मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते

मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हटले जाते

उत्तर :

i) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.

ii) त्यांनी 1928, 1932, आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.

iii) 1932 च्या ऑलिम्पिक त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध 25 गोल केले.

iv) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात 400 च्या वर गोल केले.

म्हणून, त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हटले जाते.

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.

i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

iii) उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.

iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

उत्तर :

i) मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यांतून झाला.

ii) लळिते आणि लोकनाट्ये यांत मराठी नाटकांची बीजे रोवली गेली.

iii) १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील. कथानकावरही त्यांनी नाटक रचले.

iv) गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत. नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना विष्णुदास भावे यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना ‘मराठी रंगभूमीचे जनक’ म्हणून ओळखले जाते.

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली

उत्तर :

i) संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.

ii) या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती.

iii) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.

iv) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.

चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे

चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे

उत्तर :

i) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

ii) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.

iii) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.

iv) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.  

आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.  

उत्तर :

i) आईवडिलांची जनुके त्यांच्या जनक पेशीतून, म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांतून संततीत जातात. 

ii) काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. यं जनुकांची वैशिष्टये जशी असतील, तसेच गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. 

iii) त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. 

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

उत्तर :

जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात

शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात

उत्तर :

i) शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यातम कक्षा पूर्ण असतात.

ii) या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सरूपण स्थिर असते . ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किवा भागीदारी करीत नाहीत; तसेच रासायनिक अभिक्रियेचे भाग घेत नाहीत. ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात, म्हणून शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात.

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

उत्तर :

i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.

ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.

iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.