सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय इयत्ता नववी

सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान

1. योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा. 

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ

3) मूळ संस्थेची होणारी वाढ

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ

अ) गुरुत्वानुवर्ती हालचाल

ब) रसायन-अनुवर्ती हालचाल

क) प्रकाशानुवर्ती हालचाल

ड) वृद्धी असंलग्न हालचाल

इ) जलानुवर्ती हालचाल

उत्तर :

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ

3) मूळ संस्थेची होणारी वाढ

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ

ब) रसायन-अनुवर्ती हालचाल

क) प्रकाशानुवर्ती हालचाल

अ) गुरुत्वानुवर्ती हालचाल

इ) जलानुवर्ती हालचाल

स्पष्टीकरण – 

1) बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ – रसायन – अनुवर्ती हालचाल – विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन- अनुवर्तन म्हणतात.

2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ – प्रकाशानुवर्ती हालचाल – कोणत्याही वनस्पतीची प्ररोध संस्था प्रकाश उद्दिपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते.

3) मूळ संस्थेची होणारी वाढ – गुरुत्वानुवर्ती हालचाल – वनस्पतींची मुळे गुरुत्वाकर्षण या उद्दिपनांला प्रतिसाद देते त्यांची हालचाल गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होते. म्हणून मूळ संस्थेची होणारी वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे.

4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ – जलानुवर्ती हालचाल – वनस्पतींच्या मुळांची हालचाल ही पाण्याच्या दिशेने होते. म्हणून वनस्पतीची मुळे पाण्याच्या दिशेने वाढतात त्यांच्या या हालचालीला जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात.

2. परिच्छेद पूर्ण करा. 

शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती ……………. पेशीद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील ………… च्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती …………… कडे व तेथून …………. च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसुक्ष्म पोकळीतून म्हणजेच ………… मधून जातात. अशा प्रकारे …………. चे शरीरात वहन होते आणि आवेग ………… कडून ………… कडे पोहोचवले जाऊन …………….. क्रिया पूर्ण होते.

( चेतापेशी, स्नायूपेशी, आवेग, वृक्षिका, अक्षतंतू, संपर्कस्थान, प्रतिक्षिप्त, पेशीकाया) 

उत्तर :

शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती चेतापेशी पेशीद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील वृक्षिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसुक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानमधून जातात. अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते.

3. टिपा लिहा. 

मूलदाब, बाष्पोच्छ्वास, चेतापेशी, मानवी मेंदू, प्रतिक्षिप्त क्रिया. 

अ. मूलदाब

उत्तर :

i) मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात. यामुळे या पेशी ताठर होतात. त्यांमुळे त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब असे म्हणतात.

ii) या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात.

iii) या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो. जो सातत्याने पुढे ढकलला जातो.

iv) मूलदाब हा झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो.

v) मूलदाबाच्या परिणामामुळे पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य होते.

आ. बाष्पोच्छ्वास

उत्तर :

i) वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परूपाने पाणी बाहेर टाकतात.

ii) पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात.

iii) पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते.

iv) बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते.

इ. चेतापेशी

उत्तर :

i) शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात.

ii) चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत.

iii) मानवी शरीरातील आकाराने सर्वांत मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी काही मीटरपर्यंत भरते चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते.

iv) चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेता बनतात.

ई. मानवी मेंदू

उत्तर :

i) मेंदू आपल्याला विचार करायला लावतो व आपण आपल्या विचारानुसारा कृती करतो. विविध माहिती व कृती यांच्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यास कारणीभूत असलेली विविध केंद्रे सामावलेली एक जटील संरचना म्हणजे मेंदू होय.

ii) प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो.

iii) आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.

मेंदूचे विविध भाग व कार्ये

i) प्रमस्तिष्क (Cerebrum) – ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मानवी एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयका क्रिया करणे हे कार्ये प्रमस्तिक करते.

ii) अनुमस्तिष्क (Cerebellum) – ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे. शरीराचा तोल सांभाळणे हे कार्ये अनुमस्तिष्क करते.

iii) मस्तिष्कपुष्छ (Medulla-oblongata) – हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण.

iv) मेरुरज्जू (Spinal cord) – त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे. प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक  केंद्र म्हणून कार्य करतो.

उ. प्रतिक्षिप्त क्रिया

उत्तर :

i) पर्यावरणातील एखादया घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय.

ii) आपण या घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्यप्रकारे राखला जातो.

iii) जरी संकेत (संदेश) मेंदूपर्यंत पोहोचत असेल तरी प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग हा मेरूरज्जूमध्येच तयार होतो.

iv) मेंदूची विचार करण्याची प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळेच कदाचीत प्राण्यांमध्ये प्रतिक्षिप्त क्रियेचे मार्ग विकसित झाले असावेत.

v) निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये विचार करण्यासाठी आवश्यक असलेले चेतापेशींचे जटील जाळे नसते. म्हणून विचार प्रक्रियेचा अभाव असताना उत्तमरित्या कार्य करण्यासाठीच प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग विकसित झाले. परंतु चेतांचे जाळे असतानासुद्धा प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग हेच त्वरित प्रतिसाद देण्यास जास्त कार्यक्षम ठरतात.

4. खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा. 

अ. पियूषिका

उत्तर :

संप्रेरक – पीयूषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्त्राव तयार करणे.

कार्ये – पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करणे.

आ. अवटु

उत्तर :

संप्रेरक – थायरॉक्झीन, कॅल्सिटोनीन

कार्ये – i) शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.

ii) कॅल्शियमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.

इ. अधिवृक्क

उत्तर :

संप्रेरक – अँड्रेनॅलिन व नॉरअँड्रेनॅलिन, कॉर्टिकोक्स्टेरॉइड

कार्ये – i) आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे.

ii) ह्रदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.

iii) Na, K चे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.

ई. यौवनलोपी

उत्तर :

संप्रेरक – थायमोसीन

कार्ये – प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.

उ. वृषणग्रंथी

उत्तर :

संप्रेरक – टेस्टेस्टेरॉन

कार्ये – पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे.

ऊ. अंडशय 

उत्तर :

संप्रेरक – इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन

कार्ये – i) इस्ट्रोजन कार्य – स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंत: स्तराची वाढ, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे.

ii) प्रोजेस्टेरॉन – गर्भाशयाच्या अंत:स्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे.

5. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. 

अ. मानवी अंतस्त्रावी ग्रंथी

उत्तर :

आ. मानवी मेंदू

उत्तर :

इ. नेफ्रॉन

उत्तर :

ई. चेतापेशी

उत्तर :

उ. मानवी उत्सर्जन संस्था

उत्तर :

6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा. 

उत्तर :

i) आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थामार्फत समन्वय व नियंत्रण केले जाते, अंत:स्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हटले जाते.

ii) या ग्रंथीकडे त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होतात ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात.

iii) या अंतस्त्रावि ग्रंथी शरीरामध्ये जरी ठरावीक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.

iv) अंतस्त्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य व दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.

संप्रेरकाची नावे व त्यांची कार्ये – 

 संप्रेरके                        कार्य

1) पॅराथाॅर्मोन – शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या चयापचाचे नियंत्रण करणे.

2) थायमोसीन – प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.

3) थायरॉक्झीन – शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.

4) कॅल्सिटोनीन – कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.

आ. मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

 मानवी उत्सर्जन 

वनस्पती उत्सर्जन  

 

i) मानवी उत्सर्जन क्रिया ही कठीण असते. 

ii) मानवातील उत्सर्जन क्रिया करण्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते. 

iii) मानवी शरीरात रक्ताची गाळण क्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकला जातो. 

iv) मानवी उत्सर्जित पदार्थ म्हणजे युरिया, अमोनिया हे असतात. 

i) वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही सोपी असते. 

ii) वनस्पतींमध्ये  टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. 

iii) वनस्पतींमध्ये विसरण क्रियेद्वारे वायूरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. 

iv) वनस्पती उत्सर्जित पदार्थ म्हणजे राळ, डिंक यांसारखे पदार्थ असतात.

इ. वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या. 

उत्तर :

वनस्पतींमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते.

i) बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय.

ii) कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणतात. उदा. प्रकाशाच्या दिशेने वळलेले रोप.

iii) वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दिपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल म्हणतात.

iv) विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन- अनुवर्तन म्हणतात. उदा. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ.

7. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या. 

अ. समन्वय म्हणजे काय ?

उत्तर :

कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये असणारे नियमन म्हणजेच समन्वय होय. उदा. समन्वय अभावामुळे कधी कधी जेवण करत असतांना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येते.

आ. मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते ?

उत्तर :

i) मानवी उत्सर्जन क्रिया उत्सर्जन संस्थेमार्फत चालते.

ii) मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय, मूत्रोत्सर्जक लिकाचा समावेश होतो.

iii) वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते.

iv) मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव आहे.

इ. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते ?

उत्तर :

वनस्पती उत्सर्जन क्रियेत फुले, फळे तसेच राळ, डिंक असे उपयुक्त पदार्थ बाहेर टाकतात. हे सगळे पदार्थ मानवी जीवनात उपयुक्त आहेत. तसेच रबराच्या चिकांपासून रबर बनतो. रबरापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात.

ई. वनस्पतींमधील परिवहन कसे होते ?

उत्तर :

i) वनस्पतींमधील परिवहन हे विशिष्ट प्रकारच्या ऊती करतात. जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात. वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात.

ii) वनस्पतींचे परिवहन हे मूलदाब आणि बाष्पोच्छ्वास या प्रक्रियांमार्फत होते.