प्रश्न |
जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते. किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. किंवा पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो. |
उत्तर
|
i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न येता वरून आल्याचा भास होतो. म्हणून पाण्याची खोली कमी भासते किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. |