ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?

उत्तर :

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

i) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.

ii) निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.

iii) ब्राझीलमध्ये ‘रोका’ आणि भारतात ‘झूम’ यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते.

iv) लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात.

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर :

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यक आहे –

i) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.

iii) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

iv) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांना सहभाग वाढला पाहिजे.

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का ?

उत्तर :

i) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक असते.

ii) पक्षाचा अध्यक्ष, खनिजदार, सचिव या पदांच्या दर तीन वर्षानी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून निवडणुका घ्याव्या लागतात. अन्यथा त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करतो.

iii) या निवडणुकांमुळे पक्षावर एकाच व्यक्तीचे नियंत्रण राहत नाही.

iv) त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही टिकून राहते. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

उत्तर :

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे.

उत्तर :

i) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तस 30 मिनिटे मागे आहे.

ii) भारत आंतरराष्ट्रीय वररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.

iii) ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

उत्तर :

i) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.

ii) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.

iii) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

iii) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे 5.6 टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2.7 टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.

iii) ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे

भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

उत्तर :

i) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या ‘झूम’ सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका’ या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.

iii) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याची दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

उत्तर :

i) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.

ii) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

iii) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात ‘झूम’ यासारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.