अंतर्गत हालचाली स्वाध्याय
अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी
अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल
प्रश्न. 1. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा.
1) अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत ?
भरूपांवर
गतीवर ✓
दिशेवर
2) मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो ?
दाब
ताण ✓
पर्वत
3) खचदरी निर्माण होण्यासाठी भुकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते ?
ताण ✓
दाब
अपक्षय
4) खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता ?
सातपुडा
हिमालय ✓
पश्चिम घाट
5) विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे ?
पर्वतनिर्माणकारी
खंडनिर्माणकारी ✓
क्षितिजसमांतर
प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा.
1) हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.
उत्तर ;
कारण – i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते.
ii) या ऊर्जालहरी भूपृष्ठाकडे येतात. या लहरी घन, द्रव वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.
iii) या प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागेपुढे हलतात. अशाप्रकारे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या या कारणांमुळे जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.
2) मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
उत्तर :
कारण – i) मेघालय पठार व दख्खन पठार हे दोन्ही पठार असूनही त्यांची निर्मिती वेगवगेळ्या प्रकारे झाली आहे.
ii) मेघालय पठाराची निर्मिती विभंगामुळे झाली आहे. हे गट पर्वताचे उदाहरण आहे. तर दख्खनचे पठार हे भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. म्हणून मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
3) बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
उत्तर :
कारण – i) भूपट्ट सीमांचा ज्वालामुखीक्षेत्राशी थेट संबंध आहे.
ii) भूपट्ट सीमांवर वर्तमान वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्याचे अवशेष तिथे जागृत असतात. ही सतत होणारी क्रिया असते. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
4) बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
उत्तर :
कारण – i) बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता. परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.
ii) या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे.
iii) या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाच्या संचयनामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
5) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
उत्तर :
कारण – i) सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.
ii) ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.
iii) भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात, तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
प्रश्न. 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा.
1) किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.
उत्तर :
शीघ्र भू-हालचाली – भूकंप, ज्वालामुखी
2) हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.
उत्तर :
मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली
3) पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.
उत्तर :
शीघ्र भू-हालचाली – ज्वालामुखी
4) प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.
उत्तर :
मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली.
प्रश्न. 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.
1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो.
2) भूपट्ट अचानक हलतात.
3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
उत्तर :
3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
2) भूपट्ट अचानक हलतात.
1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो.
4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
प्रश्न. 5. फरक स्पष्ट करा.
1) गट पर्वत व वली पर्वत
उत्तर :
गट पर्वत |
वली पर्वत |
i) भूकवचातील खडकांवर ताण पडल्याने किंवा कठीण खडकांवर प्रचंड दाब पडल्याने खडकांमध्ये विभंग तयार होतात. या विभांगांच्या पातळीवर खडकांची हालचाल होते. काही वेळा दोन विभंगामधला खडकांचा भाग जास्त उंचीवर उचलला जातो. त्याद्वारे गट पर्वतांची निर्मिती होते. त्यांना गट पर्वत असे म्हणतात. ii) युरोपमधील ब्लॅक फॉस्फेट पर्वत, भारतातील मेघालय पठार. |
i) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे भुकवचातील मृदू खडकांच्या थरांवर दाब पडतो व मृदू खडकांच्या थरांमध्ये वळ्या तयार होतात. परिणामत: खडक जास्त उंचीवर उचलेले जातात. यातून ज्या पर्वतांची निर्मिती होते त्यांना वली पर्वत असे म्हणतात. ii) हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. |
2) प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
उत्तर :
प्राथमिक भूकंप लहरी |
दुय्यम भूकंप लहरी |
i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात. ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागपुढे होते. iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. |
i) प्राथमिक लहरींच्यानंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्यालहरींना दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभीकेंद्रापासून चहूबाजूंना पसरतात. ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने लंबरूप म्हणजे वर-खाली होते. iii) या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. |
3) भूकंप व ज्वालामुखी
उत्तर :
भूकंप |
ज्वालामुखी |
i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भुकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, यालाच भूकंप असे म्हणतात. ii) भूकंपामुळे इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. iii) काही वेळा भूकंपामुळे भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. |
i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायूरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वलामुखीचा उद्रेक होय. ii) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. iii) मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. |
प्रश्न. 6. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर :
भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
i) भूपट्ट सरकणे – दृढ शिलावरण हे स्वतंत्र अशा अनेक भूपट्टापासून बनले आहेत. भूपट्ट दुर्बलावरण या स्तरावर तरंगत आहे. हे भूपट्ट तरंगत -असतांना एकमेकांना घसटत एकमेकांपासून दूर सरकतात. त्यामुळे भूकंप होतो.
ii) भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो.
iii) भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे – भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींचा भूपृष्ठावर परिणाम होत असतो. भूहालचालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात. त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते आणि खडक दुभंगतात व त्याचे स्थानांतर होते. खडक खाली सरकतात किंवा वर उचलले जातात.
iv) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो.
v) ज्वालामुखीचा उद्रेक – सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळतात. म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही, भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.
2) जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?
उत्तर :
i) मंद भू-हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते.
ii) म्हणजेच जगातील प्रमुख वली पर्वत मंद भू-हालचालींच्या पर्वतनिर्माणकारी हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
3) भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे ?
उत्तर :
i) भूकंपाच्या धक्क्यामुळे भूपृष्ठाचा काही भाग प्रसरण पावतो त्यात ताण निर्माण होतात व कमी-अधिक लांबी, रुंदी व खोली असलेल्या भेगा पडतात.
ii) तीव्र भूकंपामुळे ज्या जमिनीवरून पृष्ठतरंग प्रवास करतात त्या भागातील जमीन वर-खाली हेलकावताना दिसते. भेगेलगतची जमीन खचल्यामुळे अनेक वस्त्या गाडल्या जातात. म्हणून भूकंपाची तीव्रता व घराची पडझड यांचा फार जवळचा संबंध आहे.
4) भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते ?
उत्तर :
भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
i) भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात.
ii) भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
iii) काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
iv) काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
v) सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लारामळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
vi) हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोमळतात.
vii) इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
viii) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
ix) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.
5) भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर :
भूकंप लहरींचे प्रमुख तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
1) प्राथमिक लहरी – i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रित्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरीना प्राथमिक लहरी म्हणतात.
ii) या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात.
iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करतांना त्याच्या दिशेत बदल होतो.
iii) प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढे-मागे हलतात.
2) दुय्यम लहरी – i) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते.
ii) या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.
iii) या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.
iv) या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात.
v) या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.
3) भूपृष्ठ लहरी – i) प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते.
ii) या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात.
iii) त्या अतिशय विनाशकारी असतात.
6) ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
उत्तर :
i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ‘ज्वालामुखीचा उद्रेक होय.
ii) ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.
iii) ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूपानुसार खालील दोन प्रकार / वर्गीकरण केले जाते.
1) केंद्रीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखादया नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.
ii) बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकुच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात.
iii) जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.
2) भेगीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात.
ii) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
iii) भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.
उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.
3) जागृत ज्वालामुखी – वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा. जपानच्या फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
4) सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी – काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा. इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.
5) मृत ज्वालामुखी – ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा. टांझानियातील किलीमांजारो.
प्रश्न. 7. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.
उत्तर :
प्रश्न. 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.
1) माउंट किलोमांजारो
2) मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र
3) माउंट फुजी
4) क्रॅकाटोआ
5) माउंट व्हेसुव्हियस
उत्तर :