स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

1) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ………………….. 

i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

उत्तर : 

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी …………………… 

i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते. 

ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 

iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 

iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात. 

उत्तर :

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ………………

i) १५ मिनिटांचा फरक असतो. 

ii) ०४ मिनिटांचा फरक असतो. 

iii) ३० मिनिटांचा फरक असतो. 

iv) ६० मिनिटांचा फरक असतो. 

उत्तर :

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ०४ मिनिटांचा फरक असतो. 

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1. स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते

उत्तर :

कारण  i) पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते.. 

ii) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा २४ तासांचा कालावधी होय. 

iii) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जस जसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वांत कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वांत लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. 

iv) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. 

2. ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

उत्तर :

कारण  i) देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. 

ii) जागतिक व्यवहाराच्यादृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. 

iii) ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच ०° रेखावृत्त आहे म्हणून ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

3. भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे

उत्तर :

कारण  i) उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबादजवळील मिर्झापूर शहरावरून जाणारे ८२°३०’ पूर्व हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. 

ii) या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. म्हणून भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

4. कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत

उत्तर :

कारण  i) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात. 

ii) कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोईचे होत नाही. म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा

उत्तर :

i) कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. 

ii) पूर्वेकडून पश्चिमेकडे अंतर कमी होत जाते. म्हणून ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर रात्रीचे ३ वाजले असतील.

2. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते

उत्तर :

i) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. 

ii) देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. 

iii) म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.

3. ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा

उत्तर :

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ ही आधीच्या दिवसाचे रात्रीचे ९.३० वाजले असतील.

प्रश्न. 4. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब,क, या ठिकाणाची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.   

 ठिकाण 

रेखावृत्त  

दिनांक  

वेळ  

 अ 

 १२०°

 

 

 ब 

 १६०°

 

 

 क

 ६०°

 

 

उत्तर :

 ठिकाण 

रेखावृत्त  

दिनांक  

वेळ  

 अ 

 १२०°

 २२ जून 

संध्याकाळचे ६:००  

 ब 

 १६०°

 २० जून 

रात्रीचे १:००  

 क

 ६०°

 २२ जून 

दुपारचे २:००  


प्रश्न. 5. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतीखाली चोेकटीत लिहा.  

उत्तर :

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इयत्ता नववी

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इतिहास 

प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या

उत्तर :

‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने पुढील मागण्या केल्या. चंदीगढ पंजाबला दयावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यासअधिक स्वायत्तता द्यावी.

2) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे

उत्तर :

सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

i) त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. उत्तर चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत.

ii) परस्परांच्या सणउत्सवांत सहभागी झाले पाहिजे.

iii) एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहीजेत.

iv) आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे.

3) प्रदेशवाद केव्हा बळावतो

उत्तर :

i) ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.

ii) इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे. हा अवाजवी प्रांताभिमान होय.

iii) जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो.

प्रश्न. 2. टिपा लिहा

1) जमातवाद

उत्तर :

i) जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर दरभिमानात होते. तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात.

ii) आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांचा धर्माला कमी लेखणे यालाच जमातवाद असे म्हणतात.

iii) अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होता.

2) प्रदेशवाद

उत्तर :

i) प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.

ii) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. यालाच प्रदेशवाद म्हणतात.

iii) आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे. या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो.

iv) विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.

प्रश्न. 3. का ते लिहा. 

1) ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले

उत्तर :

कारण – i) १९८० साली पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले.

ii) सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले.

iii) या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली.

iv) भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते. म्हणून सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.

2) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे

उत्तर :

कारण – i) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे.

ii) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.

iii) सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

प्रश्न. 4. पुढील संक्षिप्त रुपाचे पूर्ण रूप लिहा. 

1) MNF 

उत्तर :

मिझो नॅशनल फ्रॅट

2) NNC

उत्तर :

नागा नॅशनल कौन्सिल

3) PLGA

उत्तर :

पीपल्य लिबरेशन गुरिला आर्मी

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी

अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. 

1) अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत ?

भरूपांवर

गतीवर  

दिशेवर

2) मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो ?

दाब

ताण  

पर्वत

3) खचदरी निर्माण होण्यासाठी भुकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते ?

ताण  

दाब

अपक्षय

4) खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता ?

सातपुडा

हिमालय  

पश्चिम घाट

5) विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे ?

पर्वतनिर्माणकारी

खंडनिर्माणकारी  

क्षितिजसमांतर

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1) हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

उत्तर ;

कारण – i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते.

ii) या ऊर्जालहरी भूपृष्ठाकडे येतात. या लहरी घन, द्रव वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.

iii) या प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागेपुढे हलतात. अशाप्रकारे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या या कारणांमुळे जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

2) मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. 

उत्तर :

कारण – i) मेघालय पठार व दख्खन पठार हे दोन्ही पठार असूनही त्यांची निर्मिती वेगवगेळ्या प्रकारे झाली आहे.

ii) मेघालय पठाराची निर्मिती विभंगामुळे झाली आहे. हे गट पर्वताचे उदाहरण आहे. तर दख्खनचे पठार हे भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. म्हणून मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

3) बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. 

उत्तर :

कारण – i) भूपट्ट सीमांचा ज्वालामुखीक्षेत्राशी थेट संबंध आहे.

ii) भूपट्ट सीमांवर वर्तमान वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्याचे अवशेष तिथे जागृत असतात. ही सतत होणारी क्रिया असते. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

4) बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उत्तर :

कारण – i) बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता. परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.

ii) या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे.

iii) या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाच्या संचयनामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

5) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

उत्तर :

कारण – i) सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.

ii) ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

iii) भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात, तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

प्रश्न. 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. 

1) किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. 

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – भूकंप, ज्वालामुखी

2) हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. 

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली

3) पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. 

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – ज्वालामुखी

4) प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. 

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली.

प्रश्न. 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. 

1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो. 

2) भूपट्ट अचानक हलतात. 

3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. 

4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात. 

5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. 

उत्तर :

3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

2) भूपट्ट अचानक हलतात.

1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो.

4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

प्रश्न. 5. फरक स्पष्ट करा. 

1) गट पर्वत व वली पर्वत

उत्तर :

 गट पर्वत 

 वली पर्वत 

 

i) भूकवचातील खडकांवर ताण पडल्याने किंवा कठीण खडकांवर प्रचंड दाब पडल्याने खडकांमध्ये विभंग तयार होतात. या विभांगांच्या पातळीवर खडकांची हालचाल होते. काही वेळा दोन विभंगामधला खडकांचा भाग जास्त उंचीवर उचलला जातो. त्याद्वारे गट पर्वतांची निर्मिती होते. त्यांना गट पर्वत असे म्हणतात. 

ii) युरोपमधील ब्लॅक फॉस्फेट पर्वत, भारतातील मेघालय पठार.  

i) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे भुकवचातील मृदू खडकांच्या थरांवर दाब पडतो व मृदू खडकांच्या थरांमध्ये वळ्या तयार होतात. परिणामत: खडक जास्त उंचीवर उचलेले जातात. यातून ज्या पर्वतांची निर्मिती होते त्यांना वली पर्वत असे म्हणतात. 

ii) हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. 

2) प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी

उत्तर :

 प्राथमिक भूकंप लहरी

दुय्यम भूकंप लहरी 

  

i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात. 

ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागपुढे होते. 

iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.  

i) प्राथमिक लहरींच्यानंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्यालहरींना दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभीकेंद्रापासून चहूबाजूंना पसरतात. 

ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने लंबरूप म्हणजे वर-खाली होते. 

iii) या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. 

3) भूकंप व ज्वालामुखी

उत्तर :

 भूकंप 

ज्वालामुखी 

 

i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भुकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, यालाच भूकंप असे म्हणतात. 

ii) भूकंपामुळे इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. 

iii) काही वेळा भूकंपामुळे भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.  

i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायूरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वलामुखीचा उद्रेक होय. 

ii) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. 

iii) मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

प्रश्न. 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

i) भूपट्ट सरकणे – दृढ शिलावरण हे स्वतंत्र अशा अनेक भूपट्टापासून बनले आहेत. भूपट्ट दुर्बलावरण या स्तरावर तरंगत आहे. हे भूपट्ट तरंगत -असतांना एकमेकांना घसटत एकमेकांपासून दूर सरकतात. त्यामुळे भूकंप होतो.

ii) भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो.

iii) भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे – भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींचा भूपृष्ठावर परिणाम होत असतो. भूहालचालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात. त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते आणि खडक दुभंगतात व त्याचे स्थानांतर होते. खडक खाली सरकतात किंवा वर उचलले जातात.

iv) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो.

v) ज्वालामुखीचा उद्रेक – सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळतात. म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही, भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

2) जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?

उत्तर :

i) मंद भू-हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते.

ii) म्हणजेच जगातील प्रमुख वली पर्वत मंद भू-हालचालींच्या पर्वतनिर्माणकारी हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.

3) भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे ?

उत्तर :

i) भूकंपाच्या धक्क्यामुळे भूपृष्ठाचा काही भाग प्रसरण पावतो त्यात ताण निर्माण होतात व कमी-अधिक लांबी, रुंदी व खोली असलेल्या भेगा पडतात.

ii) तीव्र भूकंपामुळे ज्या जमिनीवरून पृष्ठतरंग प्रवास करतात त्या भागातील जमीन वर-खाली हेलकावताना दिसते. भेगेलगतची जमीन खचल्यामुळे अनेक वस्त्या गाडल्या जातात. म्हणून भूकंपाची तीव्रता व घराची पडझड यांचा फार जवळचा संबंध आहे.

4) भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते ?

उत्तर :

भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.

i) भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात.

ii) भूमिपात होऊन दरडी कोसळतात.

iii) काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.

iv) काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.

v) सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लारामळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.

vi) हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोमळतात.

vii) इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.

viii) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.

ix) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.

5) भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप लहरींचे प्रमुख तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1) प्राथमिक लहरी – i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रित्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरीना प्राथमिक लहरी म्हणतात.

ii) या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात.

iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करतांना त्याच्या दिशेत बदल होतो.

iii) प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढे-मागे हलतात.

2) दुय्यम लहरी – i) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते.

ii) या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.

iii) या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.

iv) या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात.

v) या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

3) भूपृष्ठ लहरी – i) प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते.

ii) या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात.

iii) त्या अतिशय विनाशकारी असतात.

6) ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.

उत्तर :

i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ‘ज्वालामुखीचा उद्रेक होय.

ii) ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.

iii) ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूपानुसार खालील दोन प्रकार / वर्गीकरण केले जाते.

1) केंद्रीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखादया नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.

ii) बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकुच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात.

iii) जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.

2) भेगीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात.

ii) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.

iii) भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.

3) जागृत ज्वालामुखी – वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा. जपानच्या फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.

4) सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी – काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा. इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.

5) मृत ज्वालामुखी – ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा. टांझानियातील किलीमांजारो.

प्रश्न. 7. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. 

उत्तर :

प्रश्न. 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. 

1) माउंट किलोमांजारो 

2) मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र

3) माउंट फुजी

4) क्रॅकाटोआ

5) माउंट व्हेसुव्हियस

उत्तर :

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

उत्तर :
हे विधान योग्य आहे.

कारण – i) आलेख किंवा आकृत्याद्वारे दर्शविण्यात येणारी आकडेवारी नकाशा शिवायही दाखविता येते परंतु या आकडेवारीचे स्थानिक वितरण नकाशाद्वारे व्यक्त केले तर ते खऱ्या अर्थाने भौगालिक वितरण दर्शविते. 

ii) वितरणाच्या नकाशांमुळे भौगोलिक घटकांचा त्या स्थानिय वितरणावर कसा परिणाम झाला आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणून वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

2. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण. – i) या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. 

ii) हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. 

iii) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जाते. त्यासाठी त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

3. क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – i) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात. 
ii) प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. 

iii) ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. म्हणजेच क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात.

4. क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

उत्तर : 

हे विधान अयोग्य आहे . 

कारण – i) क्षेत्रघनी नकाशा लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी वापरतात. 

ii) तर समघनी नकाशा उंची दाखविण्यासाठी वापरतात. 

iii) समधनी नकाशात उंची दाखविण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. तर क्षेत्रघनी नकाशात रंगछटांचा उपयोग केला जातो.

5. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. 

कारण – i) दिलेल्या भौगोलिक घटकाच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशात संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते. 

ii) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे व कोणत्या प्रदेशात कमी आहे याचे नकाशावरून सहज ज्ञान होते.

6. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण – टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते. म्हणून टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक योग्य प्रमाण असावे.

7. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे. 
कारण – समघनी नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जातात. 
i) समघनी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते. 
ii) ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजेच यावरून हे सिद्ध होते की समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करतात.

8. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. 
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे. कारण 
i) क्षेत्रघनी नकाशा पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही 
सहज समजते. 

ii) एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात.

प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर : 
वितरणाच्या नकाशांचे उपयोग – i) प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करणे. 
ii) घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो.

वितरणाच्या नकाशाचे प्रकार –

i) टिंब पद्धत 
ii) क्षेत्रघनी पद्धत 

iii) समधनी पद्धत

2. समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक

उत्तर :

 समघनी पद्धत 

 क्षेत्रघनी पद्धत

 

i) समघनी पद्धतीतील क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. 

ii) समघनी नकाशे तयार करण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. 

iv) प्रदेशाची उंची, तापमान पर्जन्य दाखविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. 

 

 

i) क्षेत्रघनी पद्धतीत प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. 

ii) क्षेत्रघनी नकाशांसाठी एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. 

iii) रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध हे वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात. 

iv) लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 

3. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत उपयुक्त असते.

कारण – 

i) टिंब पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे. 

ii) या पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही सहज समजते. कारण एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात. 

iii) एका टिबांची ठराविक किंमत असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील टिंबाची संख्या मोजून घटकाचे संख्यात्मक मूल्य काढता येते. 

iv) सामान्य माणसाला हा नकाशा सहज समजतो.

प्रश्न. 3. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल ? 

1) जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत

2) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत

3) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. 

उत्तर :

टिंब नकाशा पद्धत

4) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. 

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत

5) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत. 

प्रश्न. 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे ?

उत्तर :

 जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. 

2) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. 

उत्तर :

दिशाच्या संदर्भात उत्तर व पूर्व दिशेत लोकसंख्येचे वितरण दाट आहे. तर पश्चिम दिशेत लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. 

3) सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ? ते ठिकाण कोणते ?

उत्तर :

सर्वात मोठा गोल कोल्हापूर (करवीर तालुका) या ठिकाणी आहे. त्याची लोकसंख्या वीस लाख इतकी आहे. 

4) सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

उत्तर :

सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा हा आहे.  

कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय

कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय

कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय इयत्ता नववी

कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. सविस्तर उत्तरे लिहा. 

अ. गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.    

उत्तर :

 गतिज ऊर्जा  

स्थितिज ऊर्जा 

 

i) पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. 

ii) गतिज ऊर्जा = 1/2 mv 2 

iii) उदा. गाडीची चाल

i) पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. 

ii) स्थितिज ऊर्जा = mgh

iii) उदा. टाकीत साठवलेली पाणी

आ. पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा. 

उत्तर :

इ. उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज रूपांतरण आहे हे सिद्ध करा. 

उत्तर :

ई. बलाच्या दिशेच्या 30° कोनांत विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा. 

उत्तर :

उ. एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का ? स्पष्ट करा. 

उत्तर :

ऊ. वर्तुळावर गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते ?

उत्तर :

वर्तुळावर गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य असते, कारण यांमध्ये, बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात. ( θ = 90°)

कारण – W = F s cos θ

F s cos 90°

W = F s X 0 

= 0 

 कार्य = शून्य

 

2. खालील पर्यायातून एक वा अनेक पर्याय निवडा. 

अ. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ………………….. व्हावी लागते. 

1. स्थानांतरित 

2. अभिसारित

3. रूपांतरित

4. नष्ट

उत्तर :

कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा स्थानांतरित व्हावी लागते. 

कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते. 

 

आ. ज्यूल हे एकक ……………… चे आहे. 

1. बल

2. कार्य

3. शक्ती

4. ऊर्जा

उत्तर :

ज्यूल हे एकक कार्य चे आहे. 

ज्यूल हे एकक ऊर्जा चे आहे. 

 

इ. एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ………………. बलाची परिमाणे सारखी असतात ?

1. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल

2. गुरुत्वीय बल

3. ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल

4. घर्षण बल

उत्तर :

एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना गुरुत्वीय बल बलाची परिमाणे सारखी असतात ?

एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल बलाची परिमाणे सारखी असतात ?

 

ई. शक्ती म्हणजे ……………….. होय. 

1. कार्य जलद होण्याचे प्रमाण

2. कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण

3. कार्य मंद होण्याचे प्रमाण

4. वेळेचे प्रमाण

उत्तर :

शक्ती म्हणजे कार्य जलद होण्याचे प्रमाण होय. 

शक्ती म्हणजे कार्य मंद होण्याचे प्रमाण होय. 

 

उ. एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ……………… बलामुळे घडून येते. 

1. प्रयुक्त केलेले बल

2. गुरुत्वीय बल

3. घर्षण बल

4. प्रतिक्रिया

उत्तर :

एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य गुरुत्वीय बल बलामुळे घडून येते. 

एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य घर्षण बल बलामुळे घडून येते. 

 

3. विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा. 

अ. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही ………………. असता. 

1. खुर्चीवर बसलेले

2. जमिनीवर बसलेले

3. जमिनीवर झोपलेले

4. जमिनीवर उभे

उत्तर :

तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असता. 

जमिनीवर झोपलेले – कारण स्थितिज ऊर्जा = mgh साठी झोपले असता h कमीत कमी असते. 

 

आ. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा ……………..

1. कमी होते

2. स्थिर असते

3. वाढते

4. सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते. 

उत्तर :

एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते.

स्थिर असते – कारण ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार उंचावरून पडणाऱ्या वस्तूची ऊर्जा स्थिर असते. 

 

इ. सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ………………..

1. मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल

2. बदलणार नाही

3. मूळ ऊर्जेच्या चारपट होईल

4. मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल 

उत्तर :

सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा बदलणार नाही.

बदलणार नाही – कारण स्थितिज वेगावर अवलंबू नसते ती उंचीवर अवलंबून असते. 

 

ई. वस्तूवर घडून येणारे कार्य …………………….. वर अवलंबून नसते. 

1. विस्थापन 

2. लावलेले बल

3. वस्तूचा आरंभीचा वेग

4. बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन

उत्तर :

वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीचा वेग वर अवलंबून नसते. 

वस्तूचा आरंभीचा वेग – कारण कार्य W = f s cos θ

θ – बल व विस्थापन यातील कोन 

 

4. खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 

कृती

1. दोन वेगवेगळ्या लांबीची अँल्युमिनियमची पन्हाळी घ्या. 

2. दोन्ही पन्हाळ्याची वरील टोके समान उंचीवर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा. 

3. आता दोन समान आकरांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पन्हाळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा. ते घरंगळत जाऊन सारखीच अंतरे पार करतील. 

प्रश्न

1. चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते ?

उत्तर :

स्थितिज ऊर्जा

 

2. चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतरण होते ?

उत्तर :

स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होते. 

 

3. चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात ?

उत्तर :

दोन्ही चेंडूचे वस्तूमान सारखे आहेत तसेच दोन्ही पन्हाळ्याची वरील टोके समान उंचीवर आहेत. तसेच आरंभीचा वेग समान आहे. 

 

4. चेंडू असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही कोणती असते ?

उत्तर :

स्थितिज ऊर्जा

 

5. वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो ? स्पष्ट करा. 

उत्तर :

वरील कृतीतून ऊर्जा अक्षयतेचा नियम सिद्ध होतो. ऊर्जा निर्माण करता येत नाही. तीचा विनाशही करता येत नाही. त्याचे रूपांतरण एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेत होते. 

 

5. उदाहरणे सोडवा. 

1. एका विद्युत पंपाची शक्ती 2kW आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल ?

उत्तर :



आ. जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा. 

उत्तर :

P = 1200    W = 1.2 KW 

एप्रिल महिन्याचे दिवस = 30 

दररोज 30 मिनिटे वापर 

∴ वापराचा एकूण कालावधी = 15 तास 

∴ वापरलेली ऊर्जा = शक्ती X काळ 

= pt

= 1.2 X 15 

= 18.0 units 

 

इ. 10 m उंचीवरून जमिनीवर पडलेल्या पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळतात 40 टक्क्यांनी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल ?

उत्तर :

ई. एका मोटरीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटरीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा. 

उत्तर :



उ. रवीने एका पुस्तकाला 10 N इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंमी इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. 

उत्तर :

गतीचे नियम स्वाध्याय

गतीचे नियम स्वाध्याय

गतीचे नियम स्वाध्याय इयत्ता नववी

गतीचे नियम स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान 

 

1. खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दूसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. 

 अ.क्र.

स्तंभ-1

स्तंभ-2

स्तंभ-3

 1

 ऋष त्वरण

वस्तूचा वेग स्थिर असतो.

एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते.

 2

 धन त्वरण

वस्तूचा वेग कमी होतो.

एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.

 3

 शून्य त्वरण

वस्तूचा वेग वाढतो.

एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.

उत्तर :

 अ.क्र.

 स्तंभ-1

 स्तंभ-2

 स्तंभ-3

 1

 ऋष त्वरण

 वस्तूचा वेग कमी होतो.

 एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.

 2

 धन त्वरण

 वस्तूचा वेग वाढतो.

 एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते.

 3

 शून्य त्वरण

 वस्तूचा वेग स्थिर असतो.

 एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.

2. फरक स्पष्ट करा. 

अ. अंतर आणि विस्थापन

उत्तर :

 अंतर

 विस्थापन

 

1. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. 

2. अंतर ही अदिश राशी आहे. 

3. चाल अंतराशी संबंधित असते.  

 

1. विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. 

2. विस्थापन ही सदिश राशी आहे. 

3. वेग विस्थापनाशी संबंधित असतो. 

आ. एकसमान गती आणि नैकसमान गती

उत्तर :

 एकसमान गती

 नैकसमान गती

 

1. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. 

2. एकसमान गती मध्ये अंतर – काल आलेख सरळ रेषा दर्शवते. 

 

1. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. 

2. येथे अंतर – काल आलेख सरळ रेषा दर्शवत नाही. 

 3. खालील सारणी पूर्ण करा. 

 u (m/s)

a(m/s2)

 t (sec)

 v = u + at (m/s)

 2

4

3

 –

5

2

20

उत्तर :

v = u + at

= 2 + 4 x 3

=  2 + 12

= 14m/s

v = u + at

20 = u + 5 x 2

20 = u + 10

u = 20 – 10

u = 10 m/s

 u (m/s)

a(m/s2)

 t (sec)

 v = u + at (m/s)

 2

4

3

14

10  

5

2

20

 u (m/s)

 a(m/s2)

 t (sec)

 

 5

 12

 3

 –

 7

 –

 4

 92

उत्तर :

 u (m/s)

 a(m/s2)

 t (sec)

 

 5

 12

 3

 69

 7

 8

 4

 92

 

 u(m/s)

 a(m/s2)

 s(m)

 v2) = u+ 2as (m/s)2

 4

 3

 –

 8

 –

 5

 8.4

 10

v2) = u+ 2as

 
82 = 4+ 2as + 2 x 3 x s

64 = 16 + 6s

6s = 64 – 16

6s = 48 

s = 8 

 

v2) = u+ 2as

10=  u2 + 2 x 5 x 8.4 

100 = u+ 84 

u= 100 – 84 

u2 = 16 

u = 4m/s

 u(m/s)

 a(m/s2)

 s(m)

 v2) = u+ 2as (m/s)2

 4

 3

 8

 8

 4

 5

 8.4

 10

4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. 

अ. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे ………………… म्हणतात. 

उत्तर :

विस्थापन – विस्थापन त्या वस्तूचे कापलेल्या अंतरापेक्षा कमी असते किंवा अंतराएवढे असते.

आ. अवत्वरण म्हणजे ……………… त्वरण होय. 

उत्तर :

ऋण – कारण अवत्वरणात वेग कमी होत जाते. कमी कमी होणे हे ऋण चिन्हाने दर्शवितात.

इ. जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा ……………….. प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. 

उत्तर :

वेग – कारण प्रत्येक बिंदूपाशी गतीची दिशा बदलते.

ई. टक्कर होताना ………………. नेहमी अक्षय्य राहतो. 

उत्तर :

संवेग – बाह्य बल कार्यरत नसेल तरच न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग अक्षय्य असतो.

उ. अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या ……………………. नियमावर आधारित आहे. 

उत्तर :

तिसऱ्या – कारण अग्नी बाणातून निघणाऱ्या उष्ण वायुमुळे क्रिया व प्रतिक्रिया निर्माण होतात.

5. शास्त्रीय कारणे लिहा. 

अ. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते जेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते. 

उत्तर :

i) एखादी वस्तू जेव्हा मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा त्यावर गुरुत्वीय त्वरण कार्यरत असते.

ii) गुरुत्वीय त्वरण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होते.

iii) गुरुत्वीय त्वरण हे एकसमान रेषेत कार्यरत असल्याने वस्तूवर गतीचे त्वरणही एकसमान असते.

आ. क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. 

उत्तर :

i) जेव्हा समान आणि विरुद्ध बल एकाच पदार्थावर कार्य करतात तेव्हा एकमेकांना निष्प्रभ करतात.

ii) पण क्रिया व प्रतिक्रिया बलाच्या संदर्भात समान व विरुद्ध बल दोन वेगवेगळ्या पदार्थावर कार्य करतात. म्हणून क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिणाम समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत.

इ. समान वेग असणाऱ्या चेंडूंपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. 

उत्तर :

i) टेनिस बॉलचे वस्तूमान क्रिकेट बॉलच्या वस्तुमानापेक्षा लहान असते.

ii) परिणामतः टेनिस बॉलचा संवेग (p=mv) क्रिकेट बॉलच्या संवेगा पेक्षा कमी असतो.

iii) न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार टेनिस बॉलच्या संवेग कमी असल्याने त्याचे बलही कमी असते.

iv) त्यामुळे समान वेग असूनही क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते.

ई. विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते. 

उत्तर :

i) न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमानुसार, जर एखादया वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत गतीमध्ये सातत्य राहते.

ii) विराम अवस्थेत वस्तूवर कुठलेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसल्याने वस्तूची गती स्थिर असते व एकसमान मानली जाते.

6. तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा. 

उत्तर :

i) टेबलावर ठेवलेली वस्तू जागा बदलत नाही कारण न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तूला जडत्व असते.

ii) वेगाने जाणारी बस एकद थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात. कारण- न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमानुसार प्रवाशांमध्ये जडत्व असते.

iii) जमिनीवर टप्पा खाणारा चेंडू न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार उसळून वर येतो.

iv) बंदुकीतून गोळी सुटल्यास बंदूक मागे सरकते. कारण- न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रतिक्रिया बदल्यामूळे ती मागे सरकते.

v) वेगाने येणारा बॉल आडविल्यास हाताला मार लागतो. कारण बॉल थांबल्यामुळे त्याचे संवेग परिवर्तन होऊन त्या प्रमाणात बल निर्माण होते. ते हातावर कार्य करते.

7. उदाहरणे सोडवा. 

अ. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेंकदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा. 

उत्तर :

आ. एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती ?

उत्तर :

इ. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 g असून ती 1.5 m/s वेगाने 90g वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा. 

उत्तर :

ई. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल ?

उत्तर :

वसंतह्रदय चैत्र स्वाध्याय

वसंतह्रदय चैत्र स्वाध्याय

वसंतह्रदय चैत्र स्वाध्याय इयत्ता दहावी

वसंतह्रदय चैत्र स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1. पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा. 

 वैशिष्ट्ये 

झाडाचे/वेलीचे नाव 

 अ) निळसर फुलांचे तुरे

……………………

 आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी 

……………………

 इ) गुलाबी गेंद 

…………………… 

 ई) कडवट उग्र वास 

…………………… 

 उ) दुरंगी फुले

…………………… 

 ऊ) तीन पाकळ्यांचे फूल 

…………………… 

 ए. पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे

…………………… 

उत्तर :

 वैशिष्ट्ये 

झाडाचे/वेलीचे नाव 

 अ) निळसर फुलांचे तुरे

कडुनिंब

 आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी 

पिंपळ

 इ) गुलाबी गेंद 

मधुमालती 

 ई) कडवट उग्र वास 

घाणेरी

 उ) दुरंगी फुले

घाणेरी

 ऊ) तीन पाकळ्यांचे फूल 

नारळ

 ए. पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे

फणस

2. खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 

अ. चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे. 

उत्तर :

फाल्गुन, चैत्र व वैशाख हे तीन महिने वसंत ऋतूत येतात. पण त्यातही चैत्र हाच महिना वसंतऋतूचा आत्मा आहे. तो गोड महिना आहे. 

आ. काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. 

उत्तर :

चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची, वाटोळी, पसरट गोल अशी विविध प्रकारची घरटी बांधतात. त्यांचा आकार स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह असा वाटत असतो. ते पक्ष्यांच्या विरामाचे स्थान असते. म्हणून लेखिका म्हणते की ही काळीकबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात. 

3. योग्य जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

१) लांबलचक देठ

२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी

३) भुरभुरणारे जावळ 

अ) माडाच्या लोंब्या

आ) कैऱ्याचे गोळे

इ) करंजाची कळी 

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

१) लांबलचक देठ

२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी

३) भुरभुरणारे जावळ 

आ) कैऱ्याचे गोळे

इ) करंजाची कळी

अ) माडाच्या लोंब्या

4. खालील तक्ता पूर्ण करा. 

 शब्द

अर्थ 

 निष्पर्ण 

पाने निघून गेलेला 

 निर्गध

 ………………

 निर्वात

 ………………

 निगर्वी

 ……………….

 नि:स्वार्थी

 ……………….

उत्तर :

 शब्द

अर्थ 

 निष्पर्ण 

पाने निघून गेलेला 

 निर्गध

 वास निघून गेलेला

 निर्वात

 वारा नसलेला

 निगर्वी

 गर्व नसलेला

 नि:स्वार्थी

 स्वार्थ नसलेला

5. खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरुन वाक्ये पुन्हा लिहा. 

(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)

अ. लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच. 

उत्तर :

लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. 

आ. गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. 

उत्तर :

रुंजी घालत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. 

इ. मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच. 

उत्तर :

मोठ्या माणसांची कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच. 

ई. सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. 

उत्तर :

 सध्या घरामध्ये उंदरांची पेव पुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. 

6. खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. 

 शब्द 

प्रत्यय  

त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द  

 १) अतुलनीय

 ………………

 ………………

 २) प्रादेशिक

 ………………

 ………………

 ३) गुळगुळीत

 ………………

 ………………

 ४) अणकुचीदार 

 ………………

 ………………

उत्तर :

 शब्द 

प्रत्यय  

त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द  

 १) अतुलनीय

 ईय

 प्रशंसनीय

 २) प्रादेशिक

 इक

 भौगोलिक

 ३) गुळगुळीत

 ईत

 मिळमिळीत

 ४) अणकुचीदार 

 दार 

 दाणेदार

7. खालील वाक्यांतील आधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत लिहा. 

अ. आश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. 

उत्तर :

 विशेषनाम 

सामान्यनाम 

आ. अजय आजच मुंबईहून परत आला. 

उत्तर :

 विशेषनाम

विशेषनाम 

इ. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. 

उत्तर :

 विशेषनाम 

भाववाचकनाम 

ई. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. 

उत्तर :

 विशेषनाम 

 भाववाचकनाम

8. खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्याय शब्द शोधून लिहा. 

जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असून तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते. 

अ) कर्ण – 

आ) सोबती – 

इ) मार्ग – 

ई) हर्ष – 

उत्तर :

अ) कर्ण – कान 

आ) सोबती – मित्र

इ) मार्ग – वाट 

ई) हर्ष – आनंद


9. स्वमत

अ.  चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रुपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. 

उत्तर :

चैत्रातल्या पिंपळाची नवी पालवी हातात रेशमी पताका नाचवत उभी आहेत असे वाटते. ही गुलाबी पाने चमकतात तेव्हा सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. 

आ. चैत्र महिल्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या. 

उत्तर :

वाक्य वाचताना आपण विरामचिन्हांच्या जागी थोडे थांबत असतो, विश्रांती घेत असतो. चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची, वाटोळी, पसरट गोल ंशि विरामचिन्हांच्या आकाराची घरटी बांधत असतात आणि तेथे विश्रांती घेत असतात. म्हणजे घरट्यांचे विरामचिन्हांशी दिसणे व विश्रांती घेणे या दोन्ही गोष्टींचे विरामचिन्हाशी साम्य असते. म्हणून हे विधान सत्य आहे. 

इ. वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा. 

उत्तर :

आता जगातील ऋतुमानच बदलले आहे. उन्हाळ्यात पाऊस येतो, पावसाळ्यात नावापुरता पाऊस येतो, हिवाळ्यात गरमी होते. चैत्रपौर्णिमेला आम्ही मित्र रामटेकच्या गडमंदिराकडे सायकलने जायला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात जोरदार पाऊस झाला. आम्ही भिजलो, कुडकुडू लागतो. अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. पाऊस रात्रभर सुरू होता. हीच माझी वसंत ऋतूशी निगडीत आठवण आहे. आता वसंत वसंत राहिला नाही.      

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय

आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय इयत्ता दहावी



 

1. खालील आकृती पूर्ण करा. 

उत्तर :

2. पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

अ. मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. 

उत्तर :

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल.

i) सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली असावी.

ii) त्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले.

iii) सुरुवातीचे एपसारखे (एप-कपि) प्राणी कालांतराने दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले.

iv) कालांतराने मानवी मेंदूचा आकार मोठा होत गेला. त्यांच्या हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले.

आ. सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/ जातिउद्भव होतो.

उत्तर :

i) प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे.

ii) नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास ‘जाती’ असे म्हणतात.

iii) प्रत्येक जाती, विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढत असून त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, समागमकाळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात.

iv) परंतु एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. त्यामुळेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.

इ. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. 

उत्तर :

i) पृथ्वीच्या गर्भात पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात.

ii) या जीवांचे अवशेष व उसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात.

iii) या जीवाश्मावरून कालनिश्चिती करता येते. त्यावरून सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते.

iv) तसेच कार्बनी वयमापन पद्धतीमुळे पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी उपयोग होतो. म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

ई. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात. 

उत्तर :

i) पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते.

ii) मासा, सॅलेमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य या प्राण्यांचे भ्रूण त्यांच्या प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. म्हणून पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.

3. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. 

(जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ)

अ. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ………………… सिद्धांतामुळे लक्षात आला.

उत्तर : अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला.

आ. प्रथिनांची निर्मिती ……………… मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

उत्तर :  प्रथिनांची निर्मिती जनुकां मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

इ. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे ……………… म्हणतात.

उत्तर : DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात.

ई. उत्क्रांती म्हणजेच ……………. होय.

उत्तर : उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय.

उ. मानवी शरीरात आढळणारे ………………. हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

उत्तर : मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

4. प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. 

अ. लॅमार्कवाद

उत्तर :

i) उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो. असा सिद्धांत जीन बाप्टीस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्यांनी याला इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले.

ii) लॅमार्क यांनी असे स्पष्ट केले की, पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले, तसेच शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. ही उदाहरणे ‘मिळविलेली वैशिष्ट्ये’ अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद म्हणतात

iii) लॅमार्कवाद या सिद्धांतात लॅमार्क यांनी असे सुचवले की, प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात.

आ. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. 

उत्तर :

i) चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून ‘सक्षम ते जगतील’ असे मत मांडले.

ii) याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो.

iii) सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत.

iv) जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्टयांसकट नवीन प्रजाती तयार करतात.

v) हा सिद्धांत ‘ओरिजिन ऑफ स्पिसीज’ (Origin of Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.

इ.  भ्रूणविज्ञान

उत्तर :

i) भ्रूणविज्ञान भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो.

ii) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्येच ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो.

ई ) उत्क्रांती 

उत्तर :

i) उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते.

ii) भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय.

iii) नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखादया वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती.

iv) सजिवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्वअंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते ही संघटनात्मक उत्क्रांती आहे.

उ ) जोडणारे दुवे 

उत्तर :

i) काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे’ म्हणतात.

ii) हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात.

iii) उदा. पेरीपॅटस् या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचम व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे अँनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधीपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

iv) डकबिल प्लॅटीपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि त्याच्या शरीरावरील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यांसारखी आहेत.

v) ‘लंगफिश’ हा जरी मत्स्य आहे तरी तो फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात.

5. आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा.

उत्तर

एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस आनुवंशिकता म्हणतात. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी, कबुतरांची पिल्ले कबुतरांसारखी व मानवाची संतती मानवासारखीच असते.

आनुवंशिक बदल या प्रकारे घडतात – एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होताना त्यांच्यात लैंगिक प्रजनन झाल्यास पेशीविभाजनाच्या वेळी त्याच्या गुणसूत्रामध्ये (DNA) बदल होतो. त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत, केशरचना, डोळे यांचे रंग यामध्ये फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे अलैंगिक प्रजननात वातावरणीय गोष्टींचा परिणाम सजीवांवर होऊन त्यांच्यात नैसर्गिकरित्या आनुवंशिक बदल घडून येतात. उदा. जिराफची मान. आनुवंशिक बदल हे नैसर्गिक निवडीने होणारी प्रक्रिया होय.

6. अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यासाठी उपयुक्त आहेत हे लिहा.

उत्तर

सजीवांमधील हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात.

मानवी शरीरातील अवशेषांगाची नावे – माकडहाड, आंत्रपुच्छ, अक्कलदाढा, अंगावरील केस, कानांचे स्नायू.

अवशेषांग इतर प्राण्यासाठी उपयुक्त – i) मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.

ii) मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.

7. पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. 

अ. उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात ?

उत्तर :

आनुवंशिक गुणधर्म आई-वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे आनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधमांमुळे सजीवांत परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळुवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस आनुवंशिक बदलाचेच इंधन असते.

आ. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. 

उत्तर

गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे.

i) प्रत्येक m-RNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम t-RNA करतो. त्याकरिता m-RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम  असलेला अँटीकोडॉन t-RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात.

ii) t-RNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम r-RNA करतो. या दरम्यान रायबोझोम m RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो, या क्रियेस स्थानांतरण म्हणतात.

iii) प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात.

इ. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत ?

उत्तर

उत्क्रांतीचा सिद्धांत – सजिवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या, यापैकी ‘सजिवांची उत्क्रांती’ अथवा ‘सजिवांचा क्रमविकास’ हा सिद्धांत सर्वमान्य आहे.

i) उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला कालांतराने या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली.

ii) या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने व हळूहळू बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले.

iii) या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे.

iv) सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगानी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. म्हणूनच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात.

I) बाह्यरूपीय पुरावे – प्राण्यांमध्ये त्यांच्या तोंडाची रचना, डोळे, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील केस ही समान वैशिष्ट्ये आढळतात. यावरूनच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते.

II) शरीरशास्त्रीय पुरावे – वरवर पाहता मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा असल्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. पण त्यांच्या अवयवांतील हाडांच्या रचनेत व जोडणीत साम्य दिसते. यावरून त्यांचे पूर्वज समान असावेत हे निदर्शनास येते.

III) अवशेषांगे – मानवी शरीरात माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, आंत्रपुच्छ यासारखे अवशेषांग असतात. मानवामध्ये माकडहाड असते. ते माकडाच्या शेपटीच्या स्नायूंसारखे असतात. माकडांना ते शेपटी हलवण्यासाठी उपयोगी पडतात. यातून माकड व मानव यांचा पूर्वज एकच असावा हे सूचित होते.

IV) जीवाश्म विज्ञान पुरावे – पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या  आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

V) जोडणारे दुवे – (i) काही वनस्पती अथवा प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे’ म्हणतात. (ii) हे दुवे विद्यमान सजीवांमध्येही मिळू शकतात. (iii) उदा. पेरीपॅटस् या प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात जे अँनिलिडामध्ये आढळतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. (iv) डकबिल प्लॅटीपस हा प्राणी सरीसृप व सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. कारण तो सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि शरीरावरील केस व दुग्धग्रंथी ही लक्षणे सस्तन प्राण्यांसारखी आहेत. (v) ‘लंगफिश’ हा जरी मत्स्य आहे तरी तो फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. हे प्राणी सस्तन प्राणी असून हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत याकडे निर्देश करतात.

VI) भ्रूणविज्ञानातील पुरावे – (i) भ्रूणविज्ञानात भ्रूणापासून सजीव कसा विकसित होतो याचा अभ्यास केला जातो. (ii) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या विविध पिढ्यातील भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्येच ते कमी होत जाते. यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुराव मिळतो. याचा अभ्यास भ्रूणविज्ञानात केला जातो.

ई .  उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. 

उत्तर :

i) निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात.

उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते.

ii) बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे.

iii) परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.

उ . जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर

पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात यांनाच जीवाश्म म्हणतात.

उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म गृहीत धरतात- जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

i) जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C-14 चा न्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.

ii) C-12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता बदलत असते.

iii) एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील C-14 ची सक्रियता व C-14 व C-12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी होतो.

iv) अशाप्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना  कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल  माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो.

ऊ . सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.

उत्तर

एप वानरापासून उत्क्रांती होत आदिमानव निर्माण झाला.

कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांची वाटचाल विविध टप्प्यात झाली.

कुशल मानव – हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडात मिळाला. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता.

ताठ कण्याचा मानव – याचा मेंदू कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित होता. याला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कळले असावे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते.

शक्तिमान मानव – शक्तिमान मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती.

बुद्धिमान मानव – विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला ‘बुद्धिमान मानव’ म्हटले जाते. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. तो चित्रे काढू लागला होता व कलात्मक वस्तू ध्ये बनवू लागला होता.

प्रगत बुद्धीचा मानव – बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत अझाली. तेव्हा त्याला ‘प्रगत बुद्धीचा मानव’ असे नाव मिळाले. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित संक्रमित होत राहिली.

उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी

उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1. आकृती पूर्ण करा. 

अ. 

उत्तर :

आ. 

उत्तर :

इ. 

उत्तर :

2. खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. 

उत्तर :

3. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. 

 गोष्टी 

दक्षता 

 १) आळस 

२) परपीडा

३) सत्यमार्ग

 ……………………..

……………………..

……………………..

उत्तर :

 गोष्टी 

दक्षता 

 १) आळस 

२) परपीडा

३) सत्यमार्ग

सुख मानू नये

करू नये

सोडू नये. 


4. काव्यसौंदर्य

अ. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. 

‘जनीं आर्जव तोडूं नये | पापद्रव्य जोडूं नये |

पुण्यमार्ग सोडूं नये | कदाकाळीं ||’ 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, संकटात सापडले की माणसे ते संकट आपण दूर करावे म्हणून आपल्याला विनंती करत असतात. त्यांच्या विनंतीचा अव्हेर करू नये. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जेवढी मदत करणे आपल्यास शक्य आहे तेवढी मदत आपण अवश्य करावी. दुसरे असे की वाईट मार्गाने धन जोडू नये. कुणाला लुबाडून त्याचे धन हिसकावून घेणे. मालात भेसळ करणे, लाच खाणे,कामात घोटाळे करून पैसा मिळवणे, पैशासाठी विश्वासघात करणे ह्या मार्गानी द्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग कधीही सोडू नये, असा समाजहिताचा आशय यात आला आहे.  

या पद्यपंक्तीचे शैलीच्या दृष्टीने विचार करता ‘तोडू, जोडू, सांडू’ या अनुप्रासामुळे या पंक्तीला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. 

आ. ‘सभेमध्यें लाजों  नये | बाष्कळपणें  बोलों  नये |’, या ओळीतील विचार स्पष्ट करा. 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की सभेमध्ये बोलताना लाजू नये. सभाधीटपणा असावा. सभेत आपले विचार निर्भयपणे मांडायला हवेत. त्याचप्रमाणे मुद्देसुद बोलावे. त्यात फालतूपणा, बाष्कळपणा नसावा. त्या दोन गोष्टी कळल्या तरच सभेवर आपला प्रभाव पाडता येईल. 

इ. ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, आळसात सुख मानू नये. वास्तविक आळसामुळे आपल्या कार्याचा नाश होत असतो. अभ्यासाचा आळस केला तर अभ्यासाची कटकट चुकवल्याचा तात्पुरता आनंद वाटतो पण त्यामुळेच परीक्षेत गुण कमी मिळतात व पश्चातापाची पाळी येते. अभ्यासाच्याच नव्हे तर सर्वच कामात आळसामुळे कार्य नाश होतो.