सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे

सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे.

उत्तर :

i) विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.

ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.

iii) हौशी खेळाडू शिकवण्यासाठी; प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.

iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो; त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

उत्तर :

i) इंग्रजी शिक्षणाचे भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.

ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.

iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकरांचे लक्ष वेधले गेले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच, त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?

उत्तर :

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत –

i) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे.

ii) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे.

iii) केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे.

iv) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

उत्तर :

i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 8,515,770 चौरस किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रभेट केवळ सुमारे 32,87,263 चौरस किमी आहे.

ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे 20 कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे.

iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

उत्तर :

i) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

ii) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्यछायेचा प्रदेश होतो.

iii) भारतातील या भागांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो. या भागांत 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो.

iv) दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. त्यामुळे भारतातील राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे ?

उत्तर :

i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवानाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनांतील वनस्पतींची पाने गळतात.

ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.

iii) 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.

iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. त्यामुळे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?

उत्तर :

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

i) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.

ii) निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.

iii) ब्राझीलमध्ये ‘रोका’ आणि भारतात ‘झूम’ यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते.

iv) लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात.

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर :

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यक आहे –

i) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.

iii) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

iv) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांना सहभाग वाढला पाहिजे.

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का ?

उत्तर :

i) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक असते.

ii) पक्षाचा अध्यक्ष, खनिजदार, सचिव या पदांच्या दर तीन वर्षानी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून निवडणुका घ्याव्या लागतात. अन्यथा त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करतो.

iii) या निवडणुकांमुळे पक्षावर एकाच व्यक्तीचे नियंत्रण राहत नाही.

iv) त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही टिकून राहते. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

उत्तर :

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.