सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2

सजीवातील जीवन प्रक्रिया स्वाध्याय
 

1. खालील तक्ता पूर्ण करा. 

 

 उत्तर :
2. रिकाम्या जागा भरा. 

अ. मानवी शुक्रपेशींची निर्मिती ……………. या अवयवात होते.

उत्तर : मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते.

आ. मानवामध्ये …………… हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

उत्तर : मानवामध्ये  Y  हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

इ. पुरुष व स्त्री जननसंस्थेमध्ये ……………. ही ग्रंथी समान असते.

उत्तर : पुरुष व स्त्री जननसंस्थेमध्ये पियुषिका ग्रंथी ही ग्रंथी समान असते.

ई. भ्रूणाचे रोपण ……………. या अवयवामध्ये होते.

उत्तर : भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते.

उ. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय …………… हे प्रजनन घडून येते.

उत्तर : भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते.

ऊ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन …………. प्रकारचे आहे.

उत्तर : शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडिभवन प्रकारचे आहे.

ए. परागकोषातील कोष्ठकांमध्ये …………. विभाजनाने परागकण तयार होतात.

उत्तर : परागकोषातील कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात.

4. थोडक्यात उत्तरे द्या. 

अ. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. 

उत्तर :

एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे पुढील प्रकारे आहे.

i) द्विविभाजन : द्विविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहेत.

बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकीपेशीतील काही पेशी यामध्ये या प्रकारचे प्रजनन घडते. या विभाजनात, जनक पेशीचे दोन समान भागांत विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते. अमिबामध्ये पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजेच साधे विभाजन होते. काही सजीवांमध्ये द्विविभाजन हे आडव्या किंवा उभ्या अक्षातून होते. उदा. पॅरामेशियमचे आडवे द्विविभाजन तर युग्लीनाचे उभे द्विविभाजन.

ii) बहुविभाजन : बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. या प्रकारचे विभाजन अमिबामध्ये घडते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपाद आत ओढून घेतो, गोलाकार बनतो व पेशीपटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, त्यास पुटी म्हणतात. पुटीमध्ये केंद्रकाचे विभाजन होते. केंद्रक विभाजनांच्या पाठोपाठ पेशीद्रव्यांचेही विभाजन होते व अनेक नवजात पेशींची निर्मिती होते. अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटून अनेक अमिबा पेशी बाहेर पडतात.

बहुविभाजन_प्रक्रिया
बहुविभाजन प्रक्रिया 

iii) कलिकायन : जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, त्यास कलिका म्हणतात. जनक पेशीच्या केंद्रकाचे विभाजन होते व दोन नवजात केंद्रक तयार होतात. एक नवजात केंद्रक कलिकेत प्रवेश करते. कलिकेचा आकार वाढतो. तो जनक पेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र वाढते. उदा. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते.

कलिकायन
कलिकायन

आ.  IVF ही संकल्पना स्पष्ट करा. 

उत्तर :

i) In Vitro Fertilization चे IVF हे संक्षिप्त रूप आहे.

ii) अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. परंतु आधुनिक वैदयकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते.

iii)  IVF म्हणजे काचनलिकेतील फलन होय. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते.

iv) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरुन अपत्यप्राप्ती करता येते.

काचनलिकेतील_फलन
काचनलिकेतील फलन 

 

इ. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल. 

उत्तर :

i) शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे.

ii) सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी,

iii) शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे.

iv) लैंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बिघडू शकते.

v) मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत.

vi) समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे.

ई. आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. 

उत्तर :

यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात.

i) आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. पुटीका ग्रंथी संप्रेरक, ल्युटीनायझींग संप्रेरक, इस्ट्रोजेन संप्रेरक व प्रोजेस्टेरॉन संप्रेरक ही चार संप्रेरके होत.

ii) पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकांपैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटीका ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक स्त्रवते.

iii) इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते.

iv) दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते.

v) पितपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात.

vi) अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते.

vii) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.

viii) अडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे पूर्णपणे थांबते.

ix) या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. या बरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव पाच दिवस सुरू राहतो. यालाच मासिक पाळी किंवा ऋतुस्त्राव म्हणतात.


आर्तवचक्र/ ऋतुचक्र

5. लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. 

उत्तर :

i) लैंगिक प्रजननात दोन जनक पेशींचा म्हणजे स्त्री युग्मक व पुंयुग्मकाचा समावेश होतो.

ii) या प्रक्रियेत दोन भिन्न युग्मकांच्या संयोगातून नवीन सजीवाची निर्मिती होते.

iii) त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. उदा. माता किंवा पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. जसे चेहऱ्याची ठेवण, वर्ण, केस, उंची तसेच काही विशिष्ट आनुवंशिक रोग इत्यादी.

6. नामनिर्दिशित आकृत्या काढा. 

अ.  मानवी पुरुष प्रजनन संस्था. 

मानवी पुरुष प्रजनन संस्था

आ. मानवी स्त्री प्रजनन संस्था. 

मानवी स्त्री प्रजनन संस्था

इ. आर्तव चक्र


आर्तवचक्र/ ऋतुचक्र

7. नावे द्या. 

अ. पुरूष प्रजनन संस्थेची संबंधित विविध संप्रेरके

उत्तर : i) पुटिका ग्रंथी संप्रेरक  ii) टेस्टोस्टेरॉन संप्रेरक

आ. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके. 

उत्तर : i) इस्ट्रोजेन संप्रेरक  ii) प्रोजेस्टेरॉन संप्रेरक  iii) पुटिका ग्रंथी संप्रेरक   iv) ल्युटीनायझींग

इ. जुळयांचे प्रकार 

उत्तर :  i) एकयुग्मजी जुळे  ii) द्वियुग्मजी जुळे

ई. कोणतेही दोन लैंगिक रोग

उत्तर : i) सायफिलीस  ii) गोनोऱ्हीया

8. ‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’ या विधानाची सत्यता/ असत्यतता सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

i) पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रांमुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजननसंस्था तयार होतात.

ii) पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्येही असते. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर X स्त्रीत्वासाठी.

iii) युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते म्हणजेच (44+XX किंवा 44+XY).

iv) या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच (n) राहते, म्हणजेच (22+X किंवा 22 + X ). शुक्रपेशी (22+X) किंवा (22+Y) या दोन प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी (22+X) या एकाच प्रकारच्या पेशी तयार होतात.

v) दांपत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते, तेव्हा पुरुषांकडून लिंगगुणसूत्रांपैकी  X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. पुढे फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे चुकीचे आहे.

9. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.

उत्तर :

वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन पुढील प्रक्रियेद्वारे पूर्ण होते.

1) खंडीभवन : i) खडीभवन हा अलैगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांत आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो.

खंडीभवन
खंडीभवन 

ii) उदा. पाणी व पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यावर स्पायरोगायची (शेवाळ) वाढ व विभाजन वेगाने होते. खंडीभवनामुळे स्पायरोगायराचे अनेक खंडांमध्ये विभाजन होते. पेशीय वाढ व गुणसूत्री विभाजनाने या प्रत्येक खंडाचे परिपूर्ण स्पायरोगायरात रूपांतर होते.

2) मुकुलायन : i) मुकुलायन प्रक्रियेत हायड्रासारख्या वनस्पती प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात.

ii) हायड्राची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्याच्या शरीरभित्तिकेवर गोलाकार फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास फुगवता तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात.

iii) या मुकूलाचे रूपांतर यथावकाश छोट्या हायड्रामध्ये  होते.

iv) नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर, देह गुहा व पचनगुहा, जनक

हायड्राच्या शरीरस्तर व गुहांशी सलग जोडलेले असतात.

v) नवजात हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते.

vi) जेव्हा नवजात हायड्राची स्वतःचे अस्तित्व टिकविण्याइतपत वाढ होते तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो. वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख

मुकुलायन
मुकुलायन

3) शाकीय प्रजनन : i) वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.

ii) उदा. बटाट्यात डोळ्यांपासून (मुकुलापासून) नवीन वनस्पतींची पानांच्या कडांवरील मुकुलांपासून निर्मिती होते तर रताळ्याच्या मुळांपासून नवीन रोपटी तयार होतात.

iii) शाकीय प्रजनन पद्धतीने निर्मित वनस्पती, प्रजनन प्रक्रियेत एकाच जनकाचा समावेश असल्याने मूळ जनक वनस्पतीसारख्याच असतात.

iv) शाकीय प्रजननाद्वारे निर्माण झालेल्या वनस्पती वेगाने वाढतात. बिजापासून निर्माण झालेल्या वनस्पतींपेक्षा या वनस्पतींना लवकर फुले व फळे येतात.

शाकीय_प्रजनन
शाकीय प्रजनन

10. भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा. 

उत्तर :

i) मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशीरा लग्न करणे, दीर्घकाळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थाचे सेवन करणे, अती मद्यपान इत्यादींमुळे सुद्धा मूल होत नाही.

ii) लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल हवे ही सामान्यपणे सर्व दांपत्यांची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणी ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो.

iii) वैचारिक मतभेद, भावनिक जुळवणूक न होणे अशा कारणांमुळे असमाधानी असलेली दांपत्य तसाच संसार रेटताना दिसतात. स्वाभिमानाची चुकीची संकल्पना, जुळवणूक करण्याची क्षमता नसणे. तसेच व्यक्तिमत्वाची जुळवणूक न होणे यामुळे संसारातील सुमधूर भाव हरपलेले दिसतात. सध्याच्या काळात कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली दिसते.

iv) नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वतःचे मूल हवे आहे. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस-उपवास, गंडे-दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्र विचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असतात. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात.

v) विज्ञान-तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवत मूल होणारच याची खात्री देते.

vi) अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही.

vii) पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशींतील विविध व्यंग इत्यादी अभाव, कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात.

viii) परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी इत्यादी तंत्रांच्या साहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते.

11. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आकृतीसह स्पष्ट करा. 

उत्तर :

i) फूल : हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

ii) स्त्रीकेसर : हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग फुलाच्या मध्यभागी असतो. स्त्रीकेसर हा भाग कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशयापासून बनतो.

iii) पुंकेसर : हा फुलाचा पुल्लिंगी भाग असतो. तो परागकोश व वृंत यापासून बनलेला असतो.

iv) स्त्रीकेसराचा लांबटभाग कुक्षीवृंत असतो व त्याच्या टोकाशी कुक्षी असते.

v) अंडाशय : हा फुगीर भाग स्त्रीकेसराच्या मुळाशी असतो. त्यात एक किंवा अनेक बिजांडे तयार होतात.

vi) परागकोश : परागकोश परागकणांची निर्मिती करतात व परागकण पुंयुग्मकांची निर्मिती करतात. वृंत हे परागकोशाचे देठ असते.

वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन तीन टप्प्यांमध्ये होते. 

i) परागण : परागण म्हणजे परागकोशातील परागकणांचे  स्त्रीकेसरातील होणारे स्थानांतरण. परागक्रिया जेव्हा एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते, तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणतात. या उलट जर एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडणाऱ्या परागण क्रियेस परपरागण म्हणतात.

ii) फलन : परागकण कुक्षीवर स्थिरावतो. त्यापासून परागनलिका तयार होऊन ती कुक्षीवृंतातून अंडाशयापर्यंत पोहोचते. प्रत्येक परागनलिकेत दोन पुंयुग्मक असतात व ते नलिकेमार्फत भ्रूणकोशातील अंडपेशीजवळ सोडले जातात. एका पुंयुग्मकाचा स्त्री युग्मकाशी (अंडपेशीशी) संयोग होऊन युग्मनज तयार होतो व दुसऱ्या पुंयुग्मकाचा द्वितीयक केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणपोष तयार होतो. यालाच द्विफलन असे म्हणतात. युग्मनज भ्रूणात विकसित होतो. भ्रूणपोष भ्रूणाचे पोषण करतो.

iii) बीजांकुरण : फलनानंतर युग्मनजाचे पुनर्वृत्तीय विभाजन होऊन बीजांडात भ्रूण तयार होतो. बीजांडाचे रूपांतर बीजात तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. अनुकूल परिस्थितीमध्ये बीजापासून नवीन रोपटे तयार होते व या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात.

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग एक स्वाध्याय 

 

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून विधानांचे स्पष्टीकरण लिहा.

अ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ………….. रेणू मिळतात.

उत्तर : एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात.

स्पष्टीकरण : एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात. ज्यात 2 रेणू ग्लुकोज-विघटन, 2 रेणू ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र व 34 रेणू इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमार्फत तयार होतात.

आ. ग्लायकोलासीयच्या शेवटी ………… चे रेणू मिळतात.

उत्तर : ग्लायकोलासीयच्या शेवटी 2 पायरूविक आम्लाचे रेणू मिळतात.

स्पष्टीकरण : 2 पायरूविक आम्लाचे (पायरूवेट) रेणू, 2 NADH चे रेणू, 2 ATP चे रेणू व पाण्याचे 2 रेणू तयार होतात.

इ. अर्धगुणसूत्री विभाजन भाग- I  च्या पूर्वावस्थेतील ………… या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

उत्तर : अर्धगुणसूत्री विभाजन भाग- I  च्या पूर्वावस्थेतील मध्यवस्था I या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

स्पष्टीकरण : अर्धसूत्री विभाजन भाग- I च्या पूर्वावस्थेतील मध्यावस्था I मध्ये सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण/जनुकीय पुन:संयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसुत्रे दोन संचामध्ये विभागली जाऊन दोन एकगुणी पेशी तयार होतात.

ई. सूत्री विभाजनाच्या ……………. अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

उत्तर :  सूत्री विभाजनाच्या मध्यावस्था अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

स्पष्टीकरण : मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसुत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसुत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात.

उ. पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ……………. च्या रेणूची आवश्यकता असते.

उत्तर : पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी लिपीड (Lipid) नावाच्या रेणूची आवश्यकता असते.

स्पष्टीकरण : लिपीड नावाचे रेणू हे मेदाम्लांपासून तयार केले जातात. जे पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी आवश्यक असते.

ऊ. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी …………. प्रकारचे श्वसन करतात.

उत्तर : आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनाॅक्सिश्वसन  प्रकारचे श्वसन करतात.

स्पष्टीकरण : व्यायाम करताना मांसपेशीच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी होते व तेथे विनाॅक्सिश्वसन होते. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते.

2. व्याख्या लिहा. 

अ. पोषण

उत्तर :

पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या क्रियेला पोषण म्हणतात.

आ . पोषकद्रव्ये

उत्तर :

अन्नामधील विविध घटकाला (कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे, क्षार/ खनिजे) ‘पोषकद्रव्ये’ म्हणतात.

इ. प्रथिने 

उत्तर :

अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला ‘प्रथिने’ म्हणतात.

उ. पेशीस्तरावरील श्वसन

उत्तर :

अन्नपदार्थामधून ऊर्जा मिळवण्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होण्याच्या प्रक्रियेला ‘पेशीस्तरावरील श्वसन’ म्हणतात.

ऊ. ऑक्सिश्वसन

उत्तर :

ऑक्सिजनच्या सानिध्यात पेशीऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ‘ऑक्सिश्वसन’ म्हणतात. यामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण (विघटन) होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात.

ए . ग्लायकोलायसीस (ग्लुकोज- विघटन) 

उत्तर :

पेशींमधील ग्लुकोजचे विकराच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने विघटन होऊन ऊर्जा व पायरूविक आम्ल मिळण्याच्या क्रियेला ग्लायकोलायसीस म्हणजेच ग्लुकोज विघटन म्हणतात.

3. फरक स्पष्ट करा. 

अ. ग्लोयकोलायसीस व क्रेब चक्र 

उत्तर :

 ग्लोयकोलायसीस

 क्रेब चक्र

 

i) ग्लायकोलासीसची प्रक्रिया पेशीद्रव्यात होते. 

ii) या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरूविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. 

iii) ग्लायकोलायसीसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनाॅक्सिश्वसन या दोन्हींमध्ये होते.  

iv) पेशीश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलासीस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरूवेटमध्ये होते. 

v) या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरूवेटच्या दोन रेणूंमध्ये होते. 

vi) ग्लायकोलासीसमध्ये ATP चे 2 रेणू वापरले जातात. 

vii) ग्लायकोलासीसमध्ये ATP चे 4 रेणू तयार होतात. 

viii) या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. 

 

i) क्रेब चक्र तंतुकणिकेत होत असते.  

ii) या प्रक्रियेत अँसेटिल-को-एन्झाइम-A  च्या रेणूतील अँसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. 

iii) क्रेब चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते. 

iv) क्रेब च्रक ही पेशीश्वसनातील दुसरी पायरी आहे. 

v) या प्रक्रियेत पायरूवेटचे रूपांतर CO2 आणि H2O यांत होते. 

vi) क्रेब चक्रात ATP चे रेणू वापरले जात नाहीत. 

vii) क्रेब चक्रात ATP चे 2 रेणू तयार होतात. 

viii) या प्रक्रियेत CO2 तयार होतो. 

आ. सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

उत्तर :

 

 सूत्री पेशीविभाजन 

 अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

 

i) सूत्री पेशी विभाजन गुणसुत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात.

ii) एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात.

iii) सूत्री पेशीविभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पच्श्रावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात.

iv) सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते.

v) सूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही.

vi) या प्रकारचे पेशीविभाजन वाढ आणि विकास यांसाठी आवश्यक असते.

vii) सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी अशा दोन्हींत होते.

i) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात गुणसुत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात.

ii) एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात.

iii) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात भाग I आणि भाग II अशा दोन प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था,मध्यावस्था, पच्श्रावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात.

iv) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात पूर्वावस्था जास्त काळाची असते.

v) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण होते.

vi) या प्रकारचे पेशीविभाजन युग्मके तयार  करण्यासाठी आवश्यक असते.

vii) अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही: केवळ मूल पेशीतच होते.

 
इ. फरक स्पष्ट करा ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन

उत्तर :

 

 ऑक्सिश्वसन

 विनॉक्सिश्वसन

1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते.

2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी होते.

3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. 

4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
5. ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते.
6. ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणू तयार होतात.

 

1. विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते.

2. विनॉक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते.

3. विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवट CO2 आणि C2H5OH निर्माण होते. 

4. विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
5. विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते.
6. विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणू तयार होतात.

4. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. 

उत्तर :

i) पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात.

ii) पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात.

iii) जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल, तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत.

iv) शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील, शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. 

उत्तर :

i)आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे २ पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते.

ii) तसेच काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये मदत होते.

iii) म्हणून पालेभाज्या फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते.
इ. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. 

उत्तर :

i) पेशी विभाजन हा सजीवांतील महत्त्वाचा गुणधर्म होय.

ii) पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजेच प्रजनन संस्था मुख्यत: पेशी विभाजनावर आधारित आहे.

iii) याबरोबरच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. उदा. अनेक पेशींची मिळून ऊती तयार होते व ऊतींपासून मानवी संस्था तयार होतात.

iv) शरीराच्या झीज भरून काढण्यासाठीही पेशींचे विभाजन साहाय्य करते.

v) या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म होय.

ई. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिश्वसन करतात. 

उत्तर :

i) काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनॉक्सिश्वसन करू लागतात.

ii) जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो.

उ. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. 

उत्तर :

i) क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते.

ii) अँसेटिल-को-एन्झाइम- A चे रेणू ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात.

iii) त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो.

iv) हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.

5.सविस्तर उत्तरे द्या. 

अ. ग्लायकोलायसीस प्रक्रिये विषयी सविस्तर लिहा

उत्तर :

i) ग्लायकोलायसीस ही एक सजीवांच्या चयापचायातील एक चक्र होय. ही एक जैवरासायनिक अभिक्रियेची शृंखला आहे.

ii) यामध्ये ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लायसिस म्हणजेच विघटन म्हणजेच ‘ग्लुकोजचे विघटन’ होय.

iii) पेशीश्वसनातील हा पहिला टप्पा सर्व सजीवांत सारखाच असतो.

iv) ही प्रक्रिया पेशी द्रव्यांत घडून येते यासाठी ऑक्सिजनची गरज नसते.

v) या प्रक्रियेत सहा कार्बनी ग्लुकोजचे रूपांतर तीन कार्बनी पायरुविक आम्ल (पायरुवेट) यामध्ये होते.

vi) कमीत कमी सहा विकर या प्रक्रियेत कार्यरत असतात.

vii) यातील पहिल्या आणि तिसऱ्या पायरीमध्ये ATP चे दोन रेणू तयार होतात.

viii) पुढे सहा-कार्बन ग्लुकोज रेणूचे रूपांतर मध्यंतरी उत्पादकात होते जे दोन तीन-कार्बन संयुगात विभागले जाते.

ix) प्रक्रियेच्या शेवटी काही रूपांतर होऊन पायरुविक आम्ल तयार होते.

x) ग्लायकोलायसिसच्या शेवटच्या पायरीमध्ये क्रियेच्या दरम्यान घडलेल्या रासायनिक अभिक्रियेपासून मिळालेल्या ऊर्जेचे 4ATP रेणू तयार होतात.

xi) म्हणूनच या प्रक्रियेत पूर्ण 4ATP रेणू तया होतात, ज्यामधील 2ATP रेणू प्रक्रिये दरम्यान वापरले जातात, ज्यामुळे शेवटी 2ATP रेणू मिळतात. अशाप्रकारे ग्लुकोजचे विघटन घडून येते.

आ. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा

उत्तर :

सूत्रीविभाजन – (i) व्याख्या : सूत्रीविभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय. ज्यामध्ये एक पेशी दोन सारख्या जन्यपेशीमध्ये विभागली जाते. ज्यांचे गुणसूत्र व केंद्रक जनक पेशीसारखेच असते.

ii) सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी. सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते.

iii) कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात.

(iv) सूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

अ) प्रकलविभाजन / केंद्रकाचे विभाजन

आ) परिकलविभाजन / जीवद्रव्याचे विभाजन

अ) प्रकलविभाजन – प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते.

 पूर्वावस्था

• प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते.

• त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते.

• ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते.

• केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते.

● मध्यावस्था

• मध्यावस्थेत केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात.

• सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात.

• दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात.

● पश्चावस्था

• पश्चावस्थेत त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते.

• वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे म्हणतात. यावेळी ही ओढलेली गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात.

• अशातऱ्हेने गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.

● अंत्यावस्था

• अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्र आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात.

• दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होतो.

• अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके तयार होतात जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात.

• तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.

आ) परीकलविभाजन

• परीकलविभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी (जन्यपेशी) तयार होतात.

• या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात.

• वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी  एक पेशीपटल तयार होऊन परीकलविभाजन होते.

इ. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.

उत्तर :

अर्धगुणसूत्री विभाजन

• व्याख्या – अर्धगुणसूत्री विभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय. ज्यामध्ये गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते.

• याप्रकारचे विभाजन पुंयुग्मक व स्त्रीयुग्मक तयार होण्यासाठी आवश्यक असते.

• अर्धगुणसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

अ) अर्धसूत्री विभाजन भाग I

ब) अर्धसूत्री विभाजन भाग II

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या भागातील पूर्वावस्थेत पाच अवस्थांचा समावेश होतो.

i) लिप्टोटीन / लेप्टोटीन

• या अवस्थेत केंद्रक लांब व पातळ गुणसूत्रांनी भरलेले आढळते.

• या गुणसूत्रांवर कणिका आढळून येतात ज्याला गुणसूत्रकणिका म्हणतात.

ii) जाइगोटीन

• या अवस्थेत गुणसूत्रांचे युग्मन होते.

• ही क्रिया सारख्या गुणसूत्रांमध्ये होते.

• या प्रक्रियेत समजातीय गुणसूत्रांमध्ये (सिनॅप्ससिस) जोडी होते. याला ‘जाइगोनेमा’ सुद्धा म्हणतात.

• या जोडींना बाइवेलेंट वा चतुष्क सधा म्हणतात

• हे समजातीय गुणसूत्र अर्धगुणसूत्री नसतात.

• प्रत्येक चतुष्कात चार क्रोमेटिड्स असतात.

iii) पैकिटिन

• या अवस्थेत गुणसूत्रांची युग्मन प्रक्रिया पूर्ण होते. गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. समजात

• जनुकीय गुणसूत्रांमध्ये विचरण झाल्यामुळे समजातीय गुणसूत्रांमध्ये आनुवंशिक सामग्रीचे वहन होते.

iv) डिप्लोटिन

• या अवस्थेत समजातीय गुणसूत्रे वेगवेगळे होऊन x आकार घेताना दिसतात. ज्यांना काइज्मेटा म्हणतात.

• या प्रक्रियेला सीमान्तीकरण किंवा उपान्तीभवन सुद्धा म्हणतात.

v) डायकिनिसिस

• या अवस्थेमध्ये केंद्रके व केंद्रकावरील आवरण अदृश्य होते. या स्पींडल तंतू तयार होतात.

•या अवस्थेत पश्चावस्थेसाठी गुणसूत्रांची संख्या कमी होते.

ई. शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात

उत्तर :

i) मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात.

ii) पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था याबरोबरच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात.

iii) या सर्व संस्था एकमेकांशी सहयोग करून शरीराची वाढ व विकास घडवून आणतात.

iv) पचनसंस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाचे पचन करणे होय. अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. शरीराला आवश्यक अशा पदार्थाचे रक्ताद्वारे शोषण केल्या जाते. ज्यातून सर्व शरीरभर पोषकद्रव्ये पुरविली जातात.

v) श्वसनसंस्थेमार्फत ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. शरीरात ऊर्जानिर्मिती करून ऑक्सिजनची पेशीमध्ये निर्मिती होते. या रक्तातील Hb द्वारे ऑक्सिजन शरीरभर पोहचवले जाऊन तेथे श्वसन केल्या जाते. अनेक स्नायूंचा विकास घडून येतो.

vi)रक्ताभिसरण संस्थेमुळे रक्त शरीरभर पोहचवले जाते. ज्याद्वारे शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो व ऊर्जानिर्मिती होते. शरीरातील घाण उत्सर्जन संस्थेमार्फत बाहेर टाकली जाते. उत्सर्जनसंस्था शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रित ठेवते.

vii) नियंत्रण संस्था सर्व क्रियांचा समतोल व समन्वय साधण्याबरोबरच विविध संप्रेरके व विकर स्त्रवते जी शरीराच्या वाढ व विकासासाठी अत्यावश्यक आहे.

viii) अशाप्रकारे मानवी जीवनप्रक्रिया शरीराच्या वाढ व निर्मितीसाठी उपयोगी ठरतात.

उ. क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा

उत्तर :

i) क्रेब चक्र किंवा साइट्रिक आम्ल चक्र किंवा ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही ऑक्सिश्वसन करणाऱ्या जीवांमार्फत घडवून येणारी जैवरासायनिक श्रृंखला होय.

ii) अन्नातील कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्यापासून तयार होणाऱ्या अँसेटील-को-एन्झाइम A चे ऑक्सिडीकरण होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा निर्माण होते.

iii) हा श्वसनाचा दुसरा टप्पा होय, जो ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो.

iv) यास ऑक्सिश्वसन असेही म्हणतात. ही प्रक्रिया तंतुकणिकामध्ये घडते.

v) या प्रक्रियेत ग्लायकोलायसिसपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त होते.

vi) क्रेबच्या श्रृंखलेत 36 ATP तयार होतात.

vii) हे या चक्रात अँसिटेट व पाणी (अँसेटील-को एन्झाईम -A च्या स्वरूपातील) वापरण्यात येते, NAD चे NADA मध्ये रूपांतर होते व कार्बन डायऑक्साईड वायू उत्पादन केल्या जातो. अशाप्रकारे क्रेबची श्रृंखला घडून येते.

6. कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया कशी होते ?

खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. 

उत्तर :

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 प्रश्न उत्तरे

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 प्रश्न उत्तरे

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 प्रश्न उत्तरे

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 प्रश्न उत्तरे

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय