खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

उत्तर :

खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे –

i) खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात.

ii) माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हसित होते.

iii) खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते.

iv) खेळामुळे मनोधैर्य वाढते, चिकाटी व खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात.

v) सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते.. vi) खेळांमुळे नेतृत्वगुण विकसित होतात.

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.

ii) समाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.

iii) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.

iv) शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

उत्तर :

खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात –

i) खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक.

ii) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे स्मालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे साहाय्यक.

iii) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी.

iv) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे साहाय्यक व संगणक तज्ज्ञ.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.

ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.

iii) 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात; म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात.

ii) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात.

iii) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.

राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात

राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.

ii) शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात.

iii) या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात.

अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर :

i) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो.

ii) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते.

iii) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते.

iv) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात.

v) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीला निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

उत्तर :

स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या –

i) स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा.

ii) स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी.

iii) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाचे जगता यावे.

iv) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

राजकीय पक्ष कोणती कामे करतात

राजकीय पक्ष कोणती कामे करतात ?

उत्तर :

राजकीय पक्ष पुढील कामे करतात –

i) आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात.

ii) सत्ता मिळाल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करतात.

iii) जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे आणि योजना जनतेपर्यंत नेतात.

iv) शासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा ?

उत्तर :

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत –

i) धर्मनिरपेक्षता आणि सर्वागीण विकास साधणे.

ii) दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाजकल्याण हे उद्दिष्ट गाठणे.

iii) लोकशाही समाजवाद अस्तित्वात आणणे.

iv) आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास.