नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे

नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उत्तर :

उपाय i) स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते अवैध मार्गाने पैसे कमवतात. यासाठी तेथे शासनातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

ii) मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चोरी, मारामाऱ्या, खून यांसारख्या गुन्ह्यांपासून परावृत्त करावे.

iii) पोलिस व न्याययंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसेल.

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली.

उत्तर :

उपाय – i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बॅड , फटाक्यांचा वापर टाळावा.

ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये.

iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये.

iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.

v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी.

vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वानी करावे.

नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत

नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

उत्तर :

उपाय – i) नागरी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे त्यासाठी सांडपाणी कचरा न अडकता वाहून जाईल अशी यंत्रणा तयार करावी. तसेच नागरिकांनीही यासंबंधी तत्पर असावे.

ii) सांडपाणी व कचऱ्याच्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करावी. वेळोवेळी स्वच्छता करावी.

iii) नागरी भागात कचऱ्याची समस्या ही गंभीर समस्या आहे कचरा हा घराबाहेर जमा न करता कचरापेटीतच टाकावा. यामुळे रोग उद्भवणार नाही.

iv) प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी.

v) अशुद्ध पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांना माहिती करून द्यावी. त्यावर उपचारासाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे.

विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा

विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वनप्रदेशांचे वर्गीकरण करा.

उत्तर :

i) ब्राझील देशात उत्तरेकडील गियाना उच्चभूमीच्या व अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात दाट सदाहरित वर्षावने आढळतात.

ii) ब्राझील देशात मध्यभागात पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात पानझडी वने व सॅव्हाना प्रकारची वने आढळतात.

iii) ब्राझील देशात ब्राझील उच्चभूमीच्या भागात समशीतोष्ण वने आढळतात.

iv) पॅटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात.

v) ब्राझील देशात ईशान्य भागातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजेच शुष्क अवर्षण चतुष्कोण प्रदेशात काटेरी झुडपी वने आढळतात.

चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला

चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला

उत्तर :

सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केला.

भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा

भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.

ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या.

iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.

iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.

भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा

भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा

उत्तर :

खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते.

i) खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत.

ii) व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.

iii) खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात.

iv) ‘षट्कार’ नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे.

v) द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात.

vi) इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.

पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान स्वाध्याय

पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान स्वाध्याय

पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता दहावी

1. खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. 

अ. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पध्दतींचा वापर प्रामुख्याने …………. साठी केला जातो. 

उत्तर :

कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पध्दतींचा वापर प्रामुख्याने पशुसंवंर्धना साठी केला जातो. 

आ. ………….. ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय. 

उत्तर : 

मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय. 

इ. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे …………… होय. 

उत्तर :

इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे मधुमेह होय. 

ई. …………….. या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे. 

उत्तर :

मत्स्यव्यवसाय या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे. 

2. जोड्या जुळवा. 

   ‘अ’  गट     ‘ब’ गट 
अ. इंटरफेरॉन 
आ. फॅक्टर
इ. सोमॅटोस्टॅटीन
ई. इंटरल्युकीन 
1. मधुमेह 
2. ठेंगूपणा
3. विषाणू संक्रमण 
4. कॅन्सर
5. हिमोफिलीया 

उत्तर :

   ‘अ’  गट     ‘ब’ गट 
अ. इंटरफेरॉन 
आ. फॅक्टर
इ. सोमॅटोस्टॅटीन
ई. इंटरल्युकीन 
3. विषाणू संक्रमण 
5. हिमोफिलीया 
2. ठेंगूपणा
4. कॅन्सर

3. खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

अ. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो. 

उत्तर : 

गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीमध्ये बदल घडवून आणला जातो. 

आ. बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात. 

उत्तर :

बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकाला जोडतात. 

4. टिपा लिहा. 

अ. जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग

उत्तर :

पीक जैवतंत्रज्ञान : कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. 

संकरित बियाणे : दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके : बाहेरच्या जनुकाला एखादया पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात.

बीटी कापूस : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका  उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते.

बीटी वांगे : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूंपासून मिळवलेले जनुक वापरुन बी.टी. बांगे तयार केले जाते. बी.टी. कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण कीडीचा नाश करते.  

गोल्डन राईस : तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्त्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस – 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटिन सापडते.

तणनाशकरोधी वनस्पती : तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहेत. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य आहे. 

जैविक खते : रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमत वाढते. यामध्ये प्रामुख्याने ऱ्हायझोबिअम, अझोटोबॅक्टर, नोस्टॉक, अँनाबीना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. 

आ. औषधी वनस्पतींचे महत्त्व

उत्तर :

i) औषधी वनस्पती हा आयुर्वेदाचा मुख्य आधार होय. 

ii) औषधी बरोबर विश्वस्तरावर मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये ही औषधी वनस्पती मुख्य भूमिका बजावते.

iii) मुख्यतः अनेक औषधी वनस्पती पोषणाचा मूलभूत आधार मानल्या जातात. 

iv) दंतमंजनासाठी औषधी वनस्पतीचा उपयोग होतो. 

v) औषधी वनस्पती या औषध निर्मिती घटकांचा मुख्य स्रोत मानल्या जातात. 

vi) अँलोपॅथी औषधांपेक्षा वनस्पती औषधांचे दुष्परिणाम कमी असतात.

5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

अ. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता

उत्तर :

जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेली पीके, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस, तणनाशकरोधी वनस्पती व जैविक खते या वस्तूंचा उपयोग जीवनात होतो. तसेच विविध प्रकारच्या लसी,  प्रतिजैविके वापरली जातात.

आ. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल. 

उत्तर :

i) कीडनाशके ही एक प्रकारची रासायनिक विषे आहेत. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्तजाळ्यांमध्ये पसरतात. 

ii) D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीडनाशके फवारणार नाही.

iii) कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू.

iv) फवारणीच्या वेळी आपले नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू. 

v) जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ.

vi) अतिप्रमाणातील वापर टाळू.

इ. मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत. 

उत्तर :

i) मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यांनुसार चालत असते.

ii) मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये – विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.

iii) या अवयवांचे कार्य बिघडले, तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. 

iv) काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली, तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.

ई. फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा

उत्तर : 

i) फळप्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात. 

ii) फळांपासून बनविलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. उदा. चॉकलेट, सरबते, जॅम, जेली इत्यादी या सर्व वस्तू फळांवर प्रक्रिया करून मिळविल्या जातात. 

iii) प्रक्रिया केल्यामुळे फळे बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांची वर्षभर चव चाखता येते. 

iv) ज्या भागात फळे पिकत नाहीत अशा ठिकाणी त्या उपलब्ध करून देता येतात. 

v) बाजारपेठेत फळांची आवक वाढून दर घसरतो. अशा स्वस्त फळांवर प्रक्रिया करून चांगली किंमत मिळविता येते.

vi) प्रक्रियायुक्त फळे निर्जंतुक केल्यामुळे खाण्यासाठी सुरक्षित असतात. 

vii) आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व त्यापासून तयार झालेले पदार्थ यांचा उपयोग होतो.

viii) विशिष्ट फळे ज्या देशात पिकत नाहीत, अशा ठिकाणी निर्यात करून परकीय चलन मिळविता येते.

उ. लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा

उत्तर :

लसीकरण म्हणजे विशिष्ट रोगाच्या प्रतिकारासाठी व प्रतिक्षमता वाढविण्यासाठी दिली जाणारी लस होय. प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हंणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.

6. खालील तक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

7. रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा. 

उत्तर :

8. सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. 

अ. इन्सुलिन : मधुमेह :: इंटरक्युलिन : ………………… 

आ. इंटरफेरॉन : ……………….. :; इरिथ्रोपटीन : अँनेमिआ

इ. ………….. : ठेंगूपणा :: फॅक्टर VIII : हिमोफेलिआ

ई. श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : ……………..

उत्तर :

अ. इन्सुलिन : मधुमेह :: इंटरक्युलिन : कॅन्सर

आ. इंटरफेरॉन : विषाणू संक्रमण :: इरिथ्रोपटीन : अँनेमिआ

इ. सोमॅटोस्टॅटिन : ठेंगूपणा :: फॅक्टर VIII : हिमोफेलिआ

ई. श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : मत्स्य उत्पादन

9. जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा

उत्तर :

कुठलेही नवीन तंत्रज्ञान उदयास आले की त्याच्या फायद्याबरोबर तोटेही असतातच. जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुंच्या उत्पादनातील पदार्थांचा तसेच लागणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी झाला. लागवड वाढली तसेच उत्तमरित्या उत्पादन मिळू लागले. शेती, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचा फायदा झालेला आढळून येतो. त्याचबरोबर तोटा म्हणजे जैवतंत्रज्ञानासाठी मोठमोठ्या जागेची आवश्यकता असून त्यासाठी खर्चही जास्त लागतो. जैवतंत्रज्ञानासाठी आवश्यक गोष्टी या महागड्या असतात. जैवतंत्रज्ञानात बिघाड झाल्यास अनावश्यक विकृत प्रजाती निर्माण होऊ शकते ज्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम पडू शकतो.

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी 

१. अ )  दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. कुकने …………….. विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. 

उत्तर :

कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. 

2. महाबळेश्वरजवळील भिलार हे ………….. गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 

उत्तर :

महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 

ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

1. माथेरान  –  थंड हवेचे ठिकाण 

2. ताडोबा  –  लेणी

3. कोल्हापूर  –  देवस्थान 

4. अजिंठा  – जागतिक वारसास्थळ

उत्तर : 

चुकीची जोडी : ताडोबा  –  लेणी

दुरुस्त जोडी :  ताडोबा  –  अभयारण्य

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. 

उत्तर :

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. 

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.

2. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 

उत्तर :

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण –

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. 

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो परदेशातून येतात. 

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.

३. टिपा लिहा. 

1. पर्यटनाची परंपरा. 

उत्तर :

i) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.

ii) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे हे त्यांचे धार्मिक पर्यटन होते. 

iii) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.

iv) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.

2. मार्को पोलो. 

उत्तर :

i) मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला.

ii) तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा पहिला तो युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्त्रोतग्रंथ ठरला. 

iii) आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.

iv) भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविदया यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

3. कृषी पर्यटन. 

उत्तर :

i) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे ‘कृषी पर्यटन’ होय.

ii) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.

iii) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य’ म्हणून घोषित झाले आहे.

iv) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझ्राएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विदयार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

उत्तर :

आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे –

i) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. 

ii) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे.

iii) त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

iv) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. 

v) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुमाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

vi) दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

2. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

उत्तर :

i) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो ?

ii) तेथील हस्तोदयोग व कुटीरोदयोग यांचा विकास होतो. त्या वस्तुंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते तेथील खादयपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. तसेच पर्यटक तेथील आठवण म्हणून स्थानिक वसस्तु विकत घेतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ होते. 

iii) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, ऑटोरिक्षा, टॅक्सी यासारख्या वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो.

3. आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?

उत्तर :

i) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आम्ही आपला परिसर स्वच्छ ठेवू. 

ii) रस्त्याच्या दुतर्फा मनमोहक झाडे. फूलझाडे लावू. 

iii) परिसरातील नदी, तलाव यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयाला संपर्क साधून प्रयत्न करू. या नदीत, तलावात, पर्यटकांनाही पाणी बॉटल, प्लॅस्टिक, नारळाची टरफले यासारखा कचरा टाकण्यासाठी सक्त मनाई करू. तेथे कचऱ्यासाठी कचऱ्याचे डबे ठेवू. 

iv) जवळच्या ऐतिहासिक वास्तुंची काळजी घेऊ. 

v) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम वॉटर पार्क सारखे प्रकल्प सरकारच्या मदतीने राबवू.

५. पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा. 

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे….

उत्तर :

६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. 

उत्तर :

पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत –

i) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग.

ii) खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग.

iii) हस्तोदयोग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने.

iv) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग.

v) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग.

vi) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

2. पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार –

i) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.

ii) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.

iii) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोर्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते.

विद्युत इस्त्रीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात ते सांगा

विद्युत इस्त्रीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते सांगा.

उत्तर :

विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकतेच्या संमिश्राच्या तारेचे कुंतल धातूच्या जड ठोकळ्यांमध्ये अभ्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते. या कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित केली असता, ते तापून निर्माण होणारी उष्णता धातूच्या ठोकळ्यांना मिळते. त्यामुळे इस्त्रीची खालची बाजू तापून तिचा उपयोग कपड्यांना इस्त्री करण्यासाठी करता येतो. इस्त्रीला प्लास्टिकसारख्या विसंवाहकाची मूठ बसवलेली असते.

अभ्रक विद्युत रोधक असल्याने त्यातून धातूच्या ठोकळ्यापर्यंत विद्युतधारा पोहोचू शकत नाही. परिणामी इस्त्री वापरणाऱ्याचा विजेच्या धक्क्यापासून बचाव होतो.