विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका 2022

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :

i) सोने विलेपित दागिने हे ……………………. चे एक उदाहरण आहे. 

अ) विद्युत विलेपन

ब) संमिश्रीकरण

क) धनाग्रीकरण

ड) जस्त विलेपन

उत्तर :

सोने विलेपित दागिने हे विद्युत विलेपन चे एक उदाहरण आहे.

ii) उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य …………………. च्या नियमावर आधारित आहे. 

अ) न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम

ब) न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम

क) न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम

ड) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

उत्तर :

उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम च्या नियमावर आधारित आहे.

iii) L.P.G. मध्ये ………………. हा एक ज्वलनशील घटक असतो. 

अ) इथेन

ब) प्रोपेन

क) मिथेन

ड) इथिन

उत्तर :

L.P.G. मध्ये प्रोपेन हा एक ज्वलनशील घटक असतो.

iv) बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती ………………. आहे. 

अ) 4.0 D

ब) 0.25 D

क) -4.0 D

ड) -0.4 D

उत्तर :

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती 4.0 D आहे.

v) शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ………………. रंग सर्वात कमी वळतो. 

अ) लाल

ब) पिवळा

क) जांभळा

ड) निळा

उत्तर :

शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता लाल रंग सर्वात कमी वळतो.

ब) खालील प्रश्न सोडवा :

i) वेगळा घटक ओळखा :

INSAT, GSAT, IRS, PSLV

उत्तर :

PSLV

ii) सहसंबंध ओळखा :

गण 1 : अल्कली धातू :: ……………. : हॅलोजन

उत्तर :

गण 1 : अल्कली धातू :: गण 17 : हॅलोजन

iii) योग्य जोडी जुळवा :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

अ) 1.31

ब) 1.36

क) 1.33

उत्तर :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

क) 1.33

iv) चूक की बरोबर ते लिहा :

विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. 

उत्तर :

चूक

v) दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा :

उत्तर :

प्रोपेन-2-ओल

2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) 

i) गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. 

उत्तर :

i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.

ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ii) घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. 

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

iii) खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. 

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खादयतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) :

i) जर एका ग्रहावर एक वस्तू 5m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती ?

उत्तर :

ii) होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा. 

उत्तर :

iii) प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. 

उत्तर :

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम :

i) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या सद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका काच प्रतलात असतात.

ii) दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता sin i/sin r हे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून, r हा अपवर्ती कोन आहे.

iv) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

a) अँल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. 

उत्तर :

बॉक्साईड

b) अँल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. 

उत्तर :

सिलिका, आयर्न ऑक्साइड

v) खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून ‘अ’ आणि ‘ब’ या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा :

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्रुटी लिहा. 

उत्तर :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णाकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती.

ii) मेंडेलीव्हने आवर्तसारणीत मांडल्यानंतर खूप काळाने सम स्थानिकांचा शोध लागला समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर भिन्न अणुवस्तुमाने असल्यामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यावयाचे हे एक मोठे आव्हान होते.

iii) मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांना शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते.

iv) हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या गणात (गण VIII) हे निश्चित ठरवता आले नाही.

ii) दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा :

उत्तर :

केप्लरचा पहिला नियम :

ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.

केप्लरचा दुसरा नियम :

ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.

केप्लरचा तिसरा नियम :

सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्गहा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.

iii) खालील रासायनिक अभिक्रियाचे प्रकार ओळखा :

अ) CuSO4 + Fe  FeSO4 + Cu

उत्तर :

विस्थापन अभिक्रिया

ब) 2Mg + O2  2MgO

उत्तर :

संयोग अभिक्रिया

क) 2KClO3  2KCl + 3O2

अपघटन अभिक्रिया

iv)

v) खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही, जोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

अ) उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते. 

उत्तर :

उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णता स्थानांतरण होते.

ब) अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो ?

उत्तर :

उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो.

क) ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल ?

उत्तर :

उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता.

vi) बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

 ………………..

 ………………….

 2.

 ………………….

 अनंत अंतरावर

………………….

 3.

 …………………

 …………………

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

उत्तर :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

Fआणि 2F2 या दरम्यान

 वास्तव व उलट

 2.

नाभी F1 वर

 अनंत अंतरावर

वास्तव व उलट

 3.

 F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान

 2F1 च्या पलीकडे

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

vii) खालील संज्ञा स्पष्ट करा :

अ) धातुविज्ञान 

उत्तर :

धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरुन जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.

ब) धातुके

उत्तर :

ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात.

क) मृदा अशुद्धी

उत्तर :

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.

viii) अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा. 

उत्तर :

i) अवकाश मोहिमामुळेच आता क्षणार्धात जागतिक संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण करता येते.

ii) युद्धात शत्रुसैन्याचा सुगावा, काही नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना, आपत्ती व्यवस्थापन, खनिज साठ्यांचा शोध, व्यापार पर्यटन वाहतूक सेवांची सुलभता, जगाचे वैश्विक खेड्यात रूपांतर इत्यादी असंख्य फायदे मानवाच्या अवकाश मोहिमांमुळे लाभले आहेत.

iii) अवकाश मोहिमांमुळे सूर्यमंडल, त्यापलीकडील विश्व यांची अधिक माहिती/ज्ञान मिळण्याबरोबरच, पृथ्वीवरील मानवी जीवनातही खूप बदल झाले.

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही एक) :

i) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

अ) वरील आकृतीत दर्शविलेले यंत्र ओळखा. 

उत्तर :

आकृतीत विद्युत जनित्र हे यंत्र आहे.

ब) या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे ?

उत्तर :

हे यंत्र विद्युतचुंबकीय प्रवर्तन या तत्त्वावर कार्य करते. कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलास विद्युतधारानिर्माण होते.

क) या यंत्राचे कार्य स्पष्ट करा. 

उत्तर :

1) फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते ती ABCD या दिशेने जाते.

2) पुढील परिपथात विद्युतधारा B2 → B1 अशी गॅल्व्हाॅनोमीटर मधून जाते.

3) अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा DCBA या दिशेने जाते.

4) बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 → B2 अशी म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती निर्माण होते.

ड) या यंत्राचा उपयोग लिहा. 

उत्तर :

या यंत्राचा उपयोग यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने विद्युत निर्मिती करण्यासाठी केला जातो.

ii) अ) दिलेल्या रचना सूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा :

1) 

 

 

उत्तर :

संपृक्त

 

2)  

उत्तर :

असंपृक्त

 

ब) वरील 1) व 2) या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका सरंचना रेखाटा. 

1)

2)

 

क) समजातीय श्रेणी म्हणजे काय ?

उत्तर :

उत्तर :

कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात.

नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते

प्रश्न

 नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते.

उत्तर

 

 

i) नॅफ्थॅलीन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात.

ii) ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण पिवळा प्रकाश फेकतात, त्यामुळे ज्योत पिवळी दिसते.

तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत

प्रश्न

 तारे लुकलुकतात, पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत.

उत्तर

 

 

i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात.

ii) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदूस्रोत नसून बिंदूस्रोतांचा समूह असतो. परिणामी, वातावरण स्थिर नसले तरी, ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत.

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो

प्रश्न

जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते. 

किंवा  

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. 

किंवा 

पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो. 

उत्तर

 

 

i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न येता वरून आल्याचा भास होतो. म्हणून पाण्याची खोली कमी भासते किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो.

वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

उत्तर : 

प्रकाशझोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्गपंक्ती म्हणतात. लोलकम्मधून पांढरा प्रकाशकिरण गेल्यावर अपवर्तन होऊन आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळ्या रंगांचे किरण वेगवेगळ्या कोनांतून वळतात. तांबड्या रंगाचा किरण सर्वात कमी वळतो, तर जांभळ्या रंगाचा किरण सर्वात जास्त वळतो. प्रत्येक रंगाचे किरण लोलकामधून वेगवेगळ्या मागांनी बाहेर पडतात. बाहेर पडताना वेगवेगळ्या रंगांचे किरण विभक्त होतात. त्यामुळे सप्तरंगांची वर्णपंक्ती मिळते.

भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते ?

उत्तर

 

गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य होय.

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. A) माझी जोडी कोणाशी ?

 ‘अ’ स्तंभ 

‘ब’ स्तंभ 

1) निरोगी मानवी शरीराचे तापमान

2) पाण्याचा उत्कलन बिंदू

3) कक्ष तापमान

4) पाण्याचा गोठन बिंदू

अ) 296 K

आ) 98.6°F

इ) 0°C

ई) 212°F

उत्तर :

 ‘अ’ स्तंभ 

‘ब’ स्तंभ 

1) निरोगी मानवी शरीराचे तापमान

2) पाण्याचा उत्कलन बिंदू

3) कक्ष तापमान

4) पाण्याचा गोठन बिंदू

आ) 98.6°F

ई) 212°F

अ) 296 K

इ) 0°C 

B) कोण खर बोलतोय ?

1) पदार्थाचे तापमान ज्यूलमध्ये मोजतात.

उत्तर :

खोटे

2) उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते.

उत्तर :

खरे

3) उष्णतेचे एकक ज्यूल आहे.

उत्तर :

खोटे

4) उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात. 

उत्तर :

खोटे

5) स्थायुचे अणू स्वतंत्र असतात.

उत्तर :

खोटे

6) उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा कमी असते.

उत्तर :

खोटे

C) शोधाल तर सापडेल.

1) तापमापी हे उपकरण ………………… मोजण्यास वापरतात.

उत्तर :

तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात.

2) उष्णता मोजण्यास ……………….. हे उपकरण वापरतात.

उत्तर :

उष्णता मोजण्यास कॅलरीमापी हे उपकरण वापरतात.

3) तापमान हे वस्तूतील अणूंच्या ……………….. गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

उत्तर :

तापमान हे वस्तूतील अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

4) एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या ………………… गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

उत्तर :

एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

प्रश्न. 2. निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौरचुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर तयार होईल व का ?

 उत्तर :

शिवानीचा चहा लवकर होईल.  कारण चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे. पण उष्णता पुरविण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे. त्यामुळे आवश्यक ती उष्णता गॅस कमी वेळात पुरवितो.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो ?

उत्तर :

वैद्यकीय तापमापीचा उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो.

या तापमापीत एक अरुंद काचेची नळी असते. तिच्या एकाटोकाकडे फुगा असतो. त्यात अल्कोहोल भरतात. नळीतील उरलेली जागा निर्वात केलेली असते. हे टोक बंद असते. ह्या तापमापीवर 35°C ते 42°C पर्यंत खुणा केलेल्या असतात. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37°C असते. रोग्याच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोग्याच्या तोंडात किंवा काखेत ठेवतात. एका मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात. सध्या डिजिटल तापमापी सुद्धा वापरतात.

प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी – 

ही तापमापी वैद्यकीय तापमापी सारखीच असते पण त्यावरील खूणा वेगळ्या असतात. याच्या साहाय्याने मोजलेल्या तापमानाचा आवाका मोठा असतो. प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी वापरतात. त्यापैकी कमाल व किमान तापमापीने विशिष्ट कालावधीतील कमाल व किमान तापमानाची नोंद करता येते.

2) उष्णता व तापमान काय फरक आहे ? त्यांची एकके कोणती ? 

उत्तर :

पदार्थांतील अणू रेणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थांतील उष्णतेचे मापक असते. तर तापमान अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते.

दोन वस्तूचे तापमान समान समान असते. असेल तर त्यातील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असते. 

तापमानाचे एकक अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाईट किंवा केल्वीन आहे. उष्णतेचे एकक कॅलरी किंवा किलोकॅलरी आहे.

3) कॅलरीमापीची रचना आकृतीसह समजवा. 

उत्तर :

कॅलरीमापीचा उपयोग वस्तूतील उष्णता ऊर्जा मोजण्यासाठी होतो.

कॅलरीमापीची आकृती पहा. यात एखाद्या थर्मासफ्लास्कप्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. या मांडणीमुळे भांड्यात ठेवलेल्या वस्तूची उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरील उष्णता आत प्रवेश करू शकत नाही. अर्थात आतील भांडे व त्यातील वस्तू औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. त्यामुळे कॅलरीमापीत ठेवलेल्या वस्तूपैकी उष्ण वस्तू थंड वस्तूला उष्णता देते. ही देवाणघेवाण होऊन दोन्ही वस्तूचे तापमान समान होते. 

येथे उष्ण वस्तूने दिलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता हे उष्णता विनिमयाचे तत्त्व गृहीत धरण्यात येते.  

4) रेल्वेच्या रूळांत ठरावीक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा. 

उत्तर :

तापमानाच्या बदलानुसार रेल्वेचे रूळ आकुंचन किंवा प्रसरण पावतात. मुळे त्यांची लांबी कमी जास्त होते. दोन रूळामध्ये फट ठेवली नाहीतर रण होण्यास वाव नसल्यामुळे रेल्वेचे रूळ वाकडे होतील त्यामुळे अपघात ऊ शकतो. हे टाळण्यासाठी रेल्वे रूळात फट ठेवली असते.

5) वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा. 

उत्तर :

द्रवाचा प्रसरणांक – समजा द्रवाचे सुरुवातीचे आकारमान V1 आहे व ∆T एवढ्या तापमान बदलामुळे त्याचे आकारमान V2 होते.

यावरून

V2 = V1 (1+β∆T)

यात B ला द्रवाचा प्रसरणांक म्हणतात.

वायूचा प्रसरणांक – वायूला ठरावीक आकार व आकारमान नसते. तापमान वाढल्यास आकारमान वाढते. त्याच वेळेस त्याचा दाब बदलतो. वायुचा दाब कायम ठेऊन, तापमानातील बदलामुळे त्याच्या आकारमानातील बदल -अभ्यासण्यासाठी सरकणारा दट्ट्या (Piston) असलेली बाटली वापरतात.

पिस्टनच्या साहाय्याने वायूवरील दाब कायम ठेऊन तापमान वाढीमुळे आकारमानातील वाढ किती होते ते मोजतात.

समजा ∆T एवढ्या तापमान फरकामुळे वायूचे आकारमान V, पासून V, पर्यंत बदलते.

यावरून

V2 = V1 (1 + β∆T)

यातला β वायुचा प्रसरणांक म्हणतात.

प्रश्न. 4. खालील उदाहरणे सोडवा. 

1) फॅरेनहाईट एकाकातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एकाकातील तापमानाच्या दुप्पट असेल ?

उत्तर :

 

2) एक पूल 20m लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान  18°C असताना दोन सळ्यांत 4cm अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील ?

उत्तर :

3) आयफेल टॉवरची उंची 15°C वर 324m असल्यास व तो टॉवर लोखंडाचा असल्यास, 30°C ला त्याची उंची किती cm ने वाढेल ?

उत्तर :

 

4) अ व ब पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमश: c व 2c आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल ?

उत्तर :


5) एक 3kg वस्तुमानाची वस्तु 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10°C पासून 70°C पर्यंत वाढते.  वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे ?

उत्तर :

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय इयत्ता आठवी 

प्रश्न. 1. कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा.

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

1) रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ………………. काढतात.

उत्तर :

रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बरोबर चे चिन्ह काढतात.

2) लोखंडाचे गंजणे हा ………………… होणारा रासायनिक बदल आहे. 

उत्तर :

लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. 

3) अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट …………………… निर्माण होतो त्यावरून ओळखता येते.

उत्तर :

अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते.

4) परीक्षानळीतील कॅल्शिअम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण ………………………. होते.

उत्तर :

परीक्षानळीतील कॅल्शिअम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते.

5) लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा ……………………. बदल आहे.

उत्तर :

लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा रासायनिक बदल आहे.

6) श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक ……………………. आहे.

उत्तर :

श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिकारक आहे.

7) सोडिअम क्लोराइड हे ……………………. संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे …………………….. संयुग आहे.

उत्तर :

सोडिअम क्लोराइड हे आयनिक संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे सहसंयुज संयुग आहे.

8) हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन ………………………. पूर्ण असते.

उत्तर :

हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण असते.

9) क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे ……………………. होऊन Cl हा रेणू तयार होतो.

उत्तर :

क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संदान होऊन Cl हा रेणू तयार होतो.

प्रश्न. 2. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा.

1) श्वसन हा एक रासायनिक बदल आहे.

उत्तर :

ग्लुकोज + ऑक्सिजन  →/श्वसन  कार्बन डायऑक्साइड + पाणी 

श्वासावाटे आत घेतलेल्या ऑक्सिजनची पेशीतील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते.

2) धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्फेन पाणी सुफेन होते. 

उत्तर :

कॅल्शिअम क्लोराइड + सोडिअम कार्बोनेट → कॅल्शियम कार्बोनेट + सोडियम क्लोराइड

दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शिअम क्लोराइड विरघळलेले असते. त्यात सोडिअम कार्बोनेट टाकल्यास अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडिअम क्लोराइड तयार होतात. त्यामुळे पाणी सुफेन बनते.

3) विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते.

उत्तर :

विरल हायड्रोक्लोरिक आम्ल + चुनखडी → कॅल्शिअम क्लोराइड + कार्बन डाय ऑक्साइड + पाणी 

विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची चुनखडीवर अभिक्रिया होऊन कॅल्शिअम क्लोराईड व कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होते. कॅल्शिअम क्लोराइड पाण्यात विरघळते व कार्बन डायऑक्साइड हवेतून निघून जातो. त्यामुळे चुनखडी दिसेनाशी होते.

4) खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. 

उत्तर :
सायट्रिक आम्ल + सोडियमबाय कार्बोनेट → कार्बन डायआक्साईड + सोडिअम सायट्रेट 

खाण्याचा सोडा म्हणजे सोडिअम बायकार्बोनेट, लिंबू रस म्हणजे सायट्रिक आम्ल, निघणारे बुडबुडे कार्बन डायऑक्साइडचे असतात.

प्रश्न. 3. जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट  

‘ब’ गट

1) प्रकाशसंश्लेषण

2) पाणी

3) सोडिअम क्लोराइड

4) पाण्यात मीठ विरघळणे

5) कार्बन

6) फ्लुओरिन

7) मॅग्नेशिअम

अ) इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती 

आ) ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक

इ) रासायनिक बदल

ई) सहसंयुज बंध

उ) आयनिक संयुग

ऊ) भौतिक बदल

ए) ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती

उत्तर :

 ‘अ’ गट  

‘ब’ गट

1) प्रकाशसंश्लेषण

2) पाणी

3) सोडिअम क्लोराइड

4) पाण्यात मीठ विरघळणे

5) कार्बन

6) फ्लुओरिन

7) मॅग्नेशिअम

इ) रासायनिक बदल

ई) सहसंयुज बंध

उ) आयनिक संयुग

ऊ) भौतिक बदल

आ) ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक 

अ) इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती  

ए) ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती

प्रश्न. 4. घटक अणूंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन संरुपणाच्या रेखाटनाने दर्शवा. 

1) सोडिअम क्लोराइड

उत्तर :

2) पोटॅशिअम फ्लुओराइड

उत्तर :

3) पाणी (H2O) 

उत्तर :

4) हायड्रोजन क्लोराइड

उत्तर :

आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय

आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय

आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी 

प्रश्न. 1. खालील दिलेली द्रावणे आम्ल आणि आम्लारी ओळखा.  

 द्रावण 

दर्शकात झालेला बदल  

आम्ल/आम्लारी 

 लिटमस 

फिनाॅल्फ्थॅलिन  

मिथिल ऑरेंज  

 i) 

 

बदल नाही 

 

 

 ii) 

 

 

 नारंगी बदलून लाल झाला. 

 

 iii)

लाल लिटमस निळा झाला. 

 

 

 

उत्तर 

 द्रावण 

दर्शकात झालेला बदल  

आम्ल/आम्लारी 

 लिटमस 

फिनाॅल्फ्थॅलिन  

मिथिल ऑरेंज  

 i) 

निळा लिटमस लाल झाला. 

बदल नाही 

नारंगी गुलाबी झाला. 

आम्ल

 ii) 

निळा लिटमस लाल झाला. 

बदल नाही

नारंगी बदलून लाल झाला. 

आम्ल

 iii) 

लाल लिटमस निळा झाला. 

रंगहीन गुलाबी होतो. 

नारंगी बदलून पिवळा झाला

आम्लारी

प्रश्न. 2. सूत्रावरून नावे लिहा.

H2SO4, Ca(OH)2, HCI, NaOH, KOH, NH4OH

उत्तर :

i) H2SO4 – सल्फ्युरिक आम्ल

ii) Ca(OH)2 – कॅल्शिअम हायड्रॉक्साइड

iii) HCl – हायड्रोक्लोरिक आम्ल

iv) NaOH – सोडिअम हायड्राऑक्साइड

v) KOH – पोटॅशिअम हायड्राऑक्साइड

vi) NH4OH – अमोनिअम हायड्राऑक्साइड

प्रश्न. 3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उदयोगधंदयात सर्वांत जास्त महत्त्व का आहे ?

उत्तर :

H2SO4 ला रासायनिक उद्योगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण हे आम्ल बहुतेक सर्व अभिक्रिया घडवून आणण्यासाठी इतर आम्लापेक्षा जास्त वापरात येते. उदा. विदयुत घटामध्ये, रासायनिक खतांच्या उत्पादनात. 

प्रश्न. 4. उत्तरे द्या.

1) क्लोराइड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे ? 

उत्तर :

क्लोराइड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरीक आम्ल HCl हे आम्ल वापरले पाहिजे. 

2) एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे ?

उत्तर :

खडकात कार्बोनेट (CO3) हे संयुग आहे. 

3) प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल.

उत्तर :

ओलसर निळा लिटमस पेपर त्या द्रवात बुडवावा. पेपर लाल झाल्यास ते द्रव्य आम्ल आहे असे समजावे.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

 आम्ल 

आम्लारी 


i) हायड्रोजन आयन Hहा मुख्य घटक असतो. 

ii) चव आंबट असते. 

iii) सामान्यत: अधातू ऑक्साइडपासून आम्ल पासून तयार होते. 


i) हायड्राक्साइड हा OH मुख्य घटक असतो. 

ii) चव कडवट असते. 

iii) सामान्यत: धातू ऑक्साइडपासून आम्लारी तयार होते. 

2) दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही ? 

उत्तर :

दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो. मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मीठाचा परिणाम होत 

3) उदासिनीकरणातून कोणते पदार्थ निर्माण होतात.

उत्तर :

आम्ल आणि आम्लारीच्या उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ निर्माण होतात. 

आम्ल + आम्लारी ➝  क्षार + पाणी

HCl + NaOH ➝  NaCl + H2O

4) आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते ?

उत्तर :

आम्लाचे औद्योगिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. 

i) रासायनिक खतांचे उत्पादन 

ii) तेलाच्या शुद्धिकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये इत्यादीच्या प्रक्रियेत आम्लाचा उपयोग होतो. 

iii) क्षार बनविण्यासाठी.

iv) H2SO4 बॅटरीमध्ये वापरतात. 

v) HCI पाणी जंतुरहित करण्यासाठी..

vi) लाकडाचा रंग पांढरा बनविण्यासाठी आम्लाचा वापर होतो. 

प्रश्न. 6. रिकाम्या जागा भरा.

1) आम्लातील प्रमुख घटक …………………… आहे. 

उत्तर :

आम्लातील प्रमुख घटक H+ आहे. 

2) आम्लारीतील प्रमुख घटक …………………… आहे. 

उत्तर :

आम्लारीतील प्रमुख घटक OH  आहे. 

3) टार्टरिक हे ………………… आम्ल आहे. 

उत्तर :

टार्टरिक हे सेंद्रिय आम्ल आहे. 

प्रश्न. 7. जोड्या लावा.

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) चिंच

2) दही 

3) लिंबू 

4) व्हिनेगर

अ) अँसेटिक आम्ल

आ) सायट्रिक आम्ल 

इ) टार्टोरिक आम्ल

ई) लॅक्टिक आम्ल

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) चिंच

2) दही 

3) लिंबू 

4) व्हिनेगर

इ) टार्टोरिक आम्ल

ई) लॅक्टिक आम्ल

आ) सायट्रिक आम्ल  

अ) अँसेटिक आम्ल

प्रश्न. 8. चूक की बरोबर. 

1) धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात. 

उत्तर :

चूक

2) मीठ आम्लधर्मी आहे.

उत्तर :

चूक

3) क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.

उत्तर :

चूक

4) क्षार उदासीन असतात.

उत्तर :

बरोबर

प्रश्न. 9. पुढील पदार्थाचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटात वर्गीकरण करा.

HCI, NaCl, MgO, KCI, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3 

उत्तर :

आम्लधर्मी – HCI, H2SO4, HNO3

आम्लारीधर्मी – MgO, CaO

उदासीन – NaCl, KCl, H2O, Na2CO3

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. माझा जोडीदार शोधा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

अ) 350 मिली

आ) 7.4 

इ) 37°C

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

अ) 350 मिली 

इ) 37°C 

आ) 7.4  

प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा. 

 इंद्रिय संस्था

इंद्रिये 

कार्ये 

 1) श्वसनसंस्था

 

 

 2) रक्तभिसरण संस्था

 

 

उत्तर :

 इंद्रिय संस्था

 इंद्रिये

 कार्ये 


1) श्वसनसंस्था

 नाक 

हवा आत गाळून घेणे.  

 घसा

हवा श्वासनलिकेपर्यंत पोहचवणे. 

 श्वासनलिका

हवा फुफ्फुसापर्यंत पोहचवणे.  

 फुफ्फुसे

हवेची देवाण घेवाण होते.  

 श्वासपटल 

श्वासोच्छ्वास घडवून आणतो.  

 2) रक्तभिसरण संस्था

 ह्रदय 

रक्त पंप करण्याचे वहन करणे.  

 रक्तवाहिन्या

शरीरात रक्ताचे वहन करणे.  

 केशवाहिन्या

शरीरातील सर्व पेशींना रक्तपुरवठा करणे.  

प्रश्न. 3. नामनिर्देशित सुबक आकृती काढा. 

1) श्वसनसंस्था

उत्तर :


2) ह्रदयची आंतररचना

उत्तर :

प्रश्न. 4. सकारण स्पष्ट करा.

1) मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. 

उत्तर :

कारण i) मानवी रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते. 

ii) लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो. हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

2) श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

उत्तर :

कारण i) बरगड्यावर जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडून आल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो व बाहेरील हवा नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये जाते. 

ii) बरगड्या मूळ जागी परत आले व श्वासपटल वर गेला की फुफ्फुसावर दाब पडून त्यातील हवा नाकाद्वारे बाहेर ढकलली जाते. 

iii) त्यामुळे श्वाच्छोच्छ्वास घडून येतो व श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

3) रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

उत्तर :

कारण i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) एका रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

4) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.

उत्तर :

कारण i) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतर रक्तगट असलेल्या व्यक्तीस देता येते. 

ii) याकारणाने ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.

5) आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे. 

उत्तर :

कारण i) मीठामधील सोडिअम हे रक्तदाब आणि हृदयविकारांना कारणीभूत आहे. 

ii) याकारणाने आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

1) रक्तभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर :

i) रक्ताभिसरण संस्था व श्वसन संस्था दोन्हीच्या मदतीने शरीरात पेशीतील वायूची देवाण घेवाण होते. जर वायूची देवाण घेवाण झाली नाही तर सर्व पेशी मृत होतील. त्याचबरोबर श्वसनसंस्थेमुळेच शरीरात ऑक्सिजन प्रवेश करते ते रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते.

ii) पचनसंस्थेमार्फत विविध पोषकद्रव्य तयार केले जातात जे रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते. तसेच पचन न झालेले घातक पदार्थ सुद्धा रक्ताभिसरण संस्थेद्वारे वृक्कापर्यंत पोहचवले जाते.

iii) वृक्कापर्यंत आलेल्या रक्तातून युरीआ, युरीक आम्ल, पाणी रक्तातून वेगळे काढून पुन्हा संस्थेला पोहचवले जाते.

अशाप्रकारे रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी संबंध येतो.

2) मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

उत्तर :

मानवी रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते. 

मानवी रक्ताची कार्ये – i) उतींना प्राणवायू पुरवणे. 

ii) यकृताकडून ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्तरसामध्ये विरघळलेली असतात. 

iii) कार्बन डायऑक्साइड, युरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते. 

iv) श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती करते. 

v) रक्त कलयन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा. शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तकलयन यंत्रणा कार्यान्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉबिनच्या तंतूमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते. 

vi) संप्रेरकाचे वहन-ही शरीराची उतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे. 

vii) रक्ताचे सामू नियंत्रण. 

viii) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण. 

ix) द्रवीय कार्य इत्यादी. 

3) रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

उत्तर :

महत्त्व व गरज – i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) ॲलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. 

vi) आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात. अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. 

प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा. 

1) धमन्या व शिरा

उत्तर :

 धमन्या 

शिरा

 i) ह्रदयापासून उतकाकडे ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस धमन्या/रोहिण्या म्हणतात. 

अपवाद – फुफ्फुस धमनी

ii) धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात. 

iii) धमन्या शरीरात खोलवर स्थित असतात व त्यांना झडपा नसतात. 

iv) धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो. (100mm Hg) 

v) आकारांनुसार उतरता क्रम महाधमनी – धमन्या-धमनिका.

 i) उर्तीकडून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करणाऱ्या रक्तवाहिणीस शिरा म्हणतात.

अपवाद – फुफ्फुस शिरा

ii) शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात. 

iii) शिरा त्वचेखाली स्थिर असतात व त्यांना झडपा असतात. 

iv) शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. 

(2 mm Hg)

v) आकारानुसार उतरता क्रम महाशिरा – शिरा – शिरिका.

2) बर्हिःश्वसन व अंत: श्वसन

उत्तर :

 बर्हिश्वसन

अंत:श्वसन

 i) बर्हिश्वसन ही भौतिक प्रक्रिया आहे.

ii) ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बर्हिः श्वसन म्हणतात. 

iii) बर्हिः श्वसनाची क्रिया श्वास आणि उच्छ्वास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

iv) या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन उतींमध्ये सोडल्या जातो. 

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 100mmHg पासून 40 mm Hg पर्यंत कमी होतो. 

 i) अंतःश्वसन ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे.

ii) ज्या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यास पेशीश्वसन किंवा अंतःश्वसन म्हणतात.

iii) अंत: श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवात समान असते.

iv) या क्रियेत वायुकोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडल्या जातो. (2mm Hg)

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 40mm Hg पासून 100mm Hg पर्यंत वाढतो. 

प्रश्न. 7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल ?

उत्तर :

रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे पुढील निकष लक्षात घेतात.

• रक्तदान करणारा व्यक्ती 18 वर्षांवरील असावा.

• वजन 45 कि.ग्र वर असावे.

• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असावे.

• मागील 3 दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले नसावे..

• मागील 3 महिन्यात मलेरिया झाला नसावा.

• मागील 1 वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली नसावी.

• 6 महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी.

• गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षांखालील मूल नसल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला नसावा.

प्रश्न. 8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा.

(हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक, आम्लधर्मी)

1) रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ………………… हे लोहाचे संयुग असते. 

उत्तर :

रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते. 

2) ………………… हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 

उत्तर :

श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 

3) हृदय स्नायू …………….. असतात.

उत्तर :

हृदय स्नायू अनैच्छिक असतात.

4) ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ……………. असते.

उत्तर :

ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.

5) RBC ची निर्मिती ……………… मध्ये होते. 

उत्तर :

RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये होते. 

प्रश्न. 9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

1) A, O, K, AB, B

उत्तर :

K इतर सर्व रक्तगट आहेत.

2) रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका 

उत्तर :

रक्तपराधान इतर सर्व रक्ताचे घटक आहेत.

3) श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका

उत्तर :

केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत. 

4) न्युटोफिल, ग्लोब्युलिन्स, अँल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन

उत्तर :
प्रोथ्रोम्बीन इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहेत. 

प्रश्न 10- खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.

आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.

उत्तर :

अस्थमा. 

प्रश्न. 11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे ? 

उत्तर :

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी काकांनी पुढील मदतदायी उपाय करावेत :

• पोटॅशिअमची अधिक मात्रा असलेले अन्न सेवन करावे.

• मद्यसेवन टाळावे.

• नियमित व्यायाम करावा.

• अतिरिक्त प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम संपुरके घ्यावी.

• तंतुमय पदार्थ अधिक असलेला शाकाहारी आहार घ्यावा.

• ताण-तणाव घालवण्यासाठी उपचार करावा.

• धूम्रपान टाळावे.

• कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.

• मधुमेहावर नियंत्रण ठेवावे.

• रक्तदाब वाढवणारी औषधे टाळावी. 

• वजन कमी करणे. 

• आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे.