आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. 

अ) महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद

ब) कावेरी पाणीवाटप

क) निर्वासितांचे प्रश्न

ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद

उत्तर :

निर्वासितांचे प्रश्न

2) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. 

अ) रोजगाराचा अधिकार

ब) माहितीचा आधिकार

क) बालकांचे अधिकार

ड) समान कामासाठी समान वेतन

उत्तर :

माहितीचा आधिकार

3) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?

अ) शिक्षक दिन

ब) बालदिन

क) वसुंधरा दिन

ड) ध्वजदिन

उत्तर :

वसुंधरा दिन

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) पर्यावरणीय  ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे

उत्तर -:

हे विधान बरोबर आहे. कारण – i) वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही. 

ii) तसेच त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

2) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. 

ii) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते. 

iii) स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) मानवी हक्क

उत्तर :

i) मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय. 

ii) अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातं  ,समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे, या विचारला बळ मिळाले. 

iii) मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते. 

iv) मानवी हक्कांना आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

2) पर्यावरणीय ऱ्हास

उत्तर :

i) वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे, तापमान वाढ, नद्या, तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे यासर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. 

ii) पर्यावरणीय ऱ्हासाचे दुषपरिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित असले ता त्यांच्या दीर्घकालीन परिणामांमुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होते.

3) दहशतवाद

उत्तर :

i) राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला ‘दहशतवाद’ असे म्हणतात. 

ii) दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. 

iii) वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेलादेखील धोका निर्माण होतो. 

iv) दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते.

4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

5. तुमचे मत नोंदवा. 

1) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा

उत्तर :

मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका –

i) भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे 

ii) भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे. 

iii) १९१३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग’ व ‘राज्य मानवी हक्क आयोग’ स्थापन करण्यात आले आहे. 

iv) मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे.

2) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

उत्तर : 

दहशतवादामुळे झालेले परिणाम – 

i) दहशतवादामुळे समाजात अशांतता पसरते आणि विकासकार्यांना खीळ बसते. 

ii) दहशतवादामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी व वित्तहानी होते. 

iii) दहशतवादामुळे अनेक सामाजिक व नैतिक समस्या निर्माण होतात. 

iv) दहशतवादामुळे जातिवाद, प्रदेशवाद भाषावाद, जमातवाद यांसारख्या समस्या बळावतात. 

v) दहशतवादामुळे सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होते. प्रामुख्याने लहान मुले व तरुण पिढीचे योग्य सामाजिकरण न झाल्यामुळे ते असामाजिक कृत्यांकडे आकृष्ट होतात. 

vi) देशाची जास्तीत जास्त शक्ती दहशतवादी कारवायांत खर्च होत असल्यामुळे नवीन उद्योग, नवीन विकास योजना व आर्थिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या मार्गांत अडथळे निर्माण होतात. 

vii) दहशतवादामुळे महागाई वाढते. तसेच चोऱ्या, दरोडे, लुटमार, भ्रष्टाचार इत्यादी अनेक असामाजिक प्रकारांना प्रोत्साहन मिळते. 

viii) दहशतवादामुळे समाजाचे व राष्ट्राचे ऐक्य धोक्यात येते. 

ix) दहशतवादामुळे लोकशाही प्रणालीवर आघात होतो. 

x) दहशतवादामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय – 

i) सामाजिक व आर्थिक विषमतेला आळा घालण्यासाठी ठोस उपाय अमलात आणले पाहिजे. त्यासाठी घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे झाली पाहिजे. 

ii) दहशतवादाची कारणे शोधून ती समुळ नष्ट करण्यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर आंदोलने केली पाहिजे. 

iii) दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळेल अशी कायदेशीर व न्यायीक प्रक्रिया केली जावी. 

iv) प्रत्येक देशाच्या सीमेबाहरचा दहशवाद रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व कार्यक्षम केली जावी. 

v) विविध प्रसार माध्यमांच्या साहाय्याने दहशतवाद विरोधी प्रचार अभियान राबविले पाहिजे. 

vi) दहशतवादविरोधी मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणावेत. 

vii) भाषिक व प्रादेशिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय केले पाहिजे. 

viii) देशाची एकता व अखंडता यांना बाधा येईल अशा कृत्यांना खंबीरपणे आळा घातला जावा. 

ix) गरिबी व बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले जावेत. तसेच रोजगार निर्माण केला जावा. 

x) प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करून भ्रष्टाचारमुक्त अशी नि:पक्षपाती प्रशासन यंत्रणा निर्माण करावी. 

पर्यटन स्वाध्याय

पर्यटन स्वाध्याय

पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी

पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा. 

1) मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले. 

उत्तर :

परदेशी पर्यटन

2) गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटन गोव्यात आले होते. 

उत्तर :

परदेशी पर्यटन 

3) नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

4) पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

5) पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी गावाल जाऊन आली. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

6) सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

प्रश्न. 2. ‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा. 

 ‘अ’ गट

‘ब’ गट  

‘क’ गट  

 1) ताडोबा 

1) मध्यप्रदेश 

1) सरोवर 

 2) पक्षी अभयारण्य

2) आग्रा  

2) फुलपाखरे 

 3) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

3) मणिपूर  

3) कैलास लेणे 

 4) ताजमहाल 

4) नान्नज 

4) चित्रनगरी 

 5) रामोजी फिल्म सिटी

5) वेरूळ 

5) जगप्रसिद्ध आश्चर्य 

 6) राधानगरी 

6) मुंबई 

6) प्राचीन गुंफाचित्रे 

 7) भिमबेटका 

7) हैदराबाद 

7) माळढोक

 8) प्राचीन लेणी 

8) कोल्हापूर 

8) कान्हेरी लेणी 

 9) ईशलनेस्ट वन्य जीव अभयारण्य

9) चंद्रपूर 

9) रानगवा 

 10) लोकटक 

10) अरुणाचल प्रदेश 

10) वाघ 

उत्तर :

 ‘अ’ गट

‘ब’ गट  

‘क’ गट  

 1) ताडोबा 

1) मध्यप्रदेश 

1) सरोवर 

 2) पक्षी अभयारण्य

2) आग्रा  

2) फुलपाखरे 

 3) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

3) मणिपूर  

3) कैलास लेणे 

 4) ताजमहाल 

4) नान्नज 

4) चित्रनगरी 

 5) रामोजी फिल्म सिटी

5) वेरूळ 

5) जगप्रसिद्ध आश्चर्य 

 6) राधानगरी 

6) मुंबई 

6) प्राचीन गुंफाचित्रे 

 7) भिमबेटका 

7) हैदराबाद 

7) माळढोक

 8) प्राचीन लेणी 

8) कोल्हापूर 

8) कान्हेरी लेणी 

 9) ईशलनेस्ट वन्य जीव अभयारण्य

9) चंद्रपूर 

9) रानगवा 

 10) लोकटक 

10) अरुणाचल प्रदेश 

10) वाघ 


प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा. 

उत्तर :

i) धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देवीदेवतांची मंदिरे असतात. अशा ठिकाणांना भेट देणे म्हणजे धार्मिक पर्यटन होय. उदा. शिर्डी, शेगाव, तिरूपती, पंढरपूर, कोल्हापूर, अमरनाथ इ. 

ii) सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी आपल्या संस्कृतिचा ठेवा जतन केलेला असतो. अशा ठिकाणांना सांस्कृतिक पर्यटन असे म्हणतात. उदा. वाघा बार्डर, वेरुळची लेणी, ताजमहल, अशोक स्तंभ इत्यादी.

2) पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?

उत्तर :

पर्यटनाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

i) पर्यटनाचे मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे. मानवाच्या तनमनाला विश्रांती मिळावी  म्हणून पर्यटने आयोजित केली जातात. 

ii) पर्यटनातून ज्ञानप्राप्ती होते. हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनाद्वारे जैवविविधतेची ओळख होते. जगभरातील महान संस्कृतीची हौशी पर्यटकांना ओळख झाली तर त्यांची ज्ञानवृद्धी होईल. 

iii) पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. व्यवसाय हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.

3) पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. 

उत्तर :

पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. 

i) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते. 

ii) पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. 

iii) पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. 

iv) निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची, रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी, यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.

4) पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात. 

उत्तर :

i) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.  

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. त्याबरो पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या संधी निर्माण होतात.

5) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा. 

उत्तर :

पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या – i) बरीच अशी पर्यटन ठिकाणे भारतात आहेत. परंतु त्या ठिकाणाची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने र्यटकांना त्रास सहन करावा लागतो. 

ii) पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्या, पण्याच्या व्यवस्था नसतात. 

iii) पर्यटन ठिकाणांचे मार्ग नीट समजत नाही. याठिकाणी कुठेही चिन्हांचे संकेत नसल्याने पर्यटकांचा स्थळ शोधण्यात वेळ जातो. 

iv) पुरेशा सोयी सुविधांअभावी अनेक पर्यटन स्थळांमध्ये सुलभता नाही.

पर्यटनांतील समस्यांवरील उपाय – i) प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचे समान प्रमाणात वाटप केले पाहिजे. ज्यामुळे तेथील पर्यटक तिथे पोहोचण्यास मदत होईल. 

ii) जुन्या व पुरातन सांस्कृतिक वारसा संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे. आणि मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मूळ शैलीत नूतनीकरण करावे. 

iii) सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यक सुविधा तसेच सुरक्षा पुरविण्यात यायला हवी. 

iv) पर्यटन स्थळी प्रदूषित झालेल्या भागात स्वच्छता कार्यक्रम सुरू करावा. 

v) स्थानिक सामग्रीचा वापर करून पर्यटकांना आवश्यक असलेले सामान उत्पादन करावे. 

vi) बँकिंग सुविधा, विपणन आणि इतर पर्यटक केंद्र वाढविले पाहिजे. 

6) आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा. 

उत्तर :

नागपूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु ती दुर्लक्षित असल्यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा विकास झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन स्थळात भर पडेल. उदा. नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आंभोरा तिर्थक्षेत्र, छोटा ताजबाग, गणेश टेकडी मंदिर इत्यादी.  

7) पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. 

उत्तर :

i) पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. 

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन स्थळाची संपूर्ण माहिती असणारे व्यक्ती पर्यटकांना तेथील सविस्तर माहिती सांगतात. त्या मोबदल्यात ते तेथील लोकांना पैसे देतात. हा एकप्रकारचा त्यांचा रोजगार आहे. 

iv) तसेच स्थानिक लोक आपल्या घरी पर्यटकांना पेइंगेस्ट म्हणून काही दिवसांसाठी ठेवतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. त्याचा मोबदला त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळतो. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.

प्रश्न. 4. पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा. 

उत्तर :

पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचनाफलक – i) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा. 

ii) पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्षांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या. 

iii) धूम्रपान, मद्यपान करू नये. 

iv) ध्वनी प्रदूषण करू नये. 

v) झाडांना, फुलांना हात लावू नये. 

प्रश्न. 5. पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवो भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा. 

उत्तर :

i) ‘अतिथी देवो भव’ याचा अर्थ आपल्या घरी आलेले अतिथी हे देवासमान समजण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. 

ii) भारतात अनेक धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. जी अतिशय विलोभनीय आहेत. त्याचा आस्वाद घेण्यासाठी, ती स्थळे बघण्यासाठी देशा परदेशातले पर्यटक भारतात येतात. 

iii) या देशा परदेशातील पर्यटन हे आपल्या भारतीयांसाठी अतिथी आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. 

iv) आपल्या संस्कृतीनुसार आपण बाहेरून येणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य अगदी मनापासून करतो. त्या मोबदल्यात आपल्याला समाधान मिळते. 

v) भारतीय संस्कृतीतील विविधता, सन, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले अन्नपदार्थ अनेक पर्यटकांना आवडते. तसेच भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यांमुळे भारताची पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवो भव’ ही भूमिका स्पष्ट होते. 

प्रश्न. 6. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 


1) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे कारणे सांगा. 

उत्तर :

गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे –

i) ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी

ii) जळगाव जिल्ह्यातील उपनदेव

iii) रायगड जिल्ह्यातील साव 

iv) अमरावती जिल्ह्यातील सलबर्डी

v) कापेश्वर, उनकेश्वर, उन्हवरे

कारण – पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेमुळे तसेच ज्या भागात चुनखडक, गंधक या खनिजाचे साठे असतात. त्या भागात गरम पाण्याचे झरे निर्माण झाले आहे. 

2) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो ?

उत्तर :

वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध पश्चिम महाराष्ट्रांकडे आहे. कारण तेथे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे अधिक असल्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून वाहतुकीचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. 

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. फरक स्पष्ट करा. 

1) लोहमार्ग व रस्तेमार्ग

 लोहमार्ग 

 रस्तेमार्ग

 i) लोहमार्ग बांधणीसाठी रस्ते मार्ग बांधणीपेक्षा जास्त खर्च लागतो. 

ii) लोहमार्गावरील गाड्यांचा वेग रस्त्यांपेक्षा अधिक असल्याने दूरच्या अंतरावर ही वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडते. 

iii) एकाच वेळी जास्त माल व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असल्याने वाहतूक खर्च कमी येतो. 

 i) रस्ते बांधणीसाठी लोहमार्ग बांधणीपेक्षा कमी खर्च येतो. 

ii) लोहमार्गाची तुलना करता रस्ते वाहतूक ही दूरच्या अंतरावर वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 

iii) रस्त्यांवरील वाहनांची प्रवासी वा मालाच्या वाहतुकीची क्षमता कमी असते.  

2) वाहतूक व संदेशवहन

 वाहतूक

 संदेशवहन

 i) वस्तू किंवा व्यक्तीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थानांतर म्हणजे वाहतूक होय. 

ii) वाहतूक मार्गामुळे आपल्या देशातील लोक आणि परदेशीय लोक संपर्कात येतात. 

iii) दुष्काळ, भूकंप, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तसेच राष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे मार्ग महत्वाचे ठरतात. 

 i) व्यक्ती-व्यक्ती किंवा समूह यांचा परस्परांशी साधला जाणारा संपर्क किंवा विचारांची देवाण-घेवाण ज्ञान, माहिती किंवा तंत्र यांचे संक्रमण म्हणजे संदेशवहन होय. 

ii) आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम तार विभाग करतात.  

3) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने

 पारंपरिक संदेशवहनाची साध

 आधुनिक संदेशवहनाची साधने

 i) पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी प्राणी, पक्षी, मानव यांच्या माध्यमांमार्फत संदेश वहन केल्या जात असे. त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या वेगाला मर्यादा आहेत. 

iii) उदा. आरोळी किंवा दवंडी, आग किंवा संकेत वर हावभाव, वाद्ये वाजविणे किंवा ध्वज पताका फडकविणे, कबुतर, प्राणी, दूत, जहाज, रेल्वे, मोटारी ही पारंपरिक संदेशवहनाची साधने आहेत.   

 i) उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी साधने विकसित झाली. या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक संदेशवहन साधनांच्या वेगळा मर्यादा नाहीत. 

iii) उदा. टपालसेवा, तार, दूरध्वनी, सागरी तारा, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, दुरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा, टेलिफोन, टेलिग्राफएलसिड, लॅपटॉप, व्हिडिओ-ऑडिओ टेप, सिनेमा, मोबाईल, टेलेक्स, उपग्रह, इंटरनेट इ. आधुनिक संदेशवहनाची साधने आहेत.       

  

प्रश्न. 2. सविस्तर उत्तरे लिहा. 

1) वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा. 

उत्तर :

वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे पुढील माहितीवरून पष्ट करता येते. 

i) वर्तमानपत्रांवरून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. यामुळे संदेशवहनाचे कार्य होते. 

ii) वर्तमानपत्रांमधून महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या निघतात. त्यातून आपणांस वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. हे एक प्रकारचे संदेशवहन आहे. 

iii) कोणी बेपत्ता झाले किंवा हरवले याची माहिती वृत्तपत्रातून मिळते.

2) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

i) टीव्हीमुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. 

ii) टीव्हीद्वारे घर बसल्या देशविदेशातील घडामोडी माहिती करून घेऊ शकतो. 

iii) कोणत्या ठिकाणी काय चालले आहे याची माहिती घरबसल्या मिळत असल्यामुळे आपण त्याविषयी जागृक असतो. 

iv) उदा. कुठे भुकंप आला असेल व आपल्या ओळखीची व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर आपण संदेशवहनाद्वारे तिच्याशी संपर्क साधू शकतो. या संदेशवहनाच्या साधनासाठी खर्च कमी लागतो. अशा प्रकारे टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.

3) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?

उत्तर :

भ्रमणध्वनीचा वापर आज जवळपास ९९% लोक करतात. याद्वारे संदेशवहन करणे फार सोपे झाले आहे. संदेशवहनासाठी व्हॉटस्अप,फेसबुक, चॅट, कॉल इत्यादी अँप्सचा उपयोग करून आपण संदेशवहन करू शकतो.

प्रश्न. 3. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

1) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे. 

उत्तर :

विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे – मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी. 

2) टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा. 

उत्तर :

टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा – i) पत्रे, पाकिटे, पार्सले, पैसे टपालमार्गे अल्प दरात पोहोचविण्याची सोय टपाल कार्यालयातून होते. 

ii) तसेच अत्यंत कमी वेळात पत्रे पोहोचण्यासाठी ‘स्पीड पोस्ट’ योजना मोठ्या शहरांत सुरू आहेत. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम टपाल कार्यालयातून तार विभाग करते. 

3) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. 

उत्तर :

परिसरातील राष्ट्रीय महामार्ग – नागपूर – बैतूल, नागपूर-अमरावती, नागपूर-जबलपूर, नागपूर-रायपूर. 

4) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. 

उत्तर :

महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे – ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत डहाणू, चिंचणी, तारापूर, माहिम, दातिवरे, वसई, भाईदर, ठाणे व कल्याण. 

रायगड जिल्हा – मोरे, करंजे, रेवस, मांडवे, धरमतर, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, राजपुरी, श्रीवर्धन. 

रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट, हर्णे, दाभोळ, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पूर्णगड इत्यादी. 

सिंधुदुर्ग जिल्हा – विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला व रेडी ही महत्वाची बंदरे आहेत.  

प्रश्न. 4. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

‘क’ गट 

 टपालसेवा

रस्तेमार्ग 

माहितीचे आदान-प्रदान 

 शिवनेरी

संगणक जोडणीचे जागतिक जाळे  

स्पीटपोस्ट

 आंतरजाल 

लोहमार्ग  

आरामदायी प्रवास 

 रो-रो वाहतूक 

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत  

इंधन, वेळ व श्रमाची बचत 

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

‘क’ गट 

 टपालसेवा

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत 

स्पीटपोस्ट

 शिवनेरी

रस्तेमार्ग  

आरामदायी प्रवास

 आंतरजाल 

संगणक जोडणीचे जागतिक जाळे

माहितीचे आदान-प्रदान

 रो-रो वाहतूक 

लोहमार्ग

इंधन, वेळ व श्रमाची बचत 

नागरीकरण स्वाध्याय

नागरीकरण स्वाध्याय 

नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी

नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. पुढील समस्येवर उपाय सुचवा. 

1) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. 

उत्तर :

उपाय – i) ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था शासनामार्फत वाढवावी. 

ii) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारनिमित्त शहरात येतात. या स्थलांतरित लोकांसाठी ते जेथे राहतात तेथे रोजगार निर्मिती व्हावी. तेथे लघुउद्योग, कुटिरोदयोग सुरू करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यायाने ते स्थलांतरित होणार नाही व झोपडपट्ट्यांच संख्या वाढणार नाही. 

ii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना शासनांचा योजनेमार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दयावी.

2) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. 

उत्तर :

उपाय – i) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे रहदारी पोलिस खात्यांनी लक्ष केंद्रित करावे. त्यासोबत नागरिकांनी ही जागृक राहणे आवश्यक आहे. 

ii) बहुतांश लोक प्रवासासाठी खाजगी वाहने वापरतात. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक बससेवा, रेल्वेसेवा वापरावी. त्यामुळे वाहतुक कोंडी होणार नाही. 

iii) सर्वांनी रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर वाहतुकीची कोंडी होणार नाही. 

iv) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या आमाणात पुरेशा उपलब्ध व्हाव्यात.

3) नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

उत्तर :

उपाय – i) स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते अवैध मार्गाने पैसे कमावतात. यासाठी तेथे शासानातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात. 

ii) मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चोरी, मारामाऱ्या, खून यांसारख्या गुन्ह्यांपासून परावृत्त करावे. 

iii) पोलिस व न्याययंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसेल.

4) नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली. 

उत्तर :

उपाय – i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बँड, फटाक्यांचा वापर टाळावा. 

ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये. 

iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये. 

iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.

v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी. 

vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वांनी करावे.

5) नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

उत्तर :

उपाय – i) नागरी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी सांडपाणी कचरा न अडकता वाहून जाईल अशी यंत्रणा तयार करावी. तसेच नागरिकांनीही यासंबंधी तत्पर असावे. 

ii) सांडपाणी व कचऱ्याच्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करावी. वेळोवेळी स्वच्छता करावी. 

iii) नागरी भागात कचऱ्याची समस्या ही गंभीर समस्या आहे कचरा हा घराबाहेर जमा न करता कचरापेटीतच टाकावा. यामुळे रोग उद्भवणार नाही. 

iv) प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी. 

v) अशुद्ध पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांना माहिती करून दयावी. त्यावर उपचारासाठी निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे.

प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

2) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. 

3) 75% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. 

4) कचऱ्याची समस्या

अ) नागरीप्रदेश

आ) नियोजनाचा अभाव

इ) स्थलांतर

ई) नागरीकरण

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

2) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. 

3) 75% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. 

4) कचऱ्याची समस्या

ई) नागरीकरण

इ) स्थलांतर

अ) नागरीप्रदेश

आ) नियोजनाचा अभाव

प्रश्न. 3. महत्त्व सांगा/ फायदे लिहा. 

1) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण

उत्तर :

i) गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. 

ii) ग्रामीण भागांतील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. 

iii) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे कामात सुसूत्रता व कमी वेळात जास्त काम होण्याची क्षमता वाढली.

2) व्यापार

उत्तर :

i) व्यापारामुळे व्यापार संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह, इत्यादी सेवांची वाढ होते. 

ii) या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. 

iii) व्यापारामुळे देशांदेशांमधील राजनैतिक, आर्थिक संबंध सुधारतात. 

iv) तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो. पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते. 

3) औद्योगिकीकरण 

उत्तर :

i) औद्योगिकीकरणामुळे उद्योगांचा विकास व केंद्रीकरण झाले. 

ii) उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. 

iii) लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. 

iv) देशाचा आर्थिक विकास होत आहे. 

v) नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होत आहे. नागरिकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ झाली आहे.


4) शहरातील सोईसुविधा

उत्तर :

i) वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात. 

ii) चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो. 

iii) शिक्षणाच्या सेवादेखील नागरी भागांमध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. मुख्यतः उच्च शिक्षणाच्या सोईमुळे इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागांत येतात. 

iv) तसेच वैद्यकीय सोईदेखील नागरी भागांत चांगल्या विकसित झालेल्या असतात.

5) शहरातील सामाजिक ऐक्य

उत्तर :

i) शहरात अनेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करून येतात. हे लोक वेगवेगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे असतात. हे सर्व लोक एकत्र राहतात. त्यांच्यात सर्वधर्म समभाव ही भावना निर्माण होते. 

ii) वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक ऐक्य निर्माण होते. 

iii) शहरातील सण-उत्सवात सर्व धर्माचे, पंथांचे लोक एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात सामाजिक ऐक्य निर्माण होते. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होते.

प्रश्न. 4. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा. 

1) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी

उत्तर :

 वाहतूक व्यवस्था

 वाहतुकीची कोंडी

 i) सर्वत्र वाहतुकीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला वाहतूक व्यवस्था असे म्हणतात. 

ii) चांगल्या वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. 

iii) वाहतूक व्यवस्था ही नागरीकरणातील सोईसुविधा आहे. 

iv) उदा. चेन्नईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत आहे.  

 i) वाहतुकीची नियोजनातील कमतरता आणि येणाऱ्या मर्यादेमुळे जी वाहतुकीची समस्या निर्माण होते तिला वाहतुकीची कोंडी असे म्हणतात. 

ii) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खासगी वाहनांची गर्दी वाढते परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. 

iii) वाहतूक कोंडी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iv) उदा. कोल्हापूरमधील ट्रेझरी ऑफीस चौकातील गणेश मंदीर येथे वाहतुकीची कोंडी होते. 

2) औद्योगिकीकरण व वायूप्रदूषण

उत्तर :

 औद्योगिकीकरण

 वायूप्रदूषण

 i) एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे याला औद्योगिकीकरण असे म्हणतात. 

ii) औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 

iii) उदा. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे मुंबई महानगरचा भाग झाली आहे. 

 i) कारखान्यांतील मोठ्या प्रमाणात हानिकारक व दुषित वायू हवेत सोडले जाते. वाहनतून विषारी धूर हवेत सोडला जातो. या विषारी वायूंमुळे प्रदूषण निर्माण होते त्याला वायूप्रदूषण असे म्हणतात. 

ii) वायूप्रदूषण ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iii) उदा. दिल्ली, मुंबई, कोलकता, यांसारख्या महानगरांमध्ये वायूप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे तेथे श्वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.     

3) स्थलांतर व झोपडपट्टी

उत्तर :

 स्थलांतर

 झोपडपट्टी

 i) व्यक्ती किंवा समूह एका प्रदेशातून किंवा देशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा देशामध्ये अल्पकाळ किंवा दीर्घकाळ वास्तवासाठी जाणे या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. 

ii) स्थलांतर ही नागरीकरणाची प्रक्रिया आहे. 

iii) उदा. भारताच्या विविध भागांतून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. 

 i) अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते, असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. त्यांना झोपडपट्टी असे म्हणतात. 

ii) झोपडपट्टी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iii) उदा. मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी, सुरत शहरात तापीनदीच्या मुखाजवळील झोपडपट्टी.  

4) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी

उत्तर :

 सोईसुविधा

 वाढती गुन्हेगारी

 i) नागरी वस्तीमध्ये अनेक सोईसुविधा विकसित होतात. 

ii) वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात. 

iii) नागरीकरणाच्या प्रक्रियेत सोईसुविंधामुळे फायदे होतात. 

उदा. उच्च शिक्षणाच्या सोईमुळे तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक पुणे शहरात शिकायला येतात. 

 i) स्थलांतरित लोकांपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होता नाही, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात यांतून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. 

ii) चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. 

iii) वाढती गुन्हेगारी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

उदा. शहरात आज अधिक प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहे.   

प्रश्न. 5. खालील तक्ता पूर्ण करा. 

 नागरीकरण

 परिणाम

 झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोईसुविधा 

 

उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. 

 प्रदूषण

 

 

नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. 

ग्रामीण ते शहर – बदल

 

उत्तर :

 नागरीकरण

 परिणाम

 झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोईसुविधा 

 स्थलांतरित लोक

उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. 

 प्रदूषण

नागरी जीवनावर विपरित परिणाम शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा व नियमांचे उल्लंघन. आरोग्यास धोका 

औद्योगिकीकरण

नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. 

ग्रामीण ते शहर – बदल

सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायती ऐवजी नगरपरिषद / नगरपालिकेचा उदय. नागरिकांच्या विविध मूलभूत सर्वजनिक सेवा उपलब्ध


प्रश्न. 6. स्पष्ट करा. 

1) शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. 

उत्तर :

i) शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राचीवाढ होय. औद्योगिकीकरण व खेड्यातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो. त्यामुळे शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. 

ii) एखादया प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iii) शहरे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iv) उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे शहरांकडे लोकांचे स्थलांतरण होऊन विशिष्ट पद्धतीने शहरांची वाढ होते.

2) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर

उत्तर :

माझ्या कल्पनेतील सुनियोजित शहर हे प्रदूषण मुक्त असेल. शहराची मांडणी अगदी साधी, सरळ असेल. मोजकी घरे, पाण्याच्या सुविधा (नळ, तलाव. विहिरी) असेल. शहरात बगीचा, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वेटेशन, बस सुविधा, विमान सुविधा असेल. रस्ते स्वच्छ व विजेरी दिव्यांची सोय असणारी असेल. जागो जागी कचरा पेटीची सुविधा तसेच सांडपाण्याची सोय केलेली असेल. करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे असेल. माझ्या शहरात भ्रष्टाचार, चोरी याला स्थान मिळणार नाही.

3) औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो. 

उत्तर :

i) औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावरील उदयोगधंदे सुरू झाले. 

ii) एखाद्या प्रदेशांमध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. 

iii) औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंद्यात वृद्धी झाली. उद्योगधंदयांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 

4) प्रदूषण- एक समस्या

उत्तर :

i) प्रदूषण म्हणजे घातक दुषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यतः प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. 

ii) प्रदूषणामध्ये वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यांचा समावेश होतो. 

iii) शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यांमुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

iv) शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणातदेखील वाढ होते. 

v) प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात जसे श्वसनाचे विकार, बहिरेपणा.

5) स्वच्छ भारत अभियान

उत्तर :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५० व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी ‘स्वच्छ भारत अभियानाची’ संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर २०१४ या दिवशी हातात झाडू घेऊन साफसफाई करत ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ उद्घाटन केले. मोंदीनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर ‘एक कदम, स्वच्छता की ओर’ या घोष वाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील असा आशय व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदींनी इंडिया गेटमधून या राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहने मोदी यांनी केले आहे.

स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील अस्वच्छता दूर करणे हा असून याद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करून जनतेच्या मनोवृत्तीत बदल घडून आणण्याचा प्रयत्न या अभियानात केला जात आहे. 

प्रश्न. 7. खालील छायांचित्रांतील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा. 

उतर :

1) वायूप्रदूषणावरील उपाय – i) घरे, फॅक्टरी, वाहने यांपासून निघणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा. 

ii) फटाक्यांचा वापर करून नका. 

iii) केरकचरा केराच्या कुंड्यांमध्ये टाका, जाळू नका. 

iv) सर्वाना वायूप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

2) ध्वनी प्रदूषणावरील उपाय – i) टिव्ही आणि म्युझिक सिस्टमचा आवाज कमी ठेवा. 

ii) गाडीचा हॉर्न क्वचितच वाजवा. 

iii) लाउडस्पीकरच्या वापरास प्रोत्साहन देऊ नका. 

iv) लग्नाच्या वरातीत बॅन्ड व फटाक्यांचा वापरू नका. 

v) सर्वाना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

3) मृदा प्रदूषणावरील उपाय – i) रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर करावा. पॉलिथिनच्या ऐवजी कॉटन, ज्युटचा वापर करावा. 

ii) पॉलिथिनच्या पिशव्यांची विल्हेवाट योग्य त्या प्रकारे लावा. 

iii) जास्तीत जास्त झाडे लावा. 

iv) सर्वाना रासायनिक प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

v) सेंद्रीय शेतीचा वापर करणे, रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरावे. 

4) जल प्रदूषणावरील उपाय – i) सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नये. 

ii) पाण्याच्या सार्वजनिक पाइपांचा गैरवापर करू नका. 

iii) फक्त अधिकृत जागेवरच पवित्र मूर्तीचे विसर्जन करा. 

iv) सर्वाना जल प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

v) शाडूमातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सात्विक आनंद घ्यावा.

vi) कारखान्यात दूषित पाणी प्रक्रिया करून नदीत सोडावे. 

व्यापार स्वाध्याय

व्यापार स्वाध्याय 

व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी

व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा. 

अ) महाराष्ट्र व पंजाब

आ) भारत व जपान

इ) लासलगाव व पुणे

ई) चीन व कॅनडा

उ) भारत व युरोपीय संघ

उत्तर :

प्रश्न. 2. खालील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा. 

1) भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो. 

उत्तर :

आयात

2) कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो. 

उत्तर :

निर्यात

3) जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो. 

उत्तर :

निर्यात

प्रश्न. 3. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

1) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे. 

उत्तर :

भारत हा देश स्वयंपूर्ण नाही.

कारण – भारताला काही बाबींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते. उदा. पेट्रोल. 

2) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

जय ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. 

3) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापराची प्रक्रिया सहज व सोपी असते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. 

4) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते. 

उत्तर :

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते

प्रश्न. 4. पुढील उदाहरणांतील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा. 

1) सृष्टीने किरणा दुकानातून साखर आणली. 

उत्तर :

किरकोळ व्यापार

2) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. 

उत्तर :

घाऊक व्यापार

3) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. 

उत्तर :

आंतरराष्ट्रीय व्यापार

4) सदाभाऊंनी घाऊक मार्केटमध्ये दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 पोती तांदूळ विकत आणले. 

उत्तर :

घाऊक व्यापार

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा. 

2) व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा. 

उत्तर :

व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक पुढीलप्रमाणे आहे

१) प्रतिकूल व्यापार संतुलन- i) जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. 

ii) या व्यापार संतुलनाच्या प्रकारात आयातीचे मूल्य जास्त असते व निर्यातीचे मूल्य कमी असते.

२) अनुकूल व्यापार संतुलन- i) जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. 

ii) व्यापार संतुलनाच्या प्रकारात निर्यातीचे मूल्य जास्त असते व आयातीचे भूत कमी असते.

३) संतुलित व्यापार- i) जेव्हा आयात व निर्यातमूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.

ii) या व्यापार संतुलनाच्या प्रकारात आयातीचे व निर्यातीचे मूल्य समान असते.

3) जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. 

उत्तर :

जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत. i) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. 

ii) व्यापारविषयक मतभेद हाताळणे. 

iii) राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे. 

iv) विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

4) ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा. 

ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक – 

 ओपेक व्यापार संघटना

 आपेक व्यापार संघटना

 i) खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे. हे कार्य ओपेक ही संघटना करते. 

ii) ही संघटना सदस्य देशांतील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करते. 

i) आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, हे कार्य आपेक ही संघटना करते. 

ii) ही संघटना सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याल प्रोत्साहन देते. 

5) आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा. 

उत्तर :

आशिया खंडातील सार्क या व्यापार संघटनेचे कार्य –

i) दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे.

ii) सदस्य देशांतील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे.

iii) दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. 

6) शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. 

उत्तर :

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व –

i) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळण्यासाठी विपणनाची आवश्यकत असते.

ii) शेतकऱ्यांना आपल्या मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करण्यासाठी विपणन महत्त्वाचे असते.

iii) शेतमालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशाप्रकारे सादर केला जातो, यांवरून त्या मालाची किंमत ठरते. जर शेतमालाबाबत कमतरता असली तर बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही. म्हणून विपणन व्यवस्था महत्त्वाची असते.

iv) विपणनाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपरमार्केटमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे त्या शेतमालाला अधिक किंमत मिळते.

प्रश्न. 6. खालील तक्त्यात सन २०१४-२०१५ सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जोड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा. 

  उत्तर :

 देश 

निर्यात मूल्य  

आयात मूल्य 

 चीन 

२१४३  

१९६०  

 भारत

२७२  

३८०  

 ब्राझील 

१९०  

२४१  

 संयुक्त संस्थाने

१५१०  

२३८०  

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रश्न. 2. स्पष्टीकरण लिहा. 

1) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. 

उत्तर :

i) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटनांशी संबंधीत असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. 

ii) मासिक उत्पन्नातून तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी गरजांच्या तीव्रतेनुसार क्रमवारी लावता येते. अधिक महत्त्वाच्या गरजा आधी भागवल्या जातात आणि कमी महत्त्वाच्या गरजा नंतर पूर्ण केल्या जातात. उदा.- आजारपणामध्ये आईस्क्रिम खरेदी करण्याऐवजी औषधाला जाधान्य दयावे लागते. 

iii) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा, हे अर्थशास्त्रामुळे समजते. या विवेंचनावरून असे स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

2) भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. 

उत्तर :

i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

ii) जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खासगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. 

iii) प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. 

iv) अशाप्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला भारताने प्राधान्य दिले. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

3) अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात. 

उत्तर :

i) जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. 

ii) जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 

iii) चीन, रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. सामाजिक कल्याण साधणे हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांचे घटक एकत्रितरीत्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. 

iv) भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे होय. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या विवेंचनावरून हे स्पष्ट होते की, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 

1) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर :

व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते.

2) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?

उत्तर :

अर्थशास्त्र ही संज्ञा ओईकोनोमिया (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.

3) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर :

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 

4) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर :

जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय.

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेषावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा. 

उत्तर :

प्रश्न. 2. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?

1) पूर्वकडून पश्चिमेकडे

2) पश्चिमेकडून पूर्वेकडे

3) दक्षिणेकडून उत्तरेकडे

4) उत्तरेकडून दक्षिणेकडे

उत्तर :

पश्चिमेकडून पूर्वेकडे

आ) जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील ?

1) बुधवार सकाळचे सहा

2) बुधवार रात्रीचे नऊ

3) गुरुवार दुपारचे दोन

4) गुरुवार संध्याकाळचे सहा

उत्तर :

बुधवार रात्रीचे नऊ

इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. 

1) ०°

2) ९०° पूर्व

3) ९०° पश्चिम

4) १८०°

उत्तर :

१८०°

ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ?

1) पूर्व

2) पश्चिम

3) उत्तर 

4) दक्षिण

उत्तर :

पश्चिम

उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे कशामुळे सुसूत्रता येते ?

1) जी. पी. एस. प्रणाली

2) संरक्षण खाते

3) वाहतुकीचे वेळापत्रक

4) गोलार्ध ठरवण्यासाठी

उत्तर :

वाहतुकीचे वेळापत्रक

प्रश्न. 3. भौगोलिक कारणे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. 

उत्तर :

कारण – i) आतंरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. 

ii) आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. 

iii) आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक वा घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. 

iv) जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. 

v) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.

आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. 

उत्तर :

कारण – i) आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती.

ii) पूर्व बाजूला एक वार व एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. 

iii) शिवाय जमिनीवरून चालतांना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

प्रश्न. 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

उत्तर :

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना पुढील बाबी विचारात घेतल्या आहेत. (i) प्रवासाची दिशा (ii) चालू असलेला वार व दिनांक

i) प्रवासाची दिशा – आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते, की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, तर पूर्वेला संपतो. 

ii) चालू असलेला वार व दिनांक – पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर त्याला आहे तोच वार (मागचा) मानावा लागतो. 

आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.

इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय बाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. 

ii) त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८० रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.

ई) आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.

उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

उत्तर :

i) १८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत १२ तासांच्या फरकाने येते, त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. 

ii) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही १८०° रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली जाते.

प्रश्न. 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. 

अ) मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-लॉसएंजिलिस-टोकियो. 

आ) दिल्ली-कोलकाता-सिंगापूर-मेलबर्न. 

इ) कोलकाता-हाँगकाँग-टोकियो-सॅनफ्रॅन्सिस्को

ई) चेन्नई-सिंगापूर-टोकियो-सिडनी-सांतियागो

उ) दिल्ली-लंडन-न्यूयॉर्क

उत्तर :

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका 2022

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :

i) सोने विलेपित दागिने हे ……………………. चे एक उदाहरण आहे. 

अ) विद्युत विलेपन

ब) संमिश्रीकरण

क) धनाग्रीकरण

ड) जस्त विलेपन

उत्तर :

सोने विलेपित दागिने हे विद्युत विलेपन चे एक उदाहरण आहे.

ii) उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य …………………. च्या नियमावर आधारित आहे. 

अ) न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम

ब) न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम

क) न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम

ड) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

उत्तर :

उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम च्या नियमावर आधारित आहे.

iii) L.P.G. मध्ये ………………. हा एक ज्वलनशील घटक असतो. 

अ) इथेन

ब) प्रोपेन

क) मिथेन

ड) इथिन

उत्तर :

L.P.G. मध्ये प्रोपेन हा एक ज्वलनशील घटक असतो.

iv) बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती ………………. आहे. 

अ) 4.0 D

ब) 0.25 D

क) -4.0 D

ड) -0.4 D

उत्तर :

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती 4.0 D आहे.

v) शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ………………. रंग सर्वात कमी वळतो. 

अ) लाल

ब) पिवळा

क) जांभळा

ड) निळा

उत्तर :

शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता लाल रंग सर्वात कमी वळतो.

ब) खालील प्रश्न सोडवा :

i) वेगळा घटक ओळखा :

INSAT, GSAT, IRS, PSLV

उत्तर :

PSLV

ii) सहसंबंध ओळखा :

गण 1 : अल्कली धातू :: ……………. : हॅलोजन

उत्तर :

गण 1 : अल्कली धातू :: गण 17 : हॅलोजन

iii) योग्य जोडी जुळवा :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

अ) 1.31

ब) 1.36

क) 1.33

उत्तर :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

क) 1.33

iv) चूक की बरोबर ते लिहा :

विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. 

उत्तर :

चूक

v) दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा :

उत्तर :

प्रोपेन-2-ओल

2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) 

i) गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. 

उत्तर :

i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.

ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ii) घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. 

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

iii) खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. 

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खादयतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) :

i) जर एका ग्रहावर एक वस्तू 5m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती ?

उत्तर :

ii) होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा. 

उत्तर :

iii) प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. 

उत्तर :

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम :

i) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या सद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका काच प्रतलात असतात.

ii) दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता sin i/sin r हे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून, r हा अपवर्ती कोन आहे.

iv) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

a) अँल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. 

उत्तर :

बॉक्साईड

b) अँल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. 

उत्तर :

सिलिका, आयर्न ऑक्साइड

v) खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून ‘अ’ आणि ‘ब’ या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा :

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्रुटी लिहा. 

उत्तर :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णाकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती.

ii) मेंडेलीव्हने आवर्तसारणीत मांडल्यानंतर खूप काळाने सम स्थानिकांचा शोध लागला समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर भिन्न अणुवस्तुमाने असल्यामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यावयाचे हे एक मोठे आव्हान होते.

iii) मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांना शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते.

iv) हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या गणात (गण VIII) हे निश्चित ठरवता आले नाही.

ii) दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा :

उत्तर :

केप्लरचा पहिला नियम :

ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.

केप्लरचा दुसरा नियम :

ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.

केप्लरचा तिसरा नियम :

सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्गहा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.

iii) खालील रासायनिक अभिक्रियाचे प्रकार ओळखा :

अ) CuSO4 + Fe  FeSO4 + Cu

उत्तर :

विस्थापन अभिक्रिया

ब) 2Mg + O2  2MgO

उत्तर :

संयोग अभिक्रिया

क) 2KClO3  2KCl + 3O2

अपघटन अभिक्रिया

iv)

v) खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही, जोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

अ) उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते. 

उत्तर :

उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णता स्थानांतरण होते.

ब) अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो ?

उत्तर :

उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो.

क) ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल ?

उत्तर :

उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता.

vi) बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

 ………………..

 ………………….

 2.

 ………………….

 अनंत अंतरावर

………………….

 3.

 …………………

 …………………

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

उत्तर :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

Fआणि 2F2 या दरम्यान

 वास्तव व उलट

 2.

नाभी F1 वर

 अनंत अंतरावर

वास्तव व उलट

 3.

 F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान

 2F1 च्या पलीकडे

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

vii) खालील संज्ञा स्पष्ट करा :

अ) धातुविज्ञान 

उत्तर :

धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरुन जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.

ब) धातुके

उत्तर :

ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात.

क) मृदा अशुद्धी

उत्तर :

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.

viii) अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा. 

उत्तर :

i) अवकाश मोहिमामुळेच आता क्षणार्धात जागतिक संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण करता येते.

ii) युद्धात शत्रुसैन्याचा सुगावा, काही नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना, आपत्ती व्यवस्थापन, खनिज साठ्यांचा शोध, व्यापार पर्यटन वाहतूक सेवांची सुलभता, जगाचे वैश्विक खेड्यात रूपांतर इत्यादी असंख्य फायदे मानवाच्या अवकाश मोहिमांमुळे लाभले आहेत.

iii) अवकाश मोहिमांमुळे सूर्यमंडल, त्यापलीकडील विश्व यांची अधिक माहिती/ज्ञान मिळण्याबरोबरच, पृथ्वीवरील मानवी जीवनातही खूप बदल झाले.

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही एक) :

i) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

अ) वरील आकृतीत दर्शविलेले यंत्र ओळखा. 

उत्तर :

आकृतीत विद्युत जनित्र हे यंत्र आहे.

ब) या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे ?

उत्तर :

हे यंत्र विद्युतचुंबकीय प्रवर्तन या तत्त्वावर कार्य करते. कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलास विद्युतधारानिर्माण होते.

क) या यंत्राचे कार्य स्पष्ट करा. 

उत्तर :

1) फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते ती ABCD या दिशेने जाते.

2) पुढील परिपथात विद्युतधारा B2 → B1 अशी गॅल्व्हाॅनोमीटर मधून जाते.

3) अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा DCBA या दिशेने जाते.

4) बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 → B2 अशी म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती निर्माण होते.

ड) या यंत्राचा उपयोग लिहा. 

उत्तर :

या यंत्राचा उपयोग यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने विद्युत निर्मिती करण्यासाठी केला जातो.

ii) अ) दिलेल्या रचना सूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा :

1) 

 

 

उत्तर :

संपृक्त

 

2)  

उत्तर :

असंपृक्त

 

ब) वरील 1) व 2) या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका सरंचना रेखाटा. 

1)

2)

 

क) समजातीय श्रेणी म्हणजे काय ?

उत्तर :

उत्तर :

कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात.

नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते

प्रश्न

 नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते.

उत्तर

 

 

i) नॅफ्थॅलीन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात.

ii) ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण पिवळा प्रकाश फेकतात, त्यामुळे ज्योत पिवळी दिसते.

तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत

प्रश्न

 तारे लुकलुकतात, पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत.

उत्तर

 

 

i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात.

ii) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदूस्रोत नसून बिंदूस्रोतांचा समूह असतो. परिणामी, वातावरण स्थिर नसले तरी, ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत.