कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात – 

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखगारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. 

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. 

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. 

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.  

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला-क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन          

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा

उत्तर :

मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्यांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे – 

i) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘मुस्लीम स्थापत्यशैली’ असे म्हणतात. 

ii) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (240 फूट) आहे. 

iii) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. 

iv) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. 

v) फतेहपूर-सिक्री येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. 

vi) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन       

उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो

उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?

उत्तर :

‘उपयुक्तता’ हा उपयोजित कलांचा मुख्य हेतू असतो. त्या दृष्टीने उपयोजित कलाक्षेत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो –

i) औद्योगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी. 

ii) मुद्रणक्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या निर्मितीसाठी लागणारे तज्ज्ञ तसेच संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ. 

iii) भेटकार्ड, आमंत्रणपत्रिका, भेटवस्तू तसेच घरसजावटीच्या वस्तू तयार करणे. 

iv) दागदागिने, मौल्यवान वस्तू, नक्षीची भांडी, कापड, काचेच्या वस्तू यांची निर्मिती. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन       

गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा

गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा

उत्तर :

i) इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींचा प्रभाव वाढू लागला. 

ii) इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारी नंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेच्या भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला ‘गांधार शिल्पशैली’ असे म्हणतात. 

iii) हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात. 

iv) वायव्य सरहद्द प्रांत, पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत. गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यांमुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन    

लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

उत्तर :

i) लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राज्यस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. 

ii) मातीची खेळणी, बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. 

iii) पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. 

अशा धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन  

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा

उत्तर :

अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले. 

i) गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकरीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात. 

ii) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. 

iii) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. 

iv) नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. 

v) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली. 

vi) वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 

टिपा लिहा कला

प्रश्न 

टिपा लिहा कला

 उत्तर 

i) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला ‘कला’ असे म्हणतात. 

ii) ‘कला’ ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. 

iii) ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृतहोते.

iv) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत

प्रश्न

 ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत

उत्तर

 

 

i) ब्राझीलमधील अनेक नदया ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. 

ii) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे उम्याटण्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.

iii) या नदया अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. 

अ)

उत्तर :

आ.
उत्तर :

2. खाली मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. 

उत्तर :

1) आजीचे दिसणे : वयाची सत्तरावी ओलांडली तरी तिचा कणा ताठ होता. तिला काठीची गरज नव्हती. केस पांढरे व चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी तिच्या चेहऱ्याची ठेवण अशी होती की तारुण्यात ती किती सुंदर असेल याची जाणीव व्हायची. सर्व दात शाबूत होते व मोत्यासारखे चमकत होते.

2) आजीचे राहणीमान : पायात जुन्या वळणाऱ्या नालाच्या वहाणा, अंगात चोळी, हिरवं आणि लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं  गोंदण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का असे आजीचे राहणीमान होते.

3) आजीची शिस्त : आजीनं घरच्या सर्व स्त्रियांना कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, भांडी घासायची हे तिनं ठरवून दिलं होतं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं, प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे असा तिचा कटाक्ष होता. अशी आजीची शिस्त होती.

3. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) आळस

2) आदर

3) आस्था

4) आपुलकी

अ) अनास्था

ब) दुरावा

क) उत्साह

ड) अनादर

उत्तर :

 ‘अ’ गट

‘ब’ गट

1) आळस

2) आदर

3) आस्था

4) आपुलकी

इ) उत्साह

ई) अनादर

अ) अनास्था

आ) दुरावा

4. खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून आधेरेखित करा. 

अ. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. 

उत्तर :

सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

आ. दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. 

उत्तर :

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

इ. कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. 

उत्तर :

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

5. कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. 

(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची)

अ. समुद्रकिनारी …………………… सहल गेली होती. 

उत्तर :

समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

आ. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद …………………… झाला. 

उत्तर :

खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला.

इ. विजय अजयपेक्षा …………………. चपळ आहे. 

उत्तर :

विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.

ई. रवीला ………………… कैऱ्या खायला खूप आवडतात. 

उत्तर :

रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.

उ. मला गाणी ऐकण्याची ………………. आवड आहे. 

उत्तर :

मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.

ऊ. राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु …………….. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. 

उत्तर :

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

6. खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. 

उत्तर :

7. स्वमत

अ. ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं  वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. 

उत्तर :

वर्तमानपत्रातील माहिती जशी सर्व लोकांपर्यंत पोचते तशाच आजीच्या वाड्यात बायका ज्या ज्या विषयांवर बोलत असत त्याची पुढे गावभर चर्चा होत असे.

आ. तुलना करा / साम्य लिहा.

आगळ – वाड्याचे कवच

आजी – कुटुंबाचे संरक्षक कवच

उत्तर :

 आगळ

आजी

 i) वाड्याचे संरक्षक कवच

ii) घराबाहेर जाता येत नाही.

iii) रात्री आधार. भीती वाटत नाही.

i) कुटुंबाची संरक्षक कवच

ii) शब्दाबाहेर जाता येत नाही.

iii) कठीण प्रसंगात आधार. तिच्यामुळे कुटुंब निर्भय.

इ. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. 

उत्तर :

पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबत माझे मत असे की त्यातल्या काही गोष्टी मला आवडल्या, चांगल्या वाटल्या, पण काही गोष्टींबद्दल माझे मत प्रतिकूल आहे.

एकत्र कुटुंबपद्धतीत – i) शिस्त लागते ii) वळण मिळते iii) समतेची वागणूक असते आणि iv) भेदभाव नसतो v) संरक्षण मिळते. ह्या सर्व चंगल्या गोष्टी पाठात चित्रित झाल्या आहेत.

पण त्याचवेळी आजी i) हुकूमशाही पद्धतीने वागते. ‘आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या……’ असे वाक्य पाठात आहे. ज्येष्ठांबद्दल प्रेम व आदर असावा, त्याची भीती वाटू नये.

ii) या पद्धतीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा निर्माण होत असे.

iii) प्रत्येक सुनेला सर्व कामे करता आली पाहिजेत आणि त्यांची कामे रोटेशनप्रमाणे बदलायची. म्हणजे स्वयंपाकात ती सुगरण असेल तिने भांडी घासावीत आणि धडधाकट सुनेने बेचव स्वयंपाक करायचा. अमिताभने क्रिकेट खेळावे व सचिनने अभिनय करावा असेच हे चित्र आहे. या मला ब पटणाऱ्या गोष्टी आहेत.

ई. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. 

उत्तर :

आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच असते. आगळ लावली की घराबाहेर हुंदडण्याची सवयच बंद होते आणि रात्री मात्र तिचा आधार वाटतो. कुटुंबाच्या संदर्भात आजीही कुटुंबाची संरक्षक आहे. तिच्या दराऱ्यामुळे मुले बाहेर हुंदडायला जात नाही. आणि कठीण प्रसंगात मात्र तिचा आधार वाटतो. तिच्यामुळे निर्भय वातावरणात जगते. हे साम्य ‘आजी : कुटुंबाचं आगळ’ या शीर्षकातूनच दिसून येते. म्हणून हे शीर्षक निश्चितच समर्पक आहे.

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय 

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय इयत्ता दहावी 

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक ………….. करतात.

उत्तर : निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून …………… यांची नेमणूक झाली.

उत्तर : स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली.

3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ……………. समिती करते.

उत्तर : मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे, कारण –

i) त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात..

ii) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.

iii) धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण –

i) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.

ii) एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.

iii) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायदयाप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

3. एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते. 

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.

ii) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.

iii) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

३. संकल्पना स्पष्ट करा. 

1. मतदारसंघाची पुनर्रचना

उत्तर :

i) विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.

ii) निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.

iii) खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखादया मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते, तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते.

iv) हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

2. मध्यावधी निवडणुका

उत्तर :

i) विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या (पाच वर्षे) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात.अशा निवडणुकांना ‘मध्यावधी निवडणुका’ असे म्हणतात.

ii) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.

iii) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.

iv) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.

४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो –

i) मतदार यादया तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.

ii) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.

iii) उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.

iv) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.

v) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.

vi) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

2. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. 

उत्तर :

i) भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात.

ii) या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.

iii) संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.

iv) निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही.

3. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. 

उत्तर :

i) निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस ‘निवडणूक आचारसंहिता’ असे म्हणतात.

ii) निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात.