उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?
उत्तर :
‘उपयुक्तता’ हा उपयोजित कलांचा मुख्य हेतू असतो. त्या दृष्टीने उपयोजित कलाक्षेत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो –
i) औद्योगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी.
ii) मुद्रणक्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या निर्मितीसाठी लागणारे तज्ज्ञ तसेच संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ.
iii) भेटकार्ड, आमंत्रणपत्रिका, भेटवस्तू तसेच घरसजावटीच्या वस्तू तयार करणे.
iv) दागदागिने, मौल्यवान वस्तू, नक्षीची भांडी, कापड, काचेच्या वस्तू यांची निर्मिती.
इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा.
1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा