शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय
शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय इयत्ता नववी
इयत्ता नववी इतिहास शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय
प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ –
अ) डॉ. विजय भटकर
ब) डॉ. आर. एच. दवे
क) पी. पार्थसारथी
ड) वरीलपैकी कोणीही नाही.
उत्तर :
परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ – डॉ. विजय भटकर
2) जीवन शिक्षण हे मासिक ………… या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
अ) बालभारती
ब) विद्या प्राधिकरण
क) विद्यापीठ शिक्षण आयोग
ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
उत्तर :
जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
3) आय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
अ) कृषी
ब) वैद्यकीय
क) कुशल दर्जाचे व्यवस्थापन
ड) अभियांत्रिकी
उत्तर :
अभियांत्रिकी
प्रश्न. 2. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
1) भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंध तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती
|
कार्य
|
भारताचे पहिले शिक्षणमंत्री
|
………………..
|
……………………
|
विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
|
प्रा. सय्यद राऊफ
|
………………….
|
……………….
|
कोसबाड प्रकल्प
|
उत्तर :
व्यक्ती
|
कार्य
|
भारताचे पहिले शिक्षणमंत्री
|
मौलाना अबुल कलाम आझाद
|
डॉ. डी. एस. कोठारी
|
विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
|
प्रा. सय्यद राऊफ
|
इयत्ता 1 ली ते ७ वी च्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे
|
अनुताई वाघ
|
कोसबाड प्रकल्प
|
2) ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिचर्य अँड ट्रेनिंग’ या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा.
उत्तर :
प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
उत्तर :
कारण – i) १९९४ मध्ये ‘खडू-फळा’ योजनेचा विस्तार करून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली.
ii) मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती-जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले.
iii) शिक्षक भरतीत ५०% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले.
iv) १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे ठरले. म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
2) NCERT ची स्थापना करण्यात आली.
उत्तर :
कारण – i) केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा NCERT चा मुख्य उद्देश आहे.
ii) या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका वठवली.
iii) तसेच NCERT ने राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
iv) शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन – अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा यांसारखे उपक्रम राबवले म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली.
3) भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
उत्तर :
कारण – i) कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांद्वारे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कार्य सुरू झाले.
ii) या संस्थेद्वारे गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले.
iii) या संस्थेची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
प्रश्न. 4. टिपा लिहा.
1) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
उत्तर :
i) देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
ii) १९७४ मध्ये सरकारने पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशींनुसार २० सप्टेंबर १९८५ रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले.
iii) या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली.
iv) विद्यापीठाने १९९० मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक्-श्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला.
v) या विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे, परदेशात ४१ केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली.
2) कोठारी आयोग
उत्तर :
i) १९६४ मध्ये डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. तो कोठारी आयोग होय.
ii) या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १० + २ + ३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. १९७२ पासून ही व्यवस्था अंमलात आली.
iii) कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले.
iv) अनुसूचित जाती-जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या.
v) महाराष्ट्र राज्याने १० + २ + ३ ही शैक्षणिक रचना १९७२ मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची पहिली शालान्त परीक्षा घेतली.
3) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर
उत्तर :
i) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांत मोलाचे संशोधन केले.
ii) अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले.
4) बालभारती
उत्तर :
i) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली.
ii) शालेय विदयार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते.
iii) मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात.
iv) ‘किशोर’ हे विदयार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित करते.
प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) खडू – फळा (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ?
उत्तर :
‘खडू – फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता.
i) प्राथमिक शाळेत मुलांची १००% उपस्थिती : प्राथमिक शाळेत जास्तीत जास्त मुलांची उपस्थिती १००% टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढेल. सर्व शिक्षित होईल.
ii) विद्यार्थी गळती रोखने : प्राथमिक म्हणजे १ ली ते ५ वी गळतीचे प्रमाण जे ४६% आहे. व ५ वी ते १० पर्यंतचे गळतीचे प्रमाण ६०% पर्यंत आहे. ते अनुक्रमे २०% आणि ४०% घटविण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे सर्व शिक्षित होईल.
iii) मुलींचे शिक्षण : या योजनेअंतर्गत ज्या मुली सामाजिक व आर्थिक कारणाने शाळेत येवू शकत नाहीत त्यांना अनौपचारिक शिक्षणातून शिक्षण प्रवाहात आणणे हा उद्देश आहे.
iv) दिव्यांगासाठी शिक्षण : दिव्यांगासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असल्याने या योजनेअंतर्गत त्यासाठी शिक्षणाची सोय केली आहे.
v) प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन : प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन करून अभ्यासक्रमात पुनर्रचना करण्यात आली आहे. पाठाचा बोजा अभ्यासक्रमातून घटविण्यात आला असून पाठांतरावरील भर कमी केला आहे.
vi) पर्यायी शिक्षण : या योजनेत प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाचीही सोय केली आहे. व्यावसायिक शिक्षणाची गरज अभ्यासासाठी त्या जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात येते. आणि त्याआधारे मनुष्यबळाची गरज पाहून हे अभ्यासक्रम दिले जातात.
vii) समाजजागृती : शिक्षणामुळे समाजजागृती घडून येते. प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला तर अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी, परंपरा नष्ट होईल. समाज शिक्षित झाला तर समाजाची प्रगती होईल. देशाचा विकास होईल. या योजनेअंतर्गत समाजजागृती घडविण्याचाही उपक्रम राबविला आहे.
2) शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविदयालये कोणती भूमिका बजावतात ?
उत्तर :
शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविदयालये यांची भूमिका –
i) देशातील सर्व कृषी विद्यापीठातून आधुनिक तंत्राचे कृषी शिक्षण दिले जाते. कृषी संशोधनही त्याच पद्धतीने चालते.
ii) संकरित, सुधारीत शेती संशोधनाबरोबर आता जनुक बदल, एरोपॉनिक, हायटेक संशोधन केले जाते.
iii) मात्र गेल्या काही वर्षांपासून काही अध्यात्मिक शिक्षकांनी सेंद्रिय व वैदिक शेतीचे प्रयोग सुरू करून त्याचा प्रचार व प्रसार केला आहे. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत कृषी विद्यालयांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
iv) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे. कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सक्षम शेती करून दाखविली पाहिजे यासाठी शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
3) भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर :
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती – i) ‘भारतीय वैद्यकीय उत्तर अनुसंधान परिषद’ या संस्थेने विविध रोगांवर संशोधन करणारी २६ केंद्रे देशभर सुरू केली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
ii) याच क्षेत्रातील प्रगत वैदयकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली.
iii) या संस्थेवर वैदयकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली.
iv) वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविदयालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत.
v) सर्वसामान्यांना माफक दरात वैदयकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली.
iv) सरकारने वैदयकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी १९५८ मध्ये ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेचे पुनर्गठन केले. या संस्थेवर वैदयकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली.
4) तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा.
उत्तर :
i) ‘स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ – या उपक्रमाअंतर्गत शाळेचा परिसर व त्याबाहेरील परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले जाते.
ii) पर्यावरण संरक्षण – पर्यावरण संरक्षणासंबंधी ‘झाडे लावा जीवन जगवा’, ‘वृक्षदिंडी’ हे उपक्रम राबविल्या जातात. या उपक्रमांद्वारे झाडांचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जाते.
iii) मुली वाचवा – ‘मुलगी ही ओझ नसून ती दोन्ही घरांचा उद्धार करणारी असते,’ हे सर्वांना समजावून सांगण्यासाठी ‘मुली वाचवा’ हा उपक्रम शालेय आणि सहशालेय यांच्या मार्फत राबविल्या जातो. या उपक्रमाअंतर्गत मुलींचे मोफत शिक्षण, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, मुलींची सर्व क्षेत्रातील प्रगती यासंबंधी माहिती दिली जाते.
इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा.
1. इतिहासाची साधने स्वाध्याय
2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय
3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय
4. आर्थिक विकास स्वाध्याय
5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय
6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय
7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय
8. उद्योग व व्यापार स्वाध्याय
9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय
10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय