भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा

प्रश्न

 भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर

 

 

i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. 
ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बाली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान समेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. 

iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.

लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या दोन पद्धती लिहा

प्रश्न

 लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या दोन पद्धती लिहा

उत्तर

 

 i) लोखंडावर रंग, तेल किंवा ग्रीस यांचा थर लावला असता गंज रोखता येतो. 

ii) लोखंडाचा गंज किंवा क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला आहे.

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा

प्रश्न

 कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. 

उत्तर

 

 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते – 

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. 

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे

प्रश्न

 आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर

 

 

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. 

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.

तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते

प्रश्न

 तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

उत्तर

 

 

i) कालप्रवाहात विविध विचारसरणींचा उगम होत असतो.

ii) या विविध विचारसरणींचा समाजावर विविध काळात कमी-जास्त प्रभाव पडलेला असतो.

iii) या विविध विचारसरणींचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या, यांचा शोध घेण्याची गरज असते.

iv) या विचारसरणींच्या वाटचालींचा, त्यांच्या विकास-विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा

प्रश्न

 कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा

उत्तर

 

 

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली :

i) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 

ii) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते ?

iii) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती ? 

iv) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ? 

v) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?

vi) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 

vii) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतो खबरदारी घेतली जाते ? 

viii) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?

पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात

प्रश्न

 पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात.

उत्तर

 

 

ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. जसे –

i) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. 

ii) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात.

iii) घोडागाडी, रिक्षावाले किंवा अन्य वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. 

iv) पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोदयोग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो.

मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे

प्रश्न

 मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

उत्तर

 

 

i) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.

ii) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. 

iii) भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.

iv) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हटले आहे.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे

प्रश्न

 भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे

उत्तर

 

 

i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते. 

ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. 

iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात

प्रश्न

 ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात

उत्तर

 

 

i) ब्राझील देशात उत्तरेकडील अँमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. 

ii) या वर्षावनांतील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे (प्राणवायूचे) उत्सर्जन करतात. 

iii) या वर्षावनांमळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना ‘जगाची फुप्फुसे’ असे संबोधतात.