प्रश्न |
थंडीच्या दिवसांमध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो. |
उत्तर
|
i) थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसांत वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखालीही जाते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4°C च्या खाली गेले असता, ते प्रसरण पावते व त्याचे बर्फ बनले तरी त्याचेही आकारमान वाढते. ii) अशा परिस्थितीत नळातून वाहणाऱ्या पाण्याचे व त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बरेच वाढल्याने त्याचा दाब नळावर पडतो व त्यामुळे नळ फुटण्याचा संभव असतो
|