उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी 

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) १९४८ मध्ये ………………… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. 

अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा

ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

क) रोजगार निर्मिती व्हावी

ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी

उत्तर :

१९४८ मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

2) भारतातील …………………. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते. 

अ) ताग

ब) वाहन

क) सिमेंट

ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर :

भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

3) वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम ………………. हे आहे. 

अ) कापड उत्पादन करणे

ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे

क) कापड निर्यात करणे

ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे

उत्तर :

वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.

4) सायकल उत्पादनात ……………… हे भारतातील प्रमुख शहर आहे. 

अ) मुंबई

ब) लुधियाना

क) कोचीन

ड) कोलकाता

उत्तर :

सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ – औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे उपलब्ध कर्ज करून देणे

2) औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे

3) वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

4) खादी फ ग्रामोद्योग आयोग – ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणासचालना देणे

उत्तर :

चुकीची जोडी : वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

प्रश्न. 2. अ) दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा. 

चौकट पूर्ण करा. 

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

उत्तर :

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषध.

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

 चहा, कॉफी मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे

ब) टीपा लिहा. 

1) भारताची आयात-निर्यात

उत्तर :

i) १९५१ मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयतीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

ii) भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉपी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

2) भारताचे अंतर्गत व्यापार 

उत्तर :

i) एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावर होतो.

ii) भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्ती लोकसंख्या, या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो.

iii) भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो.

iv) मुंबई, कोलकता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची बंदरे आहेत.

v) अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

उत्तर :

कारण – i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

2) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

उत्तर :

कारण – i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे.

ii) तसेच भारतातील उदयोगधंदयाच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते

उत्तर :

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते.

i) ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

ii) पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.

iii) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशीचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

iv) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते.

v) उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

2) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो

उत्तर :

i) भारतात देशा-परदेशांतील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

ii) पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

iii) पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमांतून लोकांना रोजगार निर्माण होतो.

3) भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात

उत्तर :

भारतात वनसंपत्तीर वर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र कापड, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणा कच्चा माल हे व्यवसाय चालतात.