गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा
उत्तर :
i) इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींचा प्रभाव वाढू लागला.
ii) इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारी नंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेच्या भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला ‘गांधार शिल्पशैली’ असे म्हणतात.
iii) हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात.
iv) वायव्य सरहद्द प्रांत, पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत. गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यांमुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला.
इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा.
1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा