पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?

उत्तर :

i) भारतात देशा-परदेशांतील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

ii) पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

iii) पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमांतून लोकांना रोजगार निर्माण होतो.

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?

उत्तर :

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते.

i) ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

ii) पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मिळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.

iii) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशीचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

iv) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते.

v) उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

उत्तर :

कारण – i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे.

ii) तसेच भारतातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेला जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

उत्तर :

कारण – i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षवर येत असतात.

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.

उत्तर :

उपाय – i) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे रहदारी पोलिस खात्यांशी लक्ष केंद्रित करावे. त्यासोबत नागरिकांनी ही जागृक राहणे आवश्यक आहे.

ii) बहुतांश लोक प्रवासासाठी खाजगी वाहने वापरतात. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक बससेवा, रेल्वेसेवा वापरावी. त्यामुळे वाहतुक कोंडी होणार नाही.

iii) सर्वांनी रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर वाहतुकीची कोंडी होणार नाही.

iv) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध व्हाव्यात.

नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे

नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उत्तर :

उपाय i) स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते अवैध मार्गाने पैसे कमवतात. यासाठी तेथे शासनातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

ii) मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चोरी, मारामाऱ्या, खून यांसारख्या गुन्ह्यांपासून परावृत्त करावे.

iii) पोलिस व न्याययंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसेल.

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली.

उत्तर :

उपाय – i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बॅड , फटाक्यांचा वापर टाळावा.

ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये.

iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये.

iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.

v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी.

vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वानी करावे.

नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत

नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

उत्तर :

उपाय – i) नागरी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे त्यासाठी सांडपाणी कचरा न अडकता वाहून जाईल अशी यंत्रणा तयार करावी. तसेच नागरिकांनीही यासंबंधी तत्पर असावे.

ii) सांडपाणी व कचऱ्याच्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करावी. वेळोवेळी स्वच्छता करावी.

iii) नागरी भागात कचऱ्याची समस्या ही गंभीर समस्या आहे कचरा हा घराबाहेर जमा न करता कचरापेटीतच टाकावा. यामुळे रोग उद्भवणार नाही.

iv) प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी.

v) अशुद्ध पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांना माहिती करून द्यावी. त्यावर उपचारासाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे.

विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा

विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा.

उत्तर :

i) ब्राझील देशात उत्तरेकडील गियाना उच्चभूमीच्या व अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात दाट सदाहरित वर्षावने आढळतात.

ii) ब्राझील देशात मध्यभागात पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात पानझडी वने व सॅव्हाना प्रकारची वने आढळतात.

iii) ब्राझील देशात ब्राझील उच्चभूमीच्या भागात समशीतोष्ण वने आढळतात.

iv) पॅटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात.

v) ब्राझील देशात ईशान्य भागातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजेच शुष्क अवर्षण चतुष्कोण प्रदेशात काटेरी झुडपी वने आढळतात.

चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला

चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला

उत्तर :

सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केला.