प्रश्न |
तारे लुकलुकतात, पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत. |
उत्तर
|
i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात. ii) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदूस्रोत नसून बिंदूस्रोतांचा समूह असतो. परिणामी, वातावरण स्थिर नसले तरी, ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. |