आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.  

आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.  

उत्तर :

i) आईवडिलांची जनुके त्यांच्या जनक पेशीतून, म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांतून संततीत जातात. 

ii) काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. यं जनुकांची वैशिष्टये जशी असतील, तसेच गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. 

iii) त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. 

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

उत्तर :

जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात

शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात

उत्तर :

i) शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यातम कक्षा पूर्ण असतात.

ii) या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सरूपण स्थिर असते . ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किवा भागीदारी करीत नाहीत; तसेच रासायनिक अभिक्रियेचे भाग घेत नाहीत. ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात, म्हणून शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात.

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

उत्तर :

i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.

ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.

iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

उत्तर :

i) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात.

ii) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.

iii) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत

उत्तर :

i) हिमालयातील बहुतांश नदया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.

ii) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. 

iii) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

उत्तर :

i) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.

ii) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.

iii) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते.

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

उत्तर :

i) भारत देश सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.

ii) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो.

iii) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणेमुळे भारतात आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारताची लोखसंख्या जास्त असून भारतात शेती-उद्योगधंद्याचा विकास झाला आहे. म्हणून भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

उत्तर :

i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.

iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते.