ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) अर्थव्यवस्थेत बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते

लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारा पक्ष सत्तेवर येतो.

ii) संसदेत व विधिमंडळात सर्व निर्णय बहुमतानेच घेतले जातात.

iii) बहुसंख्य समाजाचे कल्याण करणे, हाच लोकशाहीचा उद्देश असतो; म्हणून लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते

उत्तर :

i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो.

ii) वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.

खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

उत्तर :

खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे –

i) खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात.

ii) माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हसित होते.

iii) खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते.

iv) खेळामुळे मनोधैर्य वाढते, चिकाटी व खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात.

v) सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते.. vi) खेळांमुळे नेतृत्वगुण विकसित होतात.

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.

ii) समाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.

iii) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.

iv) शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

उत्तर :

खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात –

i) खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक.

ii) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे स्मालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे साहाय्यक.

iii) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी.

iv) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे साहाय्यक व संगणक तज्ज्ञ.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.

ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.

iii) 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात; म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात.

ii) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात.

iii) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.

राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात

राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.

ii) शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात.

iii) या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात.

अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर :

i) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो.

ii) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते.

iii) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते.

iv) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात.

v) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीला निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.