प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो

प्रश्न

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो. 

किंवा 

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो. 

उत्तर

 

 

i) सूर्याकडून आलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत गेले असता सूर्य दिसतो. पृथ्वीभोवती सुमारे 300km जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात त्यांचे अपवर्तन होते. प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. 

ii) अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो. म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणांस क्षितिजावर दिसतो.

Leave a comment