लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या जाणवतात

लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या जाणवतात ?

उत्तर :

लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या जाणवतात. या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त व पुरुषांचे प्रमाण कमी आहे किंवा पुरुषांचे जास्त व स्त्रियांचे कमी प्रमाण असेल अशा ठिकाणी वेश्या व्यवसायाला चालना मिळते. विवाहासाठी जोडीदार मिळणे कठीण होते. उदा. गुजरात, राजस्थान, हरियाणा यासारख्या प्रदेशात मुलींची संख्या कमी असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो. विवाहासाठी मुलींचे अपहरण दुसऱ्या राज्यातून (जिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे.) केले जाते. तसेच मुलींची तस्करी केली जाते. यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.

स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय

स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय

उत्तर :

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुष सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iii) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

iv) १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

टिपा लिहा ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्य:स्थिती


टिपा लिहा ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्य:स्थिती

उत्तर :

i) ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले.

ii) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. १९८५ पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.

iii) विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यांतून हा देश सावरला आहे.

iv) जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्य:स्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते.

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा

उत्तर :

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम :

i) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या सद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका काच प्रतलात असतात.

ii) दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता sin i/sin r हे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून, r हा अपवर्ती कोन आहे.

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा

उत्तर :

भारताची प्राकृतिक रचना ब्राझीलची प्राकृतिक रचना
i) भारताची प्राकृतिक रचना ही भारतीय भूमीची समुद्रपाटीपासूनची उंची, भू-उतार, खडक प्रकार इत्यादी घटकांतील विविधता विचारात घेऊन केली आहे.
ii) भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
1. हिमालय
2. उत्तर भारतीय मैदान
3. द्वीपकल्प
4. किनारपट्टीचा प्रदेश
5. द्वीपसमूह
iii) भारतात अतिप्राचीन पठारे व अतिउंच पर्वत आहेत.
iv) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा तरीबहुज प्रदेश बनतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तसेच हा भाग विस्तीर्ण मैदानांचा आहे.
v) भारतात उत्तर वाहिनी, दक्षिण वाहिनी, पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
i) ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझाॅन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने दोन भाग पडतात.
ii) ब्राझीलचे पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात.
1. उच्चभूमी
2. अजस्त्र कडा
3. किनारी प्रदेश
4. मैदानी प्रदेश
5. द्वीपसमूह
iii) ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे.
iv) उत्तरेकडील ॲमेझाॅनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही विस्तीर्ण मैदाने नाहीत.
v) ब्राझीलमध्ये पूर्व वाहिनी नद्या आहेत.

पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा

पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा

उत्तर :

i) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे ‘पोवाडा’ होय,

ii) पोवाडा हा गदय-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.

iii) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.

iv) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.

v) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.

vi) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो

एका वाक्यात उत्तरे लिहा

ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

उत्तर :

ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग अवर्षण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो.

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर :

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

i) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.

ii) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्यक्ष पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो.

iii) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.

iv) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा

उत्तर :

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत.

i) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.

ii) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते.

iii) ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

iv) विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.

v) खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूच माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.

vi) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) अर्थव्यवस्थेत बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.