महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

इयत्ता नववी राज्यशास्त्र महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ………..

अ)  राजकीय व्यवस्था

ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

क) सामाजिक व्यवस्था

ड) यांपैकी नाही

उत्तर :

आंतरराष्ट्रीय व्यवस्था

2. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ……………

अ) युद्ध टाळणे

ब) वसाहतींचे स्वातंत्र्य

क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था करणे

ड) नि:शस्त्रीकरण करणे

उत्तर :

युद्ध टाळणे

3. शीतयुद्ध …………… या घटनेमुळे संपले. 

अ) संयुक्त राष्ट्राची स्थापना

ब) सोव्हिएत युनियनचे विघटन

क) लष्करी संघटनांची

ड) क्यूबाचा

उत्तर :

सोव्हिएत युनियनचे विघटन

प्रश्न. 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण – पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला.

2. शीतयुद्धांमुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. 

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण – i) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोनमहासत्तांच्या गटात सामील झाले होते.

ii) राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. अर्थात शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले.

3. मिखाईल गोर्बोचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण – i) सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बोचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईक’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अंमलात आणली.

ii) या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. म्हणून मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

प्रश्न. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) शीतयुद्ध

उत्तर :

(i) दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले.

ii) या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता.

iii) अर्थात प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे याला ‘शीतयुद्ध’ असे म्हणतात.

iv) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती म्हणजे शीतयुद्ध होय.

v) अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत

युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उदयास आल्या होत्या. त्याच्यात असलेल्या तणावपूर्ण संबंधाला ‘शीतयुद्ध’ म्हटले जाते.

2) अलिप्ततावाद

उत्तर :

i) शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात.

ii) अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.

3) परस्परावलंबन

उत्तर :

i) कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी जगातले सर्व देश अवलंबून असतात. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात.

ii) राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. याला परस्परावलंबन म्हणतात.

iii) परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट आहे.

4) द्विध्रुवीकरण 

उत्तर :

i) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांशी अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय.

ii) द्विध्रुवीकरणामुळे शीतयुद्धाचा आवाका वाढला. तणावाचे क्षेत्र व्यापक झाले.

5) जागतिकीकरण

उत्तर :

i) शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यामुळे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले.

ii) जगभरातील लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात.

iii) विविध देशांत माहिती तंत्रज्ञान, भांडवल, लोक, बाजारपेठा आाणि वस्तू यांचा मुक्त संचार आणि देवाण-घेवाण म्हणजे जागतिकीकरण होय.

प्रश्न. 4. पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा. 

1) राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या ?

उत्तर :

i) जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकूमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. राष्ट्रसंघाने तेथे लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता तर दुसरे महायुद्ध टळले असते.

ii) अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. राष्ट्रसंघाने अमेरिकेला अणुबॉम्ब टाकण्यास प्रतिबंध केला असता तर युद्धास प्रतिबंध झाला असता आणि पर्यायाने राष्ट्रसंघाच्या मदतीने दुसरे महायुद्ध टळले असतं.

2) शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावाद आवश्यक होता. 

उत्तर :

i) शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावाद ही एक महत्त्वाची चळवळ होती.

ii) अलिप्ततावादाने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन मिळाले.

iii) मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. अलिप्ततावादामुळे शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली नसती. म्हणून शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावाद आवश्यक होता.

3) शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. 

उत्तर :

i) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता तर सोब्जिएत युनियनला समाजवादाचा प्रसार करायचा होता. यामध्ये सामान्य जनतेचे हाल होत होते. त्यांचा सर्वांगिण विकास होण्याऐवजी ते या दोन महासत्तांमध्ये पिचले जात होते.

ii) या दोन महासत्तांमुळे तणावाचे क्षेत्र व्यापक झाले होते. त्यामुळे तेथील लोक मूलभूत हक्कांपासून वंचीत राहिले.

 4) आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून कोणत्या देशांचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो ? 

उत्तर :

आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून साऊथ अरेबिया, चीन, फ्रान्स, जापान, रशिया, युनायटेंड किंगडम, जर्मनी, भारत या देशांचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो.

प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. 

 मुद्दे 

 पहिले महायुद्ध 

 दुसरे महायुद्ध

1) कालखंड 

 १९१४ ते १९१८

 १९३९ ते १९४५

2) सहभागी राष्ट्रे 

 मित्र राष्ट्रे – ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका.

मध्यगत राष्ट्रे – जर्मन, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया.

 मित्र राष्ट्रे – ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन अमेरिका.

अक्ष राष्ट्रे – जर्मनी, जपान, इटली.

3) परिणाम (राजकीय व आर्थिक) 

राजकीय परिणाम – जागतिक राजकारणात महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्कस्तान यांची साम्राज्ये नष्ट झाली.

आर्थिक परिणाम – जगातील अनेक राष्ट्रांनी आर्थिक स्थिती ढासळली युद्धकाळात शेती, उद्योगधंदे थंड झाले. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महागाई वाढली.

 राजकीय परिणाम – या महायुद्धात पराभव झाला म्हणून जर्मनी, इटली व जपान यांच्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. ती राज्ये विजयी होऊनही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे साम्राज्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यात अपयश आले.

आर्थिक परिणाम – मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाल्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली. युद्ध संपल्यावर सामान्य माणसाच्या जीवनात हालअपेष्टा कमी होण्याऐवजी वाढल्या. अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला.

4) युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना

राष्ट्रसंघ

नाटो, संयुक्त राष्ट्रसंघटना

2) शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ?

उत्तर :

१९४५ पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक गोष्टी / बाबी कारणीभू ठरल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

i) सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचेअर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.

ii) सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ‘ग्लासनोस्त’ (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

iii) पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.

iv) सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वांत मोठा देश होता.

3) शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले ?

उत्तर :

सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. या शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले.

i) जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.

ii) राष्ट्राराष्ट्रामधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार – कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला.

iii) सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधाना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखादया देशाला ‘शत्रुराष्ट्र’ म्हणून सबोधण्याऐवजी ‘स्पर्धक राष्ट्र’ ही संकल्पना पुढे आली.

iv) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.

v) पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

इयत्ता नववी राज्यशास्त्र सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

2. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

3. भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

4. संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

5. भारत व अन्य देश स्वाध्याय

6. आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे इयत्ता नववी

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय