महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय इयत्ता नववी 

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय नववी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) इ. स. १९९२ मध्ये ……………. या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 

अ) महाराष्ट्र

ब) गुजरात

क) आंध्र प्रदेश

ड) उत्तराखंड

उत्तर :

इ. स. १९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 

2) भारत सरकारने १९७५ मध्ये ………………. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 

अ) डॉ. फुलरेणू गुहा

ब) उमा भारती

क) वसुंधरा राजे

ड) प्रमिला दंडवते

उत्तर :

भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ. फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 

प्रश्न. 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) सौदामिनी राव – स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

2) विद्या बाळ – नारी समता मंच

3) प्रमिला दंडवते – महिला दक्षता समिती

4) ज्योती म्हापसेकर – महिला आयोग

उत्तर :

चुकीची जोडी : ज्योती म्हापसेकर – महिला आयोग

प्रश्न. 3. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 

1) स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली

उत्तर :

कारण – i) पूर्वापार चालत आलेली बंधनं, जोखडं झुगारून देऊन स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करायचा हक्क मिळावा. 

ii) त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले जावे यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली. 

iii) पूर्वी स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली.

2) १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला

उत्तर :

कारण – i) भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून ‘स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, ‘धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू’ अशा बातम्या येत. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते. 

ii) पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जनजागृती घडली. त्यामुळे १९८४ मध्ये ‘हुंडाबंदी सुधारणा कायदा’ करण्यात आला.

3) अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली

उत्तर :

कारण – i) संविधानाच्या १७ व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. 

ii) स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व देण्यात आले. या सर्व बाबींना अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायदयाने बंदी आणली.

4) संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत

उत्तर :

कारण – i) एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्यांक म्हणतात. 

ii) आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत. 

iii) या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा. म्हणून संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.

प्रश्न. 6. टिपा लिहा. 

1) चिपको आंदोलन 

उत्तर :

i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला ‘चिपको आंदोलन’ म्हणतात.

2) मानव अधिकार संरक्षण कायदा

उत्तर :

i) स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून १९९३ मध्ये हा कायदा करण्यात आला. 

ii) यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. त्याच धतींवर काही राज्यांमध्ये ‘राज्य मानवाधिकार आयोग’ स्थापन झाले. 

iii) या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. 

प्रश्न. 5. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. 

1) स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा

उत्तर :

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येईल.

अ) स्त्रीशक्तीचा आविष्कार : i) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. 

ii) समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. 

iii) ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. 

iv) या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला.

ब) चिपको आंदोलन : i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला ‘चिपको आंदोलन’ म्हणतात.

क) मद्यपानविरोधी आंदोलन : i) आंध्र प्रदेशात १९९२ मध्ये ‘मद्यपान विरोधी चळवळ’ सुरू झाली. 

ii) १९९२ मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले. 

iii) या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी अरक (स्थानिक दारू) विक्रीचे दुकान बंद पाडले. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला. 

iv) राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारूविक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले.

ड) इतर उदाहरणे : i) तसेच महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. 

ii) निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तिलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग वेठबिगारमुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली. 

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता नववी

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत  खूण करा. 

 

            क्षारता

 जास्त     मध्यम      कमी

 1) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ. 

 

 

 

 2) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य. 

 

 

 

 3) बहुतेक दिवस निरभ्र आकशा, लंबरूप सूर्यकिरणे. 

 

 

 

 4) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश

 

 

 

 5) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.  

 

 

 

 6) खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य

 

 

 

प्रश्न. 2. कारणे लिहा. 

अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

उत्तर :

कारण i) बाल्टिक हा भूवेष्टित समुद्र शीत हवामानाच्या प्रदेशात आहे. या समुद्रास प्रचंड प्रमाणात ध्रुवीय प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. 

ii) येथे बाष्पीभवन फार कमी होते. त्यामुळे बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते. 

आ) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

उत्तर :

कारण – i) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदाहरित वने, समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोऱ्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. म्हणून समुद्राच्या दक्षिण भागात क्षारता कमी आहे. 

ii) तर समुद्राच्या उत्तर भागात सहारा वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने क्षारांचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही. 

उत्तर :

कारण – i) समान अक्षवृत्तावर बरेच समुद्र आहेत. काही समुद्राला गोड्या पाण्याच्या नद्या येऊन मिळाल्याने त्या समुद्राची क्षारता कमी असते. 

ii) तर काही समुद्राला नदया येऊन मिळत नाही किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतात. त्यांची क्षारता जास्त असते. म्हणून समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

ई) वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उत्तर :

कारण – i) सागरजलाचे तापमान हे सर्वत्र सारखे नसते. सागरी पृष्ठभागावरील पाणी सूर्याच्या उष्णतेने अधिक तप्त असते. 

ii) समुद्रात सुमारे ३० ते ४० मीटर्स खोलीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचतात. 

iii) खोलीनुसार पाण्याचे तापमान घटत जाते. २०० मी. च्या पलीकडे सूर्यकिरणांचा थेट प्रभाव होत नाही. त्यामुळे या खोलीवर पाणी थंड असते. साधारणपणे १०० फॅदम खोलीवर -१२° से. ने तापमान घटलेले असते. खोलीनुसार तापमान घटण्याची क्रिया १८३० मीटरपर्यंतच होते. त्यानंतर मात्र सागरजलाचे तापमान सर्वत्र स्थिर आढळते. अशाप्रकारे वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. 

उ) भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. 

उत्तर :

कारण – i) अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नदयांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होते. तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते . 

ii) तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नदया मुबलक प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात. 

iii) बंगालच्या उपसागराची क्षारता हजारी २० तर अरबी समुद्राची क्षारता हजारी ३७ ते ३९ असते. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. 

ऊ) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

उत्तर :

कारण – i) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात पर्जन्यमान कमी असते व नदयांतून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. 

ii) या पट्ट्यांमध्ये बाळवंटी प्रदेश आहेत. त्यामुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर :

i) सागरजलाची क्षारता सर्व ठिकाणी सारखी नसते. स्थानपरत्वे त्यात कमी-अधिकपणा दिसून येतो. 

ii) कारण सागजलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदीनाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. 

iii) भूवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा, बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो.

आ) कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा. 

उत्तर :

कारण – i) कर्कवृत्त आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. 

ii) त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळ जवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते. 

इ) सागरजलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. 

उत्तर :

सागरजलाच्या तापमानाची भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. 

i) अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५° से., मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६° से. तर ध्रुवीय प्रदेशात २° से. पर्यंत असते. 

ii) याशिवाय सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचा ही परिणाम दिसून येतो. 

iii) सागरी प्रवाहाचा सुद्धा सागरजलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागरजलाचे पृष्ठीय तापमान वाढते.

ई) खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा. 

उत्तर :

i) सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात 

ii) परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. 

iii) ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४०° से. असते. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४° से. पर्यंतच कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. 

iv) विषुववृत्ताजवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो.

उ) क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर :

क्षारतेवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 

i) शुद्ध पाण्याचा पुरवठा – विषुववृत्तीय प्रदेशात उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असले तरी वर्षभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शुद्ध पाण्याचा रोज भरपूर पुरवठा होतो. याचा परिणाम होऊन सागर जलाच्या पाण्याची क्षारता ये सुमारे ३४% – ३५% पेक्षा कधीही जास्त नसते.

ii) बाष्पीभवनाचा वेग – कर्क आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळजवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते. 

iii) पाण्याचे मिश्रण – मोठमोठ्या नदया, हिमनदया, वितळणारे बर्फ इत्यादींमुळे जर शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात समुद्रास होत असेल तर त्याच्या पाण्याची क्षारता कमी होते. या विरुद्ध जर शुद्ध पाण्याचा पुरवठा कमी असेल आणि जवळपासच्या पाण्याचे मिश्रण सागरी पाण्यात होत नसेल तर क्षारतेचे प्रमाण जास्त असते. 

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय

विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता दहावी

विद्युतधारेचे परिणाम इयत्ता दहावी

 

प्रश्न 1. गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. 

अ. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र

उत्तर :

वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र यात न बसणारा शब्द जनित्र. कारण जनित्रात विद्युत निर्मिती होते व इतर तीन हे कशाचीही निर्मिती करत नाहीत.

आ. व्होल्टमीटर, अँमीटर, गॅलव्हॅनोमीटर, थर्मामीटर

उत्तर :

व्होल्टमीटर, अँमीटर, गॅलव्हॅनोमीटर, थर्मामीटर. यात थर्मामीटर हा शब्द गटात न बसणारा आहे. कारण याच्या साहाय्याने तापमान मापन करतात व इतर तीन विद्युतच्या संदर्भातील आहेत.

इ. ध्वनीवर्धक, सुक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक

उत्तर :

ध्वनीवर्धक, सुक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक यापैकी चुबक हा गटात न बसणारा आहे. कारण इतर तीन मध्ये चुंबकाचा उपयोग करून काही नवनिर्मिती केलेली आहे.

प्रश्न 2. रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. 

अ) विद्युतचलित्र     ब) विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)

उत्तर :

विद्युतचलित्र – विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युतचलित्र होय.

तत्त्व – चुंबकीय क्षेत्रातून विद्युतधारा वाहून नेणाऱ्या तारेवर ‘बल’ कार्य करते. ह्या बलाची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा यावर अवलंबून असते. जर विद्युत धारेची दिशा व चुंबकक्षेत्राची दिशा परस्पर लंब असतील तर विद्युत वाहक तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा ही ह्या दोहोंशी लंब असते. हे फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले याच तत्त्वावर विद्युतचलित्र कार्य करते.

रचना – आकृतीत दाखविल्याप्रमाणे विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल N व S या प्रबळ चुंबक ध्रुवामध्ये ठेवलेले असते. ह्या बाजू चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लांब असतात.

कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. विद्युतरोधक आवरण असलेले कड्याचे दोन भाग चलित्राच्या आसावर पक्के बसविले असतात. दोन विदयुत वाहक कार्बन ब्रश (E व F) हे X व Y ह्या कड्यांना स्पर्श करून ठेवलेले असतात.

E व F ही ब्रशची टोके विद्युत स्त्रोताला जोडलेली असतात. K ही कळ चालू करताच विद्युत प्रवाह A → B → C → D या दिशेने वाहू लागतो व चलित्राचा आस म्हणजेच विदयुत वाहक तारेचे कुडल, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागते. अशारितीने विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते.

कार्य – विद्युतधारा, कार्बन ब्रश मार्फत कुंडलात A→ B→ C→ D या दिशेने वाहू लागते. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा N → S आहे व विद्युतधारेची दिशा A → B आहे. ह्या परस्पर लंब आहेत. कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा या दोहोंना लंब असते.

कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ठरविता येते.

या नियमानुसार AB ही कुंडलाची बाजू विद्युत चुंबकीय बलामुळे खालच्या दिशेने ढकलली जाईल व तारेचे कुंडल व आस दोन्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतील.

अर्धे परिवलन होताच, दुभंगलेल्या कड्याचे X व Y हे भाग अनुक्रमे F व E या कार्बन ब्रशला स्पर्श करतात, त्यामुळे विद्युत प्रवाहाची दिशा पूर्वीच्या दिशेच्या उलट होते. त्यामुळे आता BA शाखेवर, वरच्या दिशेने बल कार्य करते व विद्युत वाहक कुंडल सतत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरू लागते.

विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती) – यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विदयुत जनित्र म्हणतात.

तत्त्व – कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तीत होते. अर्थात वाहक तारेची कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरविल्यास त्यात विद्युतनिर्मिती होते. या फॅरडेच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्त्वावर विदयुत जनित्र कार्य करते.

रचना- आकृतीत दाखविल्याप्रमाणे ABCD हे तांब्याच्या तारेचे कुंड आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे. कुंडलाची दोन टोके R1 व R2 ही विदयुत वाहक कड्यांना (slip rings) ब्रशेस B1 व B2 मार्फत जोडलेली असतात. आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरविला असता त्याला जोडलेले ABCD हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते. कुंडल फिरताच बाह्यपरिपथात जोडलेल्या गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरू लागतो. त्यामुळे विद्युतधारेची दिशा लक्षात येते.

कार्य – बाह्य ऊर्जेद्वारे (पाणी, वायू, डिझेल) आस फिरविला असत ABCD कुंडल फिरायला लागते. AB शाखा वर जाते तर CD शाखा खाली येते. (कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते)

फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा वाहू लागते. विद्युतधारेची दिशा A → B → C → D अशी असते. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युतधारेचे अस्तित्व दर्शवितो.

कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विदयुत धारा D → C → B → A अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते.

BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व CD ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विदयुतधारा B1 कडून B2 कडे (पूर्वीच्या उलट दिशेने वाहते)

प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते.

प्रश्न 3. विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे

अ. विद्युतवाहकाचे प्रभारित होणे. 

आ. कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. 

इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. 

ई. विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.  

उत्तर :

इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.

प्रश्न 4. फरक लिहा प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र

उत्तर :

i) प्रत्यावर्ती जनित्रामध्ये प्रत्येक अर्धपरिवलनामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेची दिशा व त्या पुढील अर्ध परिवलनामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेची दिशा या एकमेकींच्या विरुद्ध असतात. म्हणजेच प्रत्यावर्ती जनित्रामध्ये प्रत्येक अर्ध्या परिवलनामध्ये विद्युतधारेची दिशा उलट होते. पण दिष्ट जनित्रामध्ये निर्माण होणाऱ्या विद्युतधारेची दिशा नेहमीच स्थिर असते. पूर्ण परिवलनामध्ये दिशा एकच असते. ती बदलत नाही.

ii) प्रत्यावर्ती जनित्रामध्ये कुंडलाची टोके विद्युत वाहक कड्यांना जोडलेली असतात तर दिष्ट जनित्रामध्ये कुंडलाची टोक दुभंगलेल्या कड्यांना जोडलेली असतात.

प्रश्न 5. विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? आकृतीसह वर्णन करा. 

अ. विद्युतचलित्र   ब. गॅल्व्हॅनोमीटर   क. विद्युतजनित्र (दिष्ट)  ड. व्होल्टमीटर

उत्तर :

विद्युतजनित्र (दिष्ट) हे उपकरण वापरतात.

विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती) – यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विदयुत जनित्र म्हणतात.

तत्त्व – कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तीत होते. अर्थात वाहक तारेची कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरविल्यास त्यात विद्युतनिर्मिती होते. या फॅरडेच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्त्वावर विदयुत जनित्र कार्य करते.

रचना- आकृतीत दाखविल्याप्रमाणे ABCD हे तांब्याच्या तारेचे कुंड आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे. कुंडलाची दोन टोके R1 व R2 ही विदयुत वाहक कड्यांना (slip rings) ब्रशेस B1 व B2 मार्फत जोडलेली असतात. आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरविला असता त्याला जोडलेले ABCD हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते. कुंडल फिरताच बाह्यपरिपथात जोडलेल्या गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरू लागतो. त्यामुळे विद्युतधारेची दिशा लक्षात येते.

कार्य – बाह्य ऊर्जेद्वारे (पाणी, वायू, डिझेल) आस फिरविला असत ABCD कुंडल फिरायला लागते. AB शाखा वर जाते तर CD शाखा खाली येते. (कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते)

फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा वाहू लागते. विद्युतधारेची दिशा A → B → C → D अशी असते. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युतधारेचे अस्तित्व दर्शवितो.

कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विदयुत धारा D → C → B → A अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते.

BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व CD ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विदयुतधारा B1 कडून B2 कडे (पूर्वीच्या उलट दिशेने वाहते)

प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते.

प्रश्न 6.  लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो ?

उत्तर :

उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विदयुतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात. या वेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे परिपथात आग लागू शकते.

प्रश्न 7. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. 

उत्तर :

i) विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंतलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते.

ii) बल्बमधील तार बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विदयुतधारा पाठवून, तार न वितळता, तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो. टंगस्टनचा वितळणांक अतिउच्च (3410 °C) असतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.

आ. उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत

उत्तर :

कारण – नायक्रोम या मिश्रधातूमध्ये खालील गुणधर्म आहेत की, जे उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणासाठी आवश्यक आहेत. ही सर्व गुणधर्म एकत्रपणे एकाच धातूमध्ये मिळत नाहीत. म्हणून शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम मिश्रधातू वापरतात.

नायक्रोमचे गुणधर्म – i) उच्च वितळण बिंदू, ii) उच्च विद्युत रोध, iii) रासायनिकदृष्ट्या उदासिन, iv) अचुंबकीय, v) उत्तम विद्युत गुणधर्म.

उदाहरणार्थ – तन्यता, वर्धनियता, कठीणपणा, लवचिकता इत्यादी.

या सर्व गुणधर्मामुळे नायक्रोमची तार उच्च तापमान निर्माण करू शकते व त्यावर हवेचा परिणाम होत नाही त्यामुळे त्यापासून बनविलेले तारेची कुंडल अधिक टिकावू बनते. म्हणून उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणामध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात.

इ. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात. 

उत्तर :

i) तांबे व अँल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत.

ii) तांबे व अँल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अँल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

ई. व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते

उत्तर:

कारण – ज्यूल ही ऊर्जामापनाचे मूलभूत एकक आहे. पण हे अतिशय लहान आहे. त्या मानाने आपला दैनंदिन ऊर्जा वापर खूपच मोठा असतो. म्हणून ज्यूल ऐवजी त्यापेक्षा मोठे एकक kWh वापरतात. ऊर्जा मापनासाठी Joule/s  हे एकक वापरतात. 1 Joule / S = 1 watt

अर्थात वॉट हे एकक सुद्धा लहानच आहे. म्हणून त्यापेक्षा मोठे एकक किलो वॅट सुचविले आहे. 100 Watt = 1 kW

1 kW ऊर्जा एक तास पर्यंत वापरली तर 1kWh ऊर्जा वापरली असे म्हणतात.

∴ 1 kWh = 1 Kilo Watt hour

= 1000 Watt x 3600 s

= 3.6 x 106 watts

= 3.6 x 106 Joule

या सूत्रावरून ज्यूल हे एकक किती लहान आहे हे लक्षात येते. म्हणून व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी हे kWh हे एकक वापरतात.

प्रश्न 8. खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ, विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते ? स्पष्टीकरण लिहा. 

अ. तारेच्या लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात.

आ. तारेला समांतर, तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात.

इ. तारेला लंब व तारेपासून दूर (radially out ward) अशा चुंबकीय बलरेषा जातात.

ई. समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात.

उत्तर :

ई. समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात.

प्रश्न 9. नालकुंतल म्हणजे काय ? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. 

उत्तर :

विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात.

चुंबकीय क्षेत्र – नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीत दाखविली आहे.

i) चुंबकपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या रेषा यात सारखेपणा असतो.

ii) दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या बलरेषांचे गुणधर्म समान असतात.

iii) नालकुंतलाची उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनतात.

iv) नालकुंतातील चुंबकीय बलरेषा समांतर रेषांच्या स्वरूपात असतात.

v) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते.

प्रश्न 10. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. 

उत्तर :

1. आकृती (अ)  फ्लेमिंच्या उजव्या हाताचा नियम दर्शविते. यात अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते. मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविते.

2. आकृती (आ) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम दर्शविते. यात तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते. मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शविते. अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवितो.

प्रश्न 11. आकृत्या ओळखून त्याचे उपयोग स्पष्ट करा. 

उत्तर :

अ. ‘अ’ आकृती इलेक्ट्रीक फ्युजची आहे. याचा उपयोग फ्युज वायर ‘फ्युज’ झाली असेल तर त्याच्या जागी नवीन टाकण्यासाठी होतो.

आ. ही आकृती MCB ची आहे. Miniature Circuit Breaker या नावाने ओळखली जाणारी ही एक कळ आहे. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. थोडक्यात या उपकरणामुळे विद्युतधारा बंद किंवा चालू करता येते.

इ. ही आकृती इलेक्ट्रीक जनित्राची आहे. याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी होतो.

प्रश्न 12. खालील उदाहरणे सोडवा. 

अ. विद्युत परिपथातील एका विद्युत रोधमध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहत आहे, तर विद्युत रोध किती Ω असेल

उत्तर :

आ. दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल

उत्तर :

इ. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील ? 500 W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600 W ची शेगडी 20 मिनिटात ?

उत्तर :

ऊर्जा   P = t    P  = ऊर्जा वॅटमध्ये     t = वेळ सेकंदमध्ये

T. V. साठी वापरलेली ऊर्जा = P x t

= 500 x 30 x 60

= 900000 J

शेगडीसाठी वापरलेली ऊर्जा = P x t

= 600 x 20 x 60

= 720000 J

T. V. साठी वापरलेली ऊर्जा जास्त लागते.

ई. 1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल ? ( वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 /-रु. आकरते) 

उत्तर :

ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची स्वाध्याय

ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची स्वाध्याय

ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची स्वाध्याय इयत्ता दहावी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. 

अ. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ……….. होण्याची क्रिया घडते. 

उत्तर :

लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होण्याची क्रिया घडते.  

स्पष्टीकरण : दुधाचे किण्वन लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू करतात. किण्वनाच्या प्रक्रियेमुळे दुधाचे लॅक्टोजचे रूपांतर लक्टीक आम्लात होऊन दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. 

आ. प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील ………….. सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. 

उत्तर :  

प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील क्लाॅस्ट्रिडीअम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. 

स्पष्टीकरण : प्रोबायोटिक्स हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. त्यामुळे कॉस्ट्रिडीअमसारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. 

   

इ. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे …………… होय. 

उत्तर :

रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% अँसेटिक आम्ल होय. 

स्पष्टीकरण : हे पदार्थाचे परिरक्षक म्हणून व्हिनेगार वापरल्या जाते. म्हणून रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार हे 4% अँसेटिक आम्ल असे म्हणतात. 

 

ई. कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ……………. आम्लापासून बनवतात. 

उत्तर :

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॉनिक आम्ल आम्लापासून बनवतात. 

स्पष्टीकरण : हे अँस्पर जिलस नायगर या जीवणूच्या सहाय्याने ग्लुकाॅनिक आम्लापासून कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार बनवतात. 

2. योग्य जोड्या जुळवा. 

         ‘अ’ गट 

        ‘ब’  गट 

अ. झायलीटाॅल 

आ. सायट्रिक आम्ल 

इ. लायकोपिन 

ई. नायसिन

1. रंग 

2. गोडी देणे 

3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक 

4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर 

5. आम्लता देणे

उत्तर :

          ‘अ’ गट 

        ‘ब’  गट 

अ. झायलीटाॅल 

आ. सायट्रिक आम्ल 

इ. लायकोपिन 

ई. नायसिन

2. गोडी देणे 

5. आम्लता देणे

1. रंग 

3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?

उत्तर :

i) मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी-अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. 

ii) सॅकरोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथॅनॉल अल्कोहोल हे एक स्वच्छ धूररहित इंधन आहे. 

iii) हायड्रोजन वायूपासून इंधन मिळवता येते. ‘हायड्रोजन वायू’ हे भविष्यातील इंधने मानले जाते.

या इंधनाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. कारण हे इंधन धूररहित असून या इंधनापासून कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच ही इंधने भविष्यकाळात भरवशाची अशी आहेत.

आ. समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात

उत्तर :

i) अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग नष्ट करण्याची क्षमता असते. समुद्रातील/ नदीतील तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. 

ii) या जीवाणूंच्या समूहाला हायड्रोकार्बनोक्लास्टिक बॅक्टेरिआ म्हणतात. हे बॅक्टेरिआ हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. 

इ. आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते

उत्तर :

ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स ॲसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणुंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जास्रोत आहे. म्हणून आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती हे जीवाणू आटोक्यात आणतात. ती माती पुन्हा सुपिक केली जाते.

ई. सेंद्रीय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा

उत्तर :

सेंद्रीय शेती करताना कृत्रिम नायड्रोजिनेज अझॅटोबॅक्टरयुक्त द्रव्ये वापरली जातात. या शेतीमध्ये किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनविले जातात. पेरणी आधी बियाण्यांतून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतींमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. म्हणून सेंद्रीय शेतीमध्ये जैव कीटकनाशकाचे महत्त्व आहे.

उ. प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत

उत्तर – 

प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

i) प्रोबायोटीक्स ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवतात. प्रतिक्षमता वाढवतात. 

ii) आपल्या शरीरातील चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. 

iii) प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटीक्स करतात. 

iv) तसेच अतिसाराच्या उपचारासाठी व कोंबड्यावरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटीक्सचा वापर होतो.

ऊ . बेकर्स यीस्ट वापरुन बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात

उत्तर : 

i) बेकर्स यीस्टमध्ये ऊर्जा, कार्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्त्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. 

ii) बेकर्स यीस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायॉक्साईड (CO2) व इथॅनॉलमध्ये होते. CO2 मुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो. यामुळे बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात.

ए. घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबर घेणे आवश्यक आहे

उत्तर :

i) घरात साधारणपणे दोन प्रकारचा कचरा तयार होतो. 

अ) ओला कचरा म्हणजे पालेभाज्यांची देठं, खराब झालेली पानं, केळांची साल, इत्यादी.

ब) सुका कचरा म्हणजे वाळलेला पालापाचोळा, जुनी वर्तमानपत्रे, प्लॅस्टीकच्या पिशव्या, बाटल्या, जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी. 

ii) न कुजणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून तो पूनर्वापरात येवू शकतो. तसेच त्यापासून ऊर्जानिर्मिती करणेही शक्य आहे. 

iii) कचऱ्याचे विघटन करताना योग्यरितीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते जेणे करून त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होणार नाही. 

iv) तसेच प्लॅस्टिकसारख्या न कुजणाऱ्या वस्तुंचा पूर्नवापर करणे, ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करणे याने विघटन सोयीस्कर होते. 

v) अशाप्रकारे घरातील कचरा वेगवेगळा ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही जबाबदारी घेणे अत्यावश्यक आहे.

ऐ. प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे

उत्तर :

i) प्लॅस्टिक अविघटनशील कचरा या गटामध्ये मोडतो. 

ii) प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे जलनिस्सारणास अडथळा निर्माण होतो व पाणी तुंबून अनेक आरोग्यविषयक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो. त्याचबरोबर सागरी जीवांनाही धोका निर्माण होतो. परिणामत: परिसंस्था धोक्यात येते. 

iii) प्लॅस्टिकच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉऑक्साइड हवेत सोडल्या जातो. ज्यामुळे सजीवांवर त्याचा घातक परिणाम होतो. प्लॅस्टिकचे विघटनही होत नाही तसेच केल्यास पर्यावरणास हानी पोहोचते. म्हणून प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे गरजेचे आहे.

4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 

उत्तर :

5. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. औदयोगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे

उत्तर :

i) औदयोगिक सूक्ष्मजीवशास्त्रात विविध उत्पादन घेण्यासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रात एका औषधात दोन ते तीन आजार ठिक होण्यासाठी उत्परिवर्तित प्रजातींचा वापर केला जातो. 

ii) उत्परिवर्तित प्रजातीमध्ये हवी ती गुणधर्मे मिळविली जाऊ शकतात. त्यामुळे औदयोगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.

आ. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. 

उत्तर :

i) डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. 

ii) कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. 

iii) म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.

इ . रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात

उत्तर :

i) तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही सूक्ष्मजैविक विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. 

ii) ही विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात, अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. म्हणून रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.

6. उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 

उत्तर :

7. पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात चित्र पूर्ण करा. 

उत्तर :

8. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे 

उत्तर :

कंपोस्ट खत तयार करतांना जनावरांच्या गोठ्यातील टाकाऊ पदार्थ, कुक्कुटपालन केंद्रातील टाकाऊ पदार्थ, भाजीपाल्याचा कचरा तसेच भुईमुगाची टरफले हे सर्व मिश्रण एका तयार खड्ड्यात टाकले जाते. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव या कचऱ्याचे विघटन करून कंपोस्ट खत तयार करतात. अशा सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीव नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात. त्यामुळे कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची महत्त्वाची भूमिका आहे.

आ. पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत

उत्तर :

i) इथॅनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॉनोबॅटर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. यामुळे ॲसेटिक आम्ल व इतर उपउत्पादने मिळतात. 

ii) इथॅनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. हे पेट्रोल व डिझेलमध्ये मिसळले तर प्रदूषण होणार नाही. म्हणून पेट्रोल डेझेलमध्ये इथॅनॉल मिसळणे फायद्याचे आहे.

इ. इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात

उत्तर :

i) इंधने मिळवण्यासाठी (जळण्याचे लाकूड) सुबाभूळ, आजण, पळस, निलगिरी, कडूलिंब, चिंच इत्यादी वनस्पतींची लागवड करतात. 

ii) ऊसाची मळी, गहू, मका या पिकांपासून इथॅनॉल इंधन मिळवले जाते. 

iii) तसेच सोयाबीन, सूर्यफूल, पाम या वनस्पतींपासून बायोडिझेल मिळवले जाते. त्यासाठी या पिकांची लागवड केली जाते.

ई. जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात ? 

उत्तर :

बायोइथॅनॉल व बायोडिझेल ही इंधने जैववस्तुमानापासून मिळवतात.

उ. पाव जाळीदार कसा बनतो

उत्तर :

i) पाव तयार करताना पिठामध्ये बेकर्स यीस्ट-सॅकरोमायसिस सेरेव्हिसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. 

ii) यीस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड (CO2) व इथनॉलमध्ये होते. 

iii) कार्बन डायऑक्साईड (CO2) मुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो.

भिंगे व त्यांचे उपयोग स्वाध्याय

भिंगे व त्यांचे उपयोग स्वाध्याय

भिंगे व त्यांचे उपयोग स्वाध्याय इयत्ता दहावी 

प्रश्न 1. खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

 स्तंभ 1

 स्तंभ 2 

 स्तंभ 3 

 1. दूरदृष्टिता


 i. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात

 a. द्विनाभीय भिंग

 2. वृद्धदृष्टिता 


ii. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात 

b. अंतर्वक्र भिंग 

 3. निकटदृष्टिता 


iii. वृद्धावस्थेतील समस्या  

c. बहिर्वक्र भिंग 

उत्तर :

 स्तंभ 1

 स्तंभ 2 

 स्तंभ 3 

 1. दूरदृष्टिता


ii. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात 

 c. बहिर्वक्र भिंग 

 2. वृद्धदृष्टिता 


iii. वृद्धावस्थेतील समस्या a. द्विनाभीय भिंग

 3. निकटदृष्टिता 


 i. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात

b. अंतर्वक्र भिंग 

स्पष्टीकरण – 1) दूरदृष्टिता हा दृष्टिदोष आहे. यामुळे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. हा दोष घालविण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. 

2) वृद्धवृष्टिता हा दोष वयोमानानुसार येतो. यात द्विनाभीय अंतराचा चष्मा वापरावा. 

3) निकटदृष्टिता हा दोष असणाऱ्या व्यक्ती जवळच्या वस्तू पाहू शकतात. पण दूरच्या वस्तू त्यांना स्पष्ट दिसत नाहीत. त्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. 

प्रश्न. 2. भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा. 

उत्तर :

भिंगाचे_प्रकार
भिंगाचे प्रकार

भिंग – भिंग हे दोन पृष्ठांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. 

बहिर्गोल भिंग – ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना बहिर्गोल भिंग म्हणतात. 

अंतर्वक्र भिंग – ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना अंतर्वक्र भिंग म्हणतात. 

बहिर्गोल_व_अंतर्गोल_भिंगाचे_काटछेद
बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद

वक्रता केंद्र – भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगास C व C अशी दोन वक्रता केंद्र असतात. 

वक्रता त्रिज्या – भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना (R व R) भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. 

मुख्य अक्ष – भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. 

प्रकाशिय केंद्र – प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. 

भिंगाचा_प्रकाशीय_केंद्र
भिंगाचा प्रकाशीय केंद्र

मुख्य नाभी – बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. 

भिंगाची_नाभी
भिंगाची नाभी

अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूतून बाहेर पडत आहेत. या बिंदूला अंतर्गोल भिंगाची नाभी म्हणतात. 

नाभिय अंतर – भिंगाची नाभी व प्रकाशिय केंद्र या मधील अंतरास नाभिय अंतर म्हणतात. 

पसारी आणि अभिसारी भिंग – अंतर्गोल भिंगाला अपसारी तर बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात. 

प्रश्न. 3. एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तुच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल ? आकृती काढा. 

उत्तर :

प्रतिमा वास्तव व वस्तुएवढी मिळण्यासाठी वस्तू 2F1  वर ठेवावी प्रतिमा 2F2 मिळते. 

बहिर्गोल_भिंगाद्वारे_मिळणारी_वास्तव_प्रतिमा
बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा

प्रश्न. 4. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.    

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

आ. रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. 

उत्तर :

i) मानवी डोळ्यातील दृष्टिपटल हे दंडाकार व शंक्वाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात.    

ii) शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच रंगास प्रतिसाद देतात. प्रकाश अंधूक असल्यास त्या कार्य करीत नाहीत. म्हणून रंगांची संवेदना व जाण फक्त (तेजस्वी) प्रकाशातच होते.

इ. डोळ्यापासून 25 सेमी पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.  

उत्तर :

सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर 25 आहे. त्यापेक्षा कमी अंतरावरील वस्तू पाहताना डोळ्यावर ताण पडतो. त्यामुळे डोळ्यापासून 25 सेमी पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळे सुस्पष्टपणे पाहू शकत नाही. 

प्रश्न. 5. खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल ?

उत्तर :

अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालीत स्वरूपात पाहण्यासाठी दूरदर्शीचा उपयोग करतात. 

अपवर्तनी दूरदर्शकामध्ये दोन बहिर्वक्र भिंगाचा वापर केलेला असतो. 

1) पदार्थ भिंग    2) नेत्रिका 

पदार्थ भिंग जास्त नाभिय अंतर असणारे व मोठ्या आकाराचे असते. तर नेत्रिका कमी नाभिय अंतराची व आकाराने लहान असते. 

पदार्थ भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तुचे कार्य करते आणि अंतिम प्रतिमा तयार होते. 

अंतिम प्रतिमा मूळ वस्तूच्या तुलनेत उलटी आभासी व लहान मिळविण्यासाठी पदार्थी भिंग व नेत्रिका या मधील अंतर कमी जास्त करता येते. 

पदार्थ भिंग व नेत्रिका एका नलक्रियेमध्ये बसविलेले असतात त्यामुळे त्याच्यातील अंतर कमी जास्त करता येते. 

अपवर्तनी_दूरदर्शक
अपवर्तनी दूरदर्शक

दुरदर्शीच्या नळीची लांबी L  = Fo + Fe      

विषालन =Fo/Fe

येथे F: पदार्थ भिंगाचे नाभीय अंतर    

Fe: नेत्रिकेचे नाभीय अंतर

प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा. 

अ. दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता

उत्तर 

 दूरदृष्टिता

 निकटदृष्टिता

 

1. दूरदृष्टिता या स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत..

2. या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी होते.

3. या दोषामध्ये डोळ्याचे भिंग डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यातील अंतर कमी होते.

4. यात जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते. 

5. योग्य शक्ती असलेले बहिर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करता येते.

 

1. निकटदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.

2. या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढते. 

3. या दोषामध्ये डोळ्याचे मिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यातील अंतर वाढते.

4. यात दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. 

5. योग्य शक्ती असलेले अंतर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करता येते.

    

आ. अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

उत्तर 

 अंतर्गोल भिंग

 बहिर्गोल भिंग

 

1. अंतर्गोल भिंगाचे पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात. 

2. हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते.

3. या भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते.

4. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा लहान असते.

 

1. बहिर्गोल भिंगाचे पृष्ठभाग गोलीय बाहेरच्या बाजूने फुगीर असतात.

2. हे भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. 

3. या भिंगामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. 

4. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा अथवा लहान किंवा वस्तूएवढी असते.

प्रश्न. 7. मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूंचे कार्य काय आहे?

उत्तर : 

i) बुबुळाच्या मध्यभागी डोळ्याची बाहुली म्हणजे बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते. प्रकाश जास्त असल्यास बाहुलीचे आकुंचन होऊन प्रकाशाचे नियंत्रण होते. तसेच प्रकाश कमी असल्यास बाहुली रुंदावून जास्त प्रकाश डोळ्यात शिरतो. अशा प्रकारे प्रकाशाचे प्रमाण नियमित होते.

ii) मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू डोळ्यातील लवचीक भिंगाची वक्रता योग्य प्रमाणात बदलतात. त्यामुळे भिंगाचे नाभीय अंतर बदलून दृष्टिपटलावर वस्तूची वास्तव प्रतिमा तयार होते. 

मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू शिथिल असताना भिंग कमी फुगीर असते आणि दूरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते. त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते. (आकृती 1 )

आकृती 1 : दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होणे (प्रारूप आकृती) 

जवळची वस्तू बघायची असल्यास डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू आकुंचन होऊन नेत्रभिंगाची वक्रता वाढवतात. त्यामुळे भिंग फुगीर होऊन त्याचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळे जवळच्या  वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते, त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते. (आकृती 2)


आकृती 2 : जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होणे (प्रारूप आकृती)

प्रश्न. 8. उदाहरणे सोडवा. 


अ. डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी +1.5 D शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता ते सांगा ?

उत्तर :

आ. 5 cm उंचीची वस्तू 10 cm नाभीय अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्थान, आकार आणि स्वरूप शोधा. 

उत्तर :

इ. 2, 2.5 व 1.7 D शक्ती असलेली भिंगे जवळजवळ ठेवली आहे. तर त्यांची एकूण शक्ती किती होईल ?

उत्तर :

एकूण शक्ती = P = P1 + P2 + P3

                    = 2 + 2.5 + 1.7 

एकूण शक्ती = 6.2 D

ई. एका भिंगापासून 60 से.मी. अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरचे 20 से.मी. अंतरावर मिळते. भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे ? 

उत्तर :

खेळ आणि इतिहास स्वाध्याय

खेळ आणि इतिहास स्वाध्याय

खेळ आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी 

       

१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. ऑलिंपिक स्पर्धाची परंपरा ………… येथे सुरू झाली. 

उत्तर : ऑलिंपिक स्पर्धाची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली. 

2. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला …………. म्हणत. 

उत्तर : महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत. 

ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 

1. मल्लखांब  –  शारीरिक कसरतीचे खेळ 

2. वॉटर पोलो  –  पाण्यातील खेळ

3. स्केटींग  –  साहसी खेळ

4. बुद्धिबळ  –  मैदानी खेळ 

उत्तर :

चुकीची जोडी : बुद्धिबळ  –  मैदानी खेळ

दुरुस्त जोडी : बुद्धिबळ  –  बैठे खेळ 

२. टिपा लिहा. 

1. खेळणी आणि उत्सव. 

उत्तर :

उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे.

i) विविध संस्कृतींत आणि धर्मात उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. संताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो.

ii) दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकाच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.

iii) गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. 

iv) बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात.

2. खेळ व चित्रपट. 

उत्तर :

i) पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक-नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत.
ii) अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. ‘लगान’, ‘दंगल’ असे क्रिकेट, कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.

iii) मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. 

iv) प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.


३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. 

उत्तर :

i) विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे. 

ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.

iii) हौशी खेळाडू शिकण्यासाठी प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.

iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

2. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. 

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. 

i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

iii) उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.

iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. 

उत्तर :

खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते.

i) खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत.

ii) व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.

iii) खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात.  दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात. 

iv) ‘षट्कार’ नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. 

v) द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात.

vi) इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.

2. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा. 

उत्तर :

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत..

i) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.

ii) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते.

iii) ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. 

iv) विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते. 

v) खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूच माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.

vi) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.

3. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

 मैदानी खेळ

 बैठे खेळ

 

1. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. 

2. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. 

3. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. 

4. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. 

5. मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही आधिक मिळतो. 

6. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. 

7. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो. 


 

1. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर, कोठेही खेळता येतात. 

2. बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.    

3. या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. 

4. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही. 

5. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. 

6. बैठ्या खेळांना शारीरिक गरज कौशल्याची नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते. 

7. बैठ्या खेळांत बुद्धीबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो.  

भूमी उपयोजन स्वाध्याय

भूमी उपयोजन स्वाध्याय

भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा. 

1) खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. 

2) केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे.

3) नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

4) ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबाराचा (७/१२) उतारा दिला जातो.

5) ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते.

6) उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

उतारा क्रमांक ७ हे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायदयातील विशेष कलमे आहेत.

7) उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

कारण उतारा क्रमांक १२ मुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे, हे समजते. हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

उत्तर :

कारण i) नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. 

ii) या लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यशासन किंवा केंद्रशासन करते, या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदा. रुग्णालय, टपाल कार्यलय, पोलिस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. या सेवासुविधांमुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण शमला जातो. त्यामुळे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

2) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते.

उत्तर :

कारण शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा, दस्त ऐवज नगरभूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते. सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्र. कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी.

3) भूमी उपायोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

उत्तर :

कारण विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते. म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

प्रश्न. 3. उत्तरे लिहा.

1) ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ?

उत्तर :

i) ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. 

ii) शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात. 

iii) ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. तेथे शेतीसाठी जास्त जमिनीची उपलब्धता असते. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते. 

2) भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा ?

उत्तर :

भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. त्यात ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक व नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक असे प्रकार पडतात.

i) ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक – यामध्ये हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण यांचा समावेश होतो.

ii) नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक – यामध्ये भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतुक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यांचा समावेश होतो.

3) ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

ग्रामीण भूमी उपयोजन

नागरी भूमी उपयोजन 

 

i) ग्रामीण भागात शेतीसाठी भूमीचा वापर केला जातो.

ii) ग्रामीण भागात लोकसंख्येच्या मानाने जमिनीची उपलब्धता जास्त असते.

iii) ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान/माळरान असे करता येते.

 

i) नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. 

ii) नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते.

iii) नागरी भागातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजनाची ठिकाणे असे करता येते.

4) सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा..

उत्तर :

सातबारा उतारा

मिळकत पत्रिका 

 

i) गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो.

ii) हा उतारा शासकीय अभिलेखा महसूल विभागातर्फे दिला जातो. 

iii) या उताऱ्यामध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जाचा बोझा, शेतजमिनीचे हस्तांतरणं, त्यातील पिकांखालील क्षेत्र यांचा समावेश असतो.

 

i) बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते.

ii) ही पत्रिका नगरभूमापन विभागातून मिळते.

iii) मिळकत पत्रिकेत सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती असते.

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) कायद्याची निर्मिती ……………… करते. 

अ) कायदेमंडळ 

ब) मंत्रिमंडळ 

क) न्यायमंडळ

ड) कार्यकारी मंडळ

उत्तर :

कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते. 

2) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ……………. करतात. 

अ) प्रधानमंत्री 

ब) राष्ट्रपती 

क) गृहमंत्री 

ड) सरन्यायाधीश 

उत्तर :

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. 

2. संकल्पना स्पष्ट करा. 

1) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :

कार्यकारी मंडळाने किंवा संसदेने संविधानाचा भंग होईल असं एखादा कायदा किंवा कृती केल्यास न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवते व रद्द ठरवते. 

न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. 

2) जनाहितार्थ याचिका 

उत्तर : 

सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक, सामाजिक संघटना, बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हणतात. 

3. टिपा लिहा. 

1) दिवाणी व फौजदारी कायदा

उत्तर :

व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गोष्टी. उदा. जमिनीचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इ. दिवाणी कायद्यात येतात, तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे. उदा. चोरी, हुंड्यासाठी छळ, घरफोडी, हत्या इ. फौजदारी कायद्यात येतात. 

2) न्यायालयीन सक्रियता 

उत्तर :

संविधानातील न्याय व समतेची उद्दिष्टे न्यायालय पूर्ण करते. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना न्यायालय कायद्याने संरक्षण देते. यालाच न्याया लयीन सक्रियता म्हणतात. 

4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) समाजात कायद्याची गरज का असते ?

उत्तर :

व्यक्ति-व्यक्तींची मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती याबाबत भिन्नता असते. ही मतभिन्नता टोकाची झाल्यास संघर्ष निर्माण होतात. त्याचे निराकरण नि:पक्षपातीपणे कायद्याच्या आधाराने करण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते. 

2) सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

i) केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये व घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडवणे. 

ii) नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे.

iii) कनिष्ठ न्यायालयाचा व आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे.

iv) सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे. 

3) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ?

उत्तर :

i) न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो. 

ii) न्यायाधीशांना सेवा-शाश्वती असते. क्षुल्लक कारणामुळे त्यांना पदावरून दूर करता येत नाही. 

iii) न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. त्यावर संसदेत चर्चा होत नाही. 

iv) न्यायाधीशाच्या कृती व निर्णयावर व्यक्तींगत टीका करता येत नाही. 

v) न्यायालयाचा अवमान करणे हा गुन्हा आहे. 

vi) संसदेत न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही.        

प्रश्न. 5. पुढील तक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी




१. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार …………. यांना मानतात. 

उत्तर : महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. 

2. बाबुराव पेंटर यांनी …………. हा चित्रपट काढला. 

उत्तर : बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला. 

ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 

1. रायगडाला जेव्हा जाग येते  –  वसंत कानेटकर 

2. टिळक आणि आगरकर  –  विश्राम बेडेकर

3. साष्टांग नमस्कार  –  आचार्य अत्रे

4. एकच प्याला  –  अण्णासाहेब किर्लोस्कर 

उत्तर :

चुकीची जोडी : एकच प्याला  –  अण्णासाहेब किर्लोस्कर 

दुरुस्त जोडी : एकच प्याला  –  राम गणेश गडकरी

२. पुढील तक्ता पूर्ण करा. 

 

 भजन 

 कीर्तन 

 लळित 

 भारुड

 गुणवैशिष्ट्ये 

 

 

 

 

 उदाहरणे 

 

 

 

 

उत्तर :

 

 भजन

 कीर्तन

 लळित

 भारुड

 

गुणवैशिष्ट्ये

 

टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाट्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरण पर काव्यरचना गायली जाते.

 

कीर्तन करतांना कीर्तनकारांना पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष दयावे लागते. त्याच्या अंगी बहुशृतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. 

 

नाट्य प्रवेशाप्रमाणे लळित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात. लळिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव-देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे मागतात. 

 

पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते. हे एक रूपकात्मक गीत असते. यामध्ये विविधता, नाट्यात्मता, विनोद आणि गेयता असते. 

 

उदाहरणे 

 

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा।। रवा  – संत तुकाराम 

 

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला – संत गाडगे महाराज 

 

ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो। सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो।  आपापसांतले कलह लळितात मिटोत। कोणाच्याही मनात। किल्मिष न उरो। निकोप मनाने व्यवहार चालोत। सदाचरणाने समाज वागो।

 

अग, ग.. विंचू चावला देवा रे देवा.. विंचू चावला आता काय मी करू.. विंचू चावला – संत एकनाथ

३. टिपा लिहा. 

1. मनोरंजनाची आवश्यकता. 

उत्तर :

i) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. 

ii) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. 

iii) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. 

iv) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.

2. मराठी रंगभूमी. 

उत्तर :

i) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे ‘रंगभूमी’ होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे ‘मराठी रंगभूमीचे जनक’ होत.

ii) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.

iii) ‘थोरले माधवराव पेशवे’ या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली मरपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.

iv) मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.

3. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. 

उत्तर :

रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत –

i) रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते.

ii) चित्रपटासाठीही या सर्वांची गरज असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित आहेत.

४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. 

उत्तर :

i) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

ii) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.

iii) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.

iv) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते.

एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

2. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 

उत्तर :

i) संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.

ii) या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती. 

iii) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.

iv) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत.

व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे. 

उत्तर :

i) भारतात चलत्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला.

ii) १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला.

iii) दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन ‘पुंडलिक’ हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला. 

iv) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. 

अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची  ख्याती आहे.

2. पोवाडा म्हणजे काय, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

i) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे ‘पोवाडा’ होय,

ii) पोवाडा हा गदय-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. 

iii) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.

iv) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.

v) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.

vi) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी

प्राण्यांचे वर्गीकरण



1. ओळखा पाहू, मी कोण ?

अ. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही, मी कोणत्या संघातील प्राणी आहे ?

उत्तर :
सिलेंटराटा संघ. 

आ. माझे शरीर सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा संबोधतात. माझे नाव काय ?

उत्तर :

तारामासा 

इ. मी तुमच्या लहान आतडयामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल ?

उत्तर :
गोलकृमी प्राणीसंघ

ई. मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा. 

उत्तर :

रंध्रीय प्राणीसंघ

2. प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. 

रोहू मासा, नाकतोडा, हत्ती, पेंग्वीन, सुसर, टोड, उडणारा सरडा, हुक वर्म, जेलीफिश, गोम

उत्तर :

1) रोहू मासा :

i) हा प्राणी पूर्णपणे जलचर असून, जलीय जीवनासाठी अत्यंत अनुकूलित आहेत. 

ii) शरीर दोन्ही टोकाला निमुळते व खरखरीत असते. कारण त्यावर खवल्याचे आच्छादन असते. 

iii) श्वसनासाठी आच्छादित अथवा अनाच्छादित कल्ले असतात. पाण्यात पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात व पुच्छपराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो. हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते. 

iv) हा शीत रक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. 

v) यांना अस्थिमय व कास्थिमय अंतःकंकाल असते.

2) नाकतोडा :

i) ऑरथॉप्टेरा गणातील अँक्रिडिडी व टेट्टीगोनिडी कुलांमधील कीटकांना सामान्यतः नाकतोडे म्हणतात. 

ii) नाकतोडे मुख्यत्वेकरून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आढळून येतात. 

iii) हे विविध रंगाचे असून काळसर, पिवळे, वाळलेल्या गवताच्या रंगाचे किंवा शरीरावर रंगीत पट्टे असलेले सामान्यत: आढळतात. 

iv) हा शीत रक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. त्यांच्यापैकी बहुतेक सर्वच कीटकांना पूर्ण वाढलेल्या, चामड्यासारख्या लवचिक पंखांच्या दोन जोड्या असतात. परंतु काही पंखहीन किंवा नाममात्र पंख असलेलेही असतात. 

v) त्यांची मुखांगे चर्वणास उपयुक्त असून त्यांच्या शेवटच्या पायांची जोडी उडी मारण्यासाठी रूपांतरित झालेली असते. 

vi) नाकतोडे पिकांची हानी करतात. पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही याच प्रकारात येते. 

vii) मादीस खुरपाच्या वा तलवारीच्या आकाराचा लांब अंडनिक्षेपक असतो.

3) हत्ती :

i) हा दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणाऱ्या प्राण्यांच्या सस्तन प्राणीवर्गात मोडतो. 

ii) हा प्राणी उष्णरक्ती असतो. 

iii) डोके, मान, धड़ व शेपूट हे शरीराचे भाग असतात. 

iv) अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. 

v) बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. 

vi) शरीरावर केस स्वेदग्रंथी व तैलग्रंथी असतात. 

vii) एकलिंगी व जरायुज असतात. परंतु या वर्गात येणारे अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटीपस व एकडिना होय. 

viii) जरायुज प्राणी म्हणजे पिल्लाला जन्म देणारे. 

ix) हृदयाला चार कप्पे असतात. 

x) हालणारा जबडा, हालणारा बाह्यकर्ण, डोळ्यांची पापणी हालते. 

xi) छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. 

xii) स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनीनिर्मिती करू शकतात.

4) पेंग्वीन :

i) हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. 

ii) हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. 

iii) हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. 

iv) अग्रउपांगे (Forelimbs) पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. 

v) बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते. 

vi) जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. 

vii) फुफ्फुसाद्वारे श्वसन होते. 

viii) हृदय चार कप्प्यांचे असते.

5) सुसर :

i) प्राणी-उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. 

ii) हे प्राणी शीतरक्ती असतात. 

iii) शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. 

iv) त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 

v) शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. 

vi) बाह्यकर्ण नसतो. 

vii) अंगुलींना नखे असतात. 

viii) एकलिंगी, अंडज असतात व फलन शरीरांतर्गत होते.

6) टोड :

i) हे प्राणी त्यांच्या डिंब-अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतात.

ii) उपांगांच्या दोन जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. 

iii) बाह्यकंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. 

iv) बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. 

v) मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. 

vi) यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते.

vii) यांच्या अंगावर श्लेष्मल ग्रंथी (Mucosa) असल्याने ते कायम ओलसर असतात. 

viii) यांच्यात बायफलन घडून येते.

7) उडणारा सरडा :

i) सरडा हा भूचर होऊन ही सरपटणारा प्राणी आहे.

ii) हे प्राणी शीतरक्ती असतात. 

iii) यांचे पाय कमकुवत असतात. 

iv) याची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 

v) शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. 

vi) याला उडण्यासाठी पापुद्र्यासारखे त्वचेचे पडदे असते.

8) हुकवर्म :

i) या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, द्विपार्श्वसममित, लांबट व दंडाकृती असते. 

ii) बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असून, एकलिंगी असतात. 

iii) शरीरात आभासी देहगुहा असते यांना सुडोसिलोम म्हणतात. 

iv) मुखापासून सुरू होऊन गुद्दद्द्वारापर्यंत जाणारी पचननलिका असते. 

v) यापैकी बहुसंख्य प्राणी माणसांमध्ये रोग निर्माण करतात. 

9) जेलीफिश :

i) हे जलवासी प्राणी असून, त्यापैकी बहुतेक समुद्रात आढळतात. 

ii) हे अरिय सममित व द्विस्तरी असतात. 

iii) देह गुहा असते. 

iv) शरीराला एक मुख असून, त्याभोवती संवेदनाक्षम शुंडके असतात. 

v) साधारणत: यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने होते.

10) गोम :

i) हे सार्वत्रिक आढळणारे त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित असून प्रचलनासाठी यांना संधियुक्त उपांगे असतात. प्राण्यांमधील हा सर्वांत मोठा संघ आहे. 

ii) त्यांचे शरीर खंडीभूत असून त्यावर कायटिनयुक्त बाह्यकंकालाचे आच्छादन असते. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. कीटकांना उडण्यासाठी पंखाच्या दोन जोड्या व उपांगांच्या तीन जोड्या असतात 

iii) एकलिंगी असून, लैंगिक प्रजनन करतात.

3. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत. 

उत्तर :

i) वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. 

ii) ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. 

iii) विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले. 

iv) ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला ‘कृत्रिम पद्धत’ म्हणतात. 

v) त्यांच्या व्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. 

vi) कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. 

vii) वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. 

viii) कालांतराने उत्क्रांतिवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अमलात आणली गेली. 

ix) डॉब्झंस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. 

x) अलिकडच्या काळात कार्ल वुज यांनी युद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. अशाप्रकारे वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या.

4. रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे ? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.

उत्तर :

रचनात्मक संघटन व सममिती हे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीसाठी वापरलेले आधारभूत मुद्दे असून रचनात्मक संघटनात प्राण्यांच्या शरीरात पेशी किंवा ऊती यांद्वारे अवयव तयार होणे यावर रचनात्मक संघटनाचे प्रकार पडतात तर सममितीमध्ये प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात.

उदा. – i) रचनात्मक संघटन : रंध्रीय संघातील प्राणी, नीडारीया संघातील प्राणी, चपटे कृमी. 

ii) सममिती : अमिबा (असममित शरीर), तारामासा (अरिय सममिती), मानव (द्विपार्श्व सममिती).

5. थोडक्यात उत्तरे द्या. 

अ. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा

उत्तर :

शार्कचे वर्गीकरण 

सजीव → दृश्यकेंद्रकी → बहुपेशीय → सजीव प्राणीवर्गीय

सृष्टी – प्राणी 

संघ – समपृष्ठरज्जू प्राणीसंघ

उपसंघ – पृष्ठवंशीय प्राणी 

वर्ग – मत्स्य प्राणीवर्ग

आ. कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा. 

उत्तर :

i) कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. 

ii) हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रोेेढावस्थेत पंच – अरिय सममिती आढळते; परंतु त्यांच्या अळीअवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. 

iii) या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन/पुननिर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. 

iv) हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. 

उदा. तारामासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार इत्यादी. 

इ. फुलपाखरू आणि वटवाघूळ यातील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा. 

उत्तर :

 फुलपाखरू

 वटवाघूळ

 

1. फुलपाखरू है उपसृष्टी असमपृष्ठरज्जू  यात वर्गीकृत केले जाते. 

2 संधिपाद संघातील कीटकवर्गात याचा समावेश केला जातो.

3. फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटीनयुक्त असतात.

4. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे. 


5. फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून अळी, अळीचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात.

 

1. वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.

2. पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो. 

3. वटवाघळाला पायाची एक जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात. 

4. वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.

5. वटवाघूळ जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे स्वतःच्या दुधाने पोषण करतात.

ई. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे ? उत्तर सकारण स्पष्ट करा.

उत्तर : 

1. झुरळ हा संधीपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे. 

2. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे :

i) शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन. 

ii) छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे : तीन पायांच्या जोड्या. 

iii) द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर. 

iv) श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे. 


6. शास्त्रीय कारणे द्या. 

अ. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. 

उत्तर :

i) कासव सरीसृप असते. ते जमिनीवर राहते त्या वेळी फुफ्फुसाने श्वसन करते.

ii) ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते. या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेच श्वसन करता येते.

iii) उभयचर प्राण्याचे असे नसते. तो जमिनीवर फुप्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो.

iv) तसेच कासवाच्या अंगावर बाह्यकंकालही असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.

आ. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. 

उत्तर :

i) जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या देशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. 

ii) दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात.

iii) जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.


इ. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत

उत्तर :

i) पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणीसंचाचा उपसंच होय. 

ii) सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये होतो. परंतु सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे तीन उपसंचात विभागले गेले आहेत. 

iii) त्यामुळे सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठवंशीय नाहीत. 

ई. बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात. 

उत्तर :

i) बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो   

ii) तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो.   

iii) दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात. 

iv) म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा असे म्हणतात.

उ. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. 

उत्तर :

i) सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. 

ii) त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. 

iii) परिसराचे तापमान जसे वर-खाली होते, त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर-खाली होते. 

iv) त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


7. योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. 

अ. रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाॅजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. 

1. कॉलर पेशी   2. निडोब्लास्ट

3. अंतर्जनस्तर पेशी    4. बहिर्जनस्तर पेशी

उत्तर :

1. कॉलर पेशी 

स्पष्टीकरण : रंध्रीय प्राणी हे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. पाण्याला प्रवाहित करण्यासाठी यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. 

आ. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विससमिती दाखवते. 

1. तारामासा   2. जेलीफिश

3. गांडूळ    4. स्पॉज

उत्तर :

3. गांडूळ 

स्पष्टीकरण : गांडूळ या प्राण्याचे शरीर द्विससमिती दाखवते. 

इ. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो ?

1. झुरळ    2. बेडूक   

3. चिमणी    4. तारामासा

उत्तर :

4. तारामासा

स्पष्टीकरण : तारामासा हा कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राणी असून असून यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. 

ई. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?  

उत्तर :

1. उभयचर    2. सरीसृप 

3. पक्षी       4. सस्तन 

उत्तर :

4. सस्तन 

स्पष्टीकरण : वटवाघळाला दूध स्त्रावणाऱ्या ग्रंथी असतात तसेच सस्तन प्राणी वर्गातील प्राण्यांची सर्व लक्षणे यांच्यात दिसून येतात. 

8. खालील तक्ता पूर्ण करा. 

 देहगुहा 

 जननस्तर 

 संघ 

 नसते 

 …………….

 रंध्रीय प्राणीसंघ

 नसते 

 त्रिस्तर 

 …………….

 आभासी 

 …………….

 गोलकृमींचा संघ 

 असते 

 …………….

 संधिपाद प्राणीसंघ

 उत्तर :

 देहगुहा 

 जननस्तर 

 संघ 

 नसते 

 दविस्तर

 रंध्रीय प्राणीसंघ

 नसते 

 त्रिस्तर 

चपट्या कृमींचा संघ 

 आभासी 

 त्रिस्तर

 गोलकृमींचा संघ 

 असते 

 त्रिस्तर

 संधिपाद प्राणीसंघ


9. तक्ता पूर्ण करा. 

 प्रकार 

वैशिष्टये  

 उदाहरणे 

 चक्रमुखी 

 

 

 

 कल्ल्याद्वारे श्वसन 

 

 उभयचर 

 

 

 

 

 देवमासा 

 

 शीतरक्ती

 

उत्तर :

 प्रकार 

वैशिष्टये  

 उदाहरणे 

 चक्रमुखी 

 अंतकंकाल कास्थिमय

 मिक्झीन

 मत्स्य प्राणीवर्ग 

 कल्ल्याद्वारे श्वसन 

 पापलेट

 उभयचर 

 उपांगांच्या दोन जोड्या 

बेडूक  

 सस्तन 

उष्णरक्ती  

 देवमासा 

 सरीसृप 

 शीतरक्ती

कासव 

10. आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. 

हायड्रा, जेलीफिश, प्लॅनेरीया, गोलकृमी, फुलपाखरू, गांडूळ, ऑक्टोपस, तारामासा, शार्क, बेडूक, पाल,कबुतर. 

हायड्रा – सिलेंटराटा

जेलीफिश – सिलेंटराटा

 

प्लॅनेरिया – चपट्या

गोलकृमी – गोलकृमी प्राणीसंघ

गांडूळ – वलयी प्राणीसंघ 
आक्टोपस – मृदुकाय प्राणीसंघ

बेडूक – उभयचर प्राणीवर्ग

पाल – सरीसृप प्राणीवर्ग

कबुतर – पक्षीवर्ग

11. आकृतीस योग्य नावे द्या. 

उत्तर :