विद्युत इस्त्रीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात ते सांगा

विद्युत इस्त्रीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते सांगा.

उत्तर :

विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोधकतेच्या संमिश्राच्या तारेचे कुंतल धातूच्या जड ठोकळ्यांमध्ये अभ्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते. या कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित केली असता, ते तापून निर्माण होणारी उष्णता धातूच्या ठोकळ्यांना मिळते. त्यामुळे इस्त्रीची खालची बाजू तापून तिचा उपयोग कपड्यांना इस्त्री करण्यासाठी करता येतो. इस्त्रीला प्लास्टिकसारख्या विसंवाहकाची मूठ बसवलेली असते.

अभ्रक विद्युत रोधक असल्याने त्यातून धातूच्या ठोकळ्यापर्यंत विद्युतधारा पोहोचू शकत नाही. परिणामी इस्त्री वापरणाऱ्याचा विजेच्या धक्क्यापासून बचाव होतो.