संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा

संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा

उत्तर :

संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत.

i) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

ii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

iii) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

iv) याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.

13.-महाराष्ट्रातील-समाजजीवन

संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते

संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते ?

उत्तर :

i) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते.

ii) तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात.

iii) संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना याप्रकारची भूमिका बजावते.

संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा

संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा

उत्तर :

संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.

ii) पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्पचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशिकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.

आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे

आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) आमसभेत पर्यावरण, नि:शस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही.

ii) आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते. म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा

भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा

उत्तर :

i) भारतातील चर्मोद्योग हा मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे.

ii) चर्मोद्योग हा भारतातील एक परंपरागत उद्योग आहे. हा उद्योग संघटित व असंघटित क्षेत्रात विस्तारलेला आहे.

iii) या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल व कुशल कारागिर भारतात उपलब्ध असल्याने हा पारंपरिक उद्योग भारतात अधिक लाभदायक आहे.

iv) या क्षेत्रात काम करणारे लोक हे प्रामुख्याने अल्पसंख्याक व कनिष्ठ वर्गातील आहे.

v) भारतात पं. बंगाल व तमिळनाडू राज्य पशूंच्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर प्रदेश हे बकऱ्यांच्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच राज्यस्थान, मध्यप्रदेश हे महत्त्वपूर्ण चामडे उत्पादक देश आहे. पादत्राण उत्पादक देशांमध्ये कानपूर, आगरा, लखनऊ, कोलकता, चेन्नई, मुंबई, बंगळुरू व जयपूर यांचा समावेश होतो.

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?

उत्तर :

i) भारतात देशा-परदेशांतील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

ii) पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

iii) पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमांतून लोकांना रोजगार निर्माण होतो.

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?

उत्तर :

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते.

i) ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

ii) पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मिळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.

iii) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशीचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

iv) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते.

v) उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

उत्तर :

कारण – i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे.

ii) तसेच भारतातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेला जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

उत्तर :

कारण – i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षवर येत असतात.

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.

उत्तर :

उपाय – i) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे रहदारी पोलिस खात्यांशी लक्ष केंद्रित करावे. त्यासोबत नागरिकांनी ही जागृक राहणे आवश्यक आहे.

ii) बहुतांश लोक प्रवासासाठी खाजगी वाहने वापरतात. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक बससेवा, रेल्वेसेवा वापरावी. त्यामुळे वाहतुक कोंडी होणार नाही.

iii) सर्वांनी रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर वाहतुकीची कोंडी होणार नाही.

iv) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध व्हाव्यात.