प्रश्न |
टिपा लिहा कला |
उत्तर |
i) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला ‘कला’ असे म्हणतात. ii) ‘कला’ ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. iii) ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृतहोते. iv) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात. |
इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा.
1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा