सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय

सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय

सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(महात्मा गांधी, खुदा-ई-खिदमतगार, रॅम्ये मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू)

1) लंडनमध्ये ………………. यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 

उत्तर :

लंडनमध्ये रॅम्ये मॅक्डोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 

2. खान अब्दुल गफारखान यांनी …………… या संघटनेची स्थापना केली. 

उत्तर :

खान अब्दुल गफारखान यांनी खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 

3. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ………………. यांनी केले. 

उत्तर :

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. 

4. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ………………. उपस्थित होते. 

उत्तर :

दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. 

2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. 

उत्तर :

पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले; परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला; म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली. 

2) सोलापुरात सरकारने ‘मार्शल लॉ’ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. 

उत्तर :

सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. ६ मे १९३० रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेचे पोलिस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. 

3) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 

उत्तर :

पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 

4) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. 

उत्तर :

गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्या नुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.

3. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले ?

उत्तर :

लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी, ही प्रमुख मागणी होती; परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. 

2) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?

उत्तर :

गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने अटक केली. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केलि. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेर एप्रिल १९३४ मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.    

प्रश्न. 4. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा. 

उत्तर :

इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने इयत्ता नववी

इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………….. येथे आहे. 

उत्तर :

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.  

2. दृक – श्राव्य साधनांमध्ये ………… या साधनाचा समावेश होतो. 

उत्तर :

दृक – श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो. 

3. भोेतिक साधनांमध्ये ………….. चा समावेश होत नाही. 

उत्तर :

भोेतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही. 

ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

 व्यक्ती 

 विशेष

1. जाल कूपर 

2. कुसुसाग्रज

3. अण्णाभाऊ साठे 

4. अमर शेख 

टपाल तिकीट अभ्यासक 

कवी

लोकशाहीर 

चित्रसंग्राहक

उत्तर :

अमर शेख – चित्रसंग्राहक

प्रश्न 2. टिपा लिहा 

1.  लिखित साधने

उत्तर :

i) वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात. 

ii) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास ‘अभिलेखागार’ असे म्हणतात. 

iii) आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 

iv) १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. 

v) टपाल तिकिटावरून इतिहासकार इतिहास सांगू शकतात. तसेच टपालखाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखादया घटनेवर, एखादया घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.

2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

उत्तर :

i) १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही महत्त्वाचा स्रोत आहे. 

ii) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेख, छायचित्रे, आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. 

iii) १९९० च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्य पाठवायला सुरुवात केली. तसेच पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे 

iv) आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.

प्रश्न 3. कारणे लिहा. 

1. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते

उत्तर :

कारण – i) टपाल तिकिटे ही लिखित साधनांपैकी एक साधन आहे. 

ii) टपाल तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती व्यांमुळे टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती देतात. 

iii) टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखादया घटनेवर, एखादया घटनेच्या मौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. म्हणून टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

2. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात

उत्तर :

कारण – i) दृक-श्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन, चित्रपट, वृत्तपट, अनुबोधपट यांचा समावेश होतो. 

ii) इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले. 

iii) समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट (डॉक्युमेंटरीज) या विभागाने तयार केले आहे. त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. 

भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला

भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर : 

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले.

इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने

2. युरोप आणि भारत 

3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम 

4. 1857 चा स्वातंत्र्यलढा

5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

7. असहकार चळवळ

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी

british satteche parinam swadhyay

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) पोर्तुगीज, ……………, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. 

अ) ऑस्टियन

ब) डच

क) जर्मन

ड) स्वीडिश

उत्तर :

पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

2) १८०२ मध्ये ……………….. पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 

अ) थोरले बाजीराव

ब) सवाई माधवराव

क) पेशवे नानासाहेब

ड) दुसरा बाजीराव

उत्तर :

१८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

3) जमशेदजी टाटा यांनी …………………… येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. 

अ) मुंबई

ब) कोलकाता

क) जमशेदपूर

ड) दिल्ली

उत्तर :

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

प्रश्न. 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) मुलकी नोकरशाही

उत्तर :

भारतात स्थापन केलेली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये, असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्यांचे पगार वाढवले.

प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्याची भरती ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’ (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.

2) शेतीचे व्यापारीकरण

उत्तर :

इंग्रजी सत्तेच्या पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. मात्र इंग्रज सरकारने कापूस, नीळ व तंबाखू यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोकांनी अन्नधान्यांऐवजी जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर दिला. या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.

3) इंग्रजांची आर्थिक धोरणे

उत्तर :

इंग्लंड हे आधुनिक व विकसित राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. इंग्रजांनी इंग्लंडमधील भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

उत्तर :

जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

2) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर :

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले.

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. 

 व्यक्ती

कार्ये

 लॉर्ड कॉर्नवालिस

…………………..

 ………………….

सतीबंदीचा कायदा केला

 लॉर्ड डलहौसी

 …………………

 …………………..

 ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

उत्तर :

 व्यक्ती

कार्ये

 लॉर्ड कॉर्नवालिस

नोकरशाहीची निर्मिती

 लॉर्ड बेंटिंक

सतीबंदीचा कायदा केला

 लॉर्ड डलहौसी

 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा

 विल्यम जोन्स

 ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने

2. युरोप आणि भारत 

3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम 

4. 1857 चा स्वातंत्र्यलढा

5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

7. असहकार चळवळ

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात – 

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखगारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. 

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. 

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. 

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.  

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला-क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन          

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

उत्तर :

मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्यांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे – 

i) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘मुस्लीम स्थापत्यशैली’ असे म्हणतात. 

ii) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (240 फूट) आहे. 

iii) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. 

iv) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. 

v) फतेहपूर-सिक्री येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. 

vi) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन       

उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो

उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?

उत्तर :

‘उपयुक्तता’ हा उपयोजित कलांचा मुख्य हेतू असतो. त्या दृष्टीने उपयोजित कलाक्षेत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो –

i) औद्योगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी. 

ii) मुद्रणक्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या निर्मितीसाठी लागणारे तज्ज्ञ तसेच संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ. 

iii) भेटकार्ड, आमंत्रणपत्रिका, भेटवस्तू तसेच घरसजावटीच्या वस्तू तयार करणे. 

iv) दागदागिने, मौल्यवान वस्तू, नक्षीची भांडी, कापड, काचेच्या वस्तू यांची निर्मिती. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन       

गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा

गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा

उत्तर :

i) इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींचा प्रभाव वाढू लागला. 

ii) इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारी नंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेच्या भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला ‘गांधार शिल्पशैली’ असे म्हणतात. 

iii) हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात. 

iv) वायव्य सरहद्द प्रांत, पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत. गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यांमुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन    

लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

उत्तर :

i) लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राज्यस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. 

ii) मातीची खेळणी, बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. 

iii) पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. 

अशा धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन  

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

उत्तर :

अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले. 

i) गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकरीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात. 

ii) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. 

iii) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. 

iv) नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. 

v) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली. 

vi) वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन