनस्पतीची प्ररोध संस्था प्रकाश उद्दिपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते.

3) मूळ संस्थेची होणारी वाढ – गुरुत्वानुवर्ती हालचाल – वनस्पतींची मुळे गुरुत्वाकर्षण या उद्दिपनांला प्रतिसाद देते त्यांची हालचाल गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होते. म्हणून मूळ संस्थेची होणारी वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे.

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ – जलानुवर्ती हालचाल – वनस्पतींच्या मुळांची हालचाल ही पाण्याच्या दिशेने होते. म्हणून वनस्पतीची मुळे पाण्याच्या दिशेने वाढतात त्यांच्या या हालचालीला जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात.

2. परिच्छेद पूर्ण करा. 

शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती ……………. पेशीद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील ………… च्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती …………… कडे व तेथून …………. च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसुक्ष्म पोकळीतून म्हणजेच ………… मधून जातात. अशा प्रकारे …………. चे शरीरात वहन होते आणि आवेग ………… कडून ………… कडे पोहोचवले जाऊन …………….. क्रिया पूर्ण होते.

( चेतापेशी, स्नायूपेशी, आवेग, वृक्षिका, अक्षतंतू, संपर्कस्थान, प्रतिक्षिप्त, पेशीकाया) 

उत्तर :

शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती चेतापेशी पेशीद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील वृक्षिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसुक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानमधून जातात. अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते.

3. टिपा लिहा. 

मूलदाब, बाष्पोच्छ्वास, चेतापेशी, मानवी मेंदू, प्रतिक्षिप्त क्रिया. 

अ. मूलदाब

उत्तर :

i) मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात. यामुळे या पेशी ताठर होतात. त्यांमुळे त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब असे म्हणतात.

ii) या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात.

iii) या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो. जो सातत्याने पुढे ढकलला जातो.

iv) मूलदाब हा झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो.

v) मूलदाबाच्या परिणामामुळे पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य होते.

आ. बाष्पोच्छ्वास

उत्तर :

i) वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परूपाने पाणी बाहेर टाकतात.

ii) पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात.

iii) पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते.

iv) बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते.

इ. चेतापेशी

उत्तर :

i) शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात.

ii) चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत.

iii) मानवी शरीरातील आकाराने सर्वांत मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी काही मीटरपर्यंत भरते चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते.

iv) चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेता बनतात.

ई. मानवी मेंदू

उत्तर :

i) मेंदू आपल्याला विचार करायला लावतो व आपण आपल्या विचारानुसारा कृती करतो. विविध माहिती व कृती यांच्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यास कारणीभूत असलेली विविध केंद्रे सामावलेली एक जटील संरचना म्हणजे मेंदू होय.

ii) प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो.

iii) आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.

मेंदूचे विविध भाग व कार्ये

i) प्रमस्तिष्क (Cerebrum) – ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मानवी एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयका क्रिया करणे हे कार्ये प्रमस्तिक करते.

ii) अनुमस्तिष्क (Cerebellum) – ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे. शरीराचा तोल सांभाळणे हे कार्ये अनुमस्तिष्क करते.

iii) मस्तिष्कपुष्छ (Medulla-oblongata) – हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण.

iv) मेरुरज्जू (Spinal cord) – त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे. प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक  केंद्र म्हणून कार्य करतो.

उ. प्रतिक्षिप्त क्रिया

उत्तर :

i) पर्यावरणातील एखादया घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय.

ii) आपण या घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्यप्रकारे राखला जातो.

iii) जरी संकेत (संदेश) मेंदूपर्यंत पोहोचत असेल तरी प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग हा मेरूरज्जूमध्येच तयार होतो.

iv) मेंदूची विचार करण्याची प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळेच कदाचीत प्राण्यांमध्ये प्रतिक्षिप्त क्रियेचे मार्ग विकसित झाले असावेत.

v) निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये विचार करण्यासाठी आवश्यक असलेले चेतापेशींचे जटील जाळे नसते. म्हणून विचार प्रक्रियेचा अभाव असताना उत्तमरित्या कार्य करण्यासाठीच प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग विकसित झाले. परंतु चेतांचे जाळे असतानासुद्धा प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग हेच त्वरित प्रतिसाद देण्यास जास्त कार्यक्षम ठरतात.

4. खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा. 

अ. पियूषिका

उत्तर :

संप्रेरक – पीयूषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्त्राव तयार करणे.

कार्ये – पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करणे.

आ. अवटु

उत्तर :

संप्रेरक – थायरॉक्झीन, कॅल्सिटोनीन

कार्ये – i) शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.

ii) कॅल्शियमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.

इ. अधिवृक्क

उत्तर :

संप्रेरक – अँड्रेनॅलिन व नॉरअँड्रेनॅलिन, कॉर्टिकोक्स्टेरॉइड

कार्ये – i) आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे.

ii) ह्रदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.

iii) Na, K चे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.

ई. यौवनलोपी

उत्तर :

संप्रेरक – थायमोसीन

कार्ये – प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.

उ. वृषणग्रंथी

उत्तर :

संप्रेरक – टेस्टेस्टेरॉन

कार्ये – पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे.

ऊ. अंडशय 

उत्तर :

संप्रेरक – इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन

कार्ये – i) इस्ट्रोजन कार्य – स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंत: स्तराची वाढ, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे.

ii) प्रोजेस्टेरॉन – गर्भाशयाच्या अंत:स्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे.

5. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. 

अ. मानवी अंतस्त्रावी ग्रंथी

उत्तर :

आ. मानवी मेंदू

उत्तर :

इ. नेफ्रॉन

उत्तर :

ई. चेतापेशी

उत्तर :

उ. मानवी उत्सर्जन संस्था

उत्तर :

6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा. 

उत्तर :

i) आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थामार्फत समन्वय व नियंत्रण केले जाते, अंत:स्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हटले जाते.

ii) या ग्रंथीकडे त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होतात ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात.

iii) या अंतस्त्रावि ग्रंथी शरीरामध्ये जरी ठरावीक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.

iv) अंतस्त्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य व दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.

संप्रेरकाची नावे व त्यांची कार्ये – 

 संप्रेरके                        कार्य

1) पॅराथाॅर्मोन – शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या चयापचाचे नियंत्रण करणे.

2) थायमोसीन – प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.

3) थायरॉक्झीन – शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.

4) कॅल्सिटोनीन – कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.

आ. मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

 मानवी उत्सर्जन 

वनस्पती उत्सर्जन  

 

i) मानवी उत्सर्जन क्रिया ही कठीण असते. 

ii) मानवातील उत्सर्जन क्रिया करण्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते. 

iii) मानवी शरीरात रक्ताची गाळण क्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकला जातो. 

iv) मानवी उत्सर्जित पदार्थ म्हणजे युरिया, अमोनिया हे असतात. 

i) वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही सोपी असते. 

ii) वनस्पतींमध्ये  टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. 

iii) वनस्पतींमध्ये विसरण क्रियेद्वारे वायूरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. 

iv) वनस्पती उत्सर्जित पदार्थ म्हणजे राळ, डिंक यांसारखे पदार्थ असतात.

इ. वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या. 

उत्तर :

वनस्पतींमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते.

i) बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय.

ii) कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणतात. उदा. प्रकाशाच्या दिशेने वळलेले रोप.

iii) वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दिपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल म्हणतात.

iv) विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन- अनुवर्तन म्हणतात. उदा. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ.

7. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या. 

अ. समन्वय म्हणजे काय ?

उत्तर :

कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये असणारे नियमन म्हणजेच समन्वय होय. उदा. समन्वय अभावामुळे कधी कधी जेवण करत असतांना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येते.

आ. मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते ?

उत्तर :

i) मानवी उत्सर्जन क्रिया उत्सर्जन संस्थेमार्फत चालते.

ii) मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय, मूत्रोत्सर्जक लिकाचा समावेश होतो.

iii) वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते.

iv) मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव आहे.

इ. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते ?

उत्तर :

वनस्पती उत्सर्जन क्रियेत फुले, फळे तसेच राळ, डिंक असे उपयुक्त पदार्थ बाहेर टाकतात. हे सगळे पदार्थ मानवी जीवनात उपयुक्त आहेत. तसेच रबराच्या चिकांपासून रबर बनतो. रबरापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात.

ई. वनस्पतींमधील परिवहन कसे होते ?

उत्तर :

i) वनस्पतींमधील परिवहन हे विशिष्ट प्रकारच्या ऊती करतात. जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात. वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात.

ii) वनस्पतींचे परिवहन हे मूलदाब आणि बाष्पोच्छ्वास या प्रक्रियांमार्फत होते.

कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य स्वाध्याय

कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य स्वाध्याय

कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य स्वाध्याय इयत्ता नववी 

कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

(एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाण घेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रीय, सहसंयुज)

अ. कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर ………………. बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्टाॅनची ………………. होते. 

उत्तर :

कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर सहसंयुज बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्टाॅनची भागीदारी होते. 

आ. संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन बंध हे ……………….. असतात. 

उत्तर :

संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन बंध हे एकेरी असतात. 

इ. असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा …………….. असतात. 

उत्तर :

असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा बहुबंध असतात. 

ई. सर्व सेंद्रीय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य ……………. हे होय. 

उत्तर :

सर्व सेंद्रीय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय. 

ए. हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक ……………….. पदार्थामध्ये असते. 

उत्तर :

हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रीय पदार्थामध्ये असते. 

2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात ?

उत्तर :

कार्बन व त्याची संयुगे ही ज्वलनशील घटक आहेत. या संयुगाचे ज्वलन केल्यास कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. याच्या संयुगामुळे पाणी तयार होते. या संयुगाच्या ज्वलनाने उष्णता निर्माण होते. जी अनेक कामांसाठी उपयोगात आणली जाते. म्हणून कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग करतात.

आ. कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो ?

उत्तर :

i) कार्बन डायऑक्साइड, कॅल्शिअम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन, हिरा, ग्रॅफाइट. या संयुगांच्या स्वरूपात कार्बन सापडतो.

ii) जीवाश्म इंधने – दगडी कोळसा, पेट्रोलिअम, नैसर्गिक वायू. 

iii) कार्बनी पोषद्रव्ये – पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद.

iv) नैसर्गिक धागे – कापूस, लोकर, रेशीम, इत्यादी. संयुगाच्या स्वरूपात कार्बन सापडतो.

इ. हिऱ्याचे उपयोग लिहा. 

उत्तर :

i) काच कापण्याच्या, धातू कापण्याच्या व खडकाला छिद्र पडण्याच्या उपकरणांत हिरे वापरतात. 

ii) अलंकार तयार करण्यासाठी करतात. 

iii) डोळ्यांची शास्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. 

iv) हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. 

v) हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात. 

3. फरक स्पष्ट करा. 

अ. हिरा व ग्रॅफाइट

उत्तर :

 हिरा  

ग्रॅफाइट

 

i) हिऱ्याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अणूभोवती ठरावीक अंतरावर चार कार्बन अणू असतात. 

ii) हिरा तेजस्वी, शुभ्र, कठीण पदार्थ आहे. 

iii) हिरा विद्युत दुर्वाहक आहे. 

 

i) प्रत्येक कार्बन अणूभोवती ठरावीक अंतरावर तीन कार्बन अणू असतात. 

ii) ग्रॅफाइट काळा, मऊ, गुळगुळीत असतो. 

iii) ग्रॅफाइट विद्युत सुवाहक आहे. 

आ. कार्बनची स्फटिक रुपे व अस्फटिक रुपे

उत्तर :

 कार्बनची स्फटिक  रुपे

अस्फटिक रुपे

 

i) स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) उदा. हिरा, ग्रॅफाइड

iii) स्फटिक रूपातील पदार्थाना निश्चित पृष्ठभाग असतात. 

 

i) अस्फटिक रुपातील अणूंची रचना अनियमित असते. 

ii) उदा. कोक, कोल

iii) यांना निश्चित पृष्ठभाग नसतो. 

4. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे. 

उत्तर :

कारण – i) ग्रॅफाइड हे काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. 

ii) ग्रॅफाइडमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. 

iii) ग्रॅफाइटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणून ग्रॅफाइड विदयुतवाहक आहे.

आ. ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत. 

उत्तर :

कारण – i) ग्रॅफाइट हे काळे, मऊ, ठिसूळ असते. 

ii) दागिने तयार करण्यासाठी कठीण धातूं आवश्यक असते. ग्रॅफाइड हे कठीण नसल्यामुळे याचा वापर दागिण्यांमध्ये करत नाही. तसेच ग्रॅफाइट हे बहुतांश द्रावकांत विरघळत नाही.


इ. चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते. 

उत्तर :

कारण – i) चुन्याच्या निवळीची CO2 बरोबर अभिक्रिया होते. 

 ii) त्यातून कार्बन डायऑक्साड वायू प्रवाहित होतो. अंद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. म्हणून चुन्याची निवळी दुधाळ होते. 

ई. बायोगॅस हें पर्यावरणस्नेही इंधन आहे. 

उत्तर :

कारण – i) बायोगॅस तयार करतांना जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. 

ii) यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. म्हणून बायोगॅस हे पर्यावरणस्नेही इंधन आहे.

5. स्पष्ट करा. 

अ. हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत. 

उत्तर :

i) हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन मधील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) याचे द्रवणाक व उत्कलनांक उच्च असतात. 

iii) या पदार्थाना निश्चित भौमितीक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. म्हणून हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत.


आ. मिथेनला मार्श गॅस म्हणतात. 

उत्तर :

मिथेन वायू मृत प्राणी व वनस्पतीच्या अपघटनाने दलदलीच्या पृष्ठभागावर आढळून येतो, म्हणून याला मार्श ग्रॅस असेही म्हणतात. 

इ. पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत. 

उत्तर :

i) पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा हे खूप वर्षा आधी बनलेले नैसर्गिक इंधन आहे. 

ii) प्राचीन काळी भूहालचालींमुळे वनस्पती व प्राण्यांच्या घोषांवर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील अवशेषांचे विघटन होऊन त्यातील कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली. त्यापासून पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही इंधने तयार झाली आहेत. म्हणून ही इंधने जीवाश्म इंधने आहेत. 


ई. कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग

उत्तर :

कार्बनची अपरूपे व त्यांचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत. 

1) स्फटिक रूप – उदा., हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन

उपयोग – i) हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांत वापरतात. अलंकार तयार करण्यासाठी, दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी, शस्त्रक्रियेच्या उपकरणांमध्ये करतात. 

ii) ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी, पेन्सिलमध्ये, आर्क लॅम्पमध्ये, रंग, पॉलिश तयार करण्यासाठी कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी वापरतात. 

iii) फूलरिनचा उपयोग विसंवाहक म्हणून, जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून करतात.

2) अस्फटिकी अपरूपे – उदा. दगडी कोळसा, चारकोल, ‘कोक उपयोग 

उपयोग – i) कारखान्यात व घरात कोळसा इंधन म्हणून वापरतात. 

ii) विद्युत निर्मितीसाठी, औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. 

iii) कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा उपयोग होतो. 

iv) कोक घरगुती इंधन म्हणून वापरतात. 

v) वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस निर्मितीत कोकचा उपयोग होतो.

उ. अग्निशामक यंत्रात CO2 वायूचा उपयोग

उत्तर :

i) कार्बन डायऑक्साइड (CO2) हा वायू ज्वलनशील नाही तसेच तो ज्वलनास मदत करत नाही. 

ii) CO2 अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीजप्रवाह प्रतिबंधक असतात. त्यामुळे विदयुत उपकरणे व यंत्रांना लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात. म्हणून अग्निशामक यंत्रात CO2 चा उपयोग होतो.


ऊ. CO2 चे व्यावहारिक उपयोग

उत्तर :

CO2 चे व्यावहारिक उपयोग – i) फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी करतात. 

ii) शीतकपाटांमध्ये तसेच सिनेमा-नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळविण्यासाठी करतात. 

iii) अग्निशामक यंत्रात 

iv) कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी वापरतात. 

v) हवेतील CO2 ची उपयोग वनपाल प्रकाश संश्लेषणासाठी करतात.

6. प्रत्येकी दोन भौतिक गुणधर्म लिहा. 

अ. हिरा

उत्तर :

i) तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. 

ii) हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. 

आ. चारकोल

उत्तर :

i) चारकोलचे ज्वलन होत असताना धूर होतो. 

ii) यामध्ये अस्फटिकी कार्बन संयुगे असतात. 

इ. कार्बनचे स्फटिक रूप

उत्तर :

i) स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) स्फटिक रूपातील पदार्थाना निश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. 

7. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. 

अ. …………… + ……………….   CO2 + 2H2O + उष्णता

उत्तर :

CH4 + 2O2   CO2 + 2H2O + उष्णता

आ. …………… + ……………….   CH3Cl+ HCl

उत्तर :

CH4 + Cl2  →/प्रकाश CH3Cl+ HCl

इ. 2NaOH + CO2   …………… + ……………….

उत्तर :

2NaOH + CO2   Na2CO3 + H2O


8. खालील प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहा. 

अ. कोळशाचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा.

उत्तर – 

कोळशाचे चार प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 

i) पीट – कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीट तयार होणे होय. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा खूप कमी असते. म्हणून यापासून कमी उष्णता मिळते.

ii) लिग्नाइट – जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीटचे रूपांतर लिग्नाइटमध्ये झाले. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते.  कोळसा तयार होण्याची दसरी पायरी म्हणजे लिग्नाइट होय.

iii) बीट्युमिनस – कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बीट्युमिन तयार झाला. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% असते.

iv) अँथ्रासाईट – कोळशाचे शुद्ध स्वरूप अँथ्रासाईट ओळखला जातो. हा कोळसा कठीण असून त्यात कार्बनचे प्रमाण सुमारे 95% असते. 

कोळशाचे उपयोग – i) कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. 

ii) कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. 

iii) विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. 

आ. ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध कराल ?

उत्तर :

प्रयोग साहित्य – पेन्सिल, विद्युतवाहक तारा, बॅटरी/सेल, लहान बल्ब, पाणी, रॉकेल, परीक्षानळ्या, पेन्सिलच्या आतील लेड इत्यादी. 

कृती – i) पेन्सिलमधील लेड काढा व तिचा हाताला होणारा स्पर्श अनुभवा. तिचा रंग कसा आहे तो पहा. ती लेड हाताने तोडून पहा. 

ii) आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्य जुळवा. परिपथात विद्युतप्रवाह सुरू करा. 

iii) विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर बल्ब प्रकाशमान दिसतो. यावरून ग्रॅफाइट हे विद्युत वाहक आहे हे सिद्ध होते. 

इ. कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा. 

उत्तर :

कार्बनची अपरुपता – निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला ‘अपरुपता’ असे म्हणतात. 

1) स्फटिक रुपे – i) स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात. 

iii) स्फटिक रूपातील पदार्थाना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतो.

2) अस्फटिकी अपरूपे – i) या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना ही नियमित नसते. 

ii) दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक ही कार्बनची अस्फटिकी रुपे आहेत. 

ई. कार्बनचे वर्गीकरण करा. 

उत्तर :

i) कार्बनच्या अपरूपतेवरून त्याचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते. 

I) स्फटिक रूप 

II) अस्फटिक रूप

I) स्फटिक रूप – हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही तीन कार्बनची स्फटिक रुपे आहेत. 

II) अस्फटिक रूप – दगडी कोळसा, कोक व कोळसा ही कार्बनची अस्फटिक रुपे आहेत. 

9. कार्बन डायऑक्साइडचे गुणधर्म कसे पडताळून पहाल ?

उत्तर :

वरील आकृतीचे निरीक्षण केल्यावर कार्बन डायऑक्साइडचे गुणधर्म पडताळून पाहाता येतात. ते पुढील प्रमाणे आहेत. 

i) ज्वलनशीलता – कार्बनडाय ऑक्साइडच्या वायुपात्रात जळती मेणबत्ती ठेवली असता ती विझते. त्यामुळे CO2 हा वायू ज्वलनास मदत करीत नाही हे स्पष्ट होते. हा वायू ज्वलनशील नाही. 

ii) द्रावणीयता – CO2 हा वायू असलेल्या वायूपात्रामध्ये थोडी चुन्याची निवळी टाकल्यास ती दुधाळ होते. अद्रावणीय कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. त्यामुळे CO2 चे अस्तित्व कळते.  

iii) वैश्विकदर्शक – निळा व लाल लिटमस कागद ओला करून कार्बन डायऑक्साइडच्या वायुपात्रात टाकल्यास निळा लिटमस लाल होतो. म्हणजेच COवायू आम्लधर्मी ऑक्साइड आहे हे सिद्ध होते. तर लाल लिटमसमध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. 

रासायनिक गुणधर्म –

i) सोडिअम हायड्रॉक्साइडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साइड पाठवल्यास सोडिअम कार्बोनेट मिळते. 

2NaOH + CO2   Na2CO3 + H2O

ii)  सोडिअम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून COपाठवला असता  सोडिअम बायकार्बोनेट मिळते. 

Na2CO3 + H2O + CO2  2NaHCO3

ध्वनीचा अभ्यास स्वाध्याय

ध्वनीचा अभ्यास स्वाध्याय

ध्वनीचा अभ्यास स्वाध्याय इयत्ता नववी

ध्वनीचा अभ्यास स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान

1. खालील विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या. 

अ. ध्वनीचे प्रसारण …………….. मधून होत नाही. 

उत्तर :

ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळी मधून होत नाही. 

कारण – ध्वनी लहरींना प्रसारणासाठी भौतिक माध्यमाची आवश्यकता असते. म्हणून ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीतून होत नाही. 

आ. पाण्यातील व स्टीलमधील ध्वनी वेगाची तुलना करता ……………. मध्ये ध्वनी वेग जास्त असतो. 

उत्तर :

पाण्यातील व स्टीलमधील ध्वनी वेगाची तुलना करता स्टील मध्ये ध्वनी वेग जास्त असतो.

कारण – ध्वनीचा वेग माध्यमानुसार ; स्थायू < द्रव < वायू

इ. दैनंदिन जीवनातील ……………… या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते. 

उत्तर :

 दैनंदिन जीवनातील विज पडणे या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते.

कारण – आकाशात वीज पडत असताना विजेचा आकाश आधी दिसतो व त्यानंतर विजेचा गडगडाट ऐकू येतो. या उदाहरणावरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होते. 

ई. समुद्रात बुडलेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी ……………. तंत्रज्ञान वापरले जाते. 

उत्तर :

समुद्रात बुडलेले एखादे जहाज, मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते. 

कारण – पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनीतरंगाचा उपयोग करून SONAR मोजते. 

2. शास्त्रीय कारणे स्पष्ट करा. 

अ. चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात. 

उत्तर :

कारण – i) कुठल्याही इमारतीचे छत व भिंती यांवरून ध्वनीतरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनीतरंग एकत्र येऊन निनाद तयार करतात. 

ii) त्यामुळे वर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा तसेच वाढलेल्या महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होते. 

iii) याप्रकारचा अनावश्यक निनाद टाळण्याच्या हेतूने चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात. 

आ. रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते. 

उत्तर :

i) ध्वनीतरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनीतरंग एकत्र येऊन निनाद तयार करतात. 

ii) रिकाम्या बंदिस्त घरामध्ये सामानांची कमतरता असल्याने घरातील भिंती व छतावरून ध्वनीचे मोठ्या प्रमाणात परावर्तन होते व ध्वनीचे गोषण होते. ध्वनींच्या शोषणास इतर माध्यम उपलब्ध नसतात. 

iii) याकारणाने काम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते.

इ. वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही. 

उत्तर :

i) प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकण्यासाठी 22 °C तापमानाला ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर 17.2 मीटर असले पाहिजे. 

ii) परंतु वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी हा पुढील भिंतीमधील अंतर व छताची जमिनीपासून उंची 17.2 मीटरपेक्षा कमी असल्यानेआढळतो. 

iii) याकारणाने वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही. 

3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. 

अ. प्रतिध्वनी म्हणजे काय ? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?

उत्तर :

मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामूळे झालेली पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय. प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी खालील बाबी आवश्यक असतात. 

i) 22 °C तापमानाला हवेतील वेग 344 मीटर/सेकंद असतो. 

ii) आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहचल्यास तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येतो. 

iii) ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर काढण्याचे सूत्र

अंतर = वेग x काळ

= 344 मीटर / सेकंद x 0.1 सेकंद

= 34.4 मीटर.

iv) ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 °C तामपानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजेच 17.2 मीटर असावे लागते.

आ. विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणमीमांसा करा. 

उत्तर :

i) विजयपूर येथील गोलघुमट ध्वनीशास्त्राच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्वका संरचित आहे. येथे कोणताही आवाज जवळपास 10 वेळा प्रतिध्वनित होतो.  

ii) याची मूळ संरचना 47.5 मीटर (156 फुट) आकाराच्या घनांनी बनलेली आहे. ज्याच्यावर 44 मीटर (144 फुट) बाहेरील व्यासाचा एक मोठा घुमट बसवलेला आहे. 

iii) गोलघुमटाच्या चार बाजूंनी चार उंच मनोरे आहेत. त्यांना आठ मजले आहेत. ज्यामुळे ध्वनी परावर्तित होतो व प्रतिध्वनी ऐकू येतो.

इ. प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची मोजमापे व रचना कशी असावी ?

उत्तर :

i) प्रतिध्वनी ऐकण्यासाठी 22°C तापमानाला ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर 17.2 मीटर असावे लागते. 

ii) वर्गखोलीची रचना करताना वर्गातील पुढील भिंतीवरील अंतर व ता जमिनीपासून उंची 17 मीटर पेक्षा कमी ठेवल्यास प्रतिध्वनी निर्माण होणार नाही.

4. ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो ?

उत्तर :

i) ध्वनीशोषक साहित्याचा वापर सभागृहांमध्ये तसेच चित्रपटगृहामध्ये केला जातो. 

ii) अनावश्यक निनाद टाळण्यासाठी तसेच प्रतिध्वनी निर्माण न होण्यासाठी सभागृहांमध्ये तसेच चित्रपटगृहांमध्ये ध्वनिशोषक साहित्याचा वापर केला जातो.

5. उदाहरणे सोडवा. 

अ. 0 तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 m/s आहे. तो प्रतिअंश सेल्सिअस ला 0.6 m/s ला हवेचे तापमान किती असेल ?

उत्तर :

आ. नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल ? ध्वनीचा हवेतील वेग = 340 m/s. 

उत्तर :

इ. सुनील दोन भिंतीच्यामध्ये उभा आहे. त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत 360 मीटर अंतरावर आहे. तो ओरडल्यानंतर 4 सेकंदानंतर त्याला पहिला प्रतिध्वनी ऐकू आला व नंतर 2 सेकंदानंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आला तर,

1) ध्वनीचा हवेतील वेग किती असेल ?

2) दोन भिंतीमधील अंतर किती असेल ?

उत्तर :

ई. हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये (A व B) एकाच तापमानावर ठेवला आहे. बाटल्यांतील वायूचे वजन अनुक्रमे 12 ग्रॅम व 48 ग्रॅम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल ? किती पटीने ?

उत्तर :

उ. दोन सारख्या बाटल्यांमध्ये हेलिअम वायू भरलेला आहे. त्यातील वायूचे वजन 10 ग्रॅम व 40 ग्रॅम आहे. जर दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गति समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल ?

उत्तर :

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ……………….  यांची नेमणूक झाली. 

अ) डॉ. होमी भाभा

ब) डॉ. होमी सेठना

क) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

ड) डॉ. राजा रामण्णा

उत्तर :

अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली. 

2) इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला …………………. हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. 

अ) आर्यभट्ट

ब) इन्सॅट १ बी

क) रोहिणी-७५

ड) ॲपल

उत्तर :

इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. 

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) पृथ्वी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र

2) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

3) आकाश – जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र

4) नाग – शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र

उत्तर :

चुकीची जोडी : अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

प्रश्न. 2. अ. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा. 

उत्तर :

ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) अवकाश संशोधन

उत्तर :

i) केरळ राज्यातील थंबा येथील ‘थुबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ वरून ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. 

ii) १९६९ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी – ७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. 

iii) या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. 

iv) भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.

2) टलेक्स सेवा

उत्तर :

i) देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 

ii) १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. 

iii) या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली

उत्तर :

कारण i) अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. 

ii) भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. म्हणून पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

2) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला

उत्तर :

कारण i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ में १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली. 

ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

3) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले

उत्तर :
कारण  i) १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संररक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले. 

ii) त्यानंतर ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही’ अशी ग्वाही दिली म्हणून अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.

प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा

उत्तर :

i) शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. 

ii) प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ‘अणुस्फोट’ चाचणीचा निर्णय घेतला. त्यासाठी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली. 

iii) अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आष्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणील महत्त्वाचा वाटा होता. 

iv) पोखरण येथे १९७४ मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली. आणि ११ मे १९९८ रोजी दुसरी अणुस्फोट चाचणी केली.

2. भास्कर-१ हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे

उत्तर

भास्कर-१ हा उपग्रह पुढील क्षेत्रासाठी उपयोगी आहे.

i) देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे. हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. 

ii) या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती. 

iii) या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनॉग्राफी) मध्ये झाला.

प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो

उत्तर :

आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल, टिव्ही, इंटरनेट, रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो.

2. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधल जाते

उत्तर :

i) भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत १९५८ साली ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (DRDO) स्थापना झाली. 

ii) संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतींत देशाला स्वावलंबी बनवणे हा य संस्थेचा उद्देश होता. 

iii) १९८३ नंतर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. 

iv) क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. यांना डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच ‘मिसाईल मॅन’ असे संबोधले जाते.

3. संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते

उत्तर 

संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाइट वर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते. प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणकीकृत अनआरक्षित तिकिट प्रणाली केंद्रावरून खरेदी करू शकतात. तसेच रेल्वेस्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकिट वेंडिग मशीनद्वारे तिकिट प्राप्त केले जाऊ शकते.

4. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा

उत्तर :
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

i) १९९८ मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. 

ii) सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. 

iii) या मार्गावर एकूण १२ बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील ६.५ किमी लांबीचा बोगदा सर्वांत मोठा बोगदा आहे. 

iv) येथे ७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील रावती नदीवरील २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत मोठा आहे. 

v) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा पूल सर्वांत उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी 

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) १९४८ मध्ये ………………… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. 

अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा

ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

क) रोजगार निर्मिती व्हावी

ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी

उत्तर :

१९४८ मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

2) भारतातील …………………. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते. 

अ) ताग

ब) वाहन

क) सिमेंट

ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर :

भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

3) वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम ………………. हे आहे. 

अ) कापड उत्पादन करणे

ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे

क) कापड निर्यात करणे

ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे

उत्तर :

वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.

4) सायकल उत्पादनात ……………… हे भारतातील प्रमुख शहर आहे. 

अ) मुंबई

ब) लुधियाना

क) कोचीन

ड) कोलकाता

उत्तर :

सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ – औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे उपलब्ध कर्ज करून देणे

2) औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे

3) वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

4) खादी फ ग्रामोद्योग आयोग – ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणासचालना देणे

उत्तर :

चुकीची जोडी : वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

प्रश्न. 2. अ) दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा. 

चौकट पूर्ण करा. 

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

उत्तर :

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषध.

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

 चहा, कॉफी मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे

ब) टीपा लिहा. 

1) भारताची आयात-निर्यात

उत्तर :

i) १९५१ मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयतीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

ii) भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉपी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

2) भारताचे अंतर्गत व्यापार 

उत्तर :

i) एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावर होतो.

ii) भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्ती लोकसंख्या, या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो.

iii) भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो.

iv) मुंबई, कोलकता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची बंदरे आहेत.

v) अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

उत्तर :

कारण – i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

2) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

उत्तर :

कारण – i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे.

ii) तसेच भारतातील उदयोगधंदयाच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते

उत्तर :

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते.

i) ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

ii) पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.

iii) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशीचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

iv) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते.

v) उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

2) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो

उत्तर :

i) भारतात देशा-परदेशांतील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

ii) पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

iii) पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमांतून लोकांना रोजगार निर्माण होतो.

3) भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात

उत्तर :

भारतात वनसंपत्तीर वर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र कापड, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणा कच्चा माल हे व्यवसाय चालतात.

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) भारताचे …………….. हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 

अ) प्रधानमंत्री

ब) राष्ट्रपती

क) संरक्षण मंत्री

ड) राज्यपाल

उत्तर :

भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 

2) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल –

अ) भूदल

ब) तटरक्षक दल

क) सीमा सुरक्षा दल 

ड) जलद कृतिदल

उत्तर :

भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल – तटरक्षक दल

3) विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी …………….. ची स्थापना करण्यात आली. 

अ) बी. एस. एफ. 

ब) सी. आर. पी. एफ. 

क) एन. सी. सी. 

ड) आर. ए. एफ. 

उत्तर :

विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन. सी. सी. ची स्थापना करण्यात आली. 

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. 

कारण – i) मानवी सुरक्षेला असणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय. 

ii) दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. 

iii) या माणसांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

2) प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. 

उत्तर : 

हे विधान बरोबर आहे. 

कारण – i) परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे. हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात. 

ii) त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

3) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणते वादग्रस्त प्रश्न नाहीत. 

उत्तर : 

हे विधान चूक आहे. 

कारण – i) स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

ii) जसे काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी प्रश्नांवरून पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केले आहे. यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) जलद कृतिदलाचे कार्य

उत्तर : 

i) भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासांठी निमलष्कर दले असतात. 

ii) संरक्षण दलांना साहाय्य करणे हे या दलांचे प्रमुख काम असते. 

iii) निमलष्करी दलात जलद कृतिदलाचा समावेश होतो. या जलद कृतिदलाचे कार्य म्हणजे बाँबस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे असते.

2)  मानवी सुरक्षा

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाशी सुरक्षा ही अंतिमत: माणसांसाठीच असते. 

ii) म्हणूनच मानवी सूरक्षा म्हणजे माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार होय. 

iii) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. 

iv) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

3) गृहरक्षक दल

उत्तर : 

i) स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल (होमगार्ड) ही संघटना स्थापन करण्यात आली. 

ii) गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात. या दलात वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकांस भरती होता येते. 

iii) पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.

4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो ? 

उत्तर :

i) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद, पाणी वाटपावरून वाद होऊन संघर्ष निर्माण होतात. 

ii) आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची कारणे निर्माण होतात. 

iii) राष्ट्रांमध्ये अशाप्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते, परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. 

iv) एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे. या सर्व बाबींमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.

2) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. 

उत्तर :

भारतातील निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो. सीमा सुरक्षा दलाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

i) सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. 

ii) सीमेजवळच्या भागातील विस्फोटक वस्तूंची तस्करी रोखणे. 

iii) सीमेवर गस्त घालणे. 

3) मानवी सुरक्षा म्हणजे काय ?

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. 

ii) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. 

iii) माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 

iv) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.

5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. 

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

………………. 

 ………………. 

 ………………. 

 ………………. 

 ………………. 

 अँडमिरल

 ………………. 

 ………………. 

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 ………………. 

 ………………. 

उत्तर :

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे.   

 जनरल

बिपिन रावत 

 नौदल 

सागरी सीमांचे रक्षण करणे.  

 अँडमिरल

सुनिल लांबा

 वायुदल

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 एअर चीफ मार्शल

बी. एस. धनोआ. 

2) भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा. 

उत्तर :

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. 

अ) अमेरिका

ब) रशिया

क) जर्मनी

ड) चीन

उत्तर :

जर्मनी

2) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. 

अ) युनिसेफ

ब) युनेस्को

क) विश्वस्त मंडळ

ड) रेडक्राॅस

उत्तर :

युनिसेफ

3) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या – 

अ) १९०

ब) १९३

क) १९८

ड) १९९

उत्तर :

१९३

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) आमसभेत पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही.

ii) आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते. म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

2) संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो.

3) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) चीन हा सुरक्षा समितीचा कायम सदस्य आहेत.

ii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे.

iii) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकत नाही.

4) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झाला होतात.

ii) निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता.

iii) संयुक्त राष्ट्रांमध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे.

iv) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे. त्यासोबतच स्त्री सैनिकांची शांतिसेना पाठवली आहे. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) नकाराधिकार

उत्तर :

i) सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात.

ii) अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे.

iii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते.

iv) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही.

v) अर्थात सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या धाराला नकाराधिकार म्हणतात.

2) युनिसेफ 

i) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय.

ii) यूनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे.

iii) लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते.

iv) युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

4. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा.

उत्तर :

संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहे

i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आतंरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.

ii) पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.

2) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते ?

उत्तर :

i) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते.

ii) तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात.

iii) संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना याप्रकारची भूमिका बजावते.

3) संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. 

उत्तर :

संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत.

i) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

ii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गानि सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

iii) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

iv) याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य चाढवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.

5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) संयुक्त राष्ट्रांच्या घटकशांखाविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्र.

 शाखा

सदस्य संख्या

कार्ये

 1.

आमसभा

 2.

सुरक्षा समिती

 3.

आंतरराष्ट्रीय न्यायालय

 4.

आर्थिक व समाजिक परिषद

उत्तर :

 क्र.

 शाखा

सदस्य संख्या

कार्ये

 1.

आमसभा

१९३

1) सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे,

2) संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.

 2.

सुरक्षा समिती

१५ सदस्य

1) जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे.

2) वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे.

3) आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे.

4) गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे.

 3.

आंतरराष्ट्रीय न्यायालय

१५ न्यायाधिश

1) संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे.

2) आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे.

3) संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे.

 4.

आर्थिक व समाजिक परिषद

५४ परिषद

1) दारिद्रय आर्थिक व सामाजिक विषमता, वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे.

2) मानवी स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती करणे.

2) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 

उत्तर :

3) संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

भारत व अन्य देश स्वाध्याय

भारत व अन्य देश स्वाध्याय

भारत व अन्य देश स्वाध्याय इयत्ता नववी

भारत व अन्य देश स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश – 

अ) पाकिस्तान

ब) बांग्लादेश

क) नेपाळ

ड) म्यानमार

उत्तर :

नेपाळ

2) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश – 

अ) पाकिस्तान व चीन

ब) नेपाळ व भूटान

क) म्यानमार व मालदीव 

ड) अफगाणिस्तान व अमेरिका

उत्तर :

पाकिस्तान व चीन

3) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी – 

अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक

ब) काश्मीर समस्या

क) अण्वस्त्रविषयक संघर्ष 

ड) वरील सर्व समस्या

उत्तर :

वरील सर्व समस्या

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे

उत्तर – हे विधान बरोबर आहे. कारण – i) भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे. 

ii) तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

2) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमाप्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन प्रश्नांशी निगडित आहे. 

ii) तसेच भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो ॲक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. या सीमावादामुळे भारत-चीन संबंध फारसे मैत्रीपूर्ण नाहीत.

3) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. 

ii) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.

3. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्र. 

 झालेल करार/देवाणघेवाण

 संबंधित देश

 1)

 …………………….

भारत – पाकिस्तान  

 2) 

 मॅकमोहन रेषा 

……………………. 

 3) 

……………………. 

भारत – बांग्लादेश 

 4)

नैसर्गिक वायूची आयात 

……………………. 

 5) 

……………………. 

भारत – अमेरिका 

 6) 

पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य.  

…………………….

 7) 

…………………….  

भारत – आफ्रिका 

उत्तर :

 क्र. 

 झालेल करार/देवाणघेवाण

 संबंधित देश

 1)

 ताश्कंद करार/ सिमला करार

भारत – पाकिस्तान  

 2) 

 मॅकमोहन रेषा 

भारत – चीन  

 3) 

पाणीवाटपासंबंधी व सीमारेषेसंबंधी करार 

भारत – बांग्लादेश 

 4)

नैसर्गिक वायूची आयात 

भारत – म्यानमार 

 5) 

आण्विक सहकार्याचा करार 

भारत – अमेरिका 

 6) 

पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य.  

भारत – मालदीव 

 7) 

शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन क्षेत्र.  

भारत – आफ्रिका 

4. टिपा लिहा. 

1) सिमला करार

उत्तर :

i) १९७२ साली भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सिमला ह करार झाला. 

ii) सिमला करार हा दोन्ही राष्ट्रांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते. कारण यात दोन्ही देशांचा सन्मान कायम ठेवून शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला होता. 

iii) त्यावेळी भारत विजयी राष्ट्र होते. सिमला करारानुसार भारत दबावाबाहेर परस्पर विचार विनिमयाने, वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर भर देतो आणि स्थिर शांततेसाठीं प्रयत्न करतो हे दिसून येते. 

iv) या करारात व नंतरच्या काळातही भारताने पाकिस्तानबाबत उदारतेचे धोरण अवलंबले आहे. परंतु आजही पाकिस्तान सिमला कराराचे पालन करत नाही.

2) भारत-नेपाळ मैत्री करार

उत्तर :

i) भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५२ साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. 

ii) या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे. 

iii) तसेच भारत आणि नेपाळ यांच्यातील हा करार लष्करी स्वरूपाचा नसला तरी नेपाळवर कोणत्याही दिशेने आक्रमण झाल तरी भारताने नेपाळला साह्य करावे हे गृहीत या करारातून स्पष्ट होते.

3) मॅकमोहन रेषा

उत्तर :

i) भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे.

ii) चीनचा दावा आहे की, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा भूप्रदेश आहे. 

iii) मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. 

iv) हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही. 

4) भारत-अफगाणिस्तान संबंध

उत्तर :

i) अफगाणिस्तानामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. 

ii) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे बांसाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. 

iii) तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्तेबांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रांत भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे.

5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा

उत्तर :

भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील –

i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्टे आहेत. सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा सर्वांत महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. 

ii) अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले आहे. 

iii) शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. 

iv) त्याचप्रमाणे २००५ मध्ये झालेला संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि २००८ मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत-अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहे. गेल्या ५ वर्षात भारत आणि ५ अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांत सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. 

2) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा

उत्तर :

i) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. 

ii) बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारताने बांग्लादेशीयांना मदत केली. या राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे. 

iii) नेपाळमध्ये राजेशाही होती. १९९० साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. यासाठी भारताने नेपाळशी मैत्री करार केला. 

3) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे

उत्तर :

दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना पुढील कार्य करत आहे

i) दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे. 

ii) दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे. 

iii) दक्षिण आशियातील प्रदेशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे. 

iv) परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणे, परस्परांना समजून घेणे. 

v) परस्परातील सहयोग गतिशील करून सांस्कृतिक, आर्थिक, औदयोगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे. 

vi) समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय सघटना यांच्याबरोबर सहकार्य करणे.

6. तुमचे मत लिहा. 

1) भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?

उत्तर :

भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी पुढील उपाय सुचवता येईल. 

i) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने आणि परस्पर वाटाघाटीतून आपले प्रश्न सोडवावेत. 

ii) दोन देशांच्या दरम्यान दळण-वळणाची साधने उपलब्ध करावी. त्यातून आपापसांत विचारविनिमय करता येईल. 

iii) दोन्ही देशांनी मिळून सांस्कृतिक आदान-प्रदानाचे कार्यक्रम करावे.

iv) कोणतेही वादग्रस्त प्रश्न उद्भवणार नाही असे कृत्य करणे टाळावे.

v) दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. 

vi) दोन्ही देशांनी मिळून आंतकवाद या समस्येचे शांततामय मार्गाने निराकरण करावे. 

vii) दोन्ही देशांनी आपापसातील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा.

2) ‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? सकारण स्पष्ट करा.

उत्तर :

‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी मी सहमत आहे. कारण – i) भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्राचे आपल्या राष्ट्राशी असणारे संबंध, त्या राष्ट्राची सैनिकी शक्ती, युद्धसाहित्य, शस्त्रास्त्रे या सर्वांचा प्रभाव अंतर्गत विकासात होतो. 

ii) शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने कधीकधी युद्धाचे प्रसंग ओढवतात. त्यातून जीवित हानी व वित्तहानी निर्माण होते. त्यामुळे अंतर्गत विकास होऊ शकत नाही. 

iii) सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. जर त्यांमध्ये तणावपूर्ण संबंध असेल तर अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतील. त्यातून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवेल. याकडे शासनाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आणि अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होईल.

3) भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे तुम्हांस वाटते का ? सकारण स्पष्ट करा

उत्तर :

भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे मला वाटते.  कारण – i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्टे आहेत. 

ii) भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला आहे. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला. 

iii) भारतीय लोक शिक्षण नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास होतो.