दुखणं बोटभर प्रश्न उत्तरे
दुखणं बोटभर प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी
दुखणं बोटभर स्वाध्याय साठी पुढील लिंकवरती क्लिक करा
https://swadhyaybookspdf.com/2024/11/01/padyavarcha_chaha_swadhyay/
दुखणं बोटभर स्वाध्याय साठी पुढील लिंकवरती क्लिक करा
https://swadhyaybookspdf.com/2024/11/01/padyavarcha_chaha_swadhyay/
पाड्यावरचा चहा स्वाध्याय साठी पुढील लिंकवरती क्लिक करा
https://swadhyaybookspdf.com/2024/11/01/padyavarcha_chaha_swadhyay/
गोधडी स्वाध्याय साठी पुढील लिंकवरती क्लिक करा
अनाम वीरा स्वाध्याय साठी पुढील लिंकवरती क्लिक करा https://swadhyaybookspdf.com/2024/11/03/anam_vira_swadhyay/
कवितेची ओळख स्वाध्याय पाहण्यासाठी या लिंकवरती क्लिक करा. https://swadhyaybookspdf.com/2024/11/25/kavitechi_olakh_swadhyay/
संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा
उत्तर :
संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत.
i) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
ii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.
iii) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.
iv) याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.
13.-महाराष्ट्रातील-समाजजीवनसंयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते ?
उत्तर :
i) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते.
ii) तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात.
iii) संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना याप्रकारची भूमिका बजावते.
संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा
उत्तर :
संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.
ii) पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्पचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशिकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.
आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे. कारण – i) आमसभेत पर्यावरण, नि:शस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही.
ii) आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते. म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.
भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा
उत्तर :
i) भारतातील चर्मोद्योग हा मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे.
ii) चर्मोद्योग हा भारतातील एक परंपरागत उद्योग आहे. हा उद्योग संघटित व असंघटित क्षेत्रात विस्तारलेला आहे.
iii) या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल व कुशल कारागिर भारतात उपलब्ध असल्याने हा पारंपरिक उद्योग भारतात अधिक लाभदायक आहे.
iv) या क्षेत्रात काम करणारे लोक हे प्रामुख्याने अल्पसंख्याक व कनिष्ठ वर्गातील आहे.
v) भारतात पं. बंगाल व तमिळनाडू राज्य पशूंच्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर प्रदेश हे बकऱ्यांच्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच राज्यस्थान, मध्यप्रदेश हे महत्त्वपूर्ण चामडे उत्पादक देश आहे. पादत्राण उत्पादक देशांमध्ये कानपूर, आगरा, लखनऊ, कोलकता, चेन्नई, मुंबई, बंगळुरू व जयपूर यांचा समावेश होतो.