भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

उत्तर :

मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्यांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे – 

i) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘मुस्लीम स्थापत्यशैली’ असे म्हणतात. 

ii) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (240 फूट) आहे. 

iii) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. 

iv) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. 

v) फतेहपूर-सिक्री येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. 

vi) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन       

Leave a comment