भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय इयत्ता नववी

इतिहास भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

प्रश्न. 1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री …………………… होते. 

अ) राजीव गांधी

ब) श्रीमती इंदिरा गांधी

क) एच. डी. देवेगौडा

ड) पी. व्ही. नरसिंहराव

उत्तर :

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.

2) भारतीय हरितक्रांतीचे जनक ………………. होत. 

अ) डॉ. वर्गीस कुरीयन

ब) डॉ. होमी भाभा

क) डॉ. एम. एस. स्वामीनाथन

ड) डॉ. नॉमेन बोरलॉग

उत्तर :

भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन होत.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) इंदिरा गांधी – आणीबाणी

2) राजीव गांधी – विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा

3) पी. व्ही. नरसिंहराव – आर्थिक सुधारणा

4) चंद्रशेखर – मंडल आयोग

उत्तर :

चुकीची जोडी  :  चंद्रशेखर – मंडल आयोग

प्रश्न. 2. अ) पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रमे तक्ता तयार करा. 

उत्तर :

 प्रधानमंत्री

 त्यांचा कालावधी

 १) पंडित जवाहर नेहरू

१९४७ – १९६४

 २) श्री. गुलजारीलाल नंदा

(मे – जून १९६४)

 ३) श्री. लालबहादूर शास्त्री

१९६४ – १९६६

 ४) श्रीमती इंदिरा गांधी

१९६६ – १९७७

 ५) श्री. मोरारजी देसाई

१९७७ – १९७९

 ६) श्री. चरणसिंग

१९७९ – १९८०

 ७) श्रीमती इंदिरा गांधी

१९८० – १९८४

 ८) श्री राजीव गांधी

१९८४ – १९८९

 ९) श्री. विश्वनाथ प्रतापसिंग

१९८९ – १९९०

 १०) श्री. चंद्रशेखर

१९९० – १९९१

 ११) श्री. पी. व्ही. नरसिंहराव

१९९१ – १९९६

 १२) श्री. अटलबिहारी वाजपेयी

१९९६ – (१ महिना)

 १३) श्री. एच. डी. देवेगौडा

१९९६ – १९९७

 १४) श्री. इंद्रकुमार गुजराल

१९९७ – १९९८

 १५) श्री. अटलबिहारी वाजपेयी

१९९८ – २००४

 १६) डॉ. मनमोहनसिंग

२००४ – २०१४

 १७) श्री. नरेंद्र मोदी

२०१४ पासून

ब) टिपा लिहा. 

1) जागतिकीकरण

उत्तर :

i) विश्वात एककेंद्रिय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औदयोगिकीकरण वाढविणे आणि आयात व निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिती निर्माण करणे याला जागतिकीकरण असे म्हणतात.

ii) डॉ. दीपक नायर यांच्या मते, ‘राष्ट्रराज्यांच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय.’

iii) जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधनसामग्री आणि भांडवलाचे सुलभ परिचलन (देवाणघेवाण) निर्माण करणे होय. – श्रवणकुमारसिंग

iv) माल्कन आदिशेष्य यांच्या मते, ‘जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असताना तिला मिळालेले जागतिक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होय.’

2) धवलक्रांती

उत्तर :

i) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले यालाच ‘धवलक्रांती’ असे म्हणतात.

ii) धवलक्रांती ‘ऑपरेशन फ्लड’ या नावाने ओळखली जाते. ऑपरेशन फ्लड ही भारतातील योजना आहे. ज्याद्वारे भारतातील दुग्धउत्पादनातील कमतरता दूर केली जाऊ शकते.

iii) जगातील कमी दुग्धोत्पादक म्हणून ओळखला जाणारा भारत देश आज धवलक्रांतीमुळे जगातील सर्वांत मोठा दुग्धोत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

प्रश्न. 3. अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले

उत्तर :

कारण – i) अनेक विरोधी पक्षांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली.

ii) या नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला.

iii) त्यावेळी मोराराजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष होते व ते प्रधानमंत्री झाले. या पक्षातील आपापसातील मतभेद अधिक वाढले. त्यामुळे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.

2) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले

उत्तर :

कारण – i) १९८० च्या दशकात शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.

ii) या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता.

iii) १९८४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी त्या मंदिरात लष्कर पाठवावे लागले.

3) भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला

उत्तर :

कारण – i) भारताच्या स्वातंत्र्यापासूनच अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत.

ii) भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते.

iii) नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.

ब) पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले

उत्तर :

i) १९९१ च्या सुमारास सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले.

ii) त्यानंतर भारतात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.

iii) याच काळात अयोध्या येथील रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. अशाप्रकारे जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.

2) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती

उत्तर :

अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. 

 भारतापुढील आव्हाने

 बलस्थाने

 उदा., भारत – पाकिस्तान युद्ध

विविधतेतही एकता

 ……………………………

 …………………………

 ……………………………..

 अण्वस्त्र सज्जता

 फुटीरतावाद

…………………………….

उत्तर :

 भारतापुढील आव्हाने

 बलस्थाने

 उदा., भारत – पाकिस्तान युद्ध

विविधतेतही एकता

 जातीयवाद

 सर्वधर्म समभाव

 दहशतवाद

 अण्वस्त्र सज्जता

 फुटीरतावाद

राष्ट्रीय ऐक्य

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय