|
प्रश्न |
वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. |
|
उत्तर
|
पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात – i) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात. ii) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो. iii) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. iv) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. v) हस्तोदयोग, कुटीरोदयोग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. vi) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. vii) विविध प्रकारचे भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. viii) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते.. ix) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. x) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांधिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो. |
swadhyaybooks.com
लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे
|
प्रश्न |
लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे |
|
उत्तर
|
i) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. ii) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणपेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. iii) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीचे होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन आहे. |
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत
|
प्रश्न |
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत |
|
उत्तर
|
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पढील उपाययोजना केल्या जात आहेत : i) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. ii) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. iii) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. iv) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदयांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी. |
ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते
|
प्रश्न |
ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते |
|
उत्तर
|
i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते. |
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा
|
प्रश्न |
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. |
|
उत्तर
|
i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.
ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बाली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान समेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.
iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
|
मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो
|
|
|
|
प्रश्न |
|
|
उत्तर |
|
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा
|
प्रश्न |
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. |
|
उत्तर
|
i) पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताचीच नव्हे, तर जागतिक समस्या बनली आहे. ii) पर्यावरणाचा न्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी बासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या, iii) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत. iv) ‘चिपको’ सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, ‘नमामि गंगे’ सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे. |
समजातीय श्रेणी म्हणजे काय
समजातीय श्रेणी म्हणजे काय
उत्तर :
कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात.
समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा
समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
समजातीय श्रेणी : कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. लगतच्या दोन संयुगांमध्ये (वरच्या व खालच्या) एक – CH2 – गटाचा फरक असतो.
उदाहरणे :
अल्केन : अल्केन कुल हे समजातीय श्रेणीचे आहे आणि त्याचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे आहे.
समजातीय श्रेणीची वैशिष्ट्ये :
i) समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना – (अ) एका मेथिलिन (CH2) घटकाची भर पडते. (आ) रेणुवस्तुमान 14u ने वाढते. (इ) कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते.
ii) समजातीय श्रेणीतील संयुगात समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते.
iii) समजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते.
iv) समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक यांसारख्या भौतिक गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसून येते..
शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे
|
|
समस्येवर उपाय सुचवा |
|
प्रश्न |
शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे |
|
उत्तर |
उपाय – i) ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था शासनामार्फत वाढवावी. ii) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारनिमित्त शहरात येतात. या स्थलांतरित लोकांसाठी ते जेथे राहतात तेथे रोजगार निर्मिती व्हावी. तेथे लघुउद्योग, कुटिरोदयोग सुरू करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यायाने ते स्थलांतरित होणार नाही व झोपडपट्ट्यांच संख्या वाढणार नाही.
ii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना शासनांचा योजनेमार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दयावी. |