भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा

प्रश्न

 भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा

उत्तर

 

 भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते :

I) वैशिष्ट्ये : 

i) भारतात शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आला आहे.

ii) भारतातील एकूण भूभागाच्या सुमारे ६० टक्के भूभाग लागवडीखाली आहे.

iii) भारतातील बहुतांश शेती ही निर्वाह शेती आहे. 

iv) ब्राझीलच्या तुलनेत भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान तुलनेने अधिक असल्याचे आढळते.

v) ब्राझीलच्या तुलनेत भारतातील तुलनेने अधिक मनुष्यबळ शेती व्यवसायात गुंतलेले आढळते.

II) व्यवसायास चालना देणारे घटक: 

भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण मैदाने, नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशातील सुपीक मृदा, वर्षभरात दीर्घ कालावधीसाठी राहणारे अनुकूल हवामान, विविध प्रदेशांतील हवामानातील भिन्नता इत्यादी घटकांमुळे भारतात शेती व्यवसायास मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे.

III) उत्पादित होणारी विविध पिके : 

भारतात ठिकठिकाणी भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी खाद्यान्न पिकांचे व चहा, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. 

IV) परकीय चलन प्राप्ती: 

भारतात मिरी, लवंग, तमालपत्र इत्यादी विविध मसाल्यांचे पदार्थ, आंबा, द्राक्ष, सफरचंद इत्यादी विविध प्रकारची फळे, भाजीपाला इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतातील कृषिमालाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते व त्यातून भारतास मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

प्रश्न

 खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात ?

उत्तर

 

 

खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात –

i) खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक.

ii) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे स्मालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे साहाय्यक.

iii) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी. 

iv) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे साहाय्यक व संगणक तज्ज्ञ.

भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते ? 

उत्तर

 

पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हे भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण होय.

सरासरी आयुर्मान म्हणजे काय

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 सरासरी आयुर्मान म्हणजे काय ?

उत्तर

 

एखादया प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी, म्हणजे ‘सरासरी आयुर्मान’ होय.

थंडीच्या दिवसांमध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो

प्रश्न

थंडीच्या दिवसांमध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो.

उत्तर

 

 

i) थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसांत वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखालीही जाते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4°C च्या खाली गेले असता, ते प्रसरण पावते व त्याचे बर्फ बनले तरी त्याचेही आकारमान वाढते.

ii) अशा परिस्थितीत नळातून वाहणाऱ्या पाण्याचे व त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बरेच वाढल्याने त्याचा दाब नळावर पडतो व त्यामुळे नळ फुटण्याचा संभव असतो

पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय

पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय

पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सातवी


प्रश्न. 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 

(पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलंड, तेलाम्ल) 

1) पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास ……………. म्हणतात.

उत्तर :

पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात.

2) ………………. रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.

उत्तर :

दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.

3) साबण हा …………….. व मोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.

उत्तर :

साबण हा तेलाम्ल व मोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.

4) संश्लिष्ट अपमार्जके ही ………………….. पाण्यातही वापरता येतात. 

उत्तर :

संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात. 

5) बांधकामासाठी प्रामुख्याने …………………. सिमेंट वापरले जाते.

उत्तर :

बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते.

प्रश्न. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात ?

उत्तर :

i) अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. 

ii) अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामूळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात.

2) पाणी कठीण आहे का, हे तुम्ही साबणचुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल ?

उत्तर :

जर पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. यावरून पाणी कठीण आहे हे तपासता येईल.

3) टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय ? 

उत्तर :

कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम, हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक आहे.

टूथपेस्टमधील घटकांचे कार्य 

i) दातांना पॉलिश करणे. 

ii) दंतक्षय रोखण्यासाठी. 

iii) दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी त्यामधील फ्लोराइड हा उपयोगी पडतो. 

4) सिमेंटमधील घटक कोणते ?

उत्तर :

सिलिका (वाळू), ॲल्युमिना (ॲल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) हे सिमेंटमधील घटक आहेत.

5) काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल ? 

उत्तर :

काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर त्यातील मिश्रणाला कठीणपणा येणार नाही. ते काँक्रीट टिकाऊ होणार नाही.

6) तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा.

उत्तर :

वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी – साबण, डिटर्जेंट, लिक्विड सोप, रिठा, शिकेकाई, कपडे धुन्याचा सोडा, शँपू इ.

7) उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत ?

 उत्तर :

उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके मृदू असावीत. 

8) पृष्ठसक्रियता म्हणजे काय ? विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा.

उत्तर :

पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते. पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात। 

अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणारी रसायने –

तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटाशिअम क्षार इत्यादी. 

प्रश्न. 3. आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे ?

1) नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके

उत्तर

 नैसर्गिक अपमार्जके

 मानवनिर्मित अपमार्जके

i) हे अपमार्जके निसर्गातच आढळतात. उदा. रिठा, शिकेकाई.  

ii)  या अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो.

iii) या अपमार्जकांचा त्वचा, कपडे यांवर अनिष्ट परिणाम होत नाही.

i) ही अपमार्जके मानवाने निर्माण केलेली आहेत. उदा. साबण.

ii) या अपमार्जकांमध्ये तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटॅशिअम क्षार असते.

iii) या अपमार्जकांचा त्वचा, कपडे यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

सारखेपणा – दोन्ही अपमार्जकांचा फेस तयार होतो. 

2) साबण व संश्लिष्ट अपमार्जक.

उत्तर :

 साबण

 संश्लिष्ट अपमार्जके

i) साबणामध्ये तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटॅशिअम क्षार असतो.

ii) कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो.

i) संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्धपदार्थ व केरोसीन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. 

ii) संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात.

सारखेपणा – साबण व संश्लिष्ट अपमार्जके हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहेत. 

3) अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण.

उत्तर :

 अंगाचा साबण

 कपडे धुण्याचा साबण

i) अंगाचा साबण हा मृदू साबण असतो.

ii) हा तेलाम्लांचा पोटॅशिअम क्षार 

i) कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो.

ii) हा तेलाम्लांचा सोडिअम क्षार असतो. 

सारखेपणा – अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहे. हे दोन्ही अपमार्जके पृष्ठसक्रिय असतात. अंगाचा साबण शरीर स्वच्छ करण्यासाठी व कपडे धुण्याचा साबण कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. 

4) आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट

उत्तर :

 आधुनिक सिमेंट

 प्राचीन सिमेंट

i) आधुनिक सिमेंट हे सिलिका, (वाळू), ॲल्युमिना (ॲल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) यांच्यापासून तयार करतात.

ii) हे सिमेंट तुलनेने कमी टिकाऊ आहे. 

i) प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवतात.

ii) हे सिमेंट अतिशय टिकाऊ होते.

सारखेपणा – दोन्ही सिमेंटचा वापर बांधकामासाठी केला जातो. तसेच दोन्ही सिमेंटमध्ये चुना हा घटक वापरल्या जातो.

प्रश्न. 4. कारणे लिहा.

1) कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.

उत्तर :

कारण – i) कठीण पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. 

ii) या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.

2) तेल पाण्यात मिसळत नाही; परंतु पुरेसा अपमार्जक वापरला, की तेल व पाणी एकजीव होते. 

उत्तर :

कारण – i) अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे अस्तात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. 

ii) अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू, तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. म्हणून पुरेसा अपमार्जक वापरला, की तेल व पाणी एकजीव होते.

3) संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.

उत्तर :

कारण – i) संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्धपदार्थ किंवा केरोसीन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. 

ii) त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. 

iii) संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यातसुद्धा वापरता येतात. ती कठीण पाण्यात वापरली तरी त्या पाण्यात साबणाचा साका तयार होत नाही. 

त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत. 

4) बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात.

उत्तर :

कारण – कपड्यांवरील तेलांचे डाग व अपमार्जके यांतील घटक यांची अभिक्रिया होऊन बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग

5) दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.

उत्तर :

तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घातक पदार्थ असतो. हा पदार्थ कर्करोगास कारणीभूत ठरतो. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय

मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय इयत्ता सातवी


प्रश्न. 1. माझे सोबती कोण-कोण आहेत ?

 ‘अ’ गट

 ‘ब’ गट

1) स्टेनलेस स्टील 

2) चांदी

3) भाजणीचे दळण

4) मीठ 

5) कोळसा

6) हयड्रोजन  

अ) अधातू 

आ) संयुग 

इ) मिश्रण 

ई) मूलद्रव्य

उ) संमिश्र 

ऊ) धातू

उत्तर :

 ‘अ’ गट

 ‘ब’ गट

1) स्टेनलेस स्टील 

2) चांदी

3) भाजणीचे दळण

4) मीठ 

5) कोळसा

6) हयड्रोजन  

उ) संमिश्र 

ऊ) धातू

इ) मिश्रण 

आ) संयुग  

अ) अधातू  

ई) मूलद्रव्य

प्रश्न. 2. Zn, Cd, Xe, Br, Ti, Cu, Fe, Si, Ir, Pt या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. 

उत्तर :

1) Zn – जस्त

2) Cd – कॅडमियम

3) Xe – झेनॉन

4) Br – ब्रोमिन

5) Ti – टायटोनियम 

6) Cu – तांबे 

7) Fe – लोखंड 

8) Si – सिलिकॉन 

9) Ir – इरिडियम

10) P – प्लॅटिनम

प्रश्न. 3. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत ? 

हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, मिथेन 

उत्तर :

1) हायड्रोक्लोरिक आम्ल – HCl 

2) सल्फ्युरिक आम्ल – H2SO4

3) सोडियम क्लोराईड – NaCl 

4) ग्लुकोज- C6H12O6

5) मिथेन – CH4

प्रश्न. 4 .शास्त्रीय कारणे लिहा.

1) लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. 

उत्तर :

कारण – i) ताक हे एक प्रकारचे मिश्रणच आहे. लोणी काढताना आपल्याला ताकाची गरज असते. 

ii) ताक घुसळल्यावर त्यात असणारे लोण्याचे कण एकत्र येऊन त्याचा गोळा बनतो. व ताक वेगळे होते. अशावेळी आपण मिश्रणांतून आपल्याला आवश्यक असणारे घटक वेगळे करतो. म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. 

2) रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.

उत्तर :

कारण – i) रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पदार्थांच्या दोन गुणधर्मांचा उपयोग केलेला आहे. 

ii) पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता हे या पद्धतीतील दोन गुणधर्म आहे. 

iii) ते परस्परविरोधी आहेत व ते वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत. त्यामुळे रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.

3) उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.

उत्तर :

कारण – i) उन्ह्याळ्यात सरासरीपेक्षा तापमानात वाढ होते. त्यामुळे पाणी साठवलेल्या भांड्याचे तापमान ही वाढते. त्यामुळे पाणी सुद्धा गरम होते. 

ii) पाण्याचे तापमान वाढू नये म्हणून पाण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड ड गुंडाळले जाते. त्यामुळे पाण्याचे भांडे पण थंड राहण्यास मदत होते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.

प्रश्न. 5. फरक स्पष्ट करा. 

1) धातू आणि अधातू

उत्तर

 धातू

 अधातू

i) धातूंना चकाकी असते. 

ii) धातू वर्धनीय असतात. ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो. 

iii) धातूंना तन्यता असते. त्यांच्यापासून बारीक तार काढता येतो.

iv) धातू सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात.

अपवाद – पारा हा द्रव अवस्थेत असतो.

i) अधातू चकाकत नाहीत. 

ii) अधातू ठिसूळ असल्याने वर्धनीय नसतात. 

iii) अधातू ठिसूळ असल्याने त्यात तन्यता नसते. बारीक तार काढता येत नाही.

iv) अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. 

अपवाद – ब्रोमीन

2) मिश्रणे आणि संयुगे

उत्तर :

 मिश्रणे 

 संयुगे

i) दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे म्हणजे मिश्रण होय.

ii) मिश्रणातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. 

iii) उदा. स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमिअम आणि निकेल यांचे संमिश्र आहे.

i) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुगे होय.

ii) संयुगाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या घटकांत विभाजन करता येते. 

iii) उदा. पाणी हे संयुग आहे.

3) अणू व रेणू

उत्तर :

 अणू

 रेणू

i) रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा व मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू होय.

ii) अणू मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात.

i) मूलद्रव्यांचे किंवा संयुगाचे सर्व गुणधर्म असणाऱ्या तसेच स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या लहानात लहान कणास रेणू म्हणतात: 

ii) पदार्थांचे लहान कण म्हणजे रेणू.

4) विलगीकरण व ऊर्ध्वपातन

उत्तर :

 विलगीकरण

 ऊर्ध्वपातन

i) एकमेकांत न विरघळणारे दोन द्रवांचे मिश्रण वेगवेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो.

ii) विलगीकरणाला उष्णतेची आवश्यकता नसते. 

i) अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो.

ii) ऊर्ध्वपातनाला उष्णतेची आवश्यकता असते.

प्रश्न. 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

1) मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात ? 

उत्तर :

मिश्रणातील विविध घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यांसारख्या सहज सोप्या पद्धतींचा वापर केला जातो.

2) आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो ?

उत्तर :

आपण दैनंदिन वापरात खालील मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे वापरतो. 

i) मूलद्रव्ये – (धातू) – तांबे, लोखंड, ऍल्युमिनिअम, सोने, चांदी, पारा. 

(अधातू ) – फॉस्फरस, कार्बन, आयोडिन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन.

ii) संयुगे – पाणी, साखर, मीठ

iii) मिश्रणे – हवा, ताक, पाणी

3) दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो ? 

उत्तर :

i) ताक घुसळवून लोणी वेगळे करणे. 

ii) वॉशिंग मशिनमध्ये कपडे वाळवणे. 

iii) रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी. 

iv) व्ह्यॉक्युम क्लिनर घरातील कचरा साफ करण्यासाठी.

4) ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो ? का ? 

उत्तर :

i) ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग अशुद्ध द्रवपदार्थ शुदध करण्यासाठी होतो. 

ii) मिश्रणातील न विरघळणाऱ्या दोन द्रवांना वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो.

5) ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

उत्तर :

विलगीकरण पद्धत वापरताना – 

i) जागा ही मोठी असली पाहिजे. 

ii) साहित्य काळजीपूर्वक वापरावे.

विलगीकरण पद्धत वापरताना – 

i) हात स्वच्छ धुणे. 

ii) यंत्र काळजीपूर्वक हाताळणे. 

iii) मास्क, रबरी, हातमोजे वापरणे. 

iv) विलगीकरण नरसाळे स्टॅडला पक्के बसवा. 

v) नरसाळ्याची तोटी बंद करा.

ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज स्पष्ट करा

प्रश्न

 ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज स्पष्ट करा.

उत्तर

 

 

ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज आहे. कारण आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही लाभला आहे. या वारशाचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. या ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन हे पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे. विविध ऐतिहासिक वास्तूमुळे सामाजिक प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय इयत्ता नववी 

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय नववी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) इ. स. १९९२ मध्ये ……………. या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 

अ) महाराष्ट्र

ब) गुजरात

क) आंध्र प्रदेश

ड) उत्तराखंड

उत्तर :

इ. स. १९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 

2) भारत सरकारने १९७५ मध्ये ………………. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 

अ) डॉ. फुलरेणू गुहा

ब) उमा भारती

क) वसुंधरा राजे

ड) प्रमिला दंडवते

उत्तर :

भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ. फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 

प्रश्न. 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) सौदामिनी राव – स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

2) विद्या बाळ – नारी समता मंच

3) प्रमिला दंडवते – महिला दक्षता समिती

4) ज्योती म्हापसेकर – महिला आयोग

उत्तर :

चुकीची जोडी : ज्योती म्हापसेकर – महिला आयोग

प्रश्न. 3. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 

1) स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली

उत्तर :

कारण – i) पूर्वापार चालत आलेली बंधनं, जोखडं झुगारून देऊन स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करायचा हक्क मिळावा. 

ii) त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले जावे यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली. 

iii) पूर्वी स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली.

2) १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला

उत्तर :

कारण – i) भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून ‘स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, ‘धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू’ अशा बातम्या येत. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते. 

ii) पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जनजागृती घडली. त्यामुळे १९८४ मध्ये ‘हुंडाबंदी सुधारणा कायदा’ करण्यात आला.

3) अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली

उत्तर :

कारण – i) संविधानाच्या १७ व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. 

ii) स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व देण्यात आले. या सर्व बाबींना अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायदयाने बंदी आणली.

4) संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत

उत्तर :

कारण – i) एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्यांक म्हणतात. 

ii) आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत. 

iii) या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा. म्हणून संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.

प्रश्न. 6. टिपा लिहा. 

1) चिपको आंदोलन 

उत्तर :

i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला ‘चिपको आंदोलन’ म्हणतात.

2) मानव अधिकार संरक्षण कायदा

उत्तर :

i) स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून १९९३ मध्ये हा कायदा करण्यात आला. 

ii) यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. त्याच धतींवर काही राज्यांमध्ये ‘राज्य मानवाधिकार आयोग’ स्थापन झाले. 

iii) या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. 

प्रश्न. 5. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. 

1) स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा

उत्तर :

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येईल.

अ) स्त्रीशक्तीचा आविष्कार : i) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. 

ii) समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. 

iii) ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. 

iv) या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला.

ब) चिपको आंदोलन : i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला ‘चिपको आंदोलन’ म्हणतात.

क) मद्यपानविरोधी आंदोलन : i) आंध्र प्रदेशात १९९२ मध्ये ‘मद्यपान विरोधी चळवळ’ सुरू झाली. 

ii) १९९२ मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले. 

iii) या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी अरक (स्थानिक दारू) विक्रीचे दुकान बंद पाडले. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला. 

iv) राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारूविक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले.

ड) इतर उदाहरणे : i) तसेच महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. 

ii) निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तिलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग वेठबिगारमुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली. 

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता नववी

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत  खूण करा. 

 

            क्षारता

 जास्त     मध्यम      कमी

 1) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ. 

 

 

 

 2) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य. 

 

 

 

 3) बहुतेक दिवस निरभ्र आकशा, लंबरूप सूर्यकिरणे. 

 

 

 

 4) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश

 

 

 

 5) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.  

 

 

 

 6) खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य

 

 

 

प्रश्न. 2. कारणे लिहा. 

अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

उत्तर :

कारण i) बाल्टिक हा भूवेष्टित समुद्र शीत हवामानाच्या प्रदेशात आहे. या समुद्रास प्रचंड प्रमाणात ध्रुवीय प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. 

ii) येथे बाष्पीभवन फार कमी होते. त्यामुळे बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते. 

आ) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

उत्तर :

कारण – i) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदाहरित वने, समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोऱ्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. म्हणून समुद्राच्या दक्षिण भागात क्षारता कमी आहे. 

ii) तर समुद्राच्या उत्तर भागात सहारा वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने क्षारांचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही. 

उत्तर :

कारण – i) समान अक्षवृत्तावर बरेच समुद्र आहेत. काही समुद्राला गोड्या पाण्याच्या नद्या येऊन मिळाल्याने त्या समुद्राची क्षारता कमी असते. 

ii) तर काही समुद्राला नदया येऊन मिळत नाही किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतात. त्यांची क्षारता जास्त असते. म्हणून समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

ई) वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उत्तर :

कारण – i) सागरजलाचे तापमान हे सर्वत्र सारखे नसते. सागरी पृष्ठभागावरील पाणी सूर्याच्या उष्णतेने अधिक तप्त असते. 

ii) समुद्रात सुमारे ३० ते ४० मीटर्स खोलीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचतात. 

iii) खोलीनुसार पाण्याचे तापमान घटत जाते. २०० मी. च्या पलीकडे सूर्यकिरणांचा थेट प्रभाव होत नाही. त्यामुळे या खोलीवर पाणी थंड असते. साधारणपणे १०० फॅदम खोलीवर -१२° से. ने तापमान घटलेले असते. खोलीनुसार तापमान घटण्याची क्रिया १८३० मीटरपर्यंतच होते. त्यानंतर मात्र सागरजलाचे तापमान सर्वत्र स्थिर आढळते. अशाप्रकारे वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. 

उ) भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. 

उत्तर :

कारण – i) अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नदयांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होते. तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते . 

ii) तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नदया मुबलक प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात. 

iii) बंगालच्या उपसागराची क्षारता हजारी २० तर अरबी समुद्राची क्षारता हजारी ३७ ते ३९ असते. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. 

ऊ) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

उत्तर :

कारण – i) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात पर्जन्यमान कमी असते व नदयांतून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. 

ii) या पट्ट्यांमध्ये बाळवंटी प्रदेश आहेत. त्यामुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर :

i) सागरजलाची क्षारता सर्व ठिकाणी सारखी नसते. स्थानपरत्वे त्यात कमी-अधिकपणा दिसून येतो. 

ii) कारण सागजलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदीनाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. 

iii) भूवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा, बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो.

आ) कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा. 

उत्तर :

कारण – i) कर्कवृत्त आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. 

ii) त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळ जवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते. 

इ) सागरजलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. 

उत्तर :

सागरजलाच्या तापमानाची भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. 

i) अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५° से., मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६° से. तर ध्रुवीय प्रदेशात २° से. पर्यंत असते. 

ii) याशिवाय सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचा ही परिणाम दिसून येतो. 

iii) सागरी प्रवाहाचा सुद्धा सागरजलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागरजलाचे पृष्ठीय तापमान वाढते.

ई) खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा. 

उत्तर :

i) सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात 

ii) परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. 

iii) ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४०° से. असते. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४° से. पर्यंतच कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. 

iv) विषुववृत्ताजवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो.

उ) क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर :

क्षारतेवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 

i) शुद्ध पाण्याचा पुरवठा – विषुववृत्तीय प्रदेशात उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असले तरी वर्षभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शुद्ध पाण्याचा रोज भरपूर पुरवठा होतो. याचा परिणाम होऊन सागर जलाच्या पाण्याची क्षारता ये सुमारे ३४% – ३५% पेक्षा कधीही जास्त नसते.

ii) बाष्पीभवनाचा वेग – कर्क आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळजवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते. 

iii) पाण्याचे मिश्रण – मोठमोठ्या नदया, हिमनदया, वितळणारे बर्फ इत्यादींमुळे जर शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात समुद्रास होत असेल तर त्याच्या पाण्याची क्षारता कमी होते. या विरुद्ध जर शुद्ध पाण्याचा पुरवठा कमी असेल आणि जवळपासच्या पाण्याचे मिश्रण सागरी पाण्यात होत नसेल तर क्षारतेचे प्रमाण जास्त असते.