आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय इयत्ता दहावी



 

1. खालील आकृती पूर्ण करा. 

उत्तर :

2. पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

अ. मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. 

उत्तर :

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल.

i) सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली असावी.

ii) त्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले.

iii) सुरुवातीचे एपसारखे (एप-कपि) प्राणी कालांतराने दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले.

iv) कालांतराने मानवी मेंदूचा आकार मोठा होत गेला. त्यांच्या हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले.

आ. सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/ जातिउद्भव होतो.

उत्तर :

i) प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे.

ii) नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास ‘जाती’ असे म्हणतात.

iii) प्रत्येक जाती, विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढत असून त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, समागमकाळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात.

iv) परंतु एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. त्यामुळेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.

इ. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. 

उत्तर :

i) पृथ्वीच्या गर्भात पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात.

ii) या जीवांचे अवशेष व उसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात.

iii) या जीवाश्मावरून कालनिश्चिती करता येते. त्यावरून सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते.

iv) तसेच कार्बनी वयमापन पद्धतीमुळे पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी उपयोग होतो. म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

ई. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात. 

उत्तर :

i) पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते.

ii) मासा, सॅलेमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य या प्राण्यांचे भ्रूण त्यांच्या प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. म्हणून पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.

3. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. 

(जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ)

अ. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ………………… सिद्धांतामुळे लक्षात आला.

उत्तर : अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला.

आ. प्रथिनांची निर्मिती ……………… मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

उत्तर :  प्रथिनांची निर्मिती जनुकां मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

इ. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे ……………… म्हणतात.

उत्तर : DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात.

ई. उत्क्रांती म्हणजेच ……………. होय.

उत्तर : उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय.

उ. मानवी शरीरात आढळणारे ………………. हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

उत्तर : मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

4. प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. 

अ. लॅमार्कवाद

उत्तर :

i) उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो. असा सिद्धांत जीन बाप्टीस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्यांनी याला इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले.

ii) लॅमार्क यांनी असे स्पष्ट केले की, पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले, तसेच शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. ही उदाहरणे ‘मिळविलेली वैशिष्ट्ये’ अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद म्हणतात

iii) लॅमार्कवाद या सिद्धांतात लॅमार्क यांनी असे सुचवले की, प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात.

आ. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. 

उत्तर :

i) चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून ‘सक्षम ते जगतील’ असे मत मांडले.

ii) याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो.

iii) सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत.

iv) जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्टयांसकट नवीन प्रजाती तयार करतात.

v) हा सिद्धांत ‘ओरिजिन ऑफ स्पिसीज’ (Origin of Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.

इ.  भ्रूणविज्ञान

उत्तर :

i) भ्रूणविज्ञान भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो.

ii) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्येच ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो.

ई ) उत्क्रांती 

उत्तर :

i) उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते.

ii) भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय.

iii) नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखादया वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती.

iv) सजिवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्वअंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते ही संघटनात्मक उत्क्रांती आहे.

उ ) जोडणारे दुवे 

उत्तर :

i) काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे’ म्हणतात.

ii) हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात.

iii) उदा. पेरीपॅटस् या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचम व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे अँनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधीपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

iv) डकबिल प्लॅटीपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि त्याच्या शरीरावरील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यांसारखी आहेत.

v) ‘लंगफिश’ हा जरी मत्स्य आहे तरी तो फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात.

5. आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा.

उत्तर

एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस आनुवंशिकता म्हणतात. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी, कबुतरांची पिल्ले कबुतरांसारखी व मानवाची संतती मानवासारखीच असते.

आनुवंशिक बदल या प्रकारे घडतात – एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होताना त्यांच्यात लैंगिक प्रजनन झाल्यास पेशीविभाजनाच्या वेळी त्याच्या गुणसूत्रामध्ये (DNA) बदल होतो. त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत, केशरचना, डोळे यांचे रंग यामध्ये फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे अलैंगिक प्रजननात वातावरणीय गोष्टींचा परिणाम सजीवांवर होऊन त्यांच्यात नैसर्गिकरित्या आनुवंशिक बदल घडून येतात. उदा. जिराफची मान. आनुवंशिक बदल हे नैसर्गिक निवडीने होणारी प्रक्रिया होय.

6. अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी उपयुक्त आहेत हे लिहा.

उत्तर

सजीवांमधील हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात.

मानवी शरीरातील अवशेषांगाची नावे – माकडहाड, आंत्रपुच्छ, अक्कलदाढा, अंगावरील केस, कानांचे स्नायू.

अवशेषांग इतर प्राण्यासाठी उपयुक्त – i) मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.

ii) मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.

7. पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. 

अ. उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात ?

उत्तर :

आनुवंशिक गुणधर्म आई-वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे आनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधमांमुळे सजीवांत परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळुवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस आनुवंशिक बदलाचेच इंधन असते.

आ. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. 

उत्तर

गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे.

i) प्रत्येक m-RNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम t-RNA करतो. त्याकरिता m-RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम  असलेला अँटीकोडॉन t-RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात.

ii) t-RNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम r-RNA करतो. या दरम्यान रायबोझोम m RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो, या क्रियेस स्थानांतरण म्हणतात.

iii) प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात.

इ. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत ?

उत्तर

उत्क्रांतीचा सिद्धांत – सजिवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या, यापैकी ‘सजिवांची उत्क्रांती’ अथवा ‘सजिवांचा क्रमविकास’ हा सिद्धांत सर्वमान्य आहे.

i) उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला कालांतराने या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली.

ii) या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने व हळूहळू बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले.

iii) या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे.

iv) सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगानी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. म्हणूनच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात.

I) बाह्यरूपीय पुरावे – प्राण्यांमध्ये त्यांच्या तोंडाची रचना, डोळे, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील केस ही समान वैशिष्ट्ये आढळतात. यावरूनच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते.

II) शरीरशास्त्रीय पुरावे – वरवर पाहता मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा असल्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. पण त्यांच्या अवयवांतील हाडांच्या रचनेत व जोडणीत साम्य दिसते. यावरून त्यांचे पूर्वज समान असावेत हे निदर्शनास येते.

III) अवशेषांगे – मानवी शरीरात माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, आंत्रपुच्छ यासारखे अवशेषांग असतात. मानवामध्ये माकडहाड असते. ते माकडाच्या शेपटीच्या स्नायूंसारखे असतात. माकडांना ते शेपटी हलवण्यासाठी उपयोगी पडतात. यातून माकड व मानव यांचा पूर्वज एकच असावा हे सूचित होते.

IV) जीवाश्म विज्ञान पुरावे – पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या  आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

V) जोडणारे दुवे – (i) काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे’ म्हणतात. (ii) हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात. (iii) उदा. पेरीपॅटस् या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे अँनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. (iv) डकबिल प्लॅटीपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि शरीरावरील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यांसारखी आहेत. (v) ‘लंगफिश’ हा जरी मत्स्य आहे तरी तो फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात.

VI) भ्रूणविज्ञानातील पुरावे – (i) भ्रूणविज्ञानात भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो. (ii) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्येच ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुराव मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो.

ई .  उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. 

उत्तर :

i) निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात.

उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते.

ii) बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे.

iii) परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.

उ . जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर

पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात यांनाच जीवाश्म म्हणतात.

उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म गृहीत धरतात- जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

i) जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C-14 चा न्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.

ii) C-12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलत असते.

iii) एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील C-14 ची सक्रियता व C-14 व C-12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी होतो.

iv) अशाप्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना  कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल  माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो.

ऊ . सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.

उत्तर

एप वानरापासून उत्क्रांती होत आदिमानव निर्माण झाला.

कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांची वाटचाल विविध टप्प्यात झाली.

कुशल मानव – हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडात मिळाला. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता.

ताठ कण्याचा मानव – याचा मेंदू कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित होता. याला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कळले असावे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते.

शक्तिमान मानव – शक्तिमान मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती.

बुद्धिमान मानव – विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला ‘बुद्धिमान मानव’ म्हटले जाते. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. तो चित्रे काढू लागला होता व कलात्मक वस्तू ध्ये बनवू लागला होता.

प्रगत बुद्धीचा मानव – बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत अझाली. तेव्हा त्याला ‘प्रगत बुद्धीचा मानव’ असे नाव मिळाले. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित संक्रमित होत राहिली.

उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी

उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1. आकृती पूर्ण करा. 

अ. 

उत्तर :

आ. 

उत्तर :

इ. 

उत्तर :

2. खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. 

उत्तर :

3. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. 

 गोष्टी 

दक्षता 

 १) आळस 

२) परपीडा

३) सत्यमार्ग

 ……………………..

……………………..

……………………..

उत्तर :

 गोष्टी 

दक्षता 

 १) आळस 

२) परपीडा

३) सत्यमार्ग

सुख मानू नये

करू नये

सोडू नये. 


4. काव्यसौंदर्य

अ. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. 

‘जनीं आर्जव तोडूं नये | पापद्रव्य जोडूं नये |

पुण्यमार्ग सोडूं नये | कदाकाळीं ||’ 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, संकटात सापडले की माणसे ते संकट आपण दूर करावे म्हणून आपल्याला विनंती करत असतात. त्यांच्या विनंतीचा अव्हेर करू नये. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जेवढी मदत करणे आपल्यास शक्य आहे तेवढी मदत आपण अवश्य करावी. दुसरे असे की वाईट मार्गाने धन जोडू नये. कुणाला लुबाडून त्याचे धन हिसकावून घेणे. मालात भेसळ करणे, लाच खाणे,कामात घोटाळे करून पैसा मिळवणे, पैशासाठी विश्वासघात करणे ह्या मार्गानी द्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग कधीही सोडू नये, असा समाजहिताचा आशय यात आला आहे.  

या पद्यपंक्तीचे शैलीच्या दृष्टीने विचार करता ‘तोडू, जोडू, सांडू’ या अनुप्रासामुळे या पंक्तीला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. 

आ. ‘सभेमध्यें लाजों  नये | बाष्कळपणें  बोलों  नये |’, या ओळीतील विचार स्पष्ट करा. 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की सभेमध्ये बोलताना लाजू नये. सभाधीटपणा असावा. सभेत आपले विचार निर्भयपणे मांडायला हवेत. त्याचप्रमाणे मुद्देसुद बोलावे. त्यात फालतूपणा, बाष्कळपणा नसावा. त्या दोन गोष्टी कळल्या तरच सभेवर आपला प्रभाव पाडता येईल. 

इ. ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, आळसात सुख मानू नये. वास्तविक आळसामुळे आपल्या कार्याचा नाश होत असतो. अभ्यासाचा आळस केला तर अभ्यासाची कटकट चुकवल्याचा तात्पुरता आनंद वाटतो पण त्यामुळेच परीक्षेत गुण कमी मिळतात व पश्चातापाची पाळी येते. अभ्यासाच्याच नव्हे तर सर्वच कामात आळसामुळे कार्य नाश होतो.    

स्थान विस्तार स्वाध्याय

स्थान विस्तार स्वाध्याय

स्थान विस्तार स्वाध्याय इयत्ता दहावी





प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. 


अ ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. 

उत्तर : हे विधान योग्य आहे. 

आ ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. 

उत्तर : हे  विधान अयोग्य आहे. 

कारण – भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. 

इ ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. 

उत्तर : हे विधान अयोग्य आहे. 

कारण –  ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. 

ई ) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. 

उत्तर : हे विधान योग्य आहे. 

उ ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. 

उत्तर : हे  विधान अयोग्य आहे. 

कारण – ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. 

ऊ ) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. 

उत्तर : हे  विधान अयोग्य आहे. 

कारण – भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. 

ए ) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. 

उत्तर : हे विधान योग्य आहे. 

प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा. 

अ ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ?

उत्तर :

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :

I) ब्राझील : स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध वित्तीय संकटांना सामोरे जावे लागले.

भारत : i) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.

ii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.

iii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले.

आ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत ?

उत्तर : 

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :

i) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलाधत आहे. 

ii) ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.

ii) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.

iv) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

इ ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. 

उत्तर : 

अ) भारत : i) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४ उत्तर अक्षवृत्त ते ३७°६ उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५ अक्षावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.

ii) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७‘ पूर्व रेखावृत्त ते ९७°२५ पूर्व रेखावृत्त आहे. 

ब) ब्राझील : i) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५’ उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे. 

ii) रेखावृत्तीय विस्तार : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५ पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८ पश्चिम रेखावृत्त आहे.

प्रश्न ३. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. 

अ ) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …………… नावाने ओळखले जाते. 

उत्तर : भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते. 

आ ) दक्षिण अमेरिका खंडातील ………….. हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. 

उत्तर : दक्षिण अमेरिका खंडातील चिली-इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. 

इ ) दोन्ही देशांतील राजवट …………… प्रकारची आहे. 

उत्तर : दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. 

ई ) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो ?

 

उत्तर :

 

उ ) खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो ?

उत्तर :

ऊ ) गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे ?

उत्तर :

ए ) गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे ?

उत्तर :

क्षेत्रभेट स्वाध्याय

क्षेत्रभेट स्वाध्याय

क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल


प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा. 

अ ) तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. 

उत्तर :

क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी ९.०० च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.

गोदावरी नदी – गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नदयांमध्ये केली जाते. या नदीला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर ११ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात झाला आहे. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा, वैनगंगा इ. उपनदया असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,१९,८१० असून या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. या नदीच्या उगमस्थानाची उंची १,६२० मी. (५,३१० फूट) इतकी असून सरासरी प्रवाह ३,५०५ घन मी./से. (१,२३,८०० घन फूट/से.) आहे. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा या गोदावरीच्या उपनदया आहेत. 

गोदावरी नदीतील पाणी ऋतुप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. गोदावरी नदीवर गंगापूर, नांदूर मधमेश्वर, डौलेश्वरम या ठिकाणी धरणे बांधली आहेत. या परिसरातील लोकांचे जीवन या नदीने समृद्ध केले आहे. म्हणून गोदावरीस महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. 

नदी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. ती मानवाला बरेच काही देऊन जाते. परंतु मानव स्वार्थापोटी त्यात प्रदूषण करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. 

या परिसराची माहिती दिल्याबद्दल मी व माझा मित्र परिवार तसेच शिक्षक या स्थानिक परिसरातील लोकांचे मनःपूर्वक आभारी आहोत. 

आ ) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

उत्तर :

एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे, हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्गनिर्मित नसतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते. ती कशी तयार होते. हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रश्नावली तयार केली आहे.

i) ज्या कारखान्याला भेट दयायची आहे. त्या कारखान्याचे नाव काय आहे ?

ii) या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते ? 

iii) कारखान्याचे स्थान व ठिकाण कोठे आहे ?

iv) तुमच्या परिसरापासून कारखाना किती अंतरावर आहे ? 

v) कारखान्याचा परिसर किती क्षेत्रफळात आहे ?

vi) या कारखान्याच्या मालकाचे नाव काय आहे ? 

vii) कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात ?

viii) सकाळ पाळी, दुपार पाळी, रात्रपाळी अशा तीन विभागात कामगा वाटले गेले आहेत काय ?

ix) किती किती तासांची प्रत्येक भागाची पाळी असते ? 

x) या कामगारांना ‘लेबर अँक्ट’ लागू केला आहे की नाही ? 

xi) जेवणाची सुटी किती तासानंतर दिली जाते ?

xii) तयार झालेला माल कोठे कोठे पाठविला जातो ? 

xiii) कामगारांना आरोग्याशी संबंधित काही सुविधा दिल्या जातात का ?

xiv) महिला कामगार असल्यास काही विशेष सोयी आहेत काय? 

इ ) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल ?

उत्तर : 

क्षेत्रभेटीसाठी ज्या भागाची निवड केली जाते त्या परिसरातील जवळपासच्या गावात राहण्याची सोय केली जाते. अशावेळी आपल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जसे परिसर स्वच्छ करून घ्यावा. परिसर स्वच्छ करून झाल्यानंतर निघालेला कचरा एकत्र गोळा करून ठेवावा व गावाच्या दूर एक मोठा खड्डा करून जो कचरा खड्ड्यात पुरण्यासारखा असेल तो खड्ड्यात टाकावा, जो जाळण्यासारखा असेल तो जाळून टाकावा. तसेच जेवणानंतर, नास्ता झाल्यानंतर खरकटे अन्न किंवा खराब झालेले अन्न, फळाच्या साली, भाज्यांचे देठ वगैरे अशा वस्तू खड्ड्यात टाकाव्या. राहुटी उचलतेवेळी त्या भागाची स्वच्छता करावी व खड्ड्यात कचरा टाकून खड्डा मातीने बुजवावा.

ई ) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल.

उत्तर :

क्षेत्रभेटीसाठी जाताना पुढील साहित्य सोबत घ्यावे. 

i) क्षेत्रभेटीस जाताना नोंदवही जवळ ठेवावी. त्यात अभ्यासाशी संदर्भातील प्रत्येक घटकाची नोंद घ्यावी. 

ii) संबंधित क्षेत्राचा नकाशा सोबत घ्यावा, त्यामुळे क्षेत्राचे योग्य निरीक्षण करता येते. 

iii) त्याचबरोबर नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, दिशा समजण्यासाठी होकायंत्र, विविध वस्तू, पदार्थ यांचे नमुने गोळा करण्यासाठी पिशवी, शक्य असल्यास कॅमेरा व दुर्बिण बरोबर घ्यावी. 

iv) क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रात गेल्यानंतर तेथील विविध घटकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे, त्याचबरोबर तेथील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उ ) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. 

उत्तर :

 i) भूगोल विषयाद्वारे आपण विविध भूरूपे, हवामान, मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे इत्यादी नैसर्गिक घटकांची तसेच व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन इत्यादी सांस्कृतिक घटकांचीही माहिती मिळवितो. 

ii) एखादया स्थळाची किंवा प्रदेशाची माहिती पुस्तके व नकाशे यातून मिळविता येते; पण ती अप्रत्यक्षपणे मिळविलेली माहिती असते. एखादया क्षेत्रास भेट देऊन आपणास प्रत्यक्ष ज्ञान मिळते. 

iii) नकाशात दाखविलेल्या प्रदेशाची आपण केवळ कल्पना करू शकतो. परंतु प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून तेथील वस्तुस्थिती समजते. 

iv) क्षेत्रभेटीच्या वेळी आपण तेथील भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या अनेक शंकांचे निरसन होते. क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्षात लोकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. 

v) क्षेत्रभेटीमुळे पुस्तकात अभ्यासलेली माहिती अधिक चांगली समजते. त्यामुळे भूगोल विषयात क्षेत्रभेट आवश्यक असते. 

गुरुत्वाकर्षण स्वाध्याय

गुरुत्वाकर्षण स्वाध्याय ( Gurutvakarshan swadhyay )

Gurutvakarshan swadhyay

इयत्ता दहावी विज्ञान भाग एक गुरुत्वाकर्षण स्वाध्याय

इयत्ता दहावी विज्ञान भाग एक गुरुत्वाकर्षण

प्रश्न 1. खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. 

 I

 II

 III

 वस्तुमान

m/s2

केंद्राजवळ शून्य

 वजन

kg

जडत्वाचे माप

 गुरुत्व त्वरण

Nm2/kg2

संपूर्ण विश्वात सारखे

 गुरुत्व स्थिरांक

N

उंचीवर अबलंबून आहे.

उत्तर :

 I

 II

 III

 वस्तुमान

 kg

जडत्वाचे माप

 वजन

 N

उंचीवर अबलंबून आहे.

 गुरुत्व त्वरण

 m/s2

केंद्राजवळ शून्य

 गुरुत्व स्थिरांक

 Nm2/kg2

संपूर्ण विश्वात सारखे

2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे ? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का ? का ?

उत्तर :

 वजन 

 वस्तुमान 

 

i. वस्तूचे वजन म्हणजे, त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्व बळ होय. 

ii. वजन सदिश राशी आहे. 

iii. वजनाचे एकक : N  dyne

iv. वस्तुची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते. 

i. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूत असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. 

ii. वस्तुमान अदिश राशी आहे. 

iii. वास्तुमानाचे एकक : kg , g. 

iv. वस्तूचे वस्तुमान सर्वत्र सारखेच असते.   

एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच राहणार नाही.  वस्तुमान कायम राहील मात्र वजन बदलेल. कारण वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्य संचय हा सर्वत्र तेवढाच राहील तर वजन = mg होईल.

येथे g म्हणजे त्या ग्रहाचे गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ग्रहाची वस्तुमाने भिन्न असल्यामुळे, त्या ग्रहासाठी g भिन्न राहील म्हणून वजन भिन्न राहील.

आ. मुक्तपतन, गुरुत्वत्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय ?

उत्तर :

i) मुक्तपतन : जर एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. उदा. उंचावरून अलगद सोडलेली वस्तू खाली पडताना तिचे ‘मुक्त पतन’ होत नाही. कारण त्या वस्तूवर अन्य बले सुद्धा कार्य करतात. जसे हवेमुळे होणारे घर्षण, उत्प्लाविता बल. पण ही बाह्य बले नसल्यास उंचावरून सोडलेल्या वस्तूचे मुक्त पतन होते. निर्वात प्रदेशात मुक्त पतन शक्य आहे. तसेच कृत्रिम उपग्रहांचे परिवलन हे देखील मुक्त पतनाचे उदाहरण आहे.

ii) गुरुत्वत्वरण : पृथ्वीजवळील सर्व वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. पृथ्वीचे गुरुत्व बल वस्तूवर कार्य करते.ह्या बलामुळे वस्तूत त्वरण निर्माण होऊन वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे गतिमान होतात. ह्या त्वरणाला गुरुत्वत्वरण म्हणतात. गुरुत्व त्वरण g ह्या चिन्हाने दर्शवितात. ह्याची सरासरी किंमत g = 9.8m/s2 असते. पृथ्वीवर सर्व ठिकाणी g ची किंमत सारखी नसते.

g ची किंमत वस्तूच्या पृथ्वी केंद्रापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. केंद्रापासून दूर गेल्यास त्वरण कमी होते.

iii) मुक्तिवेग : साधारणत: एखादी वस्तू आपण जेव्हा वर फेकतो तेव्हा तिचा वेग कमी कमी होत जातो. विशिष्ट उंचीवर वेग शून्य होतो व त्या क्षणी ती वस्तू पुन्हा पृथ्वीकडे गतिमान होते व पृथ्वीवर पडते. आरंभिचा वेग जेवढा जास्त असेल तितकी ती वस्तू जास्तीत जास्त उंची गाठू शकेल.

आपण वस्तूचा आरंभिचा वेग वाढवत गेले तर ती वस्तू अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभिचा वेग असा असेल की त्या वेगाने फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व ती पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात.

पृथ्वीसाठी मुक्तिवेग 11.2 km/s आहे. म्हणजे ह्या वेगापेक्षा जास्त वेगाने वस्तू फेकल्यास ती पृथ्वीवर परत येणार नाही.

iv) अभिकेंद्री बल : एखादी वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असल्यास त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेने कार्य करणारे बल प्रयुक्त होते. ह्या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात.

येथे m – वस्तूचे वस्तुमान, v – वस्तूचा वेग, r – परिवलन कक्षेची त्रिज्या.

न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार अभिकेंद्री बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे बल अस्तित्वात असते ह्याला अपसारी बल असे म्हणतात.

इ. केप्लरचे तीन नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली ?

उत्तर :

ई. एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. 

 

उत्तर :

उ. समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का ? का ?

 

प्रश्न 3. पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा

उत्तर :

वस्तूवर कार्य करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, वस्तूतः गुरुत्वीय त्वरण (g) निर्माण होते. आपण पृथ्वीच्या आत, पृथ्वीच्या केंद्राकडे जसजसे जातो. तसतसे, गुरुत्वीय त्वरण कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रावर हे मूल्य शून्य असते ह्याचा अर्थ असा नाही की पृथ्वीच्या केंद्रस्थानी गुरुत्वीय बल नसते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी विविध दिशेंनी हे बल कार्य करीत असते व त्याचे परिणामी बल (Resultant Force) शून्य असते. त्यामुळे गुरुत्वीय त्वरण सुद्धा शून्य असते.

पृथ्वीच्या आत जसजसे जातो तसतसे आपण पृथ्वीच्या आत ओढले जातो. आपल्या सभोवताल सर्वत्र पृथ्वीचे कण-भाग असतात व न्यूटनच्या नियमानुसार कोणत्याही दोन कणांमध्ये गुरुत्वीय बल असते. ह्या विविध दिशेंनी कार्य करणाऱ्या बलांचे परिणामी बलाचे मूल्य कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रस्थानी शून्य असते. अर्थात गुरुत्वीय त्वरण सुद्धा शून्य असते.

प्रश्न 4. सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाळ T आहे. तर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास परिभ्रमणकाळ √8T असेल.

उत्तर :

प्रश्न 5. उदाहरणे सोडवा. 

अ. जर एका ग्रहावर एक वस्तू 5m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती

उत्तर :

आ. ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल ?

उत्तर :

 

इ. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5kg व 49N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल, तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल

उत्तर :

ई. एक वर फेकलेली वस्तू 500 मी. उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल ? त्या वस्तूस वर जाऊन खाली येण्यास किती वेळ लागेल ? (g = 10 m/s2 )

उत्तर :

उ. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/sअसेल, तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल ?

उत्तर :

ऊ. पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 x 1024kg व 7.4 x 1022kg आहेत व त्या दोन्हीमधील अंतर 3.84 105km आहे. त्या दोन्ही मधील गुरुत्व बल किती असेल

दिलेले  G = 6.7 x 10-11 Nm2/kg2

उत्तर :

पृथ्वीचे वजन 6 x 1024kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 x 1011m आहे. जर दोन्हीमधील गुरुत्व बल 3.5 x 1022N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती 

उत्तर :

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2

सजीवातील जीवन प्रक्रिया स्वाध्याय
 

1. खालील तक्ता पूर्ण करा. 

 

 उत्तर :
2. रिकाम्या जागा भरा. 

अ. मानवी शुक्रपेशींची निर्मिती ……………. या अवयवात होते.

उत्तर : मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते.

आ. मानवामध्ये …………… हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

उत्तर : मानवामध्ये  Y  हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

इ. पुरुष व स्त्री जननसंस्थेमध्ये ……………. ही ग्रंथी समान असते.

उत्तर : पुरुष व स्त्री जननसंस्थेमध्ये पियुषिका ग्रंथी ही ग्रंथी समान असते.

ई. भ्रूणाचे रोपण ……………. या अवयवामध्ये होते.

उत्तर : भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते.

उ. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय …………… हे प्रजनन घडून येते.

उत्तर : भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते.

ऊ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन …………. प्रकारचे आहे.

उत्तर : शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडिभवन प्रकारचे आहे.

ए. परागकोषातील कोष्ठकांमध्ये …………. विभाजनाने परागकण तयार होतात.

उत्तर : परागकोषातील कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात.

4. थोडक्यात उत्तरे द्या. 

अ. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. 

उत्तर :

एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे पुढील प्रकारे आहे.

i) द्विविभाजन : द्विविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहेत.

बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकीपेशीतील काही पेशी यामध्ये या प्रकारचे प्रजनन घडते. या विभाजनात, जनक पेशीचे दोन समान भागांत विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते. अमिबामध्ये पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजेच साधे विभाजन होते. काही सजीवांमध्ये द्विविभाजन हे आडव्या किंवा उभ्या अक्षातून होते. उदा. पॅरामेशियमचे आडवे द्विविभाजन तर युग्लीनाचे उभे द्विविभाजन.

ii) बहुविभाजन : बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. या प्रकारचे विभाजन अमिबामध्ये घडते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपाद आत ओढून घेतो, गोलाकार बनतो व पेशीपटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, त्यास पुटी म्हणतात. पुटीमध्ये केंद्रकाचे विभाजन होते. केंद्रक विभाजनांच्या पाठोपाठ पेशीद्रव्यांचेही विभाजन होते व अनेक नवजात पेशींची निर्मिती होते. अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटून अनेक अमिबा पेशी बाहेर पडतात.

बहुविभाजन_प्रक्रिया
बहुविभाजन प्रक्रिया 

iii) कलिकायन : जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, त्यास कलिका म्हणतात. जनक पेशीच्या केंद्रकाचे विभाजन होते व दोन नवजात केंद्रक तयार होतात. एक नवजात केंद्रक कलिकेत प्रवेश करते. कलिकेचा आकार वाढतो. तो जनक पेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र वाढते. उदा. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते.

कलिकायन
कलिकायन

आ.  IVF ही संकल्पना स्पष्ट करा. 

उत्तर :

i) In Vitro Fertilization चे IVF हे संक्षिप्त रूप आहे.

ii) अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. परंतु आधुनिक वैदयकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते.

iii)  IVF म्हणजे काचनलिकेतील फलन होय. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते.

iv) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरुन अपत्यप्राप्ती करता येते.

काचनलिकेतील_फलन
काचनलिकेतील फलन 

 

इ. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल. 

उत्तर :

i) शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे.

ii) सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी,

iii) शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे.

iv) लैंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बिघडू शकते.

v) मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत.

vi) समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे.

ई. आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. 

उत्तर :

यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात.

i) आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. पुटीका ग्रंथी संप्रेरक, ल्युटीनायझींग संप्रेरक, इस्ट्रोजेन संप्रेरक व प्रोजेस्टेरॉन संप्रेरक ही चार संप्रेरके होत.

ii) पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकांपैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटीका ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक स्त्रवते.

iii) इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते.

iv) दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते.

v) पितपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात.

vi) अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते.

vii) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते व अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.

viii) अडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे पूर्णपणे थांबते.

ix) या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. या बरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव पाच दिवस सुरू राहतो. यालाच मासिक पाळी किंवा ऋतुस्त्राव म्हणतात.


आर्तवचक्र/ ऋतुचक्र

5. लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. 

उत्तर :

i) लैंगिक प्रजननात दोन जनक पेशींचा म्हणजे स्त्री युग्मक व पुंयुग्मकाचा समावेश होतो.

ii) या प्रक्रियेत दोन भिन्न युग्मकांच्या संयोगातून नवीन सजीवाची निर्मिती होते.

iii) त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. उदा. माता किंवा पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. जसे चेहऱ्याची ठेवण, वर्ण, केस, उंची तसेच काही विशिष्ट आनुवंशिक रोग इत्यादी.

6. नामनिर्दिशित आकृत्या काढा. 

अ.  मानवी पुरुष प्रजनन संस्था. 

मानवी पुरुष प्रजनन संस्था

आ. मानवी स्त्री प्रजनन संस्था. 

मानवी स्त्री प्रजनन संस्था

इ. आर्तव चक्र


आर्तवचक्र/ ऋतुचक्र

7. नावे द्या. 

अ. पुरूष प्रजनन संस्थेची संबंधित विविध संप्रेरके

उत्तर : i) पुटिका ग्रंथी संप्रेरक  ii) टेस्टोस्टेरॉन संप्रेरक

आ. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके. 

उत्तर : i) इस्ट्रोजेन संप्रेरक  ii) प्रोजेस्टेरॉन संप्रेरक  iii) पुटिका ग्रंथी संप्रेरक   iv) ल्युटीनायझींग

इ. जुळयांचे प्रकार 

उत्तर :  i) एकयुग्मजी जुळे  ii) द्वियुग्मजी जुळे

ई. कोणतेही दोन लैंगिक रोग

उत्तर : i) सायफिलीस  ii) गोनोऱ्हीया

8. ‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’ या विधानाची सत्यता/ असत्यतता सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

i) पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रांमुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजननसंस्था तयार होतात.

ii) पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्येही असते. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर X स्त्रीत्वासाठी.

iii) युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते म्हणजेच (44+XX किंवा 44+XY).

iv) या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच (n) राहते, म्हणजेच (22+X किंवा 22 + X ). शुक्रपेशी (22+X) किंवा (22+Y) या दोन प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी (22+X) या एकाच प्रकारच्या पेशी तयार होतात.

v) दांपत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते, तेव्हा पुरुषांकडून लिंगगुणसूत्रांपैकी  X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. पुढे फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे चुकीचे आहे.

9. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.

उत्तर :

वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन पुढील प्रक्रियेद्वारे पूर्ण होते.

1) खंडीभवन : i) खडीभवन हा अलैगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांत आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो.

खंडीभवन
खंडीभवन 

ii) उदा. पाणी व पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यावर स्पायरोगायची (शेवाळ) वाढ व विभाजन वेगाने होते. खंडीभवनामुळे स्पायरोगायराचे अनेक खंडांमध्ये विभाजन होते. पेशीय वाढ व गुणसूत्री विभाजनाने या प्रत्येक खंडाचे परिपूर्ण स्पायरोगायरात रूपांतर होते.

2) मुकुलायन : i) मुकुलायन प्रक्रियेत हायड्रासारख्या वनस्पती प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात.

ii) हायड्राची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्याच्या शरीरभित्तिकेवर गोलाकार फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास फुगवता तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात.

iii) या मुकूलाचे रूपांतर यथावकाश छोट्या हायड्रामध्ये  होते.

iv) नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर, देह गुहा व पचनगुहा, जनक

हायड्राच्या शरीरस्तर व गुहांशी सलग जोडलेले असतात.

v) नवजात हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते.

vi) जेव्हा नवजात हायड्राची स्वतःचे अस्तित्व टिकविण्याइतपत वाढ होते तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो. वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख

मुकुलायन
मुकुलायन

3) शाकीय प्रजनन : i) वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.

ii) उदा. बटाट्यात डोळ्यांपासून (मुकुलापासून) नवीन वनस्पतींची पानांच्या कडांवरील मुकुलांपासून निर्मिती होते तर रताळ्याच्या मुळांपासून नवीन रोपटी तयार होतात.

iii) शाकीय प्रजनन पद्धतीने निर्मित वनस्पती, प्रजनन प्रक्रियेत एकाच जनकाचा समावेश असल्याने मूळ जनक वनस्पतीसारख्याच असतात.

iv) शाकीय प्रजननाद्वारे निर्माण झालेल्या वनस्पती वेगाने वाढतात. बिजापासून निर्माण झालेल्या वनस्पतींपेक्षा या वनस्पतींना लवकर फुले व फळे येतात.

शाकीय_प्रजनन
शाकीय प्रजनन

10. भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा. 

उत्तर :

i) मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशीरा लग्न करणे, दीर्घकाळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थाचे सेवन करणे, अती मद्यपान इत्यादींमुळे सुद्धा मूल होत नाही.

ii) लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल हवे ही सामान्यपणे सर्व दांपत्यांची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणी ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो.

iii) वैचारिक मतभेद, भावनिक जुळवणूक न होणे अशा कारणांमुळे असमाधानी असलेली दांपत्य तसाच संसार रेटताना दिसतात. स्वाभिमानाची चुकीची संकल्पना, जुळवणूक करण्याची क्षमता नसणे. तसेच व्यक्तिमत्वाची जुळवणूक न होणे यामुळे संसारातील सुमधूर भाव हरपलेले दिसतात. सध्याच्या काळात कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली दिसते.

iv) नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वतःचे मूल हवे आहे. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस-उपवास, गंडे-दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्र विचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असतात. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात.

v) विज्ञान-तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवत मूल होणारच याची खात्री देते.

vi) अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही.

vii) पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशींतील विविध व्यंग इत्यादी अभाव, कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात.

viii) परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी इत्यादी तंत्रांच्या साहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते.

11. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आकृतीसह स्पष्ट करा. 

उत्तर :

i) फूल : हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

ii) स्त्रीकेसर : हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग फुलाच्या मध्यभागी असतो. स्त्रीकेसर हा भाग कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशयापासून बनतो.

iii) पुंकेसर : हा फुलाचा पुल्लिंगी भाग असतो. तो परागकोश व वृंत यापासून बनलेला असतो.

iv) स्त्रीकेसराचा लांबटभाग कुक्षीवृंत असतो व त्याच्या टोकाशी कुक्षी असते.

v) अंडाशय : हा फुगीर भाग स्त्रीकेसराच्या मुळाशी असतो. त्यात एक किंवा अनेक बिजांडे तयार होतात.

vi) परागकोश : परागकोश परागकणांची निर्मिती करतात व परागकण पुंयुग्मकांची निर्मिती करतात. वृंत हे परागकोशाचे देठ असते.

वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन तीन टप्प्यांमध्ये होते. 

i) परागण : परागण म्हणजे परागकोशातील परागकणांचे  स्त्रीकेसरातील होणारे स्थानांतरण. परागक्रिया जेव्हा एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते, तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणतात. या उलट जर एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडणाऱ्या परागण क्रियेस परपरागण म्हणतात.

ii) फलन : परागकण कुक्षीवर स्थिरावतो. त्यापासून परागनलिका तयार होऊन ती कुक्षीवृंतातून अंडाशयापर्यंत पोहोचते. प्रत्येक परागनलिकेत दोन पुंयुग्मक असतात व ते नलिकेमार्फत भ्रूणकोशातील अंडपेशीजवळ सोडले जातात. एका पुंयुग्मकाचा स्त्री युग्मकाशी (अंडपेशीशी) संयोग होऊन युग्मनज तयार होतो व दुसऱ्या पुंयुग्मकाचा द्वितीयक केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणपोष तयार होतो. यालाच द्विफलन असे म्हणतात. युग्मनज भ्रूणात विकसित होतो. भ्रूणपोष भ्रूणाचे पोषण करतो.

iii) बीजांकुरण : फलनानंतर युग्मनजाचे पुनर्वृत्तीय विभाजन होऊन बीजांडात भ्रूण तयार होतो. बीजांडाचे रूपांतर बीजात तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. अनुकूल परिस्थितीमध्ये बीजापासून नवीन रोपटे तयार होते व या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात.

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग एक स्वाध्याय 

 

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून विधानांचे स्पष्टीकरण लिहा.

अ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ………….. रेणू मिळतात.

उत्तर : एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात.

स्पष्टीकरण : एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात. ज्यात 2 रेणू ग्लुकोज-विघटन, 2 रेणू ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र व 34 रेणू इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमार्फत तयार होतात.

आ. ग्लायकोलासीयच्या शेवटी ………… चे रेणू मिळतात.

उत्तर : ग्लायकोलासीयच्या शेवटी 2 पायरूविक आम्लाचे रेणू मिळतात.

स्पष्टीकरण : 2 पायरूविक आम्लाचे (पायरूवेट) रेणू, 2 NADH चे रेणू, 2 ATP चे रेणू व पाण्याचे 2 रेणू तयार होतात.

इ. अर्धगुणसूत्री विभाजन भाग- I  च्या पूर्वावस्थेतील ………… या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

उत्तर : अर्धगुणसूत्री विभाजन भाग- I  च्या पूर्वावस्थेतील मध्यवस्था I या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

स्पष्टीकरण : अर्धसूत्री विभाजन भाग- I च्या पूर्वावस्थेतील मध्यावस्था I मध्ये सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण/जनुकीय पुन:संयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसुत्रे दोन संचामध्ये विभागली जाऊन दोन एकगुणी पेशी तयार होतात.

ई. सूत्री विभाजनाच्या ……………. अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

उत्तर :  सूत्री विभाजनाच्या मध्यावस्था अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.

स्पष्टीकरण : मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसुत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसुत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात.

उ. पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ……………. च्या रेणूची आवश्यकता असते.

उत्तर : पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी लिपीड (Lipid) नावाच्या रेणूची आवश्यकता असते.

स्पष्टीकरण : लिपीड नावाचे रेणू हे मेदाम्लांपासून तयार केले जातात. जे पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी आवश्यक असते.

ऊ. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी …………. प्रकारचे श्वसन करतात.

उत्तर : आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनाॅक्सिश्वसन  प्रकारचे श्वसन करतात.

स्पष्टीकरण : व्यायाम करताना मांसपेशीच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी होते व तेथे विनाॅक्सिश्वसन होते. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते.

2. व्याख्या लिहा. 

अ. पोषण

उत्तर :

पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या क्रियेला पोषण म्हणतात.

आ . पोषकद्रव्ये

उत्तर :

अन्नामधील विविध घटकाला (कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे, क्षार/ खनिजे) ‘पोषकद्रव्ये’ म्हणतात.

इ. प्रथिने 

उत्तर :

अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला ‘प्रथिने’ म्हणतात.

उ. पेशीस्तरावरील श्वसन

उत्तर :

अन्नपदार्थामधून ऊर्जा मिळवण्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होण्याच्या प्रक्रियेला ‘पेशीस्तरावरील श्वसन’ म्हणतात.

ऊ. ऑक्सिश्वसन

उत्तर :

ऑक्सिजनच्या सानिध्यात पेशीऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ‘ऑक्सिश्वसन’ म्हणतात. यामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण (विघटन) होते आणि ऊर्जेबरोबर CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात.

ए . ग्लायकोलायसीस (ग्लुकोज- विघटन) 

उत्तर :

पेशींमधील ग्लुकोजचे विकराच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने विघटन होऊन ऊर्जा व पायरूविक आम्ल मिळण्याच्या क्रियेला ग्लायकोलायसीस म्हणजेच ग्लुकोज विघटन म्हणतात.

3. फरक स्पष्ट करा. 

अ. ग्लोयकोलायसीस व क्रेब चक्र 

उत्तर :

 ग्लोयकोलायसीस

 क्रेब चक्र

 

i) ग्लायकोलासीसची प्रक्रिया पेशीद्रव्यात होते. 

ii) या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरूविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. 

iii) ग्लायकोलायसीसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनाॅक्सिश्वसन या दोन्हींमध्ये होते.  

iv) पेशीश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलासीस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरूवेटमध्ये होते. 

v) या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरूवेटच्या दोन रेणूंमध्ये होते. 

vi) ग्लायकोलासीसमध्ये ATP चे 2 रेणू वापरले जातात. 

vii) ग्लायकोलासीसमध्ये ATP चे 4 रेणू तयार होतात. 

viii) या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. 

 

i) क्रेब चक्र तंतुकणिकेत होत असते.  

ii) या प्रक्रियेत अँसेटिल-को-एन्झाइम-A  च्या रेणूतील अँसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. 

iii) क्रेब चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते. 

iv) क्रेब च्रक ही पेशीश्वसनातील दुसरी पायरी आहे. 

v) या प्रक्रियेत पायरूवेटचे रूपांतर CO2 आणि H2O यांत होते. 

vi) क्रेब चक्रात ATP चे रेणू वापरले जात नाहीत. 

vii) क्रेब चक्रात ATP चे 2 रेणू तयार होतात. 

viii) या प्रक्रियेत CO2 तयार होतो. 

आ. सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

उत्तर :

 

 सूत्री पेशीविभाजन 

 अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

 

i) सूत्री पेशी विभाजन गुणसुत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात.

ii) एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात.

iii) सूत्री पेशीविभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पच्श्रावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात.

iv) सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते.

v) सूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही.

vi) या प्रकारचे पेशीविभाजन वाढ आणि विकास यांसाठी आवश्यक असते.

vii) सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी अशा दोन्हींत होते.

i) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात गुणसुत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात.

ii) एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात.

iii) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात भाग I आणि भाग II अशा दोन प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था,मध्यावस्था, पच्श्रावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात.

iv) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात पूर्वावस्था जास्त काळाची असते.

v) अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसुत्रांमध्ये जनुकीय विचरण होते.

vi) या प्रकारचे पेशीविभाजन युग्मके तयार  करण्यासाठी आवश्यक असते.

vii) अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही: केवळ मूल पेशीतच होते.

 
इ. फरक स्पष्ट करा ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन

उत्तर :

 

 ऑक्सिश्वसन

 विनॉक्सिश्वसन

1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते.

2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी होते.

3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. 

4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
5. ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते.
6. ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणू तयार होतात.

 

1. विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते.

2. विनॉक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते.

3. विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवट CO2 आणि C2H5OH निर्माण होते. 

4. विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
5. विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते.
6. विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणू तयार होतात.

4. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. 

उत्तर :

i) पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात.

ii) पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात.

iii) जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल, तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत.

iv) शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील, शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. 

उत्तर :

i)आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे २ पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते.

ii) तसेच काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये मदत होते.

iii) म्हणून पालेभाज्या फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते.
इ. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. 

उत्तर :

i) पेशी विभाजन हा सजीवांतील महत्त्वाचा गुणधर्म होय.

ii) पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजेच प्रजनन संस्था मुख्यत: पेशी विभाजनावर आधारित आहे.

iii) याबरोबरच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. उदा. अनेक पेशींची मिळून ऊती तयार होते व ऊतींपासून मानवी संस्था तयार होतात.

iv) शरीराच्या झीज भरून काढण्यासाठीही पेशींचे विभाजन साहाय्य करते.

v) या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म होय.

ई. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिश्वसन करतात. 

उत्तर :

i) काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनॉक्सिश्वसन करू लागतात.

ii) जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो.

उ. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. 

उत्तर :

i) क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते.

ii) अँसेटिल-को-एन्झाइम- A चे रेणू ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात.

iii) त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोअँसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो.

iv) हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.

5.सविस्तर उत्तरे द्या. 

अ. ग्लायकोलायसीस प्रक्रिये विषयी सविस्तर लिहा

उत्तर :

i) ग्लायकोलायसीस ही एक सजीवांच्या चयापचायातील एक चक्र होय. ही एक जैवरासायनिक अभिक्रियेची शृंखला आहे.

ii) यामध्ये ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लायसिस म्हणजेच विघटन म्हणजेच ‘ग्लुकोजचे विघटन’ होय.

iii) पेशीश्वसनातील हा पहिला टप्पा सर्व सजीवांत सारखाच असतो.

iv) ही प्रक्रिया पेशी द्रव्यांत घडून येते यासाठी ऑक्सिजनची गरज नसते.

v) या प्रक्रियेत सहा कार्बनी ग्लुकोजचे रूपांतर तीन कार्बनी पायरुविक आम्ल (पायरुवेट) यामध्ये होते.

vi) कमीत कमी सहा विकर या प्रक्रियेत कार्यरत असतात.

vii) यातील पहिल्या आणि तिसऱ्या पायरीमध्ये ATP चे दोन रेणू तयार होतात.

viii) पुढे सहा-कार्बन ग्लुकोज रेणूचे रूपांतर मध्यंतरी उत्पादकात होते जे दोन तीन-कार्बन संयुगात विभागले जाते.

ix) प्रक्रियेच्या शेवटी काही रूपांतर होऊन पायरुविक आम्ल तयार होते.

x) ग्लायकोलायसिसच्या शेवटच्या पायरीमध्ये क्रियेच्या दरम्यान घडलेल्या रासायनिक अभिक्रियेपासून मिळालेल्या ऊर्जेचे 4ATP रेणू तयार होतात.

xi) म्हणूनच या प्रक्रियेत पूर्ण 4ATP रेणू तया होतात, ज्यामधील 2ATP रेणू प्रक्रिये दरम्यान वापरले जातात, ज्यामुळे शेवटी 2ATP रेणू मिळतात. अशाप्रकारे ग्लुकोजचे विघटन घडून येते.

आ. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा

उत्तर :

सूत्रीविभाजन – (i) व्याख्या : सूत्रीविभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय. ज्यामध्ये एक पेशी दोन सारख्या जन्यपेशीमध्ये विभागली जाते. ज्यांचे गुणसूत्र व केंद्रक जनक पेशीसारखेच असते.

ii) सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी. सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते.

iii) कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात.

(iv) सूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

अ) प्रकलविभाजन / केंद्रकाचे विभाजन

आ) परिकलविभाजन / जीवद्रव्याचे विभाजन

अ) प्रकलविभाजन – प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते.

 पूर्वावस्था

• प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते.

• त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते.

• ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते.

• केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते.

● मध्यावस्था

• मध्यावस्थेत केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात.

• सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात.

• दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात.

● पश्चावस्था

• पश्चावस्थेत त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते.

• वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे म्हणतात. यावेळी ही ओढलेली गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात.

• अशातऱ्हेने गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.

● अंत्यावस्था

• अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्र आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात.

• दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होतो.

• अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके तयार होतात जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात.

• तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.

आ) परीकलविभाजन

• परीकलविभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी (जन्यपेशी) तयार होतात.

• या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात.

• वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी  एक पेशीपटल तयार होऊन परीकलविभाजन होते.

इ. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.

उत्तर :

अर्धगुणसूत्री विभाजन

• व्याख्या – अर्धगुणसूत्री विभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय. ज्यामध्ये गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते.

• याप्रकारचे विभाजन पुंयुग्मक व स्त्रीयुग्मक तयार होण्यासाठी आवश्यक असते.

• अर्धगुणसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

अ) अर्धसूत्री विभाजन भाग I

ब) अर्धसूत्री विभाजन भाग II

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या भागातील पूर्वावस्थेत पाच अवस्थांचा समावेश होतो.

i) लिप्टोटीन / लेप्टोटीन

• या अवस्थेत केंद्रक लांब व पातळ गुणसूत्रांनी भरलेले आढळते.

• या गुणसूत्रांवर कणिका आढळून येतात ज्याला गुणसूत्रकणिका म्हणतात.

ii) जाइगोटीन

• या अवस्थेत गुणसूत्रांचे युग्मन होते.

• ही क्रिया सारख्या गुणसूत्रांमध्ये होते.

• या प्रक्रियेत समजातीय गुणसूत्रांमध्ये (सिनॅप्ससिस) जोडी होते. याला ‘जाइगोनेमा’ सुद्धा म्हणतात.

• या जोडींना बाइवेलेंट वा चतुष्क सधा म्हणतात

• हे समजातीय गुणसूत्र अर्धगुणसूत्री नसतात.

• प्रत्येक चतुष्कात चार क्रोमेटिड्स असतात.

iii) पैकिटिन

• या अवस्थेत गुणसूत्रांची युग्मन प्रक्रिया पूर्ण होते. गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. समजात

• जनुकीय गुणसूत्रांमध्ये विचरण झाल्यामुळे समजातीय गुणसूत्रांमध्ये आनुवंशिक सामग्रीचे वहन होते.

iv) डिप्लोटिन

• या अवस्थेत समजातीय गुणसूत्रे वेगवेगळे होऊन x आकार घेताना दिसतात. ज्यांना काइज्मेटा म्हणतात.

• या प्रक्रियेला सीमान्तीकरण किंवा उपान्तीभवन सुद्धा म्हणतात.

v) डायकिनिसिस

• या अवस्थेमध्ये केंद्रके व केंद्रकावरील आवरण अदृश्य होते. या स्पींडल तंतू तयार होतात.

•या अवस्थेत पश्चावस्थेसाठी गुणसूत्रांची संख्या कमी होते.

ई. शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात

उत्तर :

i) मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात.

ii) पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था याबरोबरच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात.

iii) या सर्व संस्था एकमेकांशी सहयोग करून शरीराची वाढ व विकास घडवून आणतात.

iv) पचनसंस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाचे पचन करणे होय. अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. शरीराला आवश्यक अशा पदार्थाचे रक्ताद्वारे शोषण केल्या जाते. ज्यातून सर्व शरीरभर पोषकद्रव्ये पुरविली जातात.

v) श्वसनसंस्थेमार्फत ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. शरीरात ऊर्जानिर्मिती करून ऑक्सिजनची पेशीमध्ये निर्मिती होते. या रक्तातील Hb द्वारे ऑक्सिजन शरीरभर पोहचवले जाऊन तेथे श्वसन केल्या जाते. अनेक स्नायूंचा विकास घडून येतो.

vi)रक्ताभिसरण संस्थेमुळे रक्त शरीरभर पोहचवले जाते. ज्याद्वारे शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो व ऊर्जानिर्मिती होते. शरीरातील घाण उत्सर्जन संस्थेमार्फत बाहेर टाकली जाते. उत्सर्जनसंस्था शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रित ठेवते.

vii) नियंत्रण संस्था सर्व क्रियांचा समतोल व समन्वय साधण्याबरोबरच विविध संप्रेरके व विकर स्त्रवते जी शरीराच्या वाढ व विकासासाठी अत्यावश्यक आहे.

viii) अशाप्रकारे मानवी जीवनप्रक्रिया शरीराच्या वाढ व निर्मितीसाठी उपयोगी ठरतात.

उ. क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा

उत्तर :

i) क्रेब चक्र किंवा साइट्रिक आम्ल चक्र किंवा ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही ऑक्सिश्वसन करणाऱ्या जीवांमार्फत घडवून येणारी जैवरासायनिक श्रृंखला होय.

ii) अन्नातील कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्यापासून तयार होणाऱ्या अँसेटील-को-एन्झाइम A चे ऑक्सिडीकरण होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा निर्माण होते.

iii) हा श्वसनाचा दुसरा टप्पा होय, जो ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो.

iv) यास ऑक्सिश्वसन असेही म्हणतात. ही प्रक्रिया तंतुकणिकामध्ये घडते.

v) या प्रक्रियेत ग्लायकोलायसिसपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त होते.

vi) क्रेबच्या श्रृंखलेत 36 ATP तयार होतात.

vii) हे या चक्रात अँसिटेट व पाणी (अँसेटील-को एन्झाईम -A च्या स्वरूपातील) वापरण्यात येते, NAD चे NADA मध्ये रूपांतर होते व कार्बन डायऑक्साईड वायू उत्पादन केल्या जातो. अशाप्रकारे क्रेबची श्रृंखला घडून येते.

6. कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया कशी होते ?

खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. 

उत्तर :

रासायनिक अभिक्रिया व समीकरणे स्वाध्याय

रासायनिक अभिक्रिया व समीकरणे स्वाध्याय

रासायनिक अभिक्रिया व समीकरणे स्वाध्याय इयत्ता दहावी

रासायनिक अभिक्रिया व समीकरण इयत्ता दहावी स्वाध्याय

प्रश्न 1. दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

 (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन)

अ. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ……………. धातूचा थर दिला जातो. 

उत्तर :

लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर जस्त धातूचा थर दिला जातो.

कारण जस्त हा लोखंडापेक्षा जास्त विद्युत ऋण धातू आहे. त्यावर वातावरणाचा परिणाम मंद गतीने होतो. जस्ताच्या थरामुळे लोखंडावरऋणाग्र थर निर्माण होतो. त्यामुळे जस्ताचे क्षरण आधी होते व लोखंडाचे क्षरण होते थांबते. जस्ताचे क्षरण काही वर्षात होऊन लोखंड उघडे पडते व गंजण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते पण सुरुवातीची काही वर्षे लोखंडाचे गंजणे थंबते.

आ. फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक …………अभिक्रिया आहे.

उत्तर :

फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.

कारण फेरस सल्फेट – फेरिक सल्फेट

Fe2+ – Fe3+ 

या अभिक्रियेत फेरस सल्फेट एक इलेक्ट्रॉन गमावतो.

इ. आम्लयुक्त पाण्यातून विदयुतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ……………. होते. 

उत्तर – आम्लयुक्त पाण्यातून विदयुतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे विदयुत अपघटन होते.

कारण 2H2O आम्लयुक्त → 2H2 + O2

पाण्याचे विदयुतमुळे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन निर्माण होतात.

ई. BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे …………अभिक्रियेचे उदाहरण आहे.

उत्तर :

BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 चे जलीय द्रावण मिसळणे हे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे.

कारण BaCl+ ZnSO4 → ZnCl2 + BaSO4

प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात ? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. 

उत्तर :

दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडाॅक्स अभिक्रिया म्हणतात.

उदा. 2H2S  + SO2    3S + 2H2O

या अभिक्रियेत H2S चे ऑक्सिडीकरण तर SO2 चे क्षपण होते.

कारण H2S मधून S चा अणू बाहेर पडतो व H अणूशी O अणूचा संयोग होतो. म्हणजेच H2S चे ऑक्सिडीकरण होते SO2 मधून ऑक्सिजनचे अणू बाहेर पडतात म्हणजेच SO2 चे क्षपण होते.

आ. हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो ?

उत्तर :

MnO2 ची पावडर H2O2 मध्ये टाकल्यास

H2O    HOह्यामुळे अपघटन अभिक्रियेचा वेग वाढतो.

इ. ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा. 

उत्तर :

अभिक्रियेचे दोन प्रकार पडतात.

i) ऑक्सिडीकरण अभिक्रिया – ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियाला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात.

उदा.  C + O2  CO2

Zn + H2SO4  ZnSO4 + H2 

ii) क्षपण – ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकाचा हायड्रोजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो व उत्पादित मिळते. अशा अभिक्रियेला क्षपण असे म्हणतात.

उदा. CuO + H2  → Cu + H2O

CuO चे क्षपण झाले. वनस्पती तेलाचे हायड्रोजनेशन होताना तेलाचे क्षपण होते.

ई. अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. 

उत्तर :

i) रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात, त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारके म्हणतात.
ii) रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो, त्याला उत्पादित म्हणतात.

iii) उदा., कोळसा (कार्बन) हवेत जाळला असता, कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. ही रासायनिक अभिक्रिया आहे. यात कोळसा (कार्बन) व ऑक्सिजन (हवेतील) हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित आहे.

उ. NaOH पाण्यात मिसळणे व CaO पाण्यात मिसळणे या दोन घटनांमधील साम्य व भेद लिहा

उत्तर :

i) NaOH पाण्यात मिसळतो त्यावेळी कोणतीही अभिक्रिया घडून येत नाही. नवीन पदार्थ निर्माण होत नाही.

पण NaOH विरघळताच द्रव गरम होतो ही क्रिया उष्मादायी प्रक्रिया आहे.

ii) CaO पाण्यात विरघळतो ही रासायनिक अभिक्रिया असून ही उष्मादायी आहे.

CaO + H2→ Ca(OH)2 + उष्णता

Ca(OH)2 हा नवीन पदार्थ तयार होतो.

प्रश्न 3. खालील संज्ञा उदाहरणासहीत स्पष्ट करा. 

अ. उष्माग्राही अभिक्रिया

उत्तर :

उष्माग्राही अभिक्रिया – ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेत उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात.

CaCO3 उष्णता → CaO +CO2 

आ. संयोग अभिक्रिया

उत्तर :

संयोग अभिक्रिया – जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात.

उदा. C + O2  CO2

 

इ. संतुलित समीकरण 

उत्तर :

संतुलित समीकरण : एखाद्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे अभिकारक व क्रियेनंतर निर्माण होणारे उत्पादिते बरोबर (=) ह्या चिन्हाच्या डावीकडे व उजवीकडे अनुक्रमे दर्शविलेली असतात व अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अणूंची संख्या ही उत्पादितांच्या अणूंच्या संख्येइतकी असेल तर अशा समीकरणांना संतुलित रासायनिक समीकरणे म्हणतात.

उदा. Zn + H2SO4 = ZnSO4 + H

अभिकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूची संख्या व उत्पादितामधील मूलद्रव्यांच्या अणूची संख्या समान आहे म्हणून ही संतुलित समीकरण आहे.

ई. विस्थापन अभिक्रिया

उत्तर :

Zn + H2SO4  ZnSO4 + H

वरील अभिक्रियेत H2SOमधील हायड्रोजन अणूचे विस्थापन Zn अणूमुळे होतेव हायड्रोजन मुक्त होतो. ही विस्थापन अभिक्रिया होय.

यात Zn ही जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे.

एखाद्या अभिक्रियेत कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्याचा अणू होतो अशा अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.

प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा.

अ. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्याम निवळी दुधाळ होते. 

उत्तर :

i) चुनखडी तापवली असता, तिचे अपघटन होऊन कॅल्शिअम ऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात.

ii) हा कार्बन डायऑक्साइड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता. अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शिअम कार्बोनेट तयार होते. यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते.

आ. शहाबादी फरशीचे तुकडे HCI मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो; पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. 

उत्तर :

i) अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जेवढा कणांचा आकार लहान तेवढा अभिक्रियेचा दर वाढतो.

ii) शहाबादी फरशीची HCI बरोबरच्या अभिक्रियेमध्ये शहाबादी फरशीव्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा चुरा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाचा फरशोत्र चुरा HCI बरोबर जलद गतीने संयोग पावतो व लवकर नाहीसा होतो.

इ. प्रयोगशाळेत संहत सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवित राहतात. 

उत्तर :

कारण संहत सल्फ्युरिक आम्ल पाण्यात विरघळून विरल होण्याची क्रिया ही उष्मादायी प्रक्रिया आहे. अर्थात या वेळी खूप जास्त उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन, वाफेबरोबर आम्ल बाहेर उडून अपघात होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून, आम्ल सावकाश ओतून सतत हलवत राहतात. त्यामुळे निर्माण झालेली उष्णता द्रवात सर्वत्र पसरते व संभाव्य धोका टळतो.

ई. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. 

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खादयतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

प्रश्न 5. पुढील चित्राचे निरीक्षण करा. रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. 

उत्तर :

ओलसर हवेत लोखंड का गंजते ते ह्या आकृतीसह स्पष्ट होते. पाण्याच्या संपर्कामुळे लोखंडी पृष्ठभागावर विद्युत प्रभार निर्माण होतो व त्यावरील काही भाग धनाग्र तर काही भाग ऋणाग्र बनतो.

धनाग्राच्या सानिध्यात – लोखंडाचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचा फेरस ऑक्साइड बनते.

ऋणाग्राच्या सानिध्यात – पाण्याचे आयोनायझेशन होऊन फेरस ऑक्साइडचे ऑक्सिडीकरण होऊन फेरिक ऑक्साइड Fe2O3  तयार होतो. हा तांबूस पदार्थ म्हणजे लोखंडाचा गंज होय. अशाप्रकारे लोखंड गंजण्याची क्रिया ही आयोनिक प्रकारची आहे.

प्रश्न 6. खालील रासायनिक अभिक्रियेतमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा. 

अ. Fe + S →  FeS

उत्तर :

या अभिक्रियेत Fe चे ऑक्सिडीकरण व S चे क्षपण होते.

आ. 2Ag2→ 4Ag + O

उत्तर :

या अभिक्रियेत Ag2O चे क्षपण होते.

इ. 2Mg + O2 → 2 MgO

उत्तर :

या अभिक्रियेत Mg चे ऑक्सिडीकरण होते.

ई. NiO  + N2   Ni + H2O

उत्तर :

या अभिक्रियेत NiO चे क्षपण होते व H2 चे ऑक्सिडीकरण होते.

प्रश्न 7. पुढील रासायनिक समीकरणे पायरीपायरीने संतुलित करा. 

प्रश्न 8. खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत का उष्माग्राही आहेत ते ओळखा. 

प्रश्न 9. पुढील तक्ता जुळवा.

 अभिकारके

उत्पादिके

रासायनिक अभिक्रियेला प्रकार

 1. BaCl2(aq) + ZnSO4(aq)

 i. H2CO3(aq)

 a. विस्थापन

 2. 2AgCl(s)

 ii. FeSO4(aq) + Cu(s)

 b. संयोग

 3. CuSO4(aq) + Fe(s)

iii. BaSO4↓+ZnCl2(aq)

 c. अपघटन

 4. H2O(l) + CO(g)

iv.  2Ag(s) + Cl2(g)

 d. दुहेरी विस्थापन

उत्तर :

 अभिकारके

उत्पादिके

रासायनिक अभिक्रियेला प्रकार

 1. BaCl2(aq) + ZnSO4(aq)

iii. BaSO4↓+ZnCl2(aq)

 d. दुहेरी विस्थापन

 2. 2AgCl(s)

iv.  2Ag(s) + Cl2(g)

 c. अपघटन

 3. CuSO4(aq) + Fe(s)

ii. FeSO4(aq) + Cu(s)  a. विस्थापन

 4. H2O(l) + CO(g)

i. H2CO3(aq)

 b. संयोग

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण स्वाध्याय

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण स्वाध्याय

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण इयत्ता दहावी स्वाध्याय

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण इयत्ता दहावी

प्रश्न 1. स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा. 

 स्तंभ क्र. 1

 स्तंभ क्र. 2

 स्तंभ क्र. 3

 i) त्रिक 

अ) सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण  


1) मेंडेलीव्ह  

 ii) अष्टक 

आ) एकवटलेले वस्तुमान व धन प्रभार  


2) थाॅमसन  

 iii) अणुअंक 

इ) पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी  


3) न्यूलॅड्स 

 iv) आवर्त 

ई)  आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पाहिल्यासारखे 


4) रुदरफोर्ड  

 v) अणुकेंद्रक 

उ) अणुकेंद्रकावरील धनप्रभार 

 

5) डोबरायनर 

 vi) इलेट्रॉन 

ऊ) रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल 

 

 6) मोजले

उत्तर :

 स्तंभ क्र. 1

 स्तंभ क्र. 2

 स्तंभ क्र. 3

  i) त्रिक 

ई) पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी

   

 5) डोबरायनर

 ii) अष्टक

 ई)  आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पाहिल्यासारखे

 3) न्यूलॅड्स

 iii) अणुअंक 

 उ) अणुकेंद्रकावरील धनप्रभार

 6) मोजले

 iv) आवर्त

 ऊ) रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल

 1) मेंडेलीव्ह

 v) अणुकेंद्रक

 आ) एकवटलेले वस्तुमान व धन प्रभार

 4) रुदरफोर्ड

 vi) इलेट्रॉन

 अ) सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण

 2) थाॅमसन

प्रश्न 2. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा. 

अ. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ………….. आहे. 

i) 1   ii) 2   iii) 3   iv) 7

उत्तर : i) 1

आ. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीत जागा …………. मध्ये आहे. 

i) गण 2   ii) गण 16   iii) आवर्त 2   iv) डी – खंड 

उत्तर : i) गण 2

इ. मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसूत्र XCl आहे. ही संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X ही मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल ?

i) Na   ii) Mg   iii) Al   iv) Si 

उत्तर : i) Na

ई. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत ?

i) s – खंड   ii) p – खंड   iii) d – खंड   iv) f – खंड 

उत्तर : p – खंड

प्रश्न 3. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. या मूलद्रव्यचा अणुअंक किती ?

उत्तर :

अणुअंक – 12 

आ. या मूलद्रव्याचा गण कोणता ?

उत्तर :

गण – 2 

इ. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे ?

उत्तर :

आवर्त – 3 

ई. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील ? (कंसात अणुअंक दिले आहेत) 

N(7), Be(4), Ar(18), Cl(17)

उत्तर : 

रासायनिक गुणधर्म Be सारखे

प्रश्न 4. दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरुपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. 

अ. 3Li, 14Si, 2He, 11Na, 15P

यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती ?

उत्तर :

 मूलद्रव्ये 

 संरुपण 

 आवर्ताची संख्या

 3Li

 2, 1 

 2

 14Si

 2, 8, 4

 3

 2He

 2

 1

 11Na

 2, 8, 1 

 3

 15P

 2, 8, 5 

 3

14Si, 11Na, 15P ही मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तात आहेत. कारण यांच्या अणूसंरचनेत तीन कक्षा आहेत. 

आ. 1H, 7N, 20Ca, 16S, 4Be, 18Ar

यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती ?

उत्तर :

 मूलद्रव्ये

 संरुपण

 आवर्ताची संख्या

 1H

 1

 1 

 7N

 2, 5 

 5

 20Ca

 2, 8, 8, 2 

 2 

 16S

 2, 8, 6 

 6 

 4Be

 2, 2 

 2 

 18Ar

 2, 8, 8 

 8

20Ca, 4Be हे अणू दुसऱ्या गणातील आहेत कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. 

इ. 7N, 6C, 8O, 5B, 13Al,

यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते ?

उत्तर :

 मूलद्रव्ये 

 इलेक्ट्रॉन संरूपण 

 7N

 2, 5 

 6C

 2, 4 

 8O

 2, 6

 5B

 2, 3 

 13Al

 2, 8, 3 

बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन स्विकारून ऋण – आयन बनण्याची क्षमता 8O ची सर्वात जास्त आहे. कारण बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी 8O ला फक्त दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे व इतर अणुंना दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लागतात. म्हणून 8O हा सर्वात जास्त विद्युत ऋण मूलद्रव्य आहे.  

ई. 4Be, 6C, 8O, 5B, 13Al,

यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते ?

उत्तर :

 मूलद्रव्ये 

इलेक्ट्रॉन संरूपण   

 4Be

 2, 2 

 6C

 2, 4 

 8O

 2, 6 

 5B

 2, 3 

 13Al

 2, 8, 3

 बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमातून धन आयन तयार करण्याची क्षमता 4Be ची सर्वात जास्त आहे. कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत ते गमावणे सहज शक्य आहे. कारण इतर अणुंना दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गमवावे लगतात. म्हणून ते तुलनात्मकदृष्ट्या कठीण आहे. 

 4Be हा सर्वात जास्त विद्युतधन आहे.  

उ. 11Na, 15P, 17Cl, 14Si, 12Mg

यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता ?

उत्तर :

 अणू 

संरूपण  

केंद्रकीय प्रभार  

इलेक्ट्रॉन कक्षा 

 11Na

 2, 8, 1 

11  

 15P

 2, 8, 5 

 15

 3

 17Cl

 2, 8, 7 

17  

 3

 14Si

 2, 8, 4 

14  

 

 12Mg

 2, 8, 2 

12  

3  

11Na मध्ये केंद्रकीय धन प्रभार 11 असून इलेक्ट्रॉन कक्षा तीन आहेत. धन प्रभार कमी असल्यामुळे केंद्रकाकडे इलेक्ट्रॉनला ओढून घेणारी कक्षा कमी आहे. म्हणून आकारमान सर्वाधिक आहे. 

त्यामुळे 11Na सर्वात मोठा अणू आहे. 

ऊ. 19K, 3Li, 11Na, 4Be

यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणु कोणता ?

उत्तर :

 अणू 

संरूपण  

आवर्ताची संख्या  

 19K

 2, 8, 8, 1 

 19

 3Li

 2, 1 

 3  

 11Na

 2, 8, 1 

 11

 4Be

 2, 2

 4 

4Be अणूच्या एकूण दोन कक्षा असून धन केंद्रकीय प्रभार 4 आहे. तर 3Li मध्ये हा प्रभार 3 आहे. जेवढा तेवढे केंद्राकडे ओढणारे बल जास्त असते व त्यामुळे अणूचा आकार लहान होतो. 

म्हणून 4Be हा सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला रेणु आहे.  

ए. 13Al, 14Si, 11Na, 12Mg, 16S

यांच्यापैकी सर्वाधिक धातू – गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते ?

उत्तर :

 मूलद्रव्ये 

इलेक्ट्रॉन संरूपण  

धन आयन तयार होण्यासाठी गमवावे लागणारे इलेक्ट्रॉन   

 13Al

 2, 8, 3 

 3

 14Si

 2, 8, 4 

 4

 11Na

 2, 8, 1 

 1

 12Mg

 2, 8, 2

 2

 16S

 2, 8, 6

 6

Na ला सर्वात कमी इलेक्ट्रॉन गमवावे लागतात ते सहज शक्य होते म्हणून 11Na सर्वाधिक धातू – गुणधर्म असलेला अणू आहे. 

ऐ. 6C, 3Li, 9F, 7N, 8O

यांच्यापैकी सर्वाधिक अधातू – गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते ?

उत्तर :

 मूलद्रव्ये

 संरचना 

ऋण आयन तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन संरचना  

 6C

 2, 4 

 4

 3Li

 2, 1 

 7

 9F

 2, 7 

 1

 7N

 2, 5 

 2

 8O

 2, 6 

 2

ऋण आयन तयार करण्यासाठी 9Fe ला सर्वात कमी इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत स्विकारावे लागतात. ते सहज शक्य आहे. म्हणून 9Fe हा सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला अणू आहे.  

प्रश्न 5. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. 

अ. सर्वात लहान आकारमानाचा अणू 

उत्तर :

H

आ. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू 

उत्तर :

H

इ. सर्वाधिक विद्युतऋण अणू 

उत्तर :

F

ई. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू

उत्तर :

He 

उ. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू 

उत्तर ;

प्रश्न 6. थोडक्यात टिपा लिहा. 

अ. मेंडेलीव्हचा आवर्ती नियम 

उत्तर :

मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणूवस्तुमानांचे आवर्तीफल असते. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलीव्हने त्यावेळी माहित असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी अणू वस्तुमानांकाच्या चढच्या क्रमाने केली. या मांडणीनुसार असे दिसून आले की, काही ठराविक अवधीनंतर रासायनिक व भोेतिक गुणधर्मात सारखेपणा असलेल्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते.   

आ. आधुनिक आवर्तसारणीची रचना

उत्तर :

आधुनिक आवर्तसारणी मध्ये – 

i) सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तने म्हणतात. 

ii) अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. 

iii) आडव्या उभ्या रांगामुळे चौकटी तयार होतात. प्रत्येक चौकटीत एक एक याप्रमाणे मूलद्रव्याची नावे व  अणू अंक लिहिलेले असतात. 

iv) तळाशी आणखी दोन ओळी आहेत. त्यांना लॅन्थचनाइड व ऑक्टिनाइड श्रेणी म्हणतात. 

v) एकूण 118 चौकटीत, प्रत्येक चौकटीत एक प्रमाणे 118 मूलद्रव्ये दाखविली आहेत. 

vi) संपूर्ण आवर्त सारणी चार खंडात विभागली आहे. 

  S खंड 

गण 1 व गण 2  

 P खंड 

 गण 13 ते गण 18 

 D खंड 

 गण 3 ते गण 12 

 F खंड 

 तळाच्या तीन ओळी

vii) नागमोडी रेषा – P खंडातून एक नागमोडी रेषा जाते ह्या रेषेच्या डाव्या अंगास धातू तर उजव्या अंगास अधातू व रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. 

viii) यातील सर्व मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणू अंकानुसार केलेली आहे.   

इ. समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान

उत्तर :

समस्थानिके म्हणजे अणू अंक तोच पण अणूवस्तुमान भिन्न असलेले मूलद्रव्याचे अणू. त्याचे रासायनिक गुणधर्म अर्थातच समान असतात. मेंडेलीव्हची सारणी अणुवस्तूमानाप्रमाणे तयार केलेली असल्यामुळे समस्थानिकांना त्या सारणीत सामावून घेणे, योग्य जागी ठेवणे शक्य नव्हते. 

पण त्यानंतर मोसले या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची मांडणी अणू अंकानुसार केली त्यामुळे समस्थानिकांना या सारणीत सामावून घेणे शक्य झाले. एकाच चोेेकटीत सर्व समस्थानिके दाखविता आली. 

प्रश्न 7. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते

उत्तर :

i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो.  

ii) वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.

आ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो

उत्तर :

एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. पण केंद्रकावरील धन प्रभार वाढत जातो. (कारण इलेक्ट्रॉनची संख्या एक एक ने वाढत जाते). त्यामुळे केंद्र व इलेक्ट्रॉन यातील आकर्षण बल वाढून अणूत्रिज्या कमी होते. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावणे अणूला कठीण होत जाते. अर्थात इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो.  

इ. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. 

उत्तर :

 i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.  

ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ई. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. 

उत्तर :

i) मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.   

ii) गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा- इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.

उ. तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्ये आहेत. 

उत्तर :

i) आधुनिक आवर्तसारणीत सात आडव्या ओळी असून, त्यांना आवर्त म्हणतात. आवर्तात मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. तिसऱ्या आवता॑ति 8 मूलद्रव्ये आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. 

ii) तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही इलेक्ट्रॉन संरूपण व इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमावरून ठरते.

 अणुअंक 

 11

 12

 13

 14

 15

 16

 17

 18

 मूलद्रव्ये 

 Na 

 Mg 

 Al 

 Si 

 P

 S

 Cl 

 Ar 


अरगॉन (Ar) हे तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे. याची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. यात इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते. Ar हे मूलद्रव्य शून्य गणात येत असल्याने तिसऱ्या आवर्तामध्ये आठ मूलद्रव्ये असतात.


प्रश्न 8. दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. 

अ. K , L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त. 

उत्तर :

तिसरे आवर्त


आ. शून्य संयुजा असलेला गण 

उत्तर :

अठरावा गण किंवा शून्य गण 


इ. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल 

उत्तर :

हॅलोजन्स 


ई. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल 

उत्तर :

अल्क धातू. (गण – 1)


उ. संयुजा 2 असलेल्या धातूंचे कुल 

उत्तर :

अल्क मृदा धातू (गण – 2)


ऊ. दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामधील धातुसदृश्य 

उत्तर :

5B, 14Si


ए. तिसऱ्या आवर्तामध्ये अधातू

उत्तर :

P, S, Cl, Ar   


ऐ. संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये 

उत्तर :

Ti, Zr 

इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय

इयत्ता दहावी दुसरा धडा इतिहास लेखन भारतीय परंपरा

इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय 

इयत्ता दहावी इतिहास स्वाध्याय



 

 

१. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक…………… हे होत.

उत्तर : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर हे होत.

2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद …………. यांनी केला.

उत्तर : हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.

ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 

1. हू वेअर द शूद्राज  –  वंचितांचा इतिहास

2. स्त्रीपुरुष तुलना  –  स्त्रीवादी लेखन

3. द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857  –  मार्क्सवादी इतिहास

4. ग्रँड डफ  –  वसाहतीवादी इतिहास

उत्तर : चुकीची जोडी  : द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857  –  मार्क्सवादी इतिहास

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली. 

उत्तर :

i) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.

ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.

iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच; त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 

उत्तर :

i)  ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.

ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.

iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.

iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

३. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय. 

उत्तर :

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ हा एक प्रमुख प्रवाह आहे.

i) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला ‘मार्क्सवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

ii) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

iii) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.

2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा. 

उत्तर :

भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे –

i) ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.

ii) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.

iii) केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.

iv) आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.

v) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

vi) स्थल काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते.

४.  अ ) पुढील तक्ता पूर्ण करा. 

 जेम्स मिल

 द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया

 जेम्स ग्रँड डफ

……………………………

 ……………………….

 द हिस्टरी ऑफ इंडिया

 श्री.अ.डांगे

 …………………………..

 ………………………..

 हू वेअर द शूद्राज

उत्तर :

 जेम्स मिल

 द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया

 जेम्स ग्रँड डफ

 द हिस्टरी ऑफ द मराठाज 

 माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन  

 द हिस्टरी ऑफ इंडिया

 श्री.अ.डांगे

 प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 हू वेअर द शूद्राज

ब ) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

५. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1. प्राच्यवादी इतिहासलेखन

उत्तर :

i) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वे कडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना ‘प्राच्यवादी अभ्यासक’ असे म्हणतात.

ii) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला ‘प्राच्यवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

iii) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

2. राष्ट्रवादी इतिहासलेखन

उत्तर :

i) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास ‘राष्ट्रवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

ii) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला.

iii) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

3. वंचितांचा इतिहास

उत्तर :

i) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला ‘वंचितांचा इतिहास’ असे म्हणतात.

ii) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.

iii) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.

iv) भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.