लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

उत्तर :

अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले. 

i) गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकरीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात. 

ii) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. 

iii) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. 

iv) नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. 

v) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली. 

vi) वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 

Leave a comment