भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा
उत्तर :
भारताची प्राकृतिक रचना | ब्राझीलची प्राकृतिक रचना |
i) भारताची प्राकृतिक रचना ही भारतीय भूमीची समुद्रपाटीपासूनची उंची, भू-उतार, खडक प्रकार इत्यादी घटकांतील विविधता विचारात घेऊन केली आहे. ii) भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग केले जातात. 1. हिमालय 2. उत्तर भारतीय मैदान 3. द्वीपकल्प 4. किनारपट्टीचा प्रदेश 5. द्वीपसमूह iii) भारतात अतिप्राचीन पठारे व अतिउंच पर्वत आहेत. iv) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा तरीबहुज प्रदेश बनतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तसेच हा भाग विस्तीर्ण मैदानांचा आहे. v) भारतात उत्तर वाहिनी, दक्षिण वाहिनी, पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या आहेत. | i) ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझाॅन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने दोन भाग पडतात. ii) ब्राझीलचे पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. 1. उच्चभूमी 2. अजस्त्र कडा 3. किनारी प्रदेश 4. मैदानी प्रदेश 5. द्वीपसमूह iii) ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. iv) उत्तरेकडील ॲमेझाॅनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही विस्तीर्ण मैदाने नाहीत. v) ब्राझीलमध्ये पूर्व वाहिनी नद्या आहेत. |