|
प्रश्न |
एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. |
|
उत्तर
|
i) मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.
ii) गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा- इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.
|
swadhyaybooks.com
हवामान स्वाध्याय
हवामान स्वाध्याय
इयत्ता दहावी भूगोल हवामान स्वाध्याय
बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राॅडे दो नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझाॅनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.
|
प्रदेश |
भारत |
ब्राझील |
|
जास्त पावसाचे |
|
|
|
मध्यम पावसाचे |
|
|
|
कमी पावसाचे |
|
|
उत्तर :
|
प्रदेश |
भारत |
ब्राझील |
|
जास्त पावसाचे |
पश्चिम घाट, गोवा, पूर्व हिमालय, पूर्व महाराष्ट्र |
ॲमेझाॅनास, रिओ ग्रांडे दो सुल |
|
मध्यम पावसाचे |
पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्रप्रदेश |
सांता कॅटरिना, रोराईमा |
|
कमी पावसाचे |
गुजरात, राजस्थानचा पश्चिम भाग |
पराईबा, टोकॅटींन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, रिओ ग्राॅडे दो नॉर्ते |
प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
अ ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
आ ) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असतात.
उत्तर : हे विधान चूक आहे.
कारण – ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू नसतात. जसे ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात उन्हाळा असतो तर भारतात जानेवारी महिन्यात हिवाळा ऋतू असतो.
इ ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे.
ई ) ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर : हे विधान चूक आहे.
कारण – ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
प्रश्न ३. भोेगोलिक कारणे लिहा.
अ ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर :
i) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात.
ii) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते..
iii) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
आ ) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर :
i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.
iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
इ ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
उत्तर :
i) ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते ते क्षितिज समांतर दिशेत ही हालचाल फारशी होत नाही, अशा प्रदेशात अभिसरण पाऊस पडतो.
ii) परंतु भारतात अशी स्थिती नाही. भारतात अतिउंच पर्वत, पठारे आहेत. भारतात येणारे बाष्पयुक्त वारे समुद्रावरून येतात. व मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे ते वारे अडवले जातात. उंचवट्याच्या अडथळ्यामुळे भारतात प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. अशाप्रकारे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
ई ) ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
उत्तर :
i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानत फारसा फरक पडत नाही.
ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊध्र्व दिशेने वहन होते.
iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधिय वादळे कमी प्रमाणात होतात.
उ ) मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
उत्तर :
i) मॅनाॅस शहर हे ब्राझील देशात उत्तर दिशेला आहे. शहर विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथील तापमान उष्ण आहे.
ii) विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. तसेच येथे लंबरूप सूर्यकिरणे पडतात. म्हणून मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
ऊ ) ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो.
उत्तर :
i) भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मौसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
ii) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
iii) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे, ईशान्य मान्न वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
उत्तर :
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत :
i) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.
ii) उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५° से ते ३०° से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५० से ते १०० से असते.
iii) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.
iv) उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.
आ ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
उत्तर :
i) हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.
ii) पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
iii) हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैर्ऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात.
iv) नैर्ऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो,
v) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो.
vi) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात.
vii) नैर्ऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात.
viii) ईशान्य दिशेकडून वाहणा-या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.
इ ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
उत्तर :
i) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजख कडा इत्यादी घटक परिणाम करतात.
ii) विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक आढळते. याउलट, ब्राझोलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
iii) ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५° से ते २८° से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
iv) ब्राझीलमधील अँमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
v) ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
vi) अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
vii) ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
viii) ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश’ किंवा ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.
ई ) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
उत्तर :
भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :
i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सोेम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत
|
प्रश्न |
ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत |
|
उत्तर
|
i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. |
ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही
|
प्रश्न |
ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही |
|
उत्तर
|
i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे. iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. |
मानवी वस्ती स्वाध्याय
मानवी वस्ती स्वाध्याय
मानवी वस्ती स्वाध्याय इयत्ता दहावी
प्रश्न १. अचूक पर्यायांस समोरील चोेकटीत ✓ अशी खूण करा.
अ ) वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.
i) समुद्रसान्निध्य
ii) मैदानी प्रदेश
iii) पाण्याची उपलब्धता ✓
iv) हवामान
आ) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ?
i) केंद्रित ✓
ii) रेषाकृती
iii) विखुरलेली
iv) ताराकृती
इ ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो.
i) नदीकाठी
ii) वाहतूक मार्गाच्या लगत
iii) डोंगराळ प्रदेश ✓
iv) ओेेदयोगिक क्षेत्रात
ई ) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.
i) वनाच्छादन
ii) शेतीयोग्य जमीन ✓
iii) उंचसखल जमीन
iv) उद्योगधंदे
उ ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते ?
i) पारा ✓
ii) आमापा
iii) एस्पिरितो सांन्तो
iv) पॅराना
प्रश्न २. भोेगोलिक कारणे लिहा.
अ ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
उत्तर :
i) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
ii) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
iii) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
आ ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर :
i) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
ii) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
iii) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
इ ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर :
i) भारत देश विकसनशील आहे. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केल्याने अनेक नवीन उद्योगधंदे भारतात विकसित झाले आहे.
ii) ज्या ज्या भागात उद्योगधंदे स्थापन झाले तिथे रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले. तो भाग दाट लोकवस्त्याचा झाला.
iii) नगराचे रूपांतर महानगरात झाले. लोकांच्या सुखसुविधा वाढल्या, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले. त्याचा प्रभाव ग्रामीण भागावर पडल्याने ग्रामीण लोकचेही राहणीमान सुधारले, त्याच्याही सुख – सुविधेच्या मागणीत वाढ झाली. तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, कॉलेजेस, नवनवीन फ्लॅट सिस्टीम सुरू झाल्याने ते शहरांशी जोडल्या जाऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागाचे शहरात रूपांतर होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच नागरीकरणाला सुरुवात झाली. अशाप्रकारे भारतात नागरीकरण वाढत आहे.
ई ) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर :
i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उ ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
उत्तर :
i) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
ii) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
iii) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले.
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा
अ ) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
उत्तर :
|
भारतातील नागरीकरण |
ब्राझीलमधील नागरीकरण |
|
i) भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने आढळते. ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. iii) भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दखिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. iv) गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. |
i) ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. ii) २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. iii) ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. iv) सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. |
आ ) गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझाॅन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.
उत्तर :
|
गंगा नदीचे खोरे |
ॲमेझाॅन नदीचे खोरे |
|
1. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. 2. गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे. 3. गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे. 4. यमुना, चंबल, बेटवा, केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत. |
2. ॲमेझाॅन नदीची एकूण लांबी ६४०० किमी आहे. 3. ॲमेझाॅन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 200000 क्युसेक एवढा आहे. 4. निग्रो, जापुरा, झिंग इत्यादी ॲमेझाॅन नदीच्या उपनद्या आहेत. |
इ ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते ?
उत्तर :
i) मानवी वस्ती म्हणजे एखाद्या भूप्रदेशात मानवाने तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वस्तिस्थान होय. निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे.
ii) पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. दैनंदिन वापराबरोबर शेती, उद्योग, प्राणी यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृतीचा उदय व विकास नद्यांकाठी झाला. आजही नदी, तलाव, सरोवर, धरणांच्या परिसरात मानवी वस्ती विकसित झालेली दिसून येते.
iii) मासेमारी करणारे मानवी समूह संगरकिनाऱ्यावर, नदीकाठी स्थायिक झाले. खाणकाम करणाऱ्यांना खाणीजवळ व कारखान्यातील कामगारांना ओेेदयोगिक क्षेत्राजवळ कायमचे वास्तव्य करणे आवश्यक असते. त्यामुळे जगात सर्वत्र स्थायी वस्त्या निर्माण झाल्या.
iv) सुपीक जमीन व सपाट मैदानी प्रदेशात शेती, उद्योगधंदे वाहतूक यांचा चांगला विकास होतो त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्येत वाढ होईल. लोकसंख्येत वाढ होणे म्हणजे वस्त्यांची वाढ होणे.
वरील सर्व कारणांमुळे मानवी वस्त्यांची वाढ अशा विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी स्वाध्याय

प्रश्न १ गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
अ ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण ………..
उत्तर : भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण प्रचंड लोकसंख्या
आ ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने …………….. व्यवसायावर अवलंबून आहे.
उत्तर : ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
इ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ……………. प्रकारची आहे.
उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसिनशील प्रकारची आहे.
प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे.
उत्तर :
i) ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
ii) ब्राझीलच्या पश्चिम भागात अँमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.
iii) या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.
iv) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.
आ ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?
उत्तर :
भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य –
i) भारताला एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशालाही ७४०० किमी लांबीचा सागरकिनार लाभला आहे.
ii) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ब्राझीलमध्येही मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशात रोजगारनिर्मिती व परकीय चलन प्राप्त कर लाठी मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो.
iii) भारतामध्ये मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येही मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे.
भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक –
भारत | ब्राझील |
| i) भारताला ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ii) भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे. iii) भारतामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो. iv) भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागांना सागरी किनारा लाभला आहे. | i) ब्राझीलला भारतापेक्षा कमी म्हणजे ७४०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ii) ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे. iii) ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते. iv) ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे |
प्रश्न ३. कारणे सांगा.
अ ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर :
i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस किमी आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७, २६३ चौरस किमी आहे.
ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
आ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर :
i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते.
ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न ४. पुढील आलेखच अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा.
उत्तर :
विश्लेषण –
i) भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. परंतु भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
ii) एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे योगदान – भारतात प्राथमिक व्यवसाय हे साधारणत: सारखेच आहेत. तर तृतीयक व्यवसायातून भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त उत्पन्न प्राप्त होते.
iii) विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी – भारतात प्राथमिक व्यवसायावर जास्त प्रमाणात लोक अवलंबून आहेत. त्यामानाने ब्र झीलमध्ये प्रमाण कमी आहे. द्वितीय व्यवसाय करणारे लोक दोन्ही देशात सारखेच आहे. तर तृतीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे.
वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते
|
प्रश्न |
वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. |
|
उत्तर
|
i) एखादया वस्तूचे वस्तुमान (m) म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप होय. परिणामी वस्तूचे वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते.
ii) एखादया वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वजन, W=mg. या सूत्रानुसार, गुरुत्वीय त्वरण (g) चे मूल्य सगळीकडे सारखे नसल्याने, वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते.
|
आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो
|
प्रश्न |
आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो. |
|
उत्तर
|
|
निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा
|
प्रश्न |
निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. |
|
उत्तर
|
निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो – i) मतदार यादया तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. ii) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. iii) उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. iv) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे. v) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे. vi) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे. |
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते
|
प्रश्न |
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते |
|
उत्तर |
हे विधान चूक आहे; कारण – i) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. ii) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. |