प्रश्न |
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. |
उत्तर
|
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते – i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. |